पासिंग पॅकेज (प्रथम भाषा मराठी)

 

कल्पना विस्तार

     ग्रंथ हेच गुरु 

          गुरुशिवाय ज्ञान नाही अन् मोक्षही नाही. यास्तव ‘गुरुब्रह्म, गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वर: अशी शास्त्रात त्याची महत्ती गायिली आहे.

          गुरुकडून विद्या प्राप्त करून घेण्यासाठी चिकाटी हवी. प्राचीन काळी गुरुसेवा, गुरुदक्षिणा द्यावी लागत असे आज त्याबद्दल जबर मूल्य द्यावे लागते.पैसे मोजावे लागतात.

          वरील त्रासाशिवाय ज्ञान देणारे गुरु ग्रंथशासन वा उपहास करीत नाही. त्यांची लहर सांभाळावी लागत नाही. आपल्या लहरीप्रमाणे हे ज्ञान घेता येते. ज्ञानदानात काळाची अन् स्थळाची बंधने नाहीत.

आजच्या जगात ग्रंथसंपत्ती विपुल पण त्यातून निवडीचे कौशल्य आवश्यक, अमोल अन बहुमोल ज्ञानभांडार देण्यास ग्रंथ सदैव उत्सुक.

ग्रंथ हेच गुरू 

माणसाचा पहिला गुरू म्हणजे त्याची माता . जगाच्या शाळेत तो अगदी कोरी पाटी घेऊन येतो . आई त्याला चालायला , बोलायला शिकविते . पुढे ज्ञानाचे अनेक नवे मार्ग आणि साधने उपलब्ध असतात . कोणतीही विद्या किंवा कला गुरूशिवाय प्राप्त होत नाही . 

मानवी गुरूशिवाय सर्व गुणांनी सिद्ध असलेला गुरू म्हणजे ग्रंथ . मानवी गुरुमध्ये लहरीपणा असतो , रागीटपणा असतो ; पण कोणतेही कारण सांगता सदैव आपली सेवा करणारे गुरू म्हणजे ग्रंथ . 

 ग्रंथांच्या गुणवत्तेबद्दल आपल्याला कोणतीच शंका घेण्याचे कारण नाही . मोठेमोठे मानवी गुरू ग्रंथातूनच ज्ञान मिळवीत असतात . ग्रंथ हे मानवी गुरुप्रमाणे आपली चेष्टा करीत नाहीत , कधी फसवीत नाहीत , सदैव तत्पर असतात , आपले अंतरंग खुले करतात . आपणापासून काहीही लपवून ठेवत नाहीत . काही ग्रंथ साऱ्या मानव जातीला सदैव समाधान देतात . भगवद्गीता , बायबल , कुराण है पवित्र ग्रंथ जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवितात.

 ग्रंथरूपी गुरुच्या सान्निध्यात ब्रह्मसुखाची प्राप्ती होते . मानवी गुरूकडून मिळणाऱ्या ज्ञानासाठी जबरदस्त फी मोजावी लागते , तशी ग्रंथगुरुसाठी लागत नाही . मानवी गुरू प्रमाणे ते भडकत नाहीत, त्यांच्याशी वाद घातला तरी ते तुमचे समाधान होईपर्यंत तुम्हाला मान देतील . तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा करता ज्ञानदानाचे पवित्र कार्य सदैव करणारे हेच म्हणजे थोर गुरूच आहेत . बसल्या जागी साऱ्या जगातील वर्तमान , भूतकाळ आणि भविष्यकाळ तुमच्यासमोर उभा करणा-या या गुरुला माझे विनम्र प्रणाम .

0000000000000

     केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे

समर्थ रामदास स्वामी यांनी सामान्य माणसाला उत्कर्ष साधण्यासाठी उपदेश केला आहे. अशा श्रेष्ठ तत्त्वज्ञानाने भरून राहिलेल्या त्यांच्या विचारधनापैकी वरील विचार हा एक तेजस्वी विचारकणच आहे.

          आजवर आपल्याकडे ‘‘जे जे घडेल ते ते नशिबानेच’’ अशी विचारधारा वाहत आली आहे. ‘‘भोेक्तव्य गोष्टी अटळ असतात’’ असाच समज चालत आलेला आहे. देव, दैव आणि नशीब यावर विसंबून माणूस हताश, निराश झालेला आढळतो.

          परंतु वरील उक्तीत रामदास ममात्र प्रयत्नवादाचा पुरस्कार करताता. ‘यत्न तो देव जाणावा’. प्रयत्न हाच मुळी त्यांचा देव आहे. प्रयत्नांतीच परमेश्वर भेटतो, असाच विचार ते मांडतात. आणि माणसाला कर्तव्य करण्यास उद्युक्त करतात. ‘असाध्य ते साध्य करिता सायास’ असे तुकारामानेही एके ठिकाणी म्हटले आहे. कोणतीही गोष्ट आपल्या प्रयत्नबळाने आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आधी प्रयत्नांना आरंभ तरी केला पाहिजे. मग ते प्रयत्नच पुढच्या प्रयत्नांची दिशा दाखवितात अंती यश हे खात्रीने मिळतेच.

          शिवाजी महाराजांनी वाडवडिलांचेप्रमाणे मोंगलांची सरदारकी पत्करता स्वतंत्र स्वराज्य स्थापन करण्याचे ठरविले. निश्चय केला तसे प्रयत्न केले. त्या प्रयत्नांनी त्यांना यश मिळाले. पारतंत्र्य नाहीसे करायचेच हा निश्चय लो. टिळक, . गांधी, पं. नेहरू आदी नेत्यांनी केला. साèयांच्या प्रयत्नांनी हा देश अखेरीस स्वतंत्र झालाच. न्यूटन, केप्लर, एडिसन आदी संशोधक कोलंबसासारखा साहसी, दर्यावर्दी, शेर्पा तेनसिंगसारखा गिर्यारोहक किंवा आर्म स्ट्राँग, कल्पना चावला सारखे अंतराळवीर यांचे प्रयत्न, त्यांनी घेतलेले कष्ट त्यांना मिळालेले यश ध्यानात घेतले की असेच म्हणावेसे वाटते - ‘केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे’.

000000000000

     फुलासंगे मातीस वास लागे

          निसर्गात नित्य पाहावयास मिळणारी ही घटना. एखाद्या वेलीवरची वा झाडावरची सुगंधी फुले मातीत पडली तर त्या मातीलाही त्या फुलांचाच वास येतो. उत्तमाची संगत धरली की कनिष्ठालाही त्या   उत्तमाचा स्पर्श होतो. क्षुल्लक, पायदळी तुडविली जाणारी माती ही फुलांच्या संगतीमुळे  सुगंधित होते.

          परिसाने लोखंडाला स्पर्श केला की त्याचे सोन्यात रूपांतर होते. अमृताने ताकाला जवळ केले तरी अमृताचे ताक होत नाही, ताकाचेच अमृत होते. दगडाचा देव केला की दगडालाच देवपण येते. त्याप्रमाणे माणसाने सदैव सज्जनाच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. थोरामोठ्यांच्या सहवासाने त्यांचे अल्पस्वल्प गुण आपोआपच आपल्या अंगी बाणतात. अभ्यासू मुलांच्या संगतीत एखादा उनाड आणि टवाळ मुलगा गेला की तो सुधारतो. त्यांच्यातील दोष हे आपोआप लयास जातात. अन् गुणवृद्धी होते. वाल्या कोळ्याचा जगन्मान्य वाल्मीकी ऋषी होतो. विद्वानांच्या सान्निध्यात, शूरांच्या सहवासात, संतांच्या निकट राहून आपले समग्र जीवन बदलून गेलेले अनेकांनी अनुभवले आहे. चांगल्या संगतीने सामान्यालाही असामान्यपण प्राप्त होते.

           आपणासारिखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तयालागी’ हे कसब सज्जनांच्या ठायी असते.

000000000000000000

     प्रयत्नांती परमेश्वर 

परमेश्वराला लोकांनी अनेक नांवे दिलेली आहेत . संतांनी त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे . म्हणून ' प्रयलांती परमेश्वर ' असे म्हणतात . प्रयल करून देव मिळविणे म्हणजे यश मिळविणे . विद्यार्थ्यांनी सतत परिश्रम केले की त्याला यशरूपी देव भेटतो . पूर्वीच्या राजे लोकांनी प्रयल केले म्हणून मोठाली राज्ये स्थापन झाली .

 माणसाने आपला यत्नरूपी यज्ञ सतत पेटता ठेवला पाहिजे . देशभक्तांनी असाच यत्न केला . आपल्या प्राणांची आहुती दिली . सावरकरांनी धाडस केले . शारीरिक श्रम सहन केले . काळया पाण्याची शिक्षा सहन केली . गांधीजींनी सत्याग्रह केला . या यत्नरूपी यज्ञातूनच स्वातंत्र्याची पहाट उगवली . वानरांच्या साहाय्याने रामाने रावणाचा पराभव केला . एखादा शिल्पकार आपली लेणी वर्षानुवर्षे प्रयल करून खोदत असतो , मग त्याला देवपण येते . . " 

प्रयले वाळूचे कण रगडिता तेलही गळे ' असे म्हणतात . प्रयलाने अशक्य गोष्टी शक्य होतात . आजवरचा मानवाचा इतिहास पाहिला की त्याची प्रचीती येते . प्रयल करून माणसाने हे जग सुंदर केले . त्याला स्वर्गाचे स्वरूप प्राप्त झाले . नद्यांची वळणे बदलली , अज्ञात भूमीचा शोध घेतला , डोंगर कपारीतून रस्ते काढले , अशी किती उदाहरणे सांगावीत ! 

सर्वसामान्य माणूस आज देवाला दोष देतो , आपले अपयश झाकतो , याचे कारण  त्याने प्रयत्न , साधना केलेली नसते , म्हणून काहीतरी निमित्त आणि सबबी तो सांगतो . त्याने सतत यत्न केल्यास यशरूपी परमेश्वर त्याला भेटणारच !

000000000000000000000

     जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण

          जीवनात या वचनाचा पुनः पुन्हा आपणास अनुभव येतो . माणसाला मिळालेला मोठेपणा आपल्याला दिसतो , पण ते यश मिळविण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात . महात्मा गांधीजींचेच उदाहरण आपण घेतले तर , प्रथम त्याना समाजाकडून खूप विरोध झाला होता . पण स्वातंत्र्य  मिळविण्यासाठी त्यांनी स्वत : च्या प्राणाचीही पर्वा केली नव्हती . त्यांचे प्रयत्न पाहून सगळा भारत देश त्याच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांना ' महात्मा ' म्हणू लागला.अशा प्रकारचे कष्ट बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करताना घेतले होते . प्रथम त्यांना त्या समाजाकडून खूप विरोध झाला . नंतर मात्र त्यांच्या आनंदाश्रमाकरता लोकांनी लाखों  रुपयांची मदत केली . पण त्यांच्या सुरुवातीच्या यातना विसरता येणार नाहीत . म्हणूनच म्हणतात ना " मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो " मोठेपण हे अतिशय यातना सहन केल्यावरच मिळते

000000000000000

     करावे तसे भरावे

 हासत कर्म करावे भोगावे रडत तेच परिणामी ' अशी संतांची उक्ती आहे . एखादे वाईट कर्म करताना आपणास हसू येते . पण वाईटाचा परिणाम वाईटच होणार हे निश्चित . म्हणूनच लोकांचे हित करणाऱ्यांचे अंती हित होते असे आपणास दिसून येते . आपणास पुष्कळदा असे वाटते की एखादे कृत्य जर मी कोणाला कळत करत आहे तर मला त्याचा परिणाम काय भोगावा लागणार ? पण तसे नाही . दुसन्याकरिता खोदलेल्या खड्यात आपणासच पडावे लागते . तसेच जे कृत्य आपण करु त्याचा परिणाम भोगावाच लागणार हे विसरु नये . म्हणूनच कोणाचेही वाईट चिंतू नये . करावे तसे भरावे लागते . अफजलखान रावण यांची उदाहरणे आपल्याला माहितच आहेत.

