(बदामीच्या चालुक्य घराण्याचा कालावधी इ.स. 540 ते इ.स. 753)
(कांचीच्या पल्लव घराण्याचा कालावधी (इ.स. 350 ते इ.स.895)
पट्टडकल विरुपाक्ष मंदिर |
प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. पुलकेशीने राजा महेंद्रवर्मा या पल्लव राजाचा पराभव
केला.
2. कर्नाटक हे नाव चालुक्य या घराण्याने दिले.
3. हर पार्वतीय हे संस्कृत नाटक शिवभट्टारकने लिहिले.
4. वातापिकोंड ही उपाधी पहिला नरसिंहवर्मा या पल्लव
राजाला दिली गेली.
5. अर्जुनाची तपस्या ही कलाकृती महाबलीपूरम येथे
आहे.
महाबलीपुरम्मधील पंचरथ |
प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे द्या.
1. दुसऱ्या पुलकेशीबद्दल माहिती लिहा.
पुलकेशी दुसरा |
उत्तर : दुसरा पुलकेशी हा बदामीचे चालुक्य
या घराण्यातील अत्यंत बलाढ्य व शूर सम्राट होय. गंग, कदंब व आलूप
यांच्यावर वर्चस्व मिळवून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. पल्लवांचा शूर राजा
महेंद्रवर्माला पराभूत केले. उत्तरेतील हर्ष वर्धन राजाने नर्मदा ओलांडून
दक्षिणेकडे येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही रोखले. या विजयामुळे त्याला ‘दक्षिण पथेश्वर’ व ‘द्विपकल्पाचा
सम्राट’ या
उपाध्या मिळाल्या. आपल्या प्रचंड साम्राज्यावर राज्यकारभार ठेवण्यासाठी त्यांने
आपल्या दोन भावांना वेंगी व गुजरातचा व्यवस्थापक नेमले होते.
ह्यू एन त्संगने पुलकेशीबद्दल लिहून ठेवले
आहे की पुलकेशी राजा न्यायी आणि दयाळू होता. त्याचे सैन्य शिस्तबद्ध आणि निधड्या
छातीचे होते. राजाचे प्रजेवर अत्यंत प्रेम होते. तो आशावादी सम्राट होता. त्याचे
विदेशी राजांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. पर्शियन राजा दुसरा खुस्त्रोशी त्याचे
राजकीय संबंध होते.
2. चालुक्यांच्या राज्यकारभाराचे वर्णन करा.
उत्तर : राजाचा राज्यकारभारात सक्रीय
सहभाग असे. साम्राज्याचे जिल्ह्यात विभाजन केले होते. त्याला विशय म्हटले जात असे.
त्याची देखरेख विशयाधिपती करीत असे. खेडे हा राज्यकारभाराचा सर्वात लहान घटक होता.
ग्राम प्रमुख खेड्यांची व्यवस्था व हिशोब ठेवत असे. चालुक्यांनी धर्म, साहित्य, कला आणि
शिल्पकलेचे संवर्धन आणि रक्षण केले.
3. चालुक्य हे साहित्यप्रेमी होते. विशद करा. उदा. द्या.
उत्तर : बदामीच्या चालुक्यांनी साहित्याला उत्तेजन दिले होते. त्यामुळे कन्नड
आणि संस्कृत भाषेची वाढ झाली. कन्नड ही राजभाषा होती. काव्यातील ‘त्रिपदी’शैली अस्तित्वात
आली. कानडी साहित्यकृती निर्मिती नसली तरी शिलालेख मात्र उपलब्ध आहेत.
बदामीच्या कप्पे आर्यभटाची त्रिपदी शैली
काव्यरूपात आढळून येते. रविकिर्ती विज्जीका, अकलंक हे या
काळातील संस्कृत विद्वान होते. दुसèया पुलकेशीच्या सुनेने कौमुदी महोत्सव लिहिले.
शिवभट्टारकाने ‘हर
पार्वतीय’ हे
संस्कृत नाटक लिहिले.
4. कांचीवर राज्य केलेल्या पल्लव राजांची नावे लिहा.
उत्तर : शिवस्कंदवर्मा, महेंद्रवर्मा, पहिला
नरसिंहवर्मा, दुसरा
महेंद्रवर्मा,
पहिला परमेश्वर वर्मा, आणि दुसरा नरसिंहवर्मा, दुसरा
कीर्तीवर्मा व शेवटचा राजा अपराजित या राजांनी
5. पल्लवांनी संस्कृत आणि तामिळ भाषेला कसे उत्तेजन दिले ?
उत्तर : पल्लवांनी संस्कृत आणि तामिळ
भाषेला उत्तेजन दिले. कांची हे संस्कृत साहित्याचे केंद्र होते. भारवी
(किरातार्जुनीय) आणि दंडी (दशकुमार चरित्र) हे या काळातील कवी होते. राजा
महेंद्रवर्माने ‘मत्तविलास प्रहसन’ हे सामाजिक नाटक, ‘भागवद्ज्जुक’ ग्रंथ लिहिला.
भक्तीमार्गाच्या चळवळीतील संतांनी तामिळ भाषेमध्ये श्लोक लिहिले आहेत.
No comments:
Post a Comment