GRAMMAR



व्याकरण
१ संधी
१ स्वर संधी
२ व्यंजन संधी
३ विसर्ग संधी
सूर्य + अस्त  =   सूर्यास्त
विद्या + अर्थी  =   विद्यार्थी
मुनि + इच्छा  =    मुनीच्छा
मही + ईश    =       महीश
गुरु + उपदेश =   गुरुपदेश
ईश्वर + इच्छा  =  ईश्वरेच्छा
उमा + ईश   =   उमेश
चंद्र + उदय  =   चंद्रोदय
मत + Š    =   मतैŠ
सदा + एव   =    सदैव
जल + ओघ  =   जलौघ
प्रीति + अर्थ  =   प्रीत्यर्थ
इति + आदी  =  इत्यादी
अति + उत्तम =  अत्युत्तम
 
वाग्‌ + पति   =  वाŠपती
विपद्‌ + काल =  विपत्काल
षड + शास्त्र  =  षट्‌शास्त्र
क्षुध + पिपासा =  क्षुत्पिपासा
वाक्‌ + विहार =   वाग्विहार
सत्‌ + विचार  =   सदाचार
षट्‌ + रिपू   =  षड्रिपू
अच्‌ + आदी  =  आजादी
अप्‌ +     =   अब्ज
वाक्‌ + निश्चय =   वाङ्‌निश्चय
षट्‌ + मास   =  षण्मास
सत्‌ + मती   =  सन्मती
तत्‌ + टीका  =  तट्टीका
उत्‌ + लंघन  =  लंघन
सत्‌ + शिष्य  =   सच्छिष्य
यश: + धन  =  यशोधन
मन: + रथ  =  मनोरथ
अध: + वदन =  अधोवदन
तेज: + निधी =   तेजोनिधी
नि: + अंतर  =   निरंतर
दु: + जन   =  दुर्जन
बहि: + रंग  =   बहिरंग
अंतर + करण = अंत:करण
चतुर + सूत्री  = चतु:सूत्री 
मनस + पटल = मन:पटल 
तेजस + कण  = तेज:कण
प्रात: + काल = प्रात:काल 
अत: + एव  = अतएव
तेज: + पुंज  = तेज:पुंज
नि: + कर्ष  = निष्कर्ष


२ विभक्ती विचार



नामे आणि सर्वनामे यांचे वाŠयातील इतर शब्दांशी असणारे संबंध ज्या विकारांच्यायोगे दाखविले
जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात
विभक्ती
एकवचन
अनेकवचन
प्रथमा
प्रत्यय नाही

द्वितीया
, ला, ते
, ला, ना, ते
तृतीया
ने, , शी
नी, ही, , शी
चतुर्थी
, ला, ते,
, ला, ना, ते
पंचमी
ऊन, हून
ऊन, हून
षष्ठी
चा, ची, चे
चे, च्या, ची
सप्तमी
, ,
, ,
संबोधन
नो




३ प्रयोग
कर्ता, कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे खालील मुख्य तीन प्रयोग पडतात.
) कर्तरी प्रयोगः वाक्यात जेव्हा कर्त्याच्या पुरुष लिंग, वचनानुसार, क्रियापदाचे रुप बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात.
उदाः ) तो गाणे गातो (कर्त्याचे पुरुष बदल)     ) तो गाणे गातो (कर्त्याचे लिंग बदल) ) ते गाणे गातात (कर्त्याचे वचन बदल)
वरील वाक्यात कर्त्याचे पुरुष, लिंग, वचन बदलामुळे क्रियापदाचे रुप बदलते म्हणून त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत-
) सकर्मक कर्तरी प्रयोगः ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदाः ) सलीम आंबा खातो.         ) मीरा कापड आणते.
) अकर्मक कर्तरी प्रयोगः कर्म नसणा-या कर्तरी प्रयोगास अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात.
उदाः ) ती झोपते.        तु पोहतोस
) कर्मणी प्रयोगः- वाक्यातील क्रियापद जेंव्हा कर्माच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे चालते तेंव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा; -) मुलाने आंबा खाला (कर्मानुसार क्रियापद चालते)     ) मुलाने चिंच खाली (कर्मानुसार क्रियापद चालते)
) भावे प्रयोगः जेंव्हा क्रियापदाचे रुप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसुन ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसक लिंगी एकवचनी असे स्वतंत्र असते, तेंव्हा त्यास भावे प्रयोग असे म्हाणतात.
उदाः -)    अर्जुनाने कर्णास मारले.  )     त्याने आता शाळेत जावे.
भावे प्रयोगाचे दोन प्रकार पडतात-
) सकर्मक भावे प्रयोगः ज्या वाक्यात कर्माचे पुरुष, लिंग, वचन बदलूनही क्रियापदाचे रुप बदलत नाही. त्यास सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदाः )      वडिलाने मुलाला समजावले (वडिलाने कर्ता, मुलगा कर्म)
)     वडिलाने मुलीला समजावले (कर्माचे लिंग बदलून )  )     वडिलाने तुला समजावले (कर्माचे पुरुष बदलून)
)     वडिलाने मुलाना समजावले (कर्माचे वचन बदलून)
वरील वाक्यांत कर्माच्या पुरुष लिंग वचनात बदल केला, तरी क्रियापदाच्या रुपात बदल होत नाही. म्हणुन हा भावे प्रयोग होय.
) अकर्मक भावे प्रयोगः ज्या वाक्यात कर्त्याचे पुरुष लिंग वचन बदलले तरी क्रियापदाच्या रुपात बदल होत नाही. त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदाः - त्याने जावे (पुरुष बदलून)  तिने जावे (लिंग बदलून)    त्यांनी जावे (वचन बदलून)