000000000000

     आरोग्यम् धनसंपदा

निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते ' असे म्हटले जाते . संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला देवासमोर " शुभंकरोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा ' अशी प्रार्थना केली जाते . आरोग्याला ' धनसंपदा ' म्हटले गेले आहे . कारण माणूस निरोगी असेल , तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो . आपला शारीरिक , मानसिक बौद्धिक विकास करू शकतो . दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो . जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल , तर तो समाजाला , त्याच्या परिवाराला भारस्वरूप असतो . रोगी माणसाला सुख , समाधान मिळू शकत नाही . त्याने कमावलेले सारे धन त्याच्या आजारपणातच वाया जाते . म्हणूनच शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणेच जास्त योग्य आहे . निरोगी शरीरसंपदेच्या बळावर आपण कितीही धन कमावू शकतो . आपले जीवन सुखी , समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच उत्तम आरोग्य होय . म्हणूनच ' आरोग्यम् धनसंपदा ' असे म्हटले जाते

000000000000000000

     वाचाल तर वाचाल

 वाचाल तर वाचाल म्हणजे ज्ञान मिळवाल तर यशस्वी व्हाल. ह्या वाक्यातच आपल्याला वाचनाचे महत्व समजून जाते . जर आपल्याकडे ज्ञानाचा अमूल्य खजिना असेल तर यश आपल्यापासून दूर नाही . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा " वाचाल तर वाचाल " हा अमूल्य विचार आपल्या सर्वानासाठीच अतिशय मोलाचा आहे . ज्ञान आणि वाचन यांचे नाते जवळचे . जर ज्ञान मिळवायचे असेल तर आपल्याला वाचन करणे गरजेचे आहे . आपल्याला ह्या स्पर्धात्मक जगात ज्ञान मिळवून यशस्वी होण्यासाठी भरपूर वाचनाची गरज असते . वाचनाच्या सवयीमुळे माणसाचे आयुष्य घडत असते . आताच्या आधुनिक जगात ज्ञान मिळवण्याची भरपूर साधने उपलब्ध आहेत त्यामध्ये वाचन हे एक महत्वाचे साधन . वाचन आपल्यापासून कधीच वेगळे नाही . वाचन आणि माणूस हे एकमेकांचे मित्रच . संपूर्ण जीवन बदलवून टाकण्याची ताकद वाचनामध्ये आहे . आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण काही काही कारणावरून नकळत कितीतरी गोष्टी वाचतो .

          उत्तम वाचनामुळे आपल्या विचारांमध्ये खूप चांगले बदल घडत असतात .वाचन करण्याने आपली शब्दसमग्री वाढते त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व सुधारते . वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते , रोज येणाऱ्या नवनवीन माहितीमध्ये बातम्या , नोकरी , योजना , शैक्षणिक माहिती तसेच जगात नेमकं काय चालले आहे हे आपल्याला समजते . जर आपण ही माहिती वाचत असेन तर खूप गोष्टी सोप्या होऊन जातात . म्हणूनच वाचन हे आपल्या आयुष्यात खूप उपयुक्त ठरते . चला तर मग आजपासून आपल्यापासून सुरवात करू आणि आपली संस्कृती जपू ... वाचन करूया ज्ञान मिळवूया

 

 

निबंध लेखन

     आपले राष्ट्रीय सण

मनुष्य हा उत्सवप्रिय आहे . तो वर्षातून अनेक सण साजरे करत असो . सणादिवशी गोडधोड करुन आनंद व्यक्त करतो . सण म्हणजे उत्सवाचा दिवस होय . ग्रामदेवतेच्या जत्रेच्या दिवसालाही सणच म्हणतात . सणाचे प्रकार दोन आहेत .

1 ) धार्मिकसण 2 ) राष्ट्रीय सण

गुढी पाडवा , अक्षय तृतीया , बेंदूर , नागपंचमी , गणेश चतुर्थी , दसरा , दीपावली , ईद , मोहरम , ख्रिसमस , पोंगल . धार्मिक सण आहेत तर

26 जानेवारी , 15 ऑगष्ट हे प्रमुख राष्ट्रीय सण असून 14 एप्रिल , 5 सप्टेंबर , 2 ऑक्टोबर , 14 नोव्हेंबर हे ही दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात .

15 ऑगष्ट 1947 ला भारत 150 वर्षाच्या इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला . भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्राणाचे बलिदान केले . भारतमाता गुलामगिरीतून मुक्त झाली म्हणून हा दिवस देशभर साजरा केला जातो .

26 जानेवारी 1950 ला भारताने घटनेचा स्वीकार केला . त्या दिवशी भारत प्रजासत्ताक बनला . याला ' गणतंत्र दिनही म्हणतात . प्रजेच्या म्हणजे लोकांच्या हाती सत्ता येऊन भारतात लोकशाही राज्याला सुरुवात झाली . लोकांचे , लोकांकडून , लोकाकरिता चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय . म्हणून हा दिवस आज ही साजरा केला जातो .

          14 एप्रिल हा डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन होय . त्यांनी अनेक लोकशाही राष्ट्रांच्या घटनेचा अभ्यास करुन राजहंसा - प्रमाणे नीरक्षीर वृत्तीने चांगल्या तत्वांचा समावेश करुन घटना तयार केली त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणतात . शोषित पीडितांच्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली . म्हणून या दिवसालाही महत्व आहे .

          5 सप्टेंबरला भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन होय . ते तत्वज्ञानाचे प्राध्यापकही होते . देशाचे आधारस्तंभ घडविणाऱ्या शिक्षकांना सन्मान मिळावा म्हणून आपला जन्मदिन ' शिक्षक दिन ' म्हणून साजरा करण्यास त्यांनी सांगितले .

          2 आक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिन होय . सत्य , अहिंसा , शांतीच्या मार्गानी त्यांनी स्वातंत्र्यलढा दिला . त्यांना ' राष्ट्रपिता ' असेही संबोधले जाते . याच दिवशी लालबहाद्दर शास्त्री यांचाही जन्म दिवस साजरा केला जातो त्यानी ' जय जवान जय किसान ' हा नारा दिला . ' मूर्ती लहान पण किर्ती महान ' असे त्यांच्या विषयी म्हटले जाते . ते भारताये पंतप्रधान होते . त्यांच्या विचाराचा प्रभाव जगभर पसरला .

          14 नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन होय . ते भारताचे पहिले पंतप्रधान होते . त्यांना मुले फार आवडत . मुले त्यांना ' चाचा ' म्हणत . त्यांनी आपला जन्मदिवस ' बालदिन ' म्हणून साजरा करण्यास सांगितले . म्हणून हा दिवस साजरा केला जातो .

          असे हे आपले राष्ट्रीय सण आहेत . त्यामुळे सर्व भारतीयात प्रेम , बंधुता , सहिष्णुता , राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते . म्हणून हे राष्ट्रीय सण आपण साजरे केले पाहिजेत.

              राष्ट्रीय एकात्मता 

विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. अनेक प्रांत, अनेक भाषा, वेगळे वंश असे किती तरी एकमेकापासून दूर नेऊ शकणारे घटक या देशात आहेत. चालीरीती विषयी तर बोलायलाच नको. त्यातून जातीव्यवस्थेनी ग्रस्त झालेला समाज. मानवनिर्मित या भिती असूनही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कलकत्ता गुवाहातीपासून द्वारकेपर्यंत सारा भारत एक आहे अन तो राहाणार आहे, याची खात्री आहे.

भाषा ही प्रत्येक तीस मैलांवर थोडी वेगळी होत जाते असे म्हणतात तेही खरेच. महाराष्ट्राचेच उदाहरण ध्यानं. पुण्याची पुणेरी, कोकणातील कोकणी, विदर्भातील व-हाडी, खानदेशातील अहिराणी या ठळक वैशिष्ट्यांसह प्रत्येक जिल्हा वेगळ्या भाषेचा आहे की काय असं वाटू लागते. प्रत्येक बोलीभाषेची खुमारी काही औरच. बोलताना हेल काढणारे, अनुनासिकात बोलणारे, खूप जलद गतीने बोलणारे --- मात्र सर्वांची भाषा एकच -मराठी. जी परिस्थिती महाराष्ट्राची आहे तीच इतर प्रांताचीही आहे.

प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे. भाषावर प्रांतरचनेखाली ही राज्ये करण्यात आली. एक भाषा एका राज्याची, सोळा भाषांना राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिलेला आहे तसा राज्यघटनेत व नंतरच्या घटनादुरूस्तीत उल्लेख आहे. या विविध भाषिकांना एकत्र ठेवण्याचे सामर्थ्य केवळ एकाच शब्दात आहे- भारतीय,

मी भारतीय आहे, आणि भारतीयच राहाणार आहे. कोणालाही या महान पवित्र बंधनाचा अभिमान वाटणारच. काय सामर्थ्य आहे या शब्दात?

या वेगळेपणाने देशातील विविध प्रांताचे लोक मात्र वेगळे केलेले नाहीत. केरळचा रहिवासी केरळी, गुजराथचा गुजराथी मात्र ते सगळे सांगताना सांगतात आम्ही भारतीय. राष्ट्रीय एकात्मतेचा साक्षात्कार घ्यायचा असेल तर चला एखाद्या मोठ्या शहरात. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, बंगलोर, हैद्राबाद कितीतरी मोठी शहरे आहेत. तेथे सर्व प्रांताचे, सर्व धर्माचे लोक राहतांना दिसतात. मात्र त्यांना आपण परक्या शहरात आहोत असे मुळीच वाटत नाही.

परचक्राच्या वेळेस तर राष्ट्रीय एकात्मतेचे विलोभनीय दर्शन झालेले आहे. चीनने एकदा आणि पाकिस्तानने तीनदा आपल्यावर चढाई केली होती. विविध राजकीय विचारांचे सर्व पक्ष त्यांचे आपआपसातील भेद विसरून देशाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेत. संपूर्ण देश या सान्यांमुळे आणखीनच एकसंघ झाला. "वयं पंचाधिकम् शतम्' हे जगाला दाखवून दिले आहे.

अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत. भाषाही एक नाही, पण सर्वजण एका सत्राने बांधलेले आहेत. एका विचाराशी एकरूप झालेले आहेत. एका विचाराशी एकरूप राहाणार आहेत ... ते सूत्र आहे राष्ट्रीय एकात्मता. भारतात राहाणारे सारे भारतीय आणि हा देश त्यांचाच आहे.

              कोरोना 

कोरोना हा एक प्रकारचा विषाणू आहे. संपूर्ण जगच त्याच्या विळख्यात सापडले आहे. परंतु खूप परिश्रमानंतर त्यावर आता लस शोधण्यात आलेली आहे. कोरोना नावाचा विषाणूंचा गट आहे. त्याचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या आजारास कोविड 19 असे नाव दिलेले आहे. 2019 मध्ये हा रोग मनुष्यात आढळल्याने कोरोना व्हायरस 19 म्हणजेच कोविड 19 (Covid 19) असे नाव देण्यात आले.

1960 च्या दशकात सर्वप्रथम मनुष्याला श्वसन मार्गात संसर्ग होणाऱ्या कोरोना व्हायरसचा त्रास आढळून आला. या आजारात कोरोना विषाणूंचे श्वसन मार्गात भयंकर संक्रमण आढळून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये चीनच्या वुहान या शहरात कोरोना विषाणू संक्रमण झाल्याचे आढळले. सुरुवातीला वुहानमध्ये पसरलेला हा आजार संपूर्ण चीनमध्ये पसरला आणि त्यांनतर संपूर्ण जगभरात त्याने थैमान मांडले आहे.

ताप, कोरडा खोकला, श्वसन मार्गात आणि घशात अडथळा, शारीरिक थकवा अशी लक्षणे या आजारात आढळून येतात. याव्यतिरिक्त इतर दीर्घ आजार ज्या व्यक्तींना असतील त्यांना त्याच आजारात वाढ झाल्याचे आढळून आले. स्वस्थ व्यक्तींना संक्रमण झाले तरी वरील लक्षणे दिसून येत नव्हती परंतु इतरत्र संसर्ग होऊन तोच आजार पसरू नये म्हणून आता सर्वत्र तपासण्या चालू आहेत. स्वयंसेवक, कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासण्या करत आहेत.

रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, आणि इतर दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना आजारापासून जास्त धोका संभवतो. त्यांना या आजाराची लागण झाल्यास उपचार घेणे सक्तीचे ठरते. साधारण खोकला, ताप किंवा घशात खवखवणे असे आजार असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोरोना संक्रमण होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने हा संसर्गजन्य आजार आपण काही व्यक्तिगत सवयी पाळल्याने आणि काळजी घेतल्याने आपल्यापासून दूर ठेवू शकतो.

कोविड 19 आजार संसर्गजन्य असल्याने आणि आजाराची वेगळी स्पष्ट अशी लक्षणे नसल्याने या आजारात एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, बाहेर जाताना, फिरताना तोंडावर मास्क घालून जाणे अशी व्यक्तिगत काळजी आपण घेऊ शकतो. खोकताना किंवा शिंकताना तर रुमालाचा वापर करणे अत्यावश्यकच आहे. बाहेर गेल्यावर कोणत्याही पृष्ठभागाला अनावश्यक स्पर्श करणे टाळावे कारण कोरोना हा विषाणू दिसूनही येत नाही आणि लवकर नष्टही होत नाही.

