Friday, May 24, 2019

चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ


                                   (चोळ घराण्याचा कालावधी इ.स. 850 ते इ.स.1279)
                                      (द्वारसमुद्राचे होयसळांचा कालावधी इ.स. 984 ते इ.स.1346) 



Image result for brihadeshwara temple tanjore
बृहदेश्वर मंदिर, तंजावर 

 



Image result for chennakeshava temple belur
चन्नकेशव मंदिर, बेलूर  

     Image result for chennakeshava temple belur
            चन्नकेशव मंदिर, बेलूर 

शिलाबालिका   

प्रश्न 1 - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. चोळांची राजधानी तंजावर ही होती.
2. प्रत्येक खेड्यातील ग्रामसभेला  महासभा अथवा पेरंगुरी असे म्हटले जात असे.
3. चोळांच्या काळातील अग्रहार असलेले प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र उत्तर मेरूर
4. बेंगळूरजवळील बेगूर येथे चोळांनी चोळेश्वर हे मंदिर बांधविले.
5. होयसळ राजाच्या अंगरक्षक दलाला गरूड म्हटले जायचे.

6. राघवंकाने हरिश्चंद्रकाव्य ही कविता लिहिली.

प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे द्या.

1. चोळ साम्राज्याचा संस्थापक कोण ?
उत्तर : करीकळ हा चोळ साम्राज्याचा संस्थापक होय.
2. चोळ राज्यकारभाराची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती
उत्तर : चोळांनी समर्थ आणि योग्य राज्यकारभार केला. मंडळ, कोटवंगी, नाडू, कुर्रम किंवा ग्रामसमुदाय आणि तरकुर्रम असे साम्राज्याचे वेगवेगळे भाग पाडले होते. प्रत्येक गावात उर नावाची लोकांची समिती असे.
खेड्यांचा स्वतंत्र कारभार हे राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते. ग्रामसभा या प्रथम सभा असत. तरकुर्रम म्हणजे खेडे. प्रत्येक कुर्रमला ग्रामसभा असे. त्याला महासभा म्हटले जात असे. याला पेरंगुरी असेही म्हटले जात असे. त्यातील सभासदांना पेरुमक्कल म्हणत. सभासदांची निवड निवडणूक प्रक्रियेतून होत असे. संस्कृत विद्वान आणि श्रीमंतानाच फक्त निवडणुकांना उभे राहण्याचा अधिकार असे.
उत्पन्नाच्या 1/6 महसूल गोळ केला जात असे. पाणी पुरवठा पद्धतीवर विशेष लक्ष दिले जात असे. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षणाला उत्तेजन दिले.
3. होयसळांनी साहित्याला कसे प्रोत्साहन दिले त्याचे वर्णन करा.
उत्तर : या काळात कन्नड साहित्याची भरभराट झाली. रुद्रभटाने जगन्नाथ विजय लिहिले. जन्न कवीने यशोधरा चरित्र लिहिले. हरिहराने चंपू कविता गिरिजा कल्याण लिहिली. राघवंकाने हरिश्चंद्रकाव्य, केशिराजने शब्दमणी दर्पण लिहिले. संस्कृतमध्ये देखील अविस्मरणीय साहित्यकृती निर्माण झाल्या. रामानुजाचार्यांचे श्रीभाष्य व प्रसारभट्टाने लिहिलेला श्री गुण रत्नकोश ही महत्त्वाची उदाहरणे होत.