४ काळ   
एखाद्या वाक्यातील क्रियापदावरुन जसा क्रियेचा बोध होतो तसाच ती विशिष्ट क्रिया केव्हा घडली याचाही बोध होतो. त्यालाच काळ असे म्हणतात.
काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. ) वर्तमान काळ    ) भूतकाळ   ) भविष्यकाळ
)  वर्तमान काळः क्रियापदाच्या स्वरुपावरुन जेंव्हा क्रिया आता घडत आहे असे कळते तेंव्हा त्यास वर्तमानकाळ असे म्हणतात.  उदाः उमेश जेवण करतो.
)  भूतकाळः जेव्हा क्रिया पुर्वी घडली असे सुचित होते तेंव्हा त्यास भूतकाळ असे म्हणतात.
       उदाः उमेशने जेवण केले.
) भविष्यकाळः जेंव्हा क्रिया पुढे घडेल असे समजते तेंव्हा त्यास भविष्यकाळ असे म्हणतात.
उदाः उमेश जेवण करेल.
काळाचे उपप्रकारः काळाचे मुख्य तीन प्रकार असून त्यांचे आणखी चार उपप्रकार पडतात.
)     साधा   ) अपूर्ण   ) पूर्ण   ) रीती
प्रकार
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
)    साधा
मी फुले तोडतो
मी फुले तोडली
मी फुले तोडीन
)   अपूर्ण
मी फुले तोडीत आहे
मी फुले तोडीत होतो
मी फुले तोडीत असेन
)   पूर्ण
मी फुले तोडली आहेत
मी फुले तोडली होती
मी फुले तोडली असेन
रीती
मी फुले तोडीत असतो
मी फुले तोडीत असे
मी फुले तोडीत जाईन

५ म्हणी  म्हण : सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे चिमुकले, चटकदार, बोधप्रद व सर्वसामान्य वचन म्हणजे म्हण होय     म्हणींना तोंडचे वाङ्‌मय किंवा अनुभवाच्या खाणी असेही म्हणतात अनेकांना येणारा अनुभव एकजण आपल्या शहाणपणाने छोट्या सिद्धांतस्वरूपी सूत्रमय वाŠयात मांडून दाखवितो
          म्हणी                                                   अर्थ
असतील शिते तर जमतील भुते         खूप आरडा ओरड करणे
 आयत्या बिळात नागोबा                    जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंत                                        आपल्या भोवती माणसे जमतात
असंगाशी संग प्राणाशी गाठ          स्वत: कष्ट न करता फायद्याची गोष्ट पदरात पाडणे
  उथळ पाण्याला खळखळाट फार       थोडेसे ज्ञान असलेला मनुष्य त्याचा गाजावाजा फार करतो
उचलली जीभ लावली टाळ्याला        Šक्याशŠक्यतेचा विचार न करता बोलणे
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये    उपकारकर्त्याला फार त्रास देऊ नये त्यामुळे आपलेच नुकसान होते
एक घाव दोन तुकडे                       त्वरित निर्णय घेणे
करावे तसे भरावे                  आपण जसे कृत्य करतो तसे त्याचे फळ मिळते
  कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ        आपलाच नातेवाईक आपले नुकसान करतो
१०  घर ना दार देवळी बिऱ्हाडी          सडाफटींग असणे (एकटाच)
११  घरोघरी मातीच्या चुली             सगळीकडे सर्वसाधारण एकच परिस्थिती असते
१२ केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी     अत्यंत गरीब परिस्थिती असणे
१३  टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही    कष्ट घेतल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही
१४  दुष्काळात तेरावा महिना                  संकटात आणखी संकटाची भर
१५  चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे     प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हातरी चांगले दिवस येतात
१६  डोंगर पोखरून उंदीर काढणे        कष्टाच्या मानाने अगदी अल्प मोबदला मिळणे
१७  डोळ्यात केर कानात फुंकर              रोग एक उपचार दुसरा
१८  सारे मुसळ केरात               केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे
१९  हा सूर्य हा जयद्रथ           प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे
२० हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागू नये  सहज मिळणारी गोष्ट पदरात पाडून न घ्यावी                                 न मिळणाऱ्या गोष्टीच्या मागी लागू नये
२१ पी हळद हो गोरी                        फार उतावीळ होणे
२२ प्रयत्नांती परमेश्वर                        दीर्घ प्रयत्नाने चांगल्या गोष्टी साध्य होतात
२३ पाचा मुखी परमेश्वर                  पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे
२४ हजीर तो वजीर                         जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो
२५. अवदसा आठवणे                      वाईट गोष्टी करण्याची बुद्धी होणे