नियमित बोलताना तीन फुटांचे अंतर ठेवावे. आंबट चवीच्या पदार्थांचा, फळांचा आहारात समावेश करावा. कोणतेच औषध शंभर टक्के उपचार देणारे नसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकच पर्याय आपल्यापुढे आहे त्यामुळे फळे, कडधान्ये, सुका मेवा, आणि जास्तीत जास्त “व्हिटॅमिन सी” चे आहारात सेवन करणे गरजेचे आहे.

कोरोना आजारात सरकारने संचार बंदी लागू केली होती जेणेकरून हा विषाणू पसरला जाऊ नये. निमशहरी आणि शहरी भागात कोविड 19 सेंटर्स उभारून त्यावर कोरोना लागण झालेल्या व्यक्तींना उपचार देण्यात आले. सर्व स्तरांवर काळजी घेण्याची सूचना देण्यात आली. भारतात जवळजवळ चार महिने सर्व उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प पडून होते. रोजच्या लागणाऱ्या दैनंदिन वस्तू, सुविधा घरपोच पुरवल्या जात होत्या.

कोरोना काळात संपूर्ण जगभरात माणसांचे राहणीमान बदलले. खूप सारे लोक घरी बसून असल्याने विविध कला आणि मनोरंजन तसेच व्यायाम, योगा शिकण्यात व्यस्त होते. स्वयंरोजगार ही संकल्पना खूप लोकांनी अंगिकारली. कोरोना आजाराच्या सुरुवातीस संचार बंदी असताना पोलिस आणि डॉक्टर्स यांचा सहभाग आणि सहयोग हा खूपच बहुमूल्य होता.

कोरोना विषाणूवर लस शोधण्यात यश आले आहे. फायझर, मॉडर्ना, कोविशिल्ड, स्पूत्निक व्ही, कोवक्सिन अशा काही लसी 90 ते 95 टक्के प्रभावी आहेत. तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोणतीही लस ही 100 टक्के उपचार देणारी नाहीये. तरी सर्वत्र मान्यता मिळून योग्य प्रकारे सर्वांना लस मिळेपर्यंत योग्य काळजी घेऊन स्वतःला सशक्त बनवणेच योग्य मार्ग आहे.

              माझा आवडता छंद 

         छंद म्हणजे रिकाम्या वेळेत आपले मन रमवणे. गाणेगाणे, पुस्तक वाचणे, लिहिणे ,संगीत ऐकणे,खेळणे  ,चित्र  काढणे इत्यादी . पण माझा आवडता छंद आहे वाचन. वाचन मला ऐवढे आवडते की मी फक्त ते  रिकाम्या वेळेत करत नाही तर त्याच्यासाठी अभ्यास, खेळ मधून  वेळ काढते . वेळेतून वेळ काढते .

   मला वाचनाचा छंद लहानपणापासून आहे. पुस्तक मिळाले की ,मला खूप आनंद होतो . मी वेळेत वेळ काढून ती पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करते.  माझ्या आई बाबांनी मला वाचण्याची सवय लहानपणापासून लावली. आणि ती सवय आज माझा छंद झाला आहे. मी लहान असताना ते मला गोष्टी सांगत असत . कधी कधी ते गोष्टी वाचून दाखवत असत . त्या गोष्टींनी मूळे वाचन्याची सवय लागली. मग मी स्वतः गोष्टी वाचू लागली. मला गोष्टींचा खूप आनंद मिळू लागला . छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड.

     अजून एक गैरसमज  ज्यांना  वाचनाच्या छंदापासून परावृत्त करते ते म्हणजे आपण जे वाचतो ते पाठ करायचे असते. हे सरासर चुकीचे मत आहे. वाचन जर छंद असेल तर तो अभ्यास किंवा कामासारखा ओझे वाटला नाही पाहिजे. 

              माझा आवडता छंद 

प्रत्येक व्यक्तीची काही ना काही आवडते, यालाच छंद असे म्हटले जाते. छंद हे आनंद मिळवण्यासाठी जोपासले जातात. छंद जोपासल्याने कामात उत्साह वाढतो. माझा आवडता छंद पुस्तके वाचन आहे. मी गोष्टीची पुस्तके, साप्ताहिके, वर्तमानपत्र आणि इतर माहिती ची पुस्तके वाचतो. 

          मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून वाचन हा माझा छंद आहे. माझ्या आई वडिलांनी पण हा छंद जोपासण्यात माझी सहायता केली आहे. मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला छान छान गोष्टींची पुस्तके आणून दिली होती. लहान असतानाच बाराखडी ची पुस्तके वाचून मी वाचणे शिकलो होतो. त्यानंतर मी सोप्या सोप्या पऱ्यांच्या कथा व इतर लहान मोठ्या गोष्टी वाचू लागलो. 

          नित्य वाचन केल्याने माझे ज्ञान वाढत आहे. नवनवीन गोष्टी शिकायला मिळतं आहेत. वैज्ञानिक माहिती असलेली पुस्तके मला वाचायला जास्त आवडतात. जगातील आश्चर्य, अंतरिक्ष ची माहिती, समुद्रातील तसेच धरतीवरील प्राण्यांची माहिती, तंत्रज्ञानातील नव नवीन शोध इत्यादी माहिती मी पुस्तकातून मिळवत आहे. 

वाचनाचा अजून एक फायदा असा आहे की आता माझी स्मरणशक्ती वाढली आहे शाळेच्या अभ्यासातील बऱ्याच गोष्टी मी आधीच वाचून टाकल्या आहेत. या मुळे मला कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही. असे म्हणतात की वाचनाचे कोणतेही वय नसते, प्रत्येक वायातील व्यक्ती वाचन करू शकतो. 

मी वाचनाने निसर्गाबद्दल, झाडा झुडपांबद्दल अधिकाधिक मदहिती मिळवली आहे. प्राचीन काळाचा इतिहास मी वाचलेला आहे. आजच्या आधुनिक युगात तर एका क्लिक वर मोबाइल च्या सहायाने माहिती मिळवली जाते. आज कोणतीही माहिती हवी असल्यास ग्रंथालय मध्ये जाऊन पुस्तके शोधण्याची आवश्यकता देखील नाही. घरबसल्या तुम्ही मोबाइल मध्ये माहिती शोधू शकतात.    

माझे मत आहे की जो व्यक्ति पुरेसे वाचन करतो तो स्वतःला दुसऱ्यासोबत लवकर मिसळून घेतो. इतर लोकांच्या तुलनेत असा व्यक्ति चांगले संभाषण करतो. या मागे कारण एवढेच आहे की वाचनाने आपली बुद्धी अधिक तेज होते. माझ्या दृष्टीत तरी वाचनाची सवय ही सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. वाचकाची पुस्तके खूप चांगली मित्र असतात. व पुस्तक वाचक कधीही एकटा नसतो. जरी व्यक्तीकडे खूप सारे धन असले तरी जर त्याच्याकडे ज्ञान नसेल तर तो दारिद्रच राहतो. 

पुस्तके वाचकापुढे खूप सारी माहिती आणि नवनवीन तथ्य ठेवत असतात. ही माहिती आपल्याला रोजच्या कार्यामध्ये मदत करते. म्हणून मी वाचनाची ही आवड कायम जोपासत राहील व नवनवीन माहिती मिळवत राहील.

 

     अंधश्रद्धा

आज जग मंगळावर चाललं आहे. विश्वाच्या निर्मितीचं कोडं सोडविण्याच्या मागे सारे वैज्ञानिक लागले आहेत. तरीसुद्धा भारतातील बहुतांश लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेले आपण दिसतात. या सृष्टीचं तलम काम विणणाèया विणकरांचे हात कोणी पाहिले आहेत का ? माणसानं आपल्यापरीनं कल्पना लढविल्या. कोणीतरी अगाध शक्ती आहे असं त्याला वाटलं यातून जन्म झाला ‘देव’ या संकल्पनेचा. पण ज्याप्रमाणे दिवसावर विश्वास ठेवला तर रात्रीवर विश्वास ठेवावा लागतो. त्याप्रमाणे ‘भूत‘ ही वाईट शक्ती मानली गेली. याचाच फायदा काही लोकांनी घेतला. आणि या संकल्पनांतून अंधश्रद्धेचं जाळं त्यांनी विणलं. ज्या जाळ्यातून बाहेर पडणं आता अशक्य होत आहे.

माणसाच्या इच्छा, आशा, अपेक्षा या भरपूर असतात. त्याची पूर्तता होईलच असे नाही. गोपाळ गणेश आगरकरांनी म्हटले आहे. ‘‘माणसाची मती जिथं खुंटते तिथं ते वाटेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयारहोते.’’ एखादी वास्तवाच्या पलीकडची कल्पना जेव्हा सत्य वाटते तेव्हा जन्म घेते... अंधश्रद्धा ! आज

अंधश्रद्धांनी लांछित आम्ही

सत्याला दूर टाकीत गेलो

मार्तंडाच्या कुशीत सुखाने

स्वप्नांचे जग रेखीत गेलो

अशी सर्वांची अवस्था झाली आहे. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळे समाजाची प्रगती कुंठीत होते. विकासाला ती मारक ठरते. 13 आकडा अपशकुनी, काळं मांजर आडवं आलं - अपशकुनी. ‘मी महत्त्वाच्या कामावर जात होतो. कोणीतरी शिंकलं आता झालं माझ्या कामाचं वाटोळं. ‘रिकामा पाळणा हलवू नकोस, हं, बाळाला त्रास होतो. ‘जळलं मेलीचं तोंड बघितलं आणि दिवस वाईट गेला. अशी अनेक वाक्य जाता जाता सर्वांच्या कानावर पडतात. आज विज्ञानानं जगाची सारी क्षेत्रं पादाक्रांत केली असली तरी अंधश्रद्धेला सोडून द्यायला कोणीही तयार नाही.

ध्येय आशा प्रेम यांची

होतसे का कधी पूर्ती

वेड्यापरी पूजतो आम्ही

भंगणाऱ्या  या मूर्ती

आज कोठेही, तरुण एका हातावर परदेशी घड्याळ आणि दुसèया हातात गंडा बांधून फिरताना दिसतो. कुडमुडे ज्योतिष सांगणाèयाच्या भोवती तरुणाईचा घोळका झालेला दिसतो.

अंधश्रद्धा जेव्हा मर्यादित स्वरूपात असतात तेव्हा काही वाटत नाही पण या जेव्हा भयंकर स्वरूप धारण करतात तेव्हा मात्र या समाजकंटकांचं काम करतात. रोग्याचं भूत उतरवणं......, झाडूनं मारणं...., देवाच्या नावानं मुलांना सोडणारी देवदासीसारखी समस्या, रुग्ण बरा करण्यासाठी अघोरी उपाय सांगणे, भानामती करतो म्हणून सांगणे, गुप्त धन मिळवून देण्यासाठी चित्रविचित्र उपाय सांगणे, वस्तू अदृष्य करून दाखवणं, माणसांचं हवेत तरंगणं, या गोष्टी खोट्या आहेत हे त्यांच्या बुद्धीला पटून ही त्यावर विश्वास ठेवला जातो. अशा गोष्टीतून èयाच जणांची फसवणूक झालेली आहे हे माहीत होऊनसुद्धा लोकं आणि त्याच्याच मागे धावताना दिसतात. त्यामुळे समाज अठराव्या शतकाकडे चाललाय की काय असं वाटतं.

हल्लीचे युग हे विज्ञानाचे युग आहे आणि या अंधश्रद्धा प्रगतीच्या आडच येत आहेत. त्यामुळे लोकांच्यात वैज्ञानिक जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी कायदे केले गेले पाहिजेत. एवढेच नव्हे तर त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे तर बुवाबाजी करणाèयांच्या मनात भीती निर्माण होईल. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विज्ञान संघटना, क्लब स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. आपणही यावर विश्वास ठेवू नये म्हणून एकमुखानं म्हणू या....

अंधश्रद्धांनी केलं आमच्या

जलमाचं वाटोळं

उठा गड्यांनो फेकून द्या

दुष्ट रूढीचं हे जाळं

तेव्हाचं अंधश्रद्धांचा हा बुरखा गळून पडेल.यासाठी प्रत्येकाने प्रयत्नवादी असले पाहिजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे.

0000000000000

 

              मोबाईल शाप की वरदान 

          आज कालचे जग मोबाईल शिवाय अपूर्ण आहे. मनुष्याद्वारे केलेल्या शोधामध्ये मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन आहे. आज एकविसाव्या शतकात मनुष्य मोबाईल शिवाय राहू शकत नाही. दिवसाची सुरुवात मोबाईलच्या अलार्म ने होते. व्यवसाय किंवा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या संपर्कात राहणे मोबाईल मुळे सोपे झाले आहे. आजकाल तरुणांमध्ये मोबाईल चे चलन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल हा त्यांच्या जीवनाचा महत्वाच्या भाग बनला आहे. बाजारात देखील मोबाईलचे वेगवेगळी विशेषता असणारे मॉडेल उपलब्ध आहेत आणि तरुणांमध्ये नवीन नवीन मॉडेल घेण्याचा क्रेझ वाढत आहे.