 अवांतर प्रश्न 

1. चोळांच्या काळातील साहित्यकृती कोणत्या ?
उत्तर : चोळांच्या कालावधीत कंबाने रामायण लिहिले. सिक्कीलरने पेरीयपुराण, तर तिरुक्कदेवाने जीविका चिंतामणी रचले.
Related image
होयसळांची सिंहमुद्रा 
2. होयसळांच्या मंदिराबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तर : होयसळांनी मृदू दगडात असंख्य मंदिरांची निर्मिती केली. त्यांच्या देवळात दिसून येणारी पाच वैशिष्ट्ये म्हणजे 1.नक्षत्राकृती सभागृह 2.उपपीठे 3.सुशोभित भिंती 4.कळस 5.खांब. अनेक सुंदर नर्तिकांचे पुतळे उभे केले आहेत. विष्णुवर्धनने चोळांवरील आपल्या विजयाच्या स्मरणार्थ तलकाडू येथे कीर्तीनारंग मंदिर आणि बेलूर येथे चन्नकेशव (विजयनारायण) ही मंदिरे बांधली. केटमल्ल सैन्याधिकारीने हळेयबीडू येथील होयसळेश्वर मंदिर बांधले. सोमदंड नायकाने सोमनाथपूर येथे केशवपूर मंदिर बांधले. अर्सिकेरी, गोविंदनहळ्ळी, दोड्डगड्डावळी आणि भद्रावती येथे अनेक मंदिरे आणि बस्ती बांधल्या. नाजूक कोरीव कामासाठी या कलाकृती प्रसिद्ध आहेत. दासोजा, चव्हाण, जकनाचार्य आणि डंकन हे त्या काळातील प्रमुख शिल्पकार होते.
3. विष्णुवर्धनने चोळांवरील आपल्या विजयाच्या स्मरणार्थ कोणती मंदिरे बांधली ?
उत्तर : विष्णुवर्धनने चोळांवरील आपल्या विजयाच्या स्मरणार्थ तलकाडू येथे कीर्तीनारंग मंदिर आणि बेलूर येथे चन्नकेशव (विजयनारायण) ही मंदिरे बांधली.
Image result for saint ramanujacharya
रामानुजाचार्य 

4. होयसळांच्या काळात कोणते धर्म अस्तित्वात होते ?
उत्तर : होयसळांच्या काळात जैन, बौद्ध, शैव, वैष्णव, वीरशैव, श्रीवैष्णव इ. धर्म अस्तित्वात होते.
5. होयसळांच्या काळात शैक्षणिक संस्था कोठे होत्या ?
उत्तर : मेलुकोटे, सालगाम, अर्सीकेरे आदी ठिकाणी उत्तम शैक्षणिक संस्था होत्या. अग्रहार, मठ आणि देवळे ही शैक्षणिक केंद्रे होती.

Related image
6. ‘गरुडविषयी माहिती द्या.
 उत्तर :  होयसळांच्या काळात राजाचे वेगळे सुरक्षा सैन्य (अंगरक्षक) सैन्य होते. त्याला गरुड म्हटले जात असे. या सैन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे जर राजाचा मृत्यू झाला तर यातील सैनिकदेखील बलिदान करीत असत. 








या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 






मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि कल्याणचे चालुक्य


(राष्ट्रकूट घराण्याचा कालावधी इ.स. 753 ते इ.स. 973)
(कल्याणच्या चालुक्य घराण्याचा कालावधी इ.स. 973 ते इ.स. 1189) 

Image result for rashtrakuta map marathi
वेरूळ मधील कैलास मंदिर 


प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक दंतीदुर्ग होय.
2. राष्ट्रकूट राजाचा पराभव केलेल्या कल्याणचा चालुक्य घराण्यातील राजा दुसरा तैलप हा होय.
3. कवीरहस्याचा लेखक हलायुध.
4. पोन्नानी शांतीपुराण ही प्रसिद्ध कविता लिहिली.
5. कल्याणच्या चालुक्यामध्ये सहावा विक्रमादित्य हा सुप्रसिद्ध राजा होता.
6. या काळात सामाजिक सुधारणा करणारी व्यक्ती बसवेश्वर.

नाडोज पंप 

प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे लिहा.