६ वाक्याचे प्रकार


एक पूर्ण विचार व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या समूहाला वाŠक्य असे म्हणतात प्रत्येक वाŠक्यत आपण कोणाबद्दल काहीतरी बोलतो म्हणजे विधान करतो ज्याच्याविषयी वक्ता बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात व उद्देशाविषयी तो जे काही बोलतो त्यास विधेय असे म्हणतात
उदा प्रसाद आज चांगला खेळला
यामध्ये प्रसाद आज हे उद्देश आणि चांगला खेळला हे विधेय आहे
वाŠक्य पृथक्करणाच्या दृष्टीने वाŠयाचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार पडतात
            १ केवल किंवा शुद्ध  वाŠक्य   २ मिश्र वाŠक्य          ३ संयुक्त वाŠक्य
१ केवल किंवा शुद्ध वाक्य: ज्या वाŠयात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल किंवा शुद्ध वाŠय म्हणतात(एक क्रिया, एक उद्देश आणि एकच क्रियापद असते)
            उदा  १ आरतीने निबंध लिहिला२ तानाजी लढता लढता मेला. ३ कृष्णा नदी पवित्र आहे
२ मिश्र वाक्य : एक प्रधान वाŠक्य व एक किंवा अधिक गौण वाŠक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक वाŠक्य तयार होते त्यास मिश्र वाŠक्य असे म्हणतात (दोन क्रिया, दोन उद्देश आणि दोन क्रियापदे असतात)
            * वाŠक्याम्हणजे, की, म्हणून, कारण, का की, यास्तव, जर तर, जे ते, जेव्हा  तेव्हा, तर ही गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यये येतात
            उदा   १ जे चकाकते ते सोने नसते.  २ आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो
                        ३ शिक्षक म्हणाले, की प्रत्येकाने नियमितपणे अभ्यास केला पाहिजे
            * पहिल्या वाŠक्याजे चकाकते हे केवल वाŠक्य आहे ते सोने नसते हे दुसरे केवल वाŠक्य आहे        यातील जे चकाकते हे अर्थाच्यादृष्टीने स्वतंत्र वाŠक्य नाही ते सोने नसते या स्वतंत्र वाŠक्यावर अवलंबून आहे जे वाŠक्य स्वतंत्र असते त्यास प्रधान किंवा मुख्य वाŠक्य म्हणतात व अवलंबून          राहणाऱ्या वाŠक्याला गौण वाŠक्य म्हणतात
            * दुसऱ्या वाŠक्यात आकाशात जेव्हा ढग जमतात हे गौण वाŠक्य आहे ते तेव्हा मोर नाचू लागतात या प्रधान वाŠक्याजेव्हा या गौणसूचकत्व उभयान्वयी अव्ययांनी जोडले आहे
            * तिसऱ्या वाŠक्याशिक्षक म्हणाले हे मुख्य वाŠक्य असून प्रत्येकाने नियमित अभ्यास केला पाहिजे हे गौण वाŠक्य की या गौणसूचकत्व उभयान्वयी अव्ययाने जोडले आहे
३ संयुक्त वाक्य: दोन किंवा अधिक केवल वाŠक्ये प्रधान बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता, जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाŠक्य असे म्हणतात (एकाहून अधिक उद्देश आणि क्रिया असतात प्रत्येक वाक्य स्वतंत्र असते)
            * अशा वाŠक्यातून सामान्यत: आणि, , अन्‌, शिवाय, वा, अथवा, किंवा, पण, परंतु, परी यासारखी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यये वापरली जातात
            उदा  १ राधेने खूप वाट पाहिली परंतु श्रीकृष्ण आलेच नाहीत
                        २ सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्राबरोबर फिरावयास जातो
                        ३ तू ये व त्याला बरोबर घेऊन ये, आपण जाऊ
            वरील वाŠक्याराधेने खूप वाट पाहिली, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो, तू ये ही वाŠक्ये परंतु, किंवा, या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत
            * संयुक्त वाŠक्या्या संदर्भात पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात
                        १ त्यात दोन किंवा अधिक केवल वाŠक्य असतात
                        २ त्यात एक केवळ आणि एक मिश्र वाŠक्येही असू शकेल
                        ३ त्यात दोन मिश्र वाŠक्येही येऊ शकतात
७ समास       