          लहान लहान मुले आपला अभ्यास पूर्ण झाल्यावर आई-वडिलांकडून गेम्स खेळायला मोबाईल मागतात. मोबाईल मुळे आपण कोणत्याही स्थानाच्या नकाशा मिळवू शकतो व  कोणाचीही मदत न घेता तेथे पोहचू शकतो. मोबाईल ही विज्ञानाची अमूल्य देण आहे. मोबाईल ने आपले जीवन सोपे बनवले आहे. मोबाईल मुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या लोकांशी बातचीत करू शकतो. व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमाने दूर असलेल्या नातेवाईकांना आपण पाहू शकतो.

          मोबाईल मध्ये रेडिओ आणि mp3 प्लेयर सारखे फंक्शन्स असतात यांच्या मदतीने आपण गाणे व बातम्या ऐकू शकतो. मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर चे देखील फंक्शन असते म्हणून आता हिशोब करण्यासाठी सोबत मोठे कॅलकुलेटर सांभाळण्याची गरज नाही, मोबाईल च्या मदतीने आपण केव्हाही कॅल्क्युलेटर वापरू शकतो. जास्त करून लोक मोबाईल मध्ये व्हिडिओ आणि मूव्हीज पाहतात. यासाठी ते यूट्यूब ॲप चा वापर करतात. एका पद्धतीने मोबाईल ने संपूर्ण जगाला त्यात सामावून घेतले आहे. मोबाईल ला असलेल्या कॅमेऱ्याद्वारे आपण सुंदर फोटो काढू शकतात म्हणून बाहेर कुठे फिरायला जाताना सोबत कॅमेरा नेण्याची आवश्यकता नाही. कारण मोबाईल द्वारे अतिशय चांगली फोटो काढणे सरल झाले आहे. मोबाइलच्या पुढच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्याला सेल्फी कॅमेरा म्हटले जाते. या कॅमेर्याच्या मदतीने तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःची फोटो काढू शकतात.

मोबाईल मध्ये असलेल्या ॲप्स च्या मदतीने आपण ऑनलाइन खरीदारी करू शकतात. पूर्वीसारखे बाजारात जाऊन तासनतास वस्तू शोधण्याची आता गरज नाही. घरबसल्या मोबाईलवर आपण योग्य वस्तू शोधू शकतात व तिला ऑनलाईन ऑर्डर करू शकता. पैसे पाठवण्यासाठी देखील आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. मोबाईल मध्ये असलेल्या ऑनलाईन पेमेंट अँप च्या मदतीने घर बसल्या पैसे पाठवता येतात.

मोबाईल चे खूप सारे फायदे आहेत. जर कोणाला तात्काळ मदत हवी असेल तर इमर्जन्सी नंबर जसे पोलीस, ॲम्बुलन्स यांना फोन करून बोलवता येते. सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. दररोज लोक सोशल मीडियावर आपले फोटो टाकत असतात. कमेंट्स च्या माध्यमाने एक दुसऱ्याच्या फोटो बद्दल कमेंट पण करतात.

मोबाईल चे अनेक फायदे आहेत. पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. मोबाइल द्वारे ब्लॅकमेलिंग चे प्रकार खूप वाढले आहेत. आई वडील हे कामावरून आलेत की मोबाइल मध्ये व्यस्त होऊन जातात. ज्या मुळे मुलानं सोबत त्यांना वेळ मिळत नाही. सर्व शुभेच्छा संदेश ऑनलाईन पाठवले जातात म्हणून आधी सारखा एक दुसऱ्याला भेटण्याचा आनंद येत नाही. 

आज मोबाईलच्या अतिवापराने लोकांना त्याचे व्यसन जडत आहे. युवकांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. दीर्घकाळ मोबाईलवर गेम खेळणे, इंटरनेट वापरने यामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोकेदुखी, डोळे चुरचुरणे यासारख्या समस्या वाढीस लागतात. खूप साऱ्या लोकांना रात्री झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवण्याची सवय असते, पण असे केल्याने कॅन्सर चा धोका वाढतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो व झोप कमी होते. मोबाईलचा जास्त वापराने एकाग्रता कमी होते. म्हणून लहान मुलांच्या हातात मोबाइल देणे जास्तीत जास्त टाळावे.

          यात शंका नाही की मोबाईलचे खूप सारे फायदे आहेत व मोबाईल एक महत्त्वाचे साधन आहे. पण कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. मोबाईलच्या बाबतीत देखील तसेच आहे. एकीकडे याचे सकारात्मक परिणाम आहेत तर दुसरीकडे नकारात्मक प्रभाव देखील आहेत. म्हणून मोबाईल वापरणाऱ्या नवीन तरुणांना त्याचे योग्य उपयोग समजावून दिले पाहिजे. मोबाईलचा वापर संतुलनात करायला हवा.

0000000000000  

 

पत्रलेखन

 

( मोहन कुलकर्णी, मुचंडी,  ता. जि . बेळगाव हे धारवाडमध्ये  वसतिगृहात राहणाऱ्या छोट्या भावास अभ्यास  व्यायामाचे महत्त्व  पटवून देत आहेत , अशी कल्पना करून पत्र लिहा )

प्रेषक :               

 श्री मोहन कुलकर्णी,

                    ' निर्मल ' बिल्डिंग ,

               मु. पो. मुचंडी,  ता. जि . बेळगाव

           दि . 30 एप्रिल २०२1

 

चि . प्रणय यास , 

अनेक उत्तम आशीर्वाद अन् या बरोबरच पाडव्याच्यानववर्षाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा !

 तुझे पत्र मिळाले. तुझी तब्येत अधूनमधून बरी नसते त्यामुळे नियमित अभ्यासात व्यत्यय येतो असे तू लिहिलेस . तू तिथे आमच्यापासून दूर आहेस . तेव्हा तुला स्वत:ची काळजी स्वतः घेणे भागच आहे . प्रथमतः प्रकृतीकडे योग्य लक्ष दे . तब्येत चागली राहिल्यास तुझी अभ्यासाची क्षमता ही वाढेल , प्रणय , हे स्पर्धेचे युग आहे तरीही तब्येतीच्या बाबतीत तडजोड नको . खूप जागरण करू नकोस . नियमित अभ्यास कर , अतिजागरणाने तब्येत खराब होते . किमान सात तासांची निवांत झोप आवश्यकच आहे . तसेच परध्या जेवणाची बरोबरी बाहेरच्या जेवणाशी करताच येणार नाही तरी तू पूरक म्हणून रोज फळे खात जाणे तसेच सकाळ  संध्याकाळ दूधही घेत जाणे. सकाळी वेळात वेळ काढून २० - २५ मिनिटे व्यायाम केल्यास दिवसभर तुला छान वाटेल .

लोकमान्य टिळक म्हणत ' सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास  करत असते . " तब्येत चांगली राहिली तर आपोआपच अभ्यासाला हुरूप येईल . आईने तुला डिंकाचे लाडू करून दिलेत , ते पौष्टिक असतात , तरी रोज सकाळी एक लाडू  खात जाणे . संध्याकाळी बॅडमिंटन खेळत जाणे . अभ्यासाचा ताण करून घेता योग्य नियोजन कर . वेळापत्रक बनव सर्व विषयांना वेळ दे . अवघड वाटणारा विषय पहाटे अभ्यासाला घे , आत्मविश्वास मेहनत असेल तर यश नक्कीच समज .

 आरोग्याकडे दुर्लक्ष करता परीक्षेचा बाऊ करता प्रचंड आत्मविश्वासाने  शांत मनाने तू प्रयत्न  केलेस तर तुला त्याचे फळ निश्चितच मिळेल . खूप जास्त मार्क मिळालेच पाहिजे असे दडपण मनावर ठेवू नकोस . तुझी बुद्धिमत्ता चांगली आहेच . तब्येतीकडे लक्ष ठेवून अभ्यास केल्यास केल्यास काळजी करण्याचे कारण नाही . स्वताच स्वतःच्या जीवनाचे  शिल्पकार बनण म्हणजेच जगणं !  Every man is the Architect of his own fortune .

मला तुझी नेहमीच आठवण येते . माझ्या प्रेरणा शुभेच्छा अन् आईबाबांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच . भरपूर मोठा हो. 

तुझा भाऊ,

मोहन

लिफाफ्यावरील पत्ता

तिकीट

 

                                              प्रति,

                      श्री दीपक कुलकर्णी,

रूम नं. 224, शाल्मला हॉस्टेल,

मु.  विद्यानगर,  ता. जि . धारवाड

प्रेषक :

श्री मोहन कुलकर्णी,

' निर्मल ' बिल्डिंग ,

मु. पो. मुचंडी,  ता. जि . बेळगाव

--------------------

 

 

 

(मित्राला पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारे पत्र लिहा )

प्रेषक :               

 श्री प्रवीण पाटील ,

                   घर क्र`. 412/,  'जगदंब निवास ,

               मु. पो. नंदगड,

 ता. खानापूर, जि . बेळगाव

           दि . 30 एप्रिल २०२1

 

मित्रवर्य दयानंद  यास  सप्रेम नमस्कार,

कालच तुझे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. तुझी तब्येत तसेच घरातले सारे बरे असल्याचे कळाले. परंतु तुझ्या गावाकडे खूप उकडत असल्याचे तू कळविले आहेस. पर्यावरणाचा नाश होत  असल्याबद्दल तू खंत व्यक्त केली आहेस. याला आपणच जबाबदार आहोत हे लक्षात घे.

 

          पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा निसर्ग, परिसर, पूर्वीपासून असणाऱ्या निसर्गाचे चक्र बदललेले आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला. प्रदूषणामुळे पृथ्वीवरील तापमानात प्रचंड वाढ झाली. निसर्गाची चक्रे बदलली, ऋतू बदलले, सामान्य विज्ञान नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. वायुप्रदूषण हे वाहनामुळे वाढले; त्यामुळे आजार वाढले. प्रकार उष्णतेमुळे झाडाची हानी व्हायला लागली.

अकाली पाऊस पडायला लागला प्रखर उष्णतेने थंडावा नाहीसा झाला. एकंदरीत निसर्गाचा तोल बिघडला. असाध्य आजारपणामुळे मनुष्यहानी होऊ लागली आहे. या पर्यावरणाच्या डोक्यावर उपाय म्हणजे निसर्ग वाचवायला पाहिजे. यासाठी आपल्याला झाडे जगवा झाडे वाचवा ही मोहीम राबवली पाहिजे. प्रत्येकाने झाडे लावण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला सगळ्यांच्या प्रयत्नांनी हरित सृष्टी निर्माण झाली तरच ही पृथ्वी वाचू शकेल.

मला तुझी नेहमीच आठवण येते . माझ्या प्रेरणा शुभेच्छा अन् आईबाबांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच . भरपूर मोठा हो. 

कळावे, लोभ असावा.

तुझा मित्र

   प्रवीण  

लिफाफ्यावरील पत्ता

तिकीट

 

                                              प्रति,

                       श्री दयानंद धूडूम 

पांडुरंग निवास,

सोमवार पेठ,  पंढरपूर 

प्रेषक :

श्री प्रवीण पाटील ,

घर क्र`. 412/,  'जगदंब निवास,

मु. पो. नंदगड,

ता. खानापूर, जि . बेळगाव

------------------------

(मित्राला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे पत्र लिहा )

 

 प्रेषक :               

 श्री वसंत कडेमनी,

                     334,   'कलावती निवास ,

               मु. पो. येळ्ळूर,

 ता. जि . बेळगाव

           दि . 30 एप्रिल २०२1

 

मित्रवर्य नारायण यास  सप्रेम नमस्कार,

कालच तुझे पत्र मिळाले. तुझी तसेच घरातील साऱ्यांची तब्येत बरी असल्याचे कळाले. वाचून आनंद झाला.  परंतु तुझ्या गावात  अस्वच्छतेमुळे रोगराई वाढली असल्याचे तू कळविले आहेस. पयाबद्दल तू पत्रातून खंतही  व्यक्त केली आहेस. परंतु याअस्वच्छतेला आपणच जबाबदार आहोत हे लक्षात घे.