1. राष्ट्रकूटांचा राज्यकारभार कसा होता ?
उत्तर : राष्ट्रकूटांच्या काळात राजपद हे वारसा हक्काने मिळत असे. मंत्रिमंडळ राजाला मदत करीत असे. मंत्रिमंडळात महत्त्वाच्या व्यक्तीची नेमणूक केली जात असे त्याला महासंधीविग्रह (परराष्ट्रमंत्री) म्हटले जात. तो विदेशी व्यवहार पहात असे. राज्यकारभाराच्या सुविधेसाठी साम्राज्याचे राष्ट्र, मंडळ, विशय, नाडू आणि ग्राम असे भाग पाडले जात असत. त्याचे प्रमुख त्याचा कारभार पहात. जमीन महसूल, जकात, घर, दुकाने आणि नावाड्यांचा कर हे राजाच्या उत्पन्नाचे साधन होते. परदेशी व्यापारातून कर मिळत असे.
2. राष्ट्रकूटांच्या काळातील शिक्षण पद्धती कशी होती ?
उत्तर : राष्ट्रकूटांच्या काळात अग्रहार आणि मठ ही शिक्षण केंद्रे होती. संस्कृत, वेद, खगोलशास्त्र, तर्कशास्त्र आणि पुराणांच्याबद्दल ज्ञान दिले जात होते. विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सालोतगी हे प्रगत शैक्षणिक केंद्र होते.
3. वेरूळ येथील मंदिराबद्दल लिहा.
उत्तर : वेरूळ येथे अखंड दगडात कोरलेले देऊळ आहे. हे कैलाशनाथ मंदिर पहिल्या कृष्णाने बांधले. हे एका दगडात कोरलेले आश्चर्यआहे. हे मंदिर 100 फूट उंच 278 फूट लांब आणि 154 फूट रूंद खडकात कोरलेले आहे.
4. कल्याणच्या चालुक्यानी साहित्याला कसे उत्तेजन दिले ?
उत्तर : कल्याणच्या चालुक्यानी साहित्याला उत्तेजन दिले. या काळात जैन विद्वानांच्या सहाय्याने कन्नड साहित्याची भरभराट झाली. या काळातील प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजे गदायुद्ध अथवा साहसभीम विजय (रण्ण), पंचतंत्र (दुर्गसिंह), विक्रमांकचरित्र (बिल्लण), धर्मामृत (नयनसेन), मिताक्षरी (विघ्नेश्वर), मानसोल्लास (तिसरा सोमेश्वर), संगीत चुडामणी (दुसरा जगदेकमल). याशिवाय त्या काळात वचन साहित्याची निर्मित झाली. अक्कमहादेवी, आलमप्रभू, माचय्या हे प्रमुख वचन साहित्यकार होते. 
----------------------------------------------------------------------------------------------
Image result for sant basaveshwar picture
संत बसवेश्वर 

Image result for kalyan chalukya coins
चालुक्यन काळांतील नाणी 
   












Image result for lakkundi kashivishweshwar devalaya
काशीविश्वेश्वर देवालय, लक्कुडी 

बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव


(बदामीच्या चालुक्य घराण्याचा कालावधी इ.स. 540 ते इ.स. 753)
(कांचीच्या पल्लव घराण्याचा कालावधी (इ.स. 350 ते इ.स.895) 

Image result for pattadakal virupaksha temple
पट्टडकल विरुपाक्ष मंदिर 


प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. पुलकेशीने राजा महेंद्रवर्मा या पल्लव राजाचा पराभव केला.
2. कर्नाटक हे नाव चालुक्य या घराण्याने दिले.
3. हर पार्वतीय हे संस्कृत नाटक शिवभट्टारकने लिहिले.
4. वातापिकोंड ही उपाधी पहिला नरसिंहवर्मा या पल्लव राजाला दिली गेली.
5. अर्जुनाची तपस्या ही कलाकृती महाबलीपूरम येथे आहे. 

Image result for mahabalipuram pancha rathas
महाबलीपुरम्मधील पंचरथ 

प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे द्या.

1. दुसऱ्या  पुलकेशीबद्दल माहिती लिहा.