                  
समास हा शब्द सम्‌ + अस्‌या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे याचा अर्थ एकत्र करणेअसा होतो समासात जोडशब्द असतो म्हणून त्या जोडशब्दातील परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा विभŠतीचे प्रत्यय गाळून त्या शब्दांचे एकत्रीकरण केले जाते शब्दांच्या अशा प्रकाराच्या एकत्रीकरणास समासअसे म्हणतात
सामासिक शब्द  शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो जोडशब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात
विग्रह  समासातील गाळलेले प्रत्यय किंवा शब्द घालून त्याच्या अर्थाची फोड करण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात
समासाचे प्रमुख चार प्रकार आहेत
           ()अव्ययीभाव समास               () तत्पुरूष समास  
           () द्वंद्व समास                   () बहुव्रीही समास
     (अव्ययीभाव समास  जेव्हा समासातील पहिले पद महत्त्वाचे असते व ते अव्यय असते या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात
          उदा : आजन्म  जन्मापासून, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, आमरण  मरेपर्यंत, प्रतिदिन  प्रत्येक दिवशी, गावोगाव  प्रत्येक गावी
     (तत्पुरुष समास  ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थांच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभŠतीप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात
तत्पुरुष समासाचे प्रकार
     (विभŠक्ती तत्पुरुष समास  ज्या तत्पुरुष समासात विभŠक्तीचा किंवा विभŠक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून ती दोन्ही पदे जोडली जातात त्याला विभŠक्तीचा तत्पुरुष समास असे म्हणतात
          या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभŠक्ती प्रत्ययाने दाखविला जातो त्याच विभŠक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते
उदा : () द्वितीया तत्पुरुष : कृष्णाश्रित  कृष्णाला आश्रित  येथे विग्रहात लाहा द्वितीयेचा प्रत्यय आला आहे देशगत  देशाला गत पुढील उदाहरणे सोडवा : राजाश्रित, दुखप्राप्त
      ()      तृतीया तत्पुरुष  तोंडपाठ  तोंडाने पाठ  येथे नेहा तृतीयेचा प्रत्यय आलेला आहे
          गुणहीन  गुणाने हीन पुढील उदाहरणे सोडवा : ûवरनिर्मित, Šतीवश
() चतुर्थी तत्पुरुष  क्रीडांगण  क्रीडेसाठी अंगण या उदाहरणात साठीहे शब्दयोगी अव्यय चतुर्थीचा अर्थ सांगणारे आले आहे गायरानगायीसाठी रान पुढील उदाहरणे सोडवा : पोळपाट, वाटखर्च
(पंचमी तत्पुरुष   ऋणमुक्त ऋणातून मुŠक्त या शब्दात ऊनहा पंचमीचा प्रत्यय आलेला आहे सेवानिवृत्त सेवेतून निवृत्त पुढील उदाहरणे सोडवा : जातीभ्रष्ट, चोरभय
(षष्ठी तत्पुरुष समास  राजपुत्र  राजाचा पुत्र या विग्रहात चाहा षष्ठीचा प्रत्यय आलेला आहे देवपूजा  देवाची पूजा पुढील उदाहरणे सोडवा : लक्ष्मीकांत, आंबराई
(सप्तमी तत्पुरुष समास  घरजावई  घरातील जावई या विग्रहात सप्तमीचा प्रत्यय आलेला आहे वनभोजन  वनातील भोजन पुढील उदाहरणे सोडवा : कूपमंडूक, कलाकुशल
()  उपपद तत्पुरुष समास : ज्या तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद धातुसाधित किंवा कृदन्त असते त्या समासाला उपपद तत्पुरुष समासअसे म्हणतात उदा : पंकज  पंकात जन्मणारे ते, ग्रंथकार  ग्रंथ लिहितो तो पुढील उदाहरणे सोडवा : जलद, द्विज
(नञ् तत्पुरुष समास  ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते त्यास नञ््‌ा तत्पुरुष समासअसे म्हणतात
या समासात , अन्‌, , ना, नि, बे, गैरअशी अभाव किंवा निषेध दर्शविणारी पहिली पदे येतात उदा : अयोग्ययोग्य नव्हे ते, अनादर  आदर नसलेला पुढील उदाहरणे सोडवा : नापसंत, नावड
(कर्मधारय समास  ज्या तत्पुरुष समासातील पदे एकाच विभŠतीत म्हणजेच प्रथमा विभŠतीत असतात तेव्हा त्याला कर्मधारय समासअसे म्हणतात
          या समासात पहिले पद विशेषण व दुसरे पद विशेष्य म्हणजे नाम असते दोन्ही पदातील संबंध विशेषणविशेष्य किंवा उपमानउपमेय असे असतेे उदा : Šतचंदन  रŠतसारखे चंदन, मुखकमल  मुख हेच कमल, भाषांतर  अन्य भाषा, पांढरा शुभ्र  अतिशय पांढरा पुढील उदाहरणे सोडवा : वेषांतर, नीलकमल, हिरवागार, पुरुषोत्तम
     (द्विगू समास  ज्या समासातील पहिले पद संख्यावाचक असते व त्या सामासिक शब्दावरून समुƒयाचा अर्थ दर्शविला जातो त्याला द्विगु समासम्हणतात उदा : पंचवटी  पाच वटांचा समूह, नवरात्र  नऊ रात्रींचा समूह पुढील उदाहरणे सोडवा : त्रिभुवन, सप्ताह
     (मध्यमपदलोपी समास  जेव्हा सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात म्हणून या समासाला मध्यमपदलोपी समासअसे म्हणतात या सामासिक शब्दांचा विग्रह करताना युŠ, द्वारा, पुरता, असलेलाही गाळलेली पदे घालावी लागतात उदा डाळवांगे  वांगेयुक्त डाळ, पुरणपोळी  पुरण घालून तयार केलेली पोळी, चुलत सासरा नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा पुढील उदाहरणे सोडवा : नातसून, कांदेपोहे
     (द्वंद्व समास  ज्या समासातील दोन्हीपदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व समासम्हणतात
याचे तीन प्रकार आहेत :
          () इतरेतर द्वंद्व समास        
          () वैकल्पिक द्वंद्व समास       
          () समाहार द्वंद्व समास
     (इतरेतर द्वंद्व समास ज्या समासाचा विग्रह करताना आणि’, ‘अशा समुƒयबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात उदा आईवडील  आई आणि वडील, हरिहर  हरि आणि हर
     () वैकल्पिक द्वंद्व समास  ज्या समासाचा विग्रह करताना किंवा’, ‘अथवा’, ‘वाअशा विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात उदा खरेखोटे  खरे किंवा खोटे, तीनचार  तीन किंवा चार पुढील उदाहरणे सोडवा: पासनापास, धर्माधर्म  
     () समाहार द्वंद्व समास  ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात उदा मीठभाकर  मीठ, भाकरी, चटणी इतर साधे खाद्यपदार्थ वगैरे वगैरे, चहापाणी  चहा, पाणी व फराळाचे जिन्नस वगैरे वगैरे पुढील उदाहरणे सोडवा भाजीपाला, पालापाचोळा
  () बहुव्रीही समास  ज्या समासामध्ये त्यातील दोन्ही पदांना प्राधान्य नसून त्या दोन्हीवरून सूचित होणाऱ्या तिसऱ्या पदाचा बोध होतो व त्याला प्राधान्य असते त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात
या समासाचे तीन प्रकार आहेत
     () विभक्ती बहुव्रीही समास     
     () नञ् बहुव्रीही समास  
     () सह बहुव्रीही समास
     () विभक्ती बहुव्रीही समास  बहुव्रीही समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते हे संबंधी सर्वनाम ज्या विभŠतीत असते तिचेच नाव या समासाला देतात उदा : प्राप्तधन  प्राप्त आहे धन ज्याला असा तो (चतुर्थी), जितेंद्रिय  जित (जिंकली)आहेत इंद्रिये ज्याने असा तो (तृतीया), दशमुख  दश आहेत मुखे ज्याला असा तो, चक्रपाणि  चक्र आहे पाणिमध्ये ज्याच्या असा तो, लंबोदर  लंब आहे उदर ज्याचे असा तो
     () नञ् बहुव्रीही समास  ज्या बहुव्रीही समासामध्ये पहिले पद , अन्‌, , निअसे नकारदर्शक असते त्याला नञ् बहुव्रीही समास असे म्हणतात उदा : अनंत  अंत नाही ज्याला असा तो, नीरस  नाही रस ज्यामध्ये असे ते पुढील उदाहरणे सोडवा : अव्यय, अनादी
     ()   सह बहुव्रीही समास  ज्या बहुव्रीही समासात पहिले पद सहकिंवा असे येते त्याला सहबहुव्रीही समास असे म्हणतात उदा : सादर आदराने सहित असा जो, सहकुटुंब  कुटुंबाने सहित असा जो पुढील उदाहरणे सोडवा : सनाथ, सफल  