 

स्वच्छता हे कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही आहे. आपल्या निरोगी आणि स्वस्त जीवनासाठी ही एक चांगली सवय आहे. चांगल्या आरोग्यासाठी सगळ्या प्रकारचे स्वच्छता आवश्यक आहे मग ती स्वतःची व्यक्तिगत का असेना, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, पर्यावरणाची, पाळीव प्राण्यांची काम करण्याची जागा जसे शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी स्वच्छता ठेवायला पाहिजे. आपण सर्वांनी स्वतःच्या बाबतीत जागृत असले पाहिजेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छता कायम असली पाहिजे. आपल्या रोजच्या सवयी मध्ये स्वच्छता अंगीकारली पाहिजे. आपण कधी स्वच्छतेचा कंटाळा केला नाही पाहिजेत त्यामुळे मोठे होऊ आपण एक आदर्श आणि जबाबदार च्या रूपात देशाच्या उन्नतीला आणि प्रगतीला हातभार लावू शकतो.

मला तुझी नेहमीच आठवण येते . माझ्या प्रेरणा शुभेच्छा अन् आईबाबांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच . भरपूर मोठा हो. 

कळावे, लोभ असावा. 

तुझा मित्र,

   वसंत 

लिफाफ्यावरील पत्ता

 

                                              प्रति,

तिकीट

                       श्री नारायण शेट्टी  

लक्ष्मी नारायण निवास,

रंकाळा पेठ,  कोल्हापूर 

प्रेषक :

श्री वसंत कडेमनी,

334,   'कलावती निवास ,

मु. पो. येळ्ळूर,

ता. जि . बेळगाव

------------------------

 

(बहिणीला वाचनाचे महत्त्व पटवून देणारे पत्र लिहा )

 

 प्रेषक :               

 श्री वसंत कडेमनी,

                     334,   'कलावती निवास ,

               मु. पो. येळ्ळूर,

 ता. जि . बेळगाव

           दि . 30 एप्रिल २०२1

 

कु. निलावती हिला अनेक आशीर्वाद,

कालच तुझे पत्र मिळाले.  वाचून आनंद झाला. शिक्षणाच्या निमित्ताने तू  आमच्यापासून दूर आहेस . तेव्हा तुला स्वत:ची काळजी स्वतः घेणे भागच आहे . प्रथमतः प्रकृतीकडे योग्य लक्ष दे. तू निबंध तसेच भाषण स्पर्धेची तयारी असल्याचे कळविले आहेस.  आजच्या जीवनात वाचन महत्त्वाचे आहे हे लक्षात घे. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा " वाचाल तर वाचाल " हा अमूल्य विचार आपल्या सर्वानासाठीच अतिशय मोलाचा आहे . ज्ञान आणि वाचन यांचे नाते जवळचे . जर ज्ञान मिळवायचे असेल तर आपल्याला वाचन करणे गरजेचे आहे . आपल्याला ह्या स्पर्धात्मक जगात ज्ञान मिळवून यशस्वी होण्यासाठी भरपूर वाचनाची गरज असते . वाचनाच्या सवयीमुळे माणसाचे आयुष्य घडत असते . आताच्या आधुनिक जगात ज्ञान मिळवण्याची भरपूर साधने उपलब्ध आहेत त्यामध्ये वाचन हे एक महत्वाचे साधन . वाचन आपल्यापासून कधीच वेगळे नाही . वाचन आणि माणूस हे एकमेकांचे मित्रच . संपूर्ण जीवन बदलवून टाकण्याची ताकद वाचनामध्ये आहे .  

          उत्तम वाचनामुळे आपल्या विचारांमध्ये खूप चांगले बदल घडत असतात .वाचन करण्याने आपली शब्दसमग्री वाढते त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व सुधारते . वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते , रोज येणाऱ्या नवनवीन माहितीमध्ये बातम्या , नोकरी , योजना , शैक्षणिक माहिती तसेच जगात नेमकं काय चालले आहे हे आपल्याला समजते . जर आपण ही माहिती वाचत असेन तर खूप गोष्टी सोप्या होऊन जातात . म्हणूनच वाचन हे आपल्या आयुष्यात खूप उपयुक्त ठरते . 

आम्हाला  तुझी नेहमीच आठवण येते . आमच्या प्रेरणा,  शुभेच्छा अन् आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत . 

कळावे, लोभ असावा. 

तुझाच बंधु,

   वसंत 

लिफाफ्यावरील पत्ता

तिकीट

 

                                              प्रति,

                       श्री निलावती कडेमनी, 

रूम नंबर 24, महिला हॉस्टेल, बी विंग निवास,

विद्यानगर ,  धारवाड  

प्रेषक :

श्री वसंत कडेमनी,

334,   'कलावती निवास ,

मु. पो. येळ्ळूर,

ता. जि . बेळगाव

 

------------------------

(तुम्ही एस् . एस् . एल् . सी . उत्तीर्ण झाला आहात . तुम्हाला पुढील शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखला हवा आहे . तो मागणी करणारा अर्ज मुख्याध्यापकांना लिहा.)

 द्वारा :

वैजनाथ , व्ही . जी .

 निपाणी ,

ता . चिकोडी - जि . बेळगाव,

 पिन .591215

दि . 30 एप्रिल २०२2

 

लिफाफ्यावरील पत्ता

तिकीट

 

                                       प्रति ,

             मा . मुख्याध्यापक ,

न्यू इंग्लिश स्कूल , सिदनाळ

ता . चिकोडी - जि . बेळगाव,

                                                    पिन .591215 

प्रेषक :

वैजनाथ , व्ही . जी .

 निपाणी ,

ता . चिकोडी - जि . बेळगाव,

पिन .591215

 

प्रति ,

मा . मुख्याध्यापक ,

न्यू इंग्लिश स्कूल , सिदनाळ .

                            

                                      विषय - शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बद्दल .   

महोदय,

          मी आपल्या शाळेचा विद्यार्थी असून के.एस्.ई.ई. बोर्डाने एप्रिल 2021 मध्ये घेतलेल्या एस्.एस्.एल्.सी. परीक्षेत उत्तीण झालो आहे . पुढील शिक्षण घेण्याचा माझा मनोदय आहे . तरी मला माझा शाळा सोडल्याचा दाखला लवकरात लवकर देणेची कृपा करावी .

 कळावे ,

                   धन्यवाद ,

                                                                           आपला आज्ञाधारक विद्यार्थी ,

                                                                                   वैजनाथ . व्ही.जी.  

 

पाठांतरासाठीच्या कविता

 या भारतात बंधुभाव

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे दे वरचि असा दे,

हे सर्वपंथ, संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसूदे नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी

मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य सुखा या सकलामाजी वसू दे, दे वरचि असा दे सकलास कळो मानवता राष्ट्रभावना

हो सर्वस्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना

उद्योगी तरुण शीलवान येथे दिसू दे , दे वरचि असा दे जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून

खलनिंदका मनीही सत्य, न्याय वसू दे, दे वरचि असा दे

सौंदर्य रमो घराघरात स्वर्गियापरी

हो नष्ट होऊ दे विपत्ती , भीती बावरी

तुकडयास सदा या सेवेमाजी वसू दे , दे वरचि असादे

सत्कार

पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार उरि जेव्हा ज्वालारस झेलून

धरतीने तप केले दारुण

सुकता सुकतां नद्या म्हणाल्या हाच विश्वसंहार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार त्या काळी धरणीच्या पोटी

या इवल्या बीजाच्या ओठी

थरथरली स्फुरली होती हो श्रध्देची ललकार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार कवच भूमिचे आणि अचानक

भेदुनि आले हिरवे कौतुक

नचिकेताचे स्वप्नच अथवा अवचित हो साकार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार मातीची ही मात मृत्युवर

मृत्युंजय श्रध्देचा अंकुर

हा सृजनाचा विजयध्वज , हा जीवनसाक्षात्कार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार म्हटले स्वागतगीत खगांनी

केला मुजरा लवून ढगांनी

लाल मातिचा गुलाल उधळित पवन करी संचार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार कोसळली सर दक्षिण उत्तर

घमघमले मातीतुनि अत्तर

अष्ट दिशांतुन अभीष्टचिंतन , घुमला जयजयकार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार

 

कवितेचे  सारांश

या भारतात बंधुभाव

  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही प्रसिद्ध अशी कविता आहे. यामध्ये  त्यांनी  भारतात सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे., सर्वांनी मिळून मिसळून रहावे ही तुकडोजींची तळमळ आहे ते म्हणतात. या भारतातील लोकांमध्ये बंधूभाव राहू दे. हे देवा असाच वर मला दे. सर्वपंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. गरीब श्रीमंत एकमताने राहू देत हिंदू मुस्लीम ख्रिश्चन कोणीही असू देत सर्व सुखाने नांदावेत! सगळ्यांना माणुसकी समजु दे. सगळ्यांना राष्ट्राविषयी प्रेम समजू दे. आपापल्या प्रार्थनास्थळात सामुदायिक प्रार्थना होऊ दे. या भारतातील तरुण उद्योगी असू दे आणि तो चारित्र्यसंपन्न असावा असाच वर दे. आम्ही सर्व मिळून जातीभेद विसरून एक होऊन या जगातूनच अस्पृश्यता नष्ट करू. दृष्ट निंदक वाईट लोक यांच्यामध्ये सत्य न्याय असावा असा वर दे देवा. स्वर्गसमान सुंदरता सुख प्रत्येक घराघरात नांदू दे. जगातील सर्व प्रकारची भिती संकट नष्ट व्हावे. असा वर दे देवा आणि या तुकड्यास तुझ्या सेवेसाठी नियमित असावे असाच वर दे. स्वत:साठी देवाकडे ऐष आराम संपत्ती मागता देशासाठी मागत आहेत. हेच खरे राष्ट्रसंत.

सत्कार  

सत्कार मंगेश पाडगावकर यांची गाजलेली कविता असून ती जिप्सी या काव्यसंग्रहातून घेण्यात आली आहे.

या कवितेत सुरुवातीला पृथ्वीची निर्मिती होत असताना प्रचंड ज्वालारस बाहेर पडतो , नदी नाले ओस पडू लागतात . त्यादेजी नद्या पृथ्वीला म्हणतात , की हा विश्वाचा संहार आहे . पण पृथ्वी हे सर्व पचवते , कठोर तपश्चर्या करते या पृथ्वीवर हिरव्या तृण पात्याचा ( जीवसृष्टीचा ) जन्म होतो . त्या पहिल्या तृणपात्याचा कवी सत्कार सोहळा

मांडतो . पृथ्वीच्या पोटातून एक बीज अंकूरु लागते आणि त्या बिजानंतर धरतीवर जीवसृष्टी निर्माण होऊन चैतन्य पसरते , म्हणून कवी त्या पहिल्या तृणपात्याला फार महत्व देतो . पृथ्वीच्या पोटात असलेले इवलेसे बिज भूमिचे कवच फोडून अचानक बाहेर येते . त्या बिजाच्या हिरव्या अंकुराला कवी हिरवे कौतुक म्हणतो त्याला नचिकेताची उपमा देतो . कारण नचिकेताने जशी अवघड प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आत्मज्ञान मिळविले तशाप्रकारे हे हिरवे तृणपाते आहे . म्हणून कवी त्याला नचिकेत म्हणतो . . तृणपाते पृथ्वीवर अंकुरून येते म्हणजे मातीने मृत्यूवर मात केल्यासारखे आहे . कवी या ठिकाणी अध्यात्माची जोड देतो त्याला श्रद्धेचा अंकूर म्हणतो . नवनिर्मितीचा ' विजयध्वज म्हणतो , जीवनसाक्षात्कार असेही म्हणतो . पुढे त्या तृणपात्याच्या सत्कार सोहळ्याचे स्वागतगीत पक्षी म्हणतात , आकाशातील ढग मुजरा करतात आणि वारालालमातीरुपी गुलाल उधळतो म्हणजे कवी या सत्कार सोहळ्याला निसर्गातील घटक घेतो . या सत्कार सोहळ्याला अधिक आनंददायी करण्यासाठी दक्षिण - उत्तर पावसाच्या सरी कोसळतात . सर्वत्र मातीचा सुवासदरवळतो आणि मग शेवटी या सत्कारसोहळ्याचा तृणपात्याचा नलागतो . आठ दिशामधून शुभेच्छांचा जयजयकार घुमू लागतो.

धरण   

धरण या कवितेत कष्ट करूनही उपाशी राहणान्या सामान्य कष्टकर्यांच्या भावना व्यक्त झाल्या अाहेत . ही कष्टकरी माणसे स्वतः कष्ट करतात श्रीमंतांचेत मळे फुलवितात आपण मात्र दारिद्रयात जीवन जगतात.

गावाशेजारीच नदीवर धरण बांधण्याचे काम सुरु आहे . एक गरीब कष्टकरी स्त्री त्या ठिकाणी कामाला जात असते . धरण हे एक दिवसात बांधून पूर्ण होत नाही . त्याला अनेक वर्षे लागतात . म्हणून ' धरण - धरण ' हा शब्दकवीने कल्पकतेने दापरला आहे . त्या धरणाच्या कामात तिला मोबदलाही कमी मिळतो , म्हणून ती स्वतःचे मरणच त्या ठिकाणी कांडते आहे , असे ती दु:खाने म्हणत आहे . .