Related image
पुलकेशी दुसरा 
 उत्तर : दुसरा पुलकेशी हा बदामीचे चालुक्य या घराण्यातील अत्यंत बलाढ्य व शूर सम्राट होय. गंग, कदंब व आलूप यांच्यावर वर्चस्व मिळवून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. पल्लवांचा शूर राजा महेंद्रवर्माला पराभूत केले. उत्तरेतील हर्ष वर्धन राजाने नर्मदा ओलांडून दक्षिणेकडे येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही रोखले. या विजयामुळे त्याला दक्षिण पथेश्वरद्विपकल्पाचा सम्राटया उपाध्या मिळाल्या. आपल्या प्रचंड साम्राज्यावर राज्यकारभार ठेवण्यासाठी त्यांने आपल्या दोन भावांना वेंगी व गुजरातचा व्यवस्थापक नेमले होते.
ह्यू एन त्संगने पुलकेशीबद्दल लिहून ठेवले आहे की पुलकेशी राजा न्यायी आणि दयाळू होता. त्याचे सैन्य शिस्तबद्ध आणि निधड्या छातीचे होते. राजाचे प्रजेवर अत्यंत प्रेम होते. तो आशावादी सम्राट होता. त्याचे विदेशी राजांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. पर्शियन राजा दुसरा खुस्त्रोशी त्याचे राजकीय संबंध होते.
2. चालुक्यांच्या राज्यकारभाराचे वर्णन करा.
उत्तर : राजाचा राज्यकारभारात सक्रीय सहभाग असे. साम्राज्याचे जिल्ह्यात विभाजन केले होते. त्याला विशय म्हटले जात असे. त्याची देखरेख विशयाधिपती करीत असे. खेडे हा राज्यकारभाराचा सर्वात लहान घटक होता. ग्राम प्रमुख खेड्यांची व्यवस्था व हिशोब ठेवत असे. चालुक्यांनी धर्म, साहित्य, कला आणि शिल्पकलेचे संवर्धन आणि रक्षण केले.
3. चालुक्य हे साहित्यप्रेमी होते. विशद करा. उदा. द्या.
उत्तर : बदामीच्या चालुक्यांनी  साहित्याला उत्तेजन दिले होते. त्यामुळे कन्नड आणि संस्कृत भाषेची वाढ झाली. कन्नड ही राजभाषा होती. काव्यातील त्रिपदीशैली अस्तित्वात आली. कानडी साहित्यकृती निर्मिती नसली तरी शिलालेख मात्र उपलब्ध आहेत.
बदामीच्या कप्पे आर्यभटाची त्रिपदी शैली काव्यरूपात आढळून येते. रविकिर्ती विज्जीका, अकलंक हे या काळातील संस्कृत विद्वान होते. दुसèया पुलकेशीच्या सुनेने कौमुदी महोत्सव लिहिले. शिवभट्टारकाने हर पार्वतीयहे संस्कृत नाटक लिहिले.
4. कांचीवर राज्य केलेल्या पल्लव राजांची नावे लिहा.
उत्तर : शिवस्कंदवर्मा, महेंद्रवर्मा, पहिला नरसिंहवर्मा, दुसरा महेंद्रवर्मा, पहिला परमेश्वर वर्मा, आणि दुसरा नरसिंहवर्मा, दुसरा कीर्तीवर्मा व शेवटचा राजा अपराजित या राजांनी
5. पल्लवांनी संस्कृत आणि तामिळ भाषेला कसे उत्तेजन दिले ?
उत्तर : पल्लवांनी संस्कृत आणि तामिळ भाषेला उत्तेजन दिले. कांची हे संस्कृत साहित्याचे केंद्र होते. भारवी (किरातार्जुनीय) आणि दंडी (दशकुमार चरित्र) हे या काळातील कवी होते. राजा महेंद्रवर्माने मत्तविलास प्रहसनहे सामाजिक नाटक, ‘भागवद्ज्जुकग्रंथ लिहिला. भक्तीमार्गाच्या चळवळीतील संतांनी तामिळ भाषेमध्ये श्लोक लिहिले आहेत.

Related image

दक्षिण भारत - सातवाहन, कदंब व गंग


(इ.स.पू.3 ते इ.स.13 व्या शतकापर्यंत)
(सातवाहन घराण्याचा कालावधी इ.स.पू.230 ते इ.स.220)
( कदंब घराण्याचा कालावधी इ.स. 325 ते इ.स.540)
( गंग घराण्याचा कालावधी इ.स. 350 ते इ.स.1004)

Image result for gomateshwara bahubali
गोमटेश्वर बाहुबली 

प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. सिमूकाने श्रीकाकूलम ही आपली राजधानी केली.
2. हलाने गाथासप्तशती हा ग्रंथ लिहिला.
3. कानडी भाषेतील पहिला शिलालेख हाल्मीडी होय.
4. कदंबाची राजधानी ही आताच्या उत्तर कन्नड या जिल्ह्यात आहे.
5. गंग घराण्यातील दुर्विनीत हा मुख्य राजा होय.
6. चौंडरायने लिहिलेला ग्रंथ चौडपुराण.

प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे लिहा.