८ शब्दसमूहास एक शब्द      (अनेक शब्दाबद्दल एक शब्द)
केलेले उपकार जाणणारा                          -           कृतज्ञ
खुप दानधर्म करणारा                               -           दानशूर
खूप पाऊस पडणे                                      -           अतिवृष्टी
घरदार नष्ट झालेले आहे असा                     -           निर्वासित
ईश्वर आहे असे मानणारा                           -           आस्तिक
कमी वेळ टिकणारा                                    -           क्षणभंगुर, अल्पजीवी
केलेले उपकार विसरणारा                           -           कृतघ्न
अनेकांतून निवडलेले                                  -           निवडक
कष्ट करुन जगणारा                                     -           कष्टकरी, श्रमजीवी
जाणून घेण्याची इच्छा                                 -           जिज्ञासा
ठरावीक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे      -           नियतकालिक
मोजता येणार नाही असे                                -           अगणित, असंख्य
रणांगणावर आलेले मरण                              -           वीर मरण
योजना आखणारा                                          -           योजक
लोकांनी मान्यता दिलेला                                -           लोकमान्य
व्याख्यान देणारा                                           -           व्याख्याता
ज्याच्या हातात चक्र आहे असा                       -           चक्रधर, चक्रपाणी
माकडाचा खेळ करुन दाखवणारा                     -           मदारी
पूर्वी कधी घडले नाही असे                               -           अभूतपूर्व
मृत्युवर विजय मिळविणारा                            -           मृत्युंजय
ईश्वर नाही असे मानणारा                                -           नास्तिक
अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट                          -           अनपेक्षित
कल्पना नसताना आलेले संकट                        -           घाला
कमी आयुष्य असलेला                                     -           अल्पायुषी, अल्पायू
दगडावर कोरलेले लेख                                      -           शिलालेख
दर पंधरवाडयाने प्रसिध्द होणारे                         -         पाक्षिक
देवापुढे सतत जळणारा दिवा                             -           नंदादीप
दररोज ठरलेला कार्यक्रम                                   -           दिनक्रम
कसलीच इच्छा नसणारा                                   -           निरिच्छ
अंग राखून काम करणारा                                 -           कामचोर, अंगचोर
ऐकायला बोलायला येणारा                        -           मूकबधिर
ज्याला आईवडील नाहीत असा                          -          अनाथ, पोरका

९ शब्दांच्या जाती



    नामाचे प्रकार :
                        ) सामान्य नाम          ) विशेष नाम          ) भाववाचक नाम
) सामान्य नाम  एकाच समूहाला किंवा वर्गाला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. उदा पक्षी, झाडे, मुले, घर, गाव, नदी, देश, गाय, घोडा, माणूस, पक्षी  इ
) विशेष नाम  ज्या नामाने विशिष्ट व्यक्ती, प्राणी, स्थळ, वा वस्तू यांचा बोध होतो त्यांना विशेषनामे       म्हणतात ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात. उदा भारत, गंगा, हिमालय, अथर्व, नर्मदा, श्रीलंका, बेळगाव इ
 ) भाववाचक नाम  प्राणी, व्यक्ती, वस्तू, स्थळ अथवा पदार्थ यांचे गुणधर्म किंवा भावना यांना         भाववाचक नाम म्हणतात. उदा धैर्य, राग, लोभ, प्रेम, हुशारी, चातुर्य, शहाणपणा, माणुसकी, ओलावा, समता इ
                        नामाना पण, पणा, गिरी, , त्व, ई यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे बनविता येतात
   सर्वनामाचे प्रकार :
                        सर्वनामाचे प्रकार सहा आहेत
                        १ पुरुषवाचक सर्वनाम  मी, आम्ही, तू, तुम्ही, स्वत:, आपण
                        २ दर्शक सर्वनाम  तो, ती, ते, हा, ही, हे
                        ३ संबंधी सर्वनाम  जो, जे, जी, ज्या
                        ४ प्रश्नार्थक सर्वनाम  कोण ? कोणी ?काय ? कोणास ? कोणता ?
                        ५ अनिश्चित सर्वनाम  कोण, कधी, केव्हा, काय
                        ६ आत्मवाचक सर्वनाम  मी (स्वत:), तो (आपण)
   विशेषण :
                        विशेषणाचे मुख्य प्रकार तीन आहेत
                        ) गुण विशेषण
                        ) संख्या विशेषण
                        ) सार्वनामिक विशेषण
                        ) गुण विशेषण  नामाचा गुण दाखविणारा शब्द
                        उदा हुशार (मुली), गोड (फळे), गरीब (माणूस), काळे (मांजर), तांबडा, पांढरा, उंच, ठेंगू,   
                        ) संख्या विशेषण  नामाच्या संख्येचा किंवा क्रमाचा बोध होणारा शब्द
                       