 ही कष्टकरी स्त्री सूर्योदयापूर्वी उठून धान्य दळण्याचा प्रयत्न करते , पण घरी धान्यच नसल्याने ती निराश होते . शेवटी कणी कोंडा वापरुन स्वयंपाक करते. कामासाठी निघून जाते . पण दुपार झाल्यावर तिचा जीव घराच्या ओढीने घोटाळायला लागतो . कारण आपलं तान्हें लेकरू वेताच्या टोपलीखाली झोपवून ती बाहेर पडलेली असते . कामाच्या ठिकाणी उन्हाच्या झळा सोसवत नाहीत . तरीही हातोडीचे घाव घालून मोठे मोठे दगड ती फोडत होती.  तिला वेदना होत होत्या, तू येत होते . पायाला चटके बसू नयेत म्हणून ती झाडाची ओली पाने बांधून घेते . अशा या कष्टकरी स्त्रीच्या त्यागातून धरण बांधून पूर्ण होते . सर्वत्र पाणी पुरवठा होतो . श्रीमंतांचे ऊसाचे , धान्याचे मळे फुलतात . पण धरण बांधण्यासाठी हाडाची काडं केली , तिला मात्र घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं . ही शोकांतिका आहे . धरणाच्या बांधकामामुळे सर्वत्र भरभराट होते . लोक कामत होतात , पण ज्या रखीच्या कष्टातुन , घामातून ये धरण बांधले  गेले त्यांच्या घरी मात्र अठराविश्व दारिद्रयच राहते . कष्टकरी समाजाचे प्रातिनिधिक स्वरुपातून वर्णन या कवितेत आले आहे

नेनंता गुराखी  

कवी इंद्रजित भालेराव यांनी नेनंता गुराखी ही कविता लिहिली असून या कवितेचे मूल्य "श्रमप्रतष्ठा' आहे. "आम्ही काबाडाचे धनी' या दीर्घ कवितेतून घेतलेला हा भाग आहे. या कवितेत लहानपणीच कवीवर गुरे राखण्याची वेळ येते. या कवीच्या घरची गरिबी शेतकरीवर्गाचे दु: यातून व्यक्त होते.

लहानपनी चिखलाच्या गायीबरोबर खेळण्याच्या अजाणत्या वयात कवीवर गायीगुरे चारण्याची जबाबदारी येऊन पडली. अजाणत्या वयात प्रौढत्व आल्यासारखे वाटले. ढीगभर जनावरामागे धावताना त्या लहानच्या जीवाची रागामुळे आग-आग व्हायची. तेव्हा तो चिडून दातओठ खाऊन गायींना बदडायचा. तरीसुध्दा ती जनावर दुसऱ्याच्या शेतात शिरून धान्याच्या कणसाला तोंड लावायची. कितीही परतवलं, तरी पुन्हा पिकात घुसायची. शेवटी त्यांचा मागं पळून आदळ-आपट करून कवीचा जीव मेटाकुटीस यायचा. हातपाय दुखू लागायचे तो लहानसा जीव रडत बसायचा. त्याची फजिती पाहून त्याची समजूत काढण्यासाठी त्याची आई त्याच्यासाठी जात्यावर रचलेल्या ओव्या म्हणायची. तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच कवी पुन्हा नव्या जोमाने गुरं हाकायचा.

ज्या वयात लहान मुलांनी खेळायच, बागडायचं, गमती जमती करायच्या, त्या वयात या मुलाला गुरं हाकावी लागतात. हा मुलगा कधी म्हशीच्या पाठीवर बसायचा, तेव्हा त्याला पालखीत बसल्याचा भास होत असे. काळ्याकुट्यातून धावताना त्याचे पाय निब्बर व्हायचे. त्याच्या पायाला चट्टे पडायचे. गाई म्हशीत तो सहजच वावरत होता. ती जनावर त्याला कधीच शिंग मारीत नव्हती. उलट या अजाणत्या गुराख्याला आपल्या थंडगार आचळाजवळ आसरा द्यायच्या. अचानक पाऊस सुरू झाला की हा अबोध गुराखी गायीच्या पोटाखाली लपायचा. असा हा लहानगा जाणीव नसलेला गुराखी गाईगुरासमवेत रमायचा. घरी आल्यावर गाई गुरे सांभाळण्यात सदैव गोठ्यात गुंग असायचा. जेव्हा तो गाई गुरांना चारून दमूनभागून घरी यायचा तेव्हा आईला वाटायचे की त्याला गरमा गरम दूध भात खाऊ घालावा. पण, गरीब परिस्थितीमुळे ते शक् होत नव्हते. जसे श्रीकृष्णाला गाईगुरामुळे मुबलक दूधदूभते मिळाले. तसे या कविता मिळू शकले नाही. कारण अपुऱ्या चाऱ्यामुळे गायी आटल्या होत्या. त्यामुळे कवीच्या आईला दुसऱ्याच्या घरून उसणे दूध मागून आणावे लागते. यातून शेतकऱ्याच्या घरच्या गरीब परिस्थितीचे यथार्थ वर्णन कवी इंद्रजित भालेराव यांनी केले आहे.  

 

4 गुणांचे प्रश्न

1) भारत कशाप्रकारे  असावा अशी संत तुकडोजीनी अपेक्षा केली आहे

उत्तर : ‘‘या भारतात बंधूभाव या कवितेतून आधुनिक नव्या विचारसरणीच्या भारताची अपेक्षा संत तुकडोजी महाराज करतात. भारतात एकता नांदावी. सर्वधर्म समभाव राहावा. गरीब श्रीमंत सर्वजण सुखाने नांदावेत, सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वातंत्र्यसुख अनुभवता येऊ दे, सर्वांना राष्ट्र भावना मानवता यासारख्या गोष्टी कळू दे, पत्येक तरुण हा उद्योगी व शीलवान व्हावा, जातीभेद नष्ट व्हावा, जे दुष्ट वृत्तीचे लोक आहेत. त्यांच्याही मनात सत्याची भावना निर्मा व्हावी, पत्येक घरात स्वर्गसुख निर्माण होऊ दे. अशी अपेक्षा संत तुकडोजीनी केली आहे.

2)   हिरव्या तृणपात्यांचा सत्कार का व कसा करण्यात आला

उत्तर : मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी काव्यसंग्रहातून ही निसर्गकविता निवडली आहे. प्रतिकूल परिस्थिती असताना म्हणजे कुठेही पाण्याचा अंश नसताना नद्या सुकून गेलेल्या असताना एक गवताचे पात उगवते. जणू ते सांगतय की, अशी परिस्थिती राहणार नाही. त्याला आशेचा किरण आहे. त्याने नचिकेताप्रमाणे यमावर विजय मिळवला होता. मग त्याचा सत्कार नको करायला, तर सत्कारासाठी पक्षांनी स्वागतगीत म्हटले, ढगांनी त्यांना मुजरा केला, आठ दिशांचा सुगंध घेऊन गुलाल घेऊन वारा येतो, गुलाल उधळतो आणि काय आश्चर्य दक्षिणोत्तर सरीसरी पाऊस कोसळला. धरणी तृप्त झाली व मृदगंध पसरला. जयजयकार अष्टदिशांनी केला. सोहळा ख-या अर्थाने साजरा झाला.

3) रामजोशींनी ढोंगी भक्तावर कोणत्या शब्दांत हल्ला चढविला आहे ?
उत्तर : केवळ हट्टानेच भगवी वस्त्रे धारण करून, डोईवर जटा ठेवून, मठाची स्थापना करून, गळ्यात तुळशी माळा घालून हा सारा व्यर्थ उठाठेव तुम्ही का करता आहात ? मनापासून केलेले नामस्मरण तेवढेच देवाला आवडते. त्याला या बाह्य अवडंबराची गरज नाही. ‘भक्त’ म्हणवून घेणाèयाने भक्तिरसात रममाण झाले पाहिजे. बाह्य गोष्टींचे अवडंबर माजविणे म्हणजे दांभिकपणाच होय. कांजीला अमृत म्हणून कवटाळणे जितके मूर्खपणाचे तितकेच खरी भक्ती टाकून देऊन बाह्य अवडंबरात गुंतणे मूर्खपणाचे. तीळ, तूप, तांदूळ, दर्भ जाळीत यज्ञ करणे व पशुहत्या करणे हे सारेच ढोंग आहे. अशा ढोंगाला परमेश्वर कधीही भुलणार नाही. अशा लोकांचे हातून धर्मही घडत नाही व कर्मही घडत नाही. ही द्विधा मनाची माणसे केवळ नरकालाच जातील. अशी टीका रामजोशी यांनी केलेली आहे.

4) धर्माच्या नावाखाली ढोंगी गुरू काय काय करतो

उत्तर :  राम जोशींची ही प्रसिद्ध अशी अध्यात्मिक लावणी आहे. ही लावणी राम जोशींनी कवी मोरोपंत यांना म्हणून दाखवली तेव्हा मोरोपंतांनी त्यांना कवीश्वर पदवी दिली होती. त्यामध्ये राम जोशींनी ढोंगी साधूवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणतात हे ढोंगी बाबा मोठ्या हट्टाने आपल्या जटा रंगवतात. उगाचच मठाची चौकशी करतात, वनात जातात पण चुकूनसुद्धा हरीचे नाव मनात घेत नाहीत. गळ्यात तुळशीमाळा घालतात, पण हरीशी त्यांचे वाकडेच असते. त्यामध्ये असल्या लोकांबरोबर राहून हे मानवा तू काय अध्यात्म मिळवणार आहेस? हे लोक तीळ, तांदूळ, तूप घालून यज्ञ करतात. दंड कमंडलू धार करतात. या सा-या खोट्या गोष्टी आहेत. हे तारण्य तलवारीसारखे तेज असते. ते पुन्हा पुन्हा येणार नाही. भगवंताला खरी भक्तीच आवडत असते. तुला धर्माचे रहस्य कळत नाही म्हणून तू अशा ढोंगी गुरूंच्या मागे लागतोस हे लक्षात घे. तू तुझे चित्त द्विधा न करता ख-या देवाची भक्ती कर, भक्तीने वाहिलेले १ पान १ फुलसुद्धा त्याला पुरेसे. यापेक्षा नुसते त्याचे नाव घेतले तरी त्याच्यापर्यंत पोचतो पण अशा ढोंगी लोकांनाच समाज पुजतो हेही खरे !  

0000000000000

धरण  कवितेतील स्त्रीच्या गरीब परिस्थितीचे वर्णन कसे केले आहे ?

  , या कवितेत स्त्रीच्या घरी अठराविश्व दारिद्र्य असते . त्यासाठी तिला घरदार सोडून दिवसरात्र कष्ट करावे लागतात . स्वतःचे तान्हे मूल असन सुद्धा ती घरी थांबत नाही . तिच्या घरी पीठ करायला धान्य नाही . कणी कोंडा घालून ती स्वयंपाक करते . तिला असंख्य वेदना सहन कराव्या लागतात . तरीही ती राबते . दुसऱ्यांचेच शिवार तिच्या घामातून फुलते , पण घोटभर पाण्यासाठी तिला वणवण करावी लागते . एव्हढे कष्ट करुनही तिला  योग्य तो मोबदला मिळत नाही.

00000000000000000000000000

              पाहुणे कसे निगरगट्ट आहेत
उत्तर : पाहुणे कोणत्याही पकारची पूर्वसूचना न देता कवीच्या घरी पहाटे पहाटेच हजर होतात व घराच्या ओसरीवर पसरलेले असतात. स्वत:च्या घरात असल्यासारखेच ते वागतात. सर्वांच्या समोरच स्वयंपाक घरातील खाद्यपदार्थाच्या डब्यावर हल्ला करतात. वडिलांच्या पान सुपारीच्या पेटीतून पानाचे जुडगे पळवितात. स्वत:च्या वर्तनाचे त्यांना काहीच वाटत नाही. अशापकारे पाहुणे निगरगट्ट आहे.  

संदर्भासह स्पष्टीकरण करा.

1) हं हळू बोल, तनयाते

उत्तर : संदर्भ : वरील काव्यपंक्ती पाहुणे या कवितेतील असून ही कविता केशवकुमार यांनी लिहिलेली आहे.

स्पष्टीकरण : घरी आलेले पाहुणे कोणताही विचार न करता वाट्टेल तसे वागत असतात. त्यांचे वर्तन बघून बाळ्याला आश्चर्य वाटते व तो आईला यांचे घरदार नाही का असा पश्न विचारतो. त्यावेळी आईने वरील उद्गार काढले आहेत.

२) देवा रे मगती स्फुदे! एवढा तरी जाऊदे! ससंदर्भ स्पष्ट करा
उत्तर : संदर्भ : वरील काव्यपंक्ती पाहुणे या कवितेतील असून ही कविता केशवकुमार यांनी लिहिलेली आहे.