1. सातवाहन घराण्यातील शेवटचा राजा कोण ? सातवाहन घराण्याचा èहास कसा झाला ? 
उत्तर : यज्ञर्षी सातकर्णी हा सातवाहनांचा शेवटचा राजा होता. त्याच्या कालावधीत शकांनी सतत आक्रमण केल्यामुळे त्यांचे साम्राज्य खिळखिळे झाले आणि त्यांचा èहास झाला.
2. सातवाहन काळातील कलेबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तर : सातवाहन राजांनी कला, साहित्य आणि शिक्षणाला उत्तेजन दिले. अजंठा आणि अमरावतीमधील चित्रकला सातवाहनांच्या काळात सुरू झाली. राजवाडे, देवळे विहार, चैत्यालय आणि किल्ले बांधले गेले. बनवासीचा व्यापारी भूतपालाने कार्ले येथे चैत्यगृह बांधले आहे.
3. गंगाच्या कारकीर्दीत कोणत्या सामाजिक मूल्यांना महत्त्व होते ?
उत्तर : प्रामाणिकपणा, एकनिष्ठता, शौर्य आणि संयम, धैर्य या सामाजिक मूल्यांना गंगाच्या कारकीर्दीत महत्त्व होते.
4. गंगाच्या कालावधीतील चार पुस्तकांची नावे लिहा.
उत्तर : गंगाच्या कालावधीत दुसरा माधवने दत्तकसूत्र लिहिले. दुर्विनिताने संस्कृतमध्ये शब्दावतार  ही रचना व गुणाढ्याच्या वोड्डकथांचे संस्कृतमध्ये भाषांतर केले. श्रीपुरुषाने गजशास्त्र लिहिले. शिवमाधवाने गजाष्टकची रचना केली. हेमसेनाने राघव पांडवीय, वादीबसिंहाने गद्यचिंतामणी आणि शास्त्रचुडामणी तर नेमचंद्राने द्रव्यसार संग्रह आणि चौंडरायाने चौडपुराण लिहिले.

Image result for karle chaityalaya
कार्लेतील चैत्यालय 
Image result for banvasi madhukeshwar temple
मधुकेश्वर मंदिर, बनवासी 

Image result for talakadu pataleshwar mandir
पाताळेश्वर मंदिर, तलकाडू 

गुप्त आणि वर्धन घराणे

gupta_period_map
गुप्त काळातील भारत 


Image result for mehrauli pillar


Image result for mehrauli pillar
मेहरूलीतील  लोहस्तंभ 



प्रश्न 1 - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. गुप्तांनी आपली कारकीर्द मगध या ठिकाणाहून सुरू केली.
2. पहिल्या चंद्रगुप्ताला महाराजाधिराज असे म्हटले जात असे.
3. कालिदासाचे प्रसिद्ध  नाटक शाकुंतल होय.
4. विशाखा दत्तची  मुद्राराक्षस ही प्रसिद्ध साहित्यकृती होय.
5. शुद्रकाने मृच्छकटिक ही साहित्यकृती लिहिली.
6. वर्धन घराण्याचा संस्थापक पुष्यभूती हा होय.
Image result for shakuntala kalidasa
शाकुंतल  
Image result for shakuntala kalidasa
 कवी कालिदास 

 











प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे लिहा.

1. दुसऱ्या  चंद्रगुप्ताबद्दल माहिती लिहा.
उत्तर : दुसऱ्या  चंद्रगुप्ताने समुद्रगुप्ताचे मौर्य साम्राज्य वाढविले आणि स्थैय आणले. शकांचा पराभव करून पश्चिम भारत आपल्या अंमलाखाली आणला. भारतातील अनेक राजघराण्याशी वैवाहिक संबंध जोडल्यामुळे तो प्रभावशाली झाला. त्याने विक्रमादित्यपदवी मिळविली. त्याची कारकीर्द ही त्याने केलेल्या लढायापेक्षा साहित्य आणि कलेला दिलेल्या उत्तेजनामुळे संस्मरणीय झाली आहे. प्रसिद्ध कवी व नाटककार कालीदास हा त्याच्याच काळातील होय. विशाखा दत्त, शुद्रक हे ही त्याकाळातील प्रसिद्ध साहित्यिक होत.
2. गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे कोणती ?
उत्तर : गुप्त साम्राज्याच्या èहासाची कारणे 1.हुणांचे सतत आक्रमण होत होते. 2.त्यांचे स्वत:चे सुसज्ज सैन्य नव्हते. 3.युद्धाच्या प्रसंगी मांडलिक राजे सैन्य पुरवित त्यामुळे त्यांचे प्राबल्य वाढले. 4. पुरोहितांमुळे समाजात बिकट परिस्थिती निर्माण झाली. 5. गुप्तांचा पाश्चिमात्यांशी चाललेला व्यापार ठप्प झाल्यामुळे अंतर्गत व्यापाराला त्याची झळ बसली आणि पाटलीपुत्र नगरीलाही खेड्याचे स्वरूप प्राप्त झाले.
3. गुप्तकालीन प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोण होते ?
उत्तर : गुप्तकालीन प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणजे धन्वंतरी (ज्याला भारतीय वैद्यक शास्त्राचा जनक म्हणतात) 2.चरक (वैद्यक शास्त्रज्ञ) 3.सुश्रुत (शल्यचिकित्सक) 4.आर्यभट (खगोल शास्त्रज्ञ व गणित तज्ज्ञ) 5.वराह मिहीर (खगोल शास्त्रज्ञ) 6.भास्कर (खगोल शास्त्रज्ञ)
4. वर्धनाचा राज्यकारभार कसा होता ?
उत्तर : गुप्तांच्या विभाजनानंतर उदयास आलेल्या वर्धनांनी थानेश्वर येथून राज्यकारभार केला. राजाला राज्यकारभारात  मंत्रिमंडळाची मदत होत असे. महासंधी विग्रह (मध्यस्थ), महाबलाधीकृत (महासेनापती), भोगपती (महसूल अधिकार) आणि दूत अशी नोकरशाहीची चौकट होती. राज्याचे प्रांतामध्ये विभाजन केले होते. जमीन महसूल राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते. मांडलिक राजे खंडणी देत असत. राजा त्यांना जमिनी बहाल करीत असे व त्या बदल्यात युद्ध काळात सैन्याची मदत घेत असे.