उदा अकरा (खेळाडू), काही (फुले), चार (फोडी), दुप्पट (आकार), अर्धी (भाकर), पाचवा               (क्रम)
   क्रियापदाचे प्रकार :
            क्रियापदाचे मुख्य प्रकार दोन आहेत
                                    ) सकर्मक क्रियापद              ) अकर्मक क्रियापद
             ) सकर्मक क्रियापद  ज्या क्रियापदाचा अर्थ पुरा होण्यास कर्माची जरूरी लागते त्यास सकर्मक  असे म्हणतात उदा १ गवळी धार काढतो  २ बाबांनी आम्हाला चित्रपट दाखविला
वरील दोन वाक्याकाढतो दाखविला या क्रियापदांचा अर्थ अनुक्रमे धार चित्रपट  या  कर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही
            ) अकर्मक क्रियापद  वाŠयातील क्रियापदांचा अर्थ जेव्हा कर्माशिवाय पूर्ण होतो तेव्हा ते क्रियापद अकर्मक असते उदा १ मी रस्त्यात पडलो २ राजू आला
                        वरील वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नाही
5.  क्रियाविशेषण अव्यय :
ज्या अव्ययांनी क्रियेच्या कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखविले जाते, त्यास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
 1. तेथे कर माझे जुळतील..  2. तेथून नदी वाहते.  3. काल शाळेला सुट्टी होती. 4. परमेश्वर सर्वत्र आहे. 5. रस्त्यातून जपून चालावे. 6. तो वाचताना नेहमी अडखळतो. 7. मी अनेकदा बजावले.
5.    शब्दयोगी अव्यय :
जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो. त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.  शब्दयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे
1.त्याच्या घरावर कौले आहेत. 2. टेबलाखाली पुस्तक पडले. 3. सूर्य ढगामागे लपला. 4. देवासमोर दिवा लावला. 5. शाळेपर्यंत रस्ता आहे.
6.    उभयान्वयी अव्यय :
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.  उभयान्वयी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे
1. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. 2. आंबा फणस ही कोकणातील फळे आहेत. 3. जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल. 4. तो म्हणाला की, मी हरलो. 5. वैद्याने चांगले औषध दिले पण उपयोग झाला नाही.
7.       केवलप्रयोगी अव्यय :
जी अव्यय बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात. त्यांना केवलप्रयोगीअव्ययेअसे म्हणतात.  केवलप्रयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे

1.अय्या ! इकडे कुठे तू ?  2. अरेरे ! काय दशा झाली त्याची ! 3. चूप ! एक शब्द बोलू नको. 4. आहा ! किती सुंदर फुले !  

१० शब्द सिद्धी
तत्सम शब्द
अंध, अग्नी, अतिथी, अश्रू, आदित्य, आल्हाद, ईश्वर, कर, कन्या, कर्म, कृष्ण, गुरु, गृह, घट, चक्र, जननी, जन्म, जल, जीवन तम, तृष्णा, दानव, दास, देव, द्विज, धन, धरा, धर्म, धूल, नयन, नेत्र, पत्नी, परंतु, पिता, पुरुष, पुष्प, पृथ्वी, प्रसाद, प्रहार, प्राण, प्रीती, भगिनी, भूगोल, भय, मती, मधू, माता, मृत्यू, मेघ, यश, यज्ञ, रवी, वायू, वृक्ष, शत्त*, शशी, शिष्य, श्रम, संत, संस्कार, सत्य, समर्थन, सूर्य, सेना, सृष्टी, ज्ञान.
तद्भव शब्द
अग्नी-आग, अश्रू-आसू, अंजली-ओंजळ, कर्ण-कान, कर्म-काम, ग्राम-गाव, गृह-घर, घट-घडा, चक्र-चाक, चर्म-चामडे, चंचू-चोच, जीर्ण-जुना, दुग्ध-दूध, श्वशुर-सासरा, धूम्र-धूर, धूल-धूळ, पुष्प-फूल, पर्ण-पान, पाद-पाय, तृष्णा-तहान, ग्रास-घास.
परभाषीय शब्द
हिदी - दिल, बच्चा, भाई, बात, करोड.
गुजराती - दादर, रिकामटेकडा, दलाल.
कन्नड - तूप, कुंची, अडकित्ता, खलबत्ता, अक्का, अण्णा, ताई, गाजर, चाकरी, विळी, गुढी, लवंग, शिकेकाई, पडवळ, चिधी, चिरगूट, भांडे, परडी.
इंग्रजी - स्टेशन, स्टॉप, बस, कप, बॉल, ऑफिस, पार्सल, पेन, रेडिओ, टी.व्ही., सायकल, हॉस्पिटल, फाईल, टेलिफोन, मास्तर, फी.
फारसी - अब्रू, रवाना, अत्तर, पेशवा, पोशाख, हकिकत, सामना, बाम, महिना, मोहोर, मेणा, लेझीम, सरकार, हप्ता, हजार, गरीब, दौत, शाई, शहनाई, शाहीर, खाविद, जहागीर, मैफल.
अरबी - इनाम, जाहीर, खर्च, हुकूम, मेहनत, मंजूर, अर्ज, ऊर्फ, मौज, पेज.
पोर्तुगीज - पगार, बटाटा, तंबाखू, कोबी, हापूस, मेज, फीत, मेस्त्री, बिजागरी, चावी, तुरुंग, घमेले, शिरपेच, बटवा, काडतूस .