              स्पष्टीकरण : घरी आलेले पाहुणे वाट्टेल तसे वागत असतात.  या पाहुण्यांच्या वर्तनाने आई कंटाळली आहे. कारण ते आळशी चोरटे आहेत. अखेरीस ती देवालाच विणवणी करते की हा तरी जाऊ दे!

0000000000000000

४) ही बारबार तलवार येईल का पुन्हा म्हणजे काय
उत्तर : शाहीर राम जोशींच्या अध्यात्मिक त, लावणीतून हा भाग निवडला आहे. समाजात धर्माच्या नावाखाली जे ढोंगी साधूचे प्रस्थ मांडले आहे त्यावर समसणून टीका करून कवीने तरुणपणाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामध्ये तारण्यातच ईश्वरप्राप्तीची तयारी करायची असते, असे म्हणून त्यांनी तारण्याला धारदार तलावारीची उपमा दिली आहे. ही तलवार गाजवून अध्यात्माचा पराक्रम करायचा त्यामुळे हे तारुण्य पुन्हा पुन्हा येणार नाही, त्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा, असे त्यांना वाटते. तरुणपणाला तलवारीची उपमा देऊन राम जोशींनी त्यात ला जोश  दाखवलाय.

000000000000

              श्रीकृष्णाची प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी काय करणार आहे ?
उत्तर : कवी नरेंद्र यांनी लिहिलेल्या या ग्रंथात रुक्मिणीचे श्रीकृष्णावर प्रेम आहे तिने पती म्हणून त्यालाच वरले आहे श्रीकृष्णाची प्राप्ती व्हावी म्हणून तिने अनेक व्रते केली तरीही श्रीकृष्णाची प्राप्ती झाली नाही तर जीभ हासडून जीव देईन असे म्हणते त्यानंतर शंभर जन्म घेऊन उग्र तपश्चर्या करून श्रीकृष्णाला मिळवेनच असे म्हणते

0000000000000

000000000000000000000

झाडे लावा झाडे जगवा

 

माणसाला वृक्षवेलीचे मोठेपण , त्यांची आवश्यकता फार पूर्वीच कळली आहे . म्हणूनच एका संस्कृत श्लोकात सांगितले आहे की , जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात , ज्यांची फळे फुलेही दुसऱ्यांसाठीच असतात , असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखादया सत्पुरुषासारखे भासतात . या वृक्षरूपी सत्पुरुषाचे सान्निध्य  आबाल वृध्दांना , सामान्य जनांना त्याबरोबरच सत्पुरुषांनाही लाभावे असे वाटते म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन , अध्यापन  आणि तपश्चर्या करीत असत . संत तुकाराम म्हणतात , ' वृक्षवल्ली आम्हा सोयरी ' इंदिरा संत म्हणतात ,  जरी वेढिले चार भितीनी , या वृक्षांची मजला संगत . ' सामान्य माणूसही नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी , हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यातच जातो . अशा या उपकार कर्त्य वृक्षाचा आज ऱ्हास होत आहे . मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत . " After man , the desert - ' ' मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहूल ' अशी म्हण आहे . जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली . त्यामुळे उष्णता वाढली . पावसाचे प्रमाण कमी झाले . जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली . दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड दयावे लागते आहे . आपल्या पूर्वजांनी वृक्षांना महत्व दिले होते . तुळस , वड , पिंपळ यांची ते पूजा करीत असत . त्यांनी तुळस , बेल , दूर्वा , धोतरा या आणि अन्य वनस्पतीना देवतांच्या पूजेत स्थान दिले होते . वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे . ते खनिज संपत्तीप्रमाणे ओहोटीस लागणारे धन नाही . म्हणूनच सरकारने वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे . सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन वृक्षसंरक्षणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत . सर्वसामान्य जनतेलाही यासाठी सहजपणे , पण खूप काही करण्यासारखे आहे . हिमालयाच्या उतरणीवर होणारी जंगलतोड थांबविण्यासाठी तेथे कामगारांकडून ' चिपको आदोलन ' उभारले गेले . हे आंदोलन सामान्य माणसांनी केलेले असल्याने ते विलक्षण प्रभावी ठरले . अशा प्रकारे सामान्य माणसांना या मोहिमेत सामील करून घेतले पाहिजे . अहिल्याबाई होळकरांच्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी पंचवीस झाडे लावावी लागायची , हे लक्षात घेण्यासारखे आहे . आपल्याला शिक्षणसंस्थांमधून वृक्षसंवर्धनाचे उपक्रम हाती घेण्यासारखे आहेत . ' एक मूल , एक झाड ' हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणावे . झाड तोडण्यापूर्वी  लावण्याची सक्ती असावी . ठिकठिकाणच्या महापालिकांनी झाडे तोडण्याविरुद्ध कायदा कला आहे . वृक्षारोपणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे मोफत रोपेही पुरवली जातात . अशा उपक्रमांचा फायदा घेऊन प्रत्येकाने आयुष्यात स्वतःहून एक तरी झाड रुजवले पाहिजे. असे एक जरी झाड प्रत्येकाने रुजवले . जोपासले , तरी ते प्रत्येकाचे मोक्षसाधन ठरेल .

0000000000

 

1) हाऊस व्हाइवज या संस्थेची माहिती लिहा

उत्तर :­ जपान मधील या महत्त्वाच्या संस्थेची स्थापना 1948 साली झाली. यांची खूण लाकडाचा मोठा हात असून मातीमोल होत चाललेल्या राष्ट्रांच्या संरक्षणासाठी पुढे आलेला हात या गॄहिणीनी वर्गणी जमवून सहा मजली इमारत बांधली. प्रत्येक मजल्यावर वेगवेगळे  वर्ग तेथे चालतात. तेथेच वस्तूतील भेसळ तपासली जाते. सरकारवर यांचा वचक असून सरकार सुद्धा यांना दचकून असते. अशा या संस्थेच्या देशभर 207 शाखा आहेत. 

00000000000

) मदर्स युनियन या संस्थेची महिती लिहा

उत्तर - ही जपान मधील महत्त्वाची संघटना असून १९४५ साली याची स्थापना झाली.कारण हिरोशिमावरील बाँब हल्ल्यात अनेक घरे, कुठुंबे उध्वस्त झाली. त्यांना आश्रय देण्यासाठी याची स्थापना झाली. यांची तीन मजली इमारत असून तेथे पालकांची संस्था,शिक्षक संघटनेचे ऑफिस, मदर्स युनियनचे ऑफिस आहे.या संस्थेच्या अध्यक्षा ७०-७५ वर्षाच्या असूनही उत्साही होत्या.

000000000000

              आपला मुलगा पास झाल्याचा आनंद आक्का का व्यक्त करू शकत नव्हती?
. : लेखक सातवीच्या परीक्षेत शाळेत पहिल्या क्रमांकाने पास होतात. ही बातमी आक्काला सांगितल्यावर तिलाही आपल्यासारखा खूप आनंद होईल असे लेखकाला वाटते. पण तसे झाले नाही. लेखकाने आपण पास झाल्याची बातमी सांगूनही आक्काच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा काळजीच जास्त जाणवत होती. आपला मुलगा हुशार आहे. त्याला जर आपण पुढं शिकवल तर आपले भविष्य उजळेल असे तिला वाटते. पण हे जरी खर असल तरी घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आपल्या मुलाच्या पुढील शिक्षणाचा खर्च कसा करायचा, पैसे कोठून जमवायचे या काळजीने आक्का आनंद व्यक्त करत नव्हती.

000000000

डॉ. शिबिरांमध्ये कोणकोणत्या गोष्टीची माहिती दिली ?

उत्तर - डॉ.सुरू केलेल्या शिबिरांमधून शेती, आरोग्य,पर्यावरण आणि शासकिय योजना या चार विषयाची माहिती देत. प््रात्येक विषयाचा संबंध मुलांच्या दैनंदिव जीवनाशी कसा आहे हे सांगून शास्त्रोक्त शेतीचे फायदे, प््राात्यक्षिकासह दाखवत . आहार आजार हे आरोग्य विषयातून सांगून पर्यावरणात जंगल संपत्तीचे रक्षण कसे गरजेचे हे सांगून शासकीय योजनांची माहिती, मार्गदशन केले जाई. यातून मुलांचा आत्मविश्वास वाढून व्यवहार ज्ञान दिले जाई.

) शिबिराचा अदृश्य परिणाम कोणता?

उत्तर - आदिवासी भागात सुधारना करण्यासाठी डॉ. शिबिरे घेऊन शेती, पर्यावरण, आरोग्य शासकीय योजना याची माहिती दिली. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढल्याने ती योग्य तेथे विरोध करू लागली. जवळजवळ यामुळे पाचशेहे कार्यकर्ते तयार होऊन मेळघाटातील आसपासच्या गावात जाऊन शेती विषयक प््रायोग सुरू केले. योजनांची महिती सर्वांना देऊन स्वावलंबी बनवले. त्यामळेच शेतकर्याच्या आत्महत्येचं लोण मेळघाटात पोहचू शकले नाही. हा शिबिराचा अदृश्य परिणाम होय.

वाटणीच्या घोळाने घरात काय घडत होते ? त्यावर कोणता उपाय सुचविला?

उत्तर - वाटणीच्या घोळाने घरातील कटकटी वाढत होत्या. शेतातील कामे खोळंबून राहत होती. तर कधी चूल बंद पडत होती. आठ दिवसापासून तर धुसपुस अधिकच वाढली होती. अशा भांडणात जगण्यापेक्षा वाटणी होणे फार चांगले असे गणातात्यांना वाटू लागले म्हणून वाटणी करणे हाच योग्य उपाय आहे असे पंच मंडळींनी सुचविले.

 

  आण्णाने काय काय करावे असे आईला वाटते ?

उत्तर - दारू पिल्यामुळे आई रोज आण्णाला शिव्या द्यायची, भांडणे व्हायची त्यामुळे त्यांनी दारू सोडावी, रोज कामाला जावे, पैसे मिळवावेत, संसारासाठी वापरावेत, पोरांना शिक्षणासाठी द्यावेत, घर बांधावे, पोरांना कपडे द्यावेत संसाराकडे लक्ष द्यावे असे आईला वाटते.

000000000000

गंगूबाईंच्या गळ्यावर शत्रक्रिया का झाली ? त्याचा काय परिणाम झाला ?

उत्तर - कारण त्यांचा आवाज पातळ, नाजूक आणि बारीक होता. त्या गात असताना घसा दुखू लागे. त्यामुळे डॉक्टरांनी टॉन्सिल्सचे ऑपरेशन करण्यास सांगितले. ऑपरेशन नंतर त्यांचा आवाज बदलून पुरूषी झाला. तरीही घाबरता त्यांनी सराव सुरूच ठेवला.

) धारवाडच्या राष्ट्रीय विद्यालयातील वातावरण कसे होते ?

उत्तर - राष्ट्रीय विद्यालयातील वातावरण देशप्रेमाने भारावलेले होते. गंगूबाईना देशप्रेमाचे धडे तेथेच मिळाले.तेथे मोठेमोठे साहित्यीक,राजकीय व्यक्ती येत. वंदे मातरम् भारतमातेची वर्णनपर प््राार्थना येथे म्हटली जाई. आणि शिक्षणाबरोबर देशप््रोम, राष्ट्राभिमान वाढविण्याचे पोषक वातावरण या शाळेत होते.

 

) “बहुत अच्छा बेटी, अब खूब खाना और बहोत गाना”(संदर्भासहित स्पष्टीकरण करा )

संदर्भ - वरील उद्गार संध्या देशपांडे यांच्या स्वरगंगा या व्यक्तीचित्रणातील आहे.

स्पष्टीकरण -  अंबाबाई यांच्या घरी किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँ होते त्यावेळी लहान गंगूबाईना त्यांनी गायला सांगितले त्यानुसार गंगूबाईने पद म्हणून दाखविल्यावर तिचा ढंग आणि आवाज पााहून खाँ साहेबांनी गंगूबाईला म्हटलेल्या वरील वाक्यातून दिलेले प्रोत्साहन दिसून येते

000000000000000

) ‘विरहिणी’ म्हणजे काय ?

उत्तर - देवाच्या विरहाने आर्त झालेल्या भक्ताच्या अवस्थेचे वर्णन असणारी काव्य रचना.

) पाहूणे म्हणून घरी कोण यावे असे कवीला वाटते ?

उत्तर - पाहूणे म्हणून घरी पंढरीचा विठ्ठल  यावे असे कवीला वाटते.

) हवा असलेला शकून सांगण्यासाठी कवी कावळ्याला कोणकोणत्या गोष्टी देऊ करतो ?