Image result for nalanda vidyapith
नालंदा विद्यापीठ 


Image result for dhanvantari
धन्वंतरी 
Image result for sushrut
सुश्रुत 
Related image
चरक 



Related image
आर्यभट्ट 
Image result for varahamihira image
वराहमिहीर 










मौर्य आणि कुशाण

Image result for ashok stambh lion
अशोक स्तंभ 
  

प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. चाणक्य कौटिल्य या नावानेही ओळखला जातो.
2. मौर्य साम्राज्याच्या राजधानीची ठिकाणे पाटलीपुत्र, तक्षशीला, उज्जैन, कलिंग व सुवर्णगिरी ही होती.
3. कुशाण साम्राज्याचा संस्थापक कजुल कडफायसिस हा होय.
4. कनिष्काच्या नव्या पर्वाला शक काळ असे म्हटले जाते.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1. अशोक काळातील प्रमुख शहरांची नावे सांगा. 
उत्तर : पाटलीपुत्र, तक्षशीला, उज्जैन, कलिंग व सुवर्णगिरी ही अशोक काळातील प्रमुख शहरे होती.

2. अशोकाच्या व्यवस्थापनांचे वर्णन करा.
Image result for samrat ashok
सम्राट अशोक 
उत्तर : आपल्या विस्तृत साम्राज्यावर व्यवस्थित राज्यकारभार करण्यासाठी अशोकाने अनेक केंद्रे (सूत्रे) स्थापन केली होती. त्यासाठी अनेक अधिकारी कार्यरत होते. ही केंद्रे राजाच्या मर्जीनुसार चालत असत. यासाठी त्याला कायमस्वरूपी सैन्याची आवश्यकता असे. सर्व कार्यासाठी करांची आवश्यकता होती. जमीन महसूल राजाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. त्यामुळे अधिकाèयांना कठोर परिश्रम घ्यावे लागत. गुप्तहेर राजाला माहिती पुरवित. व्यापार उदीम व्यवस्थित चालण्यासाठी सर्वत्र वाहतुकीची सोय केली होती. जकात कर लादले होते. कायदे केले होते. हे कायदे शिळेवर व स्तंभावर आढळून येतात. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी धर्म महामात्रांची नेमणूक केली होती.





3. कुशाण कोणत्या वंशाचे होते ?
उत्तर : कुशाण यूची जमातीच्या वंशाचे होते.


4. कनिष्काचे साम्राज्य कोठे विस्तारले होते ?

उत्तर : कनिष्काचे साम्राज्य दक्षिणेकडील सांची आणि पूर्वेकडे बनारसपर्यंत पसरले होते. त्याच्या साम्राज्यात मध्य आशियाचाही समावेश होता. पुरुषपूर ही त्याची राजधानी होती.


Image result for gupta dynasty map in hindi
मौर्यकालीन साम्राज्य 
Image result for gandhara style buddha
गंधर्व शैलीतील बुद्ध


RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...