११   समानार्थी शब्द
संहार        -        विनाश, नाश.
ब्राम्हण   -        विप्र, द्बिज.
तोंड          -        मुख, तुंड, वदन, आनन.
डोके        -      मस्तक, शीर्ष, माथा, शिर.
पाय         -     चरण, पद, पाय.
डोळे          -     नयन, नेत्र, चक्षू, लोचन, अक्षी.
शरीर        -      काया, देह, तन, वपू, तनू.
हात           -        भुज, हस्त, कर, बाहू.
कपाळ       -      ललाट, कपोल, भाळ, निढळ.
सूर्य           -       भास्कर, रवी, दिनकर, प्रभाकर, चंडाशू, दिनमणी, अरुण, मित्र, आदित्य,अर्क, भानू.
वायू             -    वारा, वात, पवन, अनिल,  समीरसमीरण.
अग्नी     -      विस्तव, अंगार, पावक, अनल.
दिवस     -       वार, दिन, वासर.
रात्र          -       रजनी, यामिनी, निशा, विभावरी, शर्वरी.
कमल     -       नलिनी, पंकज, पद्म, नीरज, सरोज.
झाड           -        वृक्ष, विटप, पादप, तरु, द्रुम.
वेल               -      वल्लरी, लता.
आश्चर्य         -     नवल, विस्मय, अचंबा.
आठवण         -     स्मरण, स्मृती, याद.
प्रेम               -      अनुराग,प्रीती.
शक्ती          -      सामर्थ, बल.
राग            -      रोष, संताप, क्रोध, तम.
क्षेम          -       कुशल, कल्याण, हित.
सुरुवात      -         आरंभ, प्रारंभ, श्रीगणेशा.
सुंदर        -        मनोहर, ललित, रम्य, सुरेख, रमणीय.
शेतकरी     -        कृषिक, कृषीवल.
फूल        -        पुष्प, कुसुम, सुमन.
पान       -        पल्लव, दल, पत्र, पर्ण.
बाग     -        उपवन, उद्यान, बगीचा, वाटिका.
हरिण     -    मृग, कुरंग, सारंग.
ढग     -    घन, मेघ, अभ्र, नीरद, पयोधर.
अंधार     -    काळोख, तम, तिमिर.
नवरा     -    पती, नाथवल्लभ, कांत, भ्रतार, दादला
पत्नी       -     बायको, अर्धांगी, भार्या, दारा, सहधर्मचरिणी, कांता, जाया.
भाऊ       -     बंधू, भ्राता, सदोहर.
माणुस      -   मानव, मनुष्य.
देऊळ     -      देवालय, मंदिर, राऊळ.
अर्जुन     -   पार्थ, धनंजय, भारत, फाल्गुन.
राजा       -     नृप, भूपती, नरेश, भूपाल  भूप, नरेन्द्र.
ब्रह्मदेव  -    प्रजापती, कमलासन, विधाता, चतुरानन.
स्त्री    -    ललना, रमणी, नारी, अंगना, वनिता, महिला.
वडील      -    तात, पिता, जनक, जन्मदाता, तीर्थरुप
अमृत    -    पीयूष, सुधा.
दूध         -     दुग्ध, पय, क्षीर.
पाणी      -     जल, उदक, तीर, जीवन, तोय, पय.
नदी         -     तटिनी, सरिता, जलवाहिनी.
समुद्र     -     रत्नाकर, सागर, दर्या, सिंधू,  अर्णव.
तलाव       -       सारस, तटाक, तडाग, कासार.
जमीन     -      भूमी, भू, भुई.
पर्वत     -       अचलगिरी, नग, शैल.
अरण्य   -     वन, जंगल, कानन, विपिन.
बेडूक    -      मंडूक, भेक, दर्दुर.
कावळा   -      एकाक्ष, काक, वायस.
गरुड   -     खगेंद्र, वैनतेय, द्विजराज.
पोपट  -     राघू, शुक, रावा.
मासा   -     मत्स्य, मीन.
भुंगा       -    भ्रमर, मिलिंद, मधुप, मधुकर, अली.
पक्षी      -     अंडज, विहंगम, द्विज, विहंग.
सिंह        -     केसरी, वनराज, मृगराज, शार्दूल, वनेंद्र.
हत्ती     -     कुंजर, गज, सारंग, पीलू.
घोडा     -    अश्व, वारु, हय, तुरंग.
साप      -     सर्प, भुजंग, व्याळ.
आकाश   -   नभ, आकाश, अंबर, आभाळ,  गगन.
चांदणे   -   चंद्रिका, कौमुदी, जोत्स्ना.
किरण    -    कर, रश्मी, अंशू.
वीज   -   बिजली, विद्युत, चपला, सौदामिनी, विद्युल्लता.
आई     -   जन्मदा, माता, जननी, जन्मदात्री.
मुलगा   -  पुत्र, सुत, नंदन, आत्मज.
मुलगी    - कन्या, तनुजा, नंदिनी, तनया, दुहिता
इंद्र      -    देवेंद्र, वज्रपाणी, वासव, सुरेंद्र, पुरंदर.
शंकर    - महेश, शिव, महादेव, नीलकंठ, सांब, सदाशिव.
विष्णू        -   चक्रपाणी, नारायण, शेषशायी, रमापती, रमेश, केशव, गोविंद, मधु्सूदन, हृषीकेश.
लक्ष्मी     -   कमला, रमा, इंदिरा, पद्मा.
गणपती    -   विनायक, गजानन, विघ्नहर्ता, गजमुख, वक्रतुंड, लंबोदर, गणेश.
पृथ्वी   -  वसुंधरा, धरित्री, धरणी, वसुधा, क्षमा, अवनी, धरा.
चंद्र   -  शशी, सुधाकर, सुधांशू, हिमांशू, शशांक, इंदू.
मित्र      -   दोस्त, सखा, स्नेही.
वाटसरु     -   मार्गिक, पथिक, यात्रिक.
सर्व       -   समस्त, अखिल, सकल.
युध्द     -    समर, लढाई, संग्राम.
यज्ञ    -    होम, याग, मख, हवन.
घर   -  निवास, सदन, गृह, भवन, धाम, आलय
आनंद   -   प्रमोद, हर्ष, मोद, तोष.