उत्तर - हवा असलेला शकून सांगण्यासाठी कवी कावळ्याला दहीभाताचा घास, वाटीभरून दूध पाय सजविण्यासाठी सोने, तसेच पिकलेल्या रसाळ आंब्याची डहाळी  देऊ करित

नरेंद्र कोणाच्या दरबारात कवी होते?

उत्तर - नरेंद्र रामदेवरायाच्या दरबारात कवी होते.

) रूक्मिणीच्या गुरूचे नाव काय ?

उत्तर - सुदेव हे रूक्मिणीच्या गुरूचे नाव होय.

) रूक्मिणीचे लग्न कोणाशी ठरविले होते ?

उत्तर - रूक्मिणीचे लग्न शिशूपालाशी ठरविले होते

ही बार बार तलवार येईल का पुन्हा ?”(संदर्भासहित स्पष्टीकरण करा )

संदर्भः- वरील कवितेची ओळ शाहीर राम जोशी  यांच्या भला जन्म हा या अध्यात्मीक लावणीतील असून परमेश्वर भक्तीचे महत्त्व पटवून देताना कवीने ही ओळ म्हटली आहे.

स्पष्टीकरणः-  आपल्याला जो नरजन्म मिळालेला आहे त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. हा तलवार रूपी जीव सांभाळून ठेवला पाहिजे मनातील द्वेष मत्सर काढून टाकला पाहिजे हे सांगताना वरील ओळ  कवी स्पष्ट करतो.

 

पाहूणे कसे निगरगट्ट आहेत ते सांगा.

उत्तरः-पाहूणे कोणत्याही प््राकारची पूर्व सुचना देता कवीच्या घरी पहाटे पहाटेच हजर होतात घराच्या ओसरीवर पसरलेले असतात स्वतः च्या घरात असल्यासारखेच वागतात. सर्वाच्या समोरच स्वंयपाक घरातील खाद्यपदार्थाच्या डब्यावर हल्ला करतात.वडिलांच्या  पान सुपारीच्या पेटीतून पानाचे विडीचे जुडगे पळवितात.स्वतः च्या वर्तनाचे त्यांना काहीच वाटत नाही. अशाप््राकारे पाहूणे निगरगट्ट आहेत.

हिरव्या तृणपात्याचा सत्कार का कसा केला आहे ?

उत्तर -लाव्हारसामुळे माती मृत होते. या पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होईल याची शाश्वती नसताना पृथ्वीच्या पोटातून एका लहानशा बीजाचा अंकूर बाहेर पडतो. हे हिरवे तृणपाते पृथ्वीवर जन्म घेते म्हणून कवी या तृणपात्याचा सत्कार सोहळा मांडतो.

          या सत्कार सोहळ्याचे स्वागतगीत पक्षी म्हणतात. ढग त्याला मुजरा करतात. लाल मातीरूपी गुलाल उधळला जातो. सत्कार आनंददायी व्हावा म्हणून दक्षिण-उत्तर पावसाच्या सरीवर सरी कोसळण्यास सुरूवात होतात, सर्वत्र मातीचा सुगंध दरवळतो तसेच आठ दिशामधून विजयाचा जयजयकार घुमू लागतो. अशाप््राकारे तृणपात्याचा सत्कार केला आहे.

 

गुराख्याचे पाय कशाने निब्बर होतात ?

उत्तर -गुराख्याचे पाय काट्याकुट्यात जाऊन निब्बर होतात

गुराखी कृष्ण झाला नाही असे कवी का म्हणतो?

उत्तर -गोकूळातील श्रीकृष्णाच्या गाई मुबलक दुभत्या( दुध देणाऱ्या) होत्या, त्यामुळे कृष्णाला पोटभर दूध मिळत असे, मात्र या गरीब गुराख्याच्या गाई आटल्या(दूध देत नाहीत) आहेत. तसेच त्याची आई दुसऱ्यांकडून  उसने दूध मागून आणते म्हणून गुराखी श्रीकृष्ण झाला नाही असे कवी म्हणतो.

 

) कष्ट करून शिवार पिकविणाऱ्या स्त्रीला घोटभर पाणी का मिळत नाही ?

उत्तर -या कवितेतील सामान्य स्त्रीयांना धरणांची कामे करण्यासाठी राबवून घेतले जाते. या कष्टकरी स्त्रीयांच्या जीवावर धरणे बांधून इतरांचा शिवार पिकवला जातो. पण इतके कष्ट सोसून देखील त्या धरणातील पाणी त्या स्त्रीयांना मिळत नाही. कारण या स्त्रीयांचा त्या पाण्यावर अधिकार नाहीम्हणून घोटभर पाण्यासाठी फिरावं लागते.

 

भूके जीव काय काय करतील असे कवी म्हणतो?

उत्तर -भूके जीव देवाला इशारा देतात, तू समोर येऊ नको नाहीतर तुझे रक्त देखील वर्ज्य नाही.तसेच आमची भूक शमविला नाहीस तर तुझ्या माथ्यावर घणाचे घाव घालतील. असे कवी म्हणतो.

 

) आपला मुलगा पास झाल्याचा आनंद आक्का का व्यक्त करू शकत नव्हती?
. : लेखक सातवीच्या परीक्षेत शाळेत पहिल्या क्रमांकाने पास होतात. ही बातमी आक्काला सांगितल्यावर तिलाही आपल्यासारखा खूप आनंद होईल असे लेखकाला वाटते. पण तसे झाले नाही. लेखकाने आपण पास झाल्याची बातमी सांगूनही आक्काच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा काळजीच जास्त जाणवत होती. आपला मुलगा हुशार आहे. त्याला जर आपण पुढं शिकवल तर आपले भविष्य उजळेल असे तिला वाटते. पण हे जरी खर असल तरी घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आपल्या मुलाच्या पुढील शिक्षणाचा खर्च कसा करायचा, पैसे कोठून जमवायचे या काळजीने आक्का आनंद व्यक्त करत नव्हती.

 

* संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1) ""
दिसं कासवाला आला, जीव मागे घोटाळला''
. : वरील काव्यपंक्ती "धरण' या कवितेतील असून "दया पवार' यांनी ही कविता लिहिली आहे.
स्पष्टीकरण : कष्टकरी स्त्री धरण बांधण्याच्या कामासाठी जाते. उन्हातान्हात काम करते. ज्यावेळी दुपारची वेळ होते, त्यावेळी तिला घरची ओढ लागते. कारण कामाला येताना आपल तान्हं बाळ ती घरी सोडून आलेली असते. म्हणून ती हे वाक् म्हणते.
*
खालील प्रश्नाचे 8-10 वाक्यात उत्तरे लिहा.  

 

"शील' या गुणाबद्दल आंबेडकर काय म्हणतात?
. : आंबेडकर म्हणतात की, विद्येबरोबरच आपल्यात शील म्हणजे शिलाशिवाय विद्या फुकटची आहे. विद्येबरोबर एखाद्याजवळ शील असेल तर त्यायोगे तो एखाद्याचे संरक्षण करेल परंतु एखाद्याजवळ विद्या असून तो शीलवान नसेल तर विद्येच्या पवित्र शस्त्राने दुसऱ्याचा घात करेल. अडाणी लोक कुणाला फसवू शकत नाहीत पण शिकल्या सवरलेल्या लोकांत लबाडी करण्याचा युक्तीवाद असतो. शेवटी आंबेडकर म्हणतात शिलाशिवाय लोक निपजू लागले तर समाजाचा राष्ट्राचा नाश आहे. म्हणून त्यांच्या मते शिक्षणापेक्षा शीलाची किंमत अधिक आहे.

संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1) "
दीर्घोद्योग कष्ट करण्याने यश प्राप्त होते.'
. संदर्भ : वरील वाक् "विद्यार्थ्यांनो, जागृत व्हा!' या पाठातील असून, या पाठाचे लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.
स्पष्टीकरण : कोणतेही काम करत असताना कंटाळा करता सतत क्रियाशील राहून कष्ट केले पाहिजेत. तेव्हाच आपल्याला यश प्राप्त होते आणि जीवनात खरा आनंद मिळतो. हे सांगताना आंबेडकरांनी वरील वाक् म्हटले आहे.

 

1) गंगूबाईंना कोणकोणत्या उपाधीनी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले?
. : गंगूबाई हनगल हिंदुस्थानी संगीतातील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांना अनेक पुरस्कार उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण, तानसेन, केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, माणिरत्न, कर्नाटकभूषण, गोदावरी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर सहा विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट देऊन गौरविले आहे. संगीत सरस्वती, संगीत सम्राज्ञी, भारतीय कंठ अशा उपाधीही त्यांना मिळाल्या आहेत.

1) बेळगावमधील कॉंग्रेस अधिवेशनच्या घटनांचे वर्णन करा.
. : 1924 साली बेळगावमध्ये कॉंग्रेसचे अधिवेशन झाले. . गांधी अधिवेशनाचे अध्यक्ष ते सुध्दा बेळगावला होणाऱ्या अधिवेशनचे. या बातमीचे साऱ्या परिसरात चैतन्य पसरले होते. या कार्यक्रमाचे स्वागतगीत गाण्याचा मान गंगूबाई त्यांच्या शाळेतील इतर विद्यार्थिनींना मिळाला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 11 होते. स्वागतगीत, शिकविण्यासाठी म्हैसूरहून एक शिक्षक आले होते.व्यासपीठावर गांधीजी, नेहरू, महम्मदअली जिना, गंगाधर देशपांडे . बडी नेते मंडळी होती. मनात भिती असूनही सगतगीत इतके उत्तम झाले की, प्रत्यक्ष गांधीजींनी त्यांना शाबासकी दिली. गंगूबाईंची जात कोळी असल्याने त्या अधिवेशनात जातीवरून आपला अपमान होईल, असे त्यांना वाटले, पण तसे काही घडले नाही. या घटना दीर्घकाळ त्यांच्या स्मरणार्थ राहिल्या.

 

1. तात्यांच्या घरात धुसफूस का वाढली होती? त्यावर त्यांनी कोणता उपाय सूचविला?
. : गणातात्यांना दोन मुले होती. दोघांचीही लग्ने झाले होती. गेल्या सहा महिन्यापासून त्या दोघांनाही एकत्र राहायला नकोसे वाटत होते. वाटण्या करून वेगळं राहण्यासाठी घरात घोळ सुरू होता. घरात भांडणतंटा वाढला होता. घरातल्या कटकटीमुळे शेतातील कामे व्यवस्थित हंगामशीर होत नव्हती. ती खोळंबून राहात हाती. कधी कधी चूलही पेटत नव्हती. गेल्या आठ दिवसांपासून धूसफूस अधिक वाढल्याने वाटण्या होणे फार चांगले असे गण्यातात्यांना वाटू लागले. म्हणून वाटणी हाच त्यावर उत्तम उपाय आहे पण तीन वाटण्या करण्यास त्यांनी अनुमती दिली.

 

1) भारत कशाप्रमारे असावा अशी संत तुकडोजीनी अपेक्षा केली आहे?
उत्तर : "या भारतात बंधूभाव' या कवितेतून आधुनिक नव्या विचारसरणीच्या भारताची अपेक्षा संत तुकडोजी महाराज करतात. भारतात एकता नांदावी. सर्वधर्म समभाव राहावा. गरीब श्रीमंत सर्वजण सुखाने नांदावेत, सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वातंत्र्यसुख अनुभवता येऊ दे, सर्वांना राष्ट्रभावना मानवता यासारख्या गोष्टी कळू दे, प्रत्येक तरुण हा उद्योगी शीलवान व्हावा, जातीभेद नष्ट व्हावा, जे दुष्ट वृत्तीचे लोक आहेत. त्यांच्याही मनात सत्याची भावना निर्मा व्हावी, प्रत्येक घरात स्वर्गसुख निर्माण होऊ दे. अशी अपेक्षा संत तुकडोजीनी केली आहे.

000000000000

 

 

  मार्कडेयाची तुलना कवीने देशभक्तांशी का केली आहे?

उत्तर : कारण मार्कंडेयाने मृत्यूवर विजय मिळवला होता. खरे तर ते अल्पायुषी होते. पण भगवंत कृपेने ते दीर्घायुषी बनले. त्याप्रमाणे आपले सैनिकसुद्धा युद्धभूमीवर मरण पत्करून ते अमर झाले म्हणजेच ते मृत्यूवर विजय मिळवणारे ठरले.

 

डोळस मनुष्य आंधळ्यांना काय म्हणाला?

उत्तर : डोळस माणसांने त्या आंधळ्यांना हत्तीचे खरे स्वरूप समजावून सांगितले. तो म्हणाला, तुम्ही स्पर्श करून अनुभवला तो हत्तीचा एकेक अवयव झाला. हा संपूर्ण हत्ती नव्हे. अशा सर्व अवयवांनीयुक्त तो हत्ती होय.

No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...