लिंग विचार
  पुल्लिंग      -  स्त्रीलिंग
   पुल्लिंग      -   स्त्रीलिंग
पुल्लिंग      -   स्त्रीलिंग
गवळी        -         गवळण
शिक्षक       -         शिक्षिका
लेखक        -         लेखिका
मोर            -         लांडोर
वर            -         वधू
बेडूक         -         बेडकी
जनक        -         जननी
श्रीमान       -         श्रीमती
देव            -         देवी
पुत्र           -         कन्या
कोकिळ         -         कोकिळा

प्राध्यापक        -         प्राध्यापिका
तरुण               -         तरुणी
विदवान           -        विदुषी
भाऊ                -          बहीण
युवक              -          युवती
उंट                  -          सांडणी
गायक            -          गायिका
माळी              -          माळीण
बालक            -          बालिका
सासरा            -          सासू
वाघ               -         वाघीन
वानर        -         वानरीन
दीर          -         जाऊ
हंस           -         हंसी
चिमणा     -         चिमणी
दास         -         दासी
बैल         -         गाय
बोकड    -         शेळी
पुरुष     -         स्त्री
काका             -        काकू
घोडा              -        घोडी
 विरुध्दार्थी शब्द
 सोय              x        गैरसोय
शिस्त             x        बेशिस्त
सावध             x       बेसावध
गुणी                x        अवगुणी
मान                 x        अवमान
अवधान           x       अनवधान
अपेक्षित          x     अनअपेक्षित
आदर             x       अनादर
उत्तीर्ण            x       अनुत्तीर्ण
आरोग्य           x      अनारोग्य
नियमित          x        अनियमित
न्याय               x       अन्याय
रुंद                   x        अरुंद
आशा                x          निराशा
स्वार्थी             x          निःस्वार्थी
लक्ष                x          दुर्लक्ष
रोगी                x          निरोगी
सदाचार           x          दुराचार
सकर्मक          x          अकर्मक
सज्ञान            x          अज्ञान
उदार               x       अनुदार
उपकार            x        अपकार
उत्कृष्ट            x        निकृष्ट
उदघाटन          x         समारोप
उच्च             x        निच
आनंद            x         दुःख
उपयोगी         x     निरुपयोगी
कच्चा             x         पक्का
आसक्ती         x        विरक्ती
दीर्घ              x        -हस्व
दुरुस्त          x       नादुरुस्त
स्वच्छ         x          अस्वच्छ
निश्चित      x          अनिश्चित
 कुशल        x          अकुशल
विश्वास    x        अविश्वास
 सुगम           x          दुर्गम
 सुपुत्र              x          कुपुत्र
सुकाळ              x          दुष्काळ
अतिवृष्टी          x          अनावृष्टी
आवडता         x          नावडता
वैयक्तीक     x     सार्वजनिक
 शहाणा       x       मूर्ख
स्वस्त        x       महाग
शाश्वत      x      नश्वर
बिंब         x       प्रतिबिंब
मर्द          x          नामर्द
बाद          x          नाबाद
पास        x          नापास
इलाज        x       नाइलाज
नक्कल      x      अस्सल
मंजूळ         x       कर्कश
प्राचीन     x       अर्वाचीन
सनातनी     x        सुधारक
स्पष्ट     x      अस्पष्ट
विवाहित   x    अविवाहित
धनवान      x      निर्धन
आकर्षक     x    अनाकर्षक
स्वाधीन   x  पराधीन
सुलक्षणी     x    अवलक्षणी
आवड       x          नावड

१४ विराम चिन्हे  
 विराम म्हणजे थांबणे. बोलताना आपण आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबू शकतो, परंतु लिहिताना तसे करता येत नाही, म्हणून ही थांबण्याची क्रिया विरामचिन्हाव्दारे दर्शवली जाते.    
प्रकार
चिन्ह
नियम/ उपयोग
उदा.
पूर्णविराम
(.)
 याचा वापर वाक्य पूर्ण झाले की     करतात.
  1. आज दसरा आहे.
  2. येथून निघून जा.
  3. रमा ला कन्या प्राप्ती झाली.
स्वल्प विराम
(,)
.वाक्यातील शब्द, विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी.
. मोठे वाक्यांश वेगळे दर्शविण्यासाठी
.समान वाक्ये निराळी दाखविण्याकरता.
.एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता.
. वाक्यात आरंभी संबोधन आल्यास संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो.
  1. आम्ही संग्रहालयातील प्राणी, पक्षी, चित्रे, नाणी, ताम्रपट, लिपिप्रकार पहिले.
  2. पावसाच्या आगमनाने सारी सृष्टी आनंदित झाली,कोकिळा गाऊ लागली, गायी हंबरू लागल्या, वासरे बागडू लागली.
  3. विद्यार्थी मित्रांनो , प्रिया म्हणाली, मी आज येणार नाही.
  4. कृष्णाने कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या.
अर्धविराम
(;)
  1. ज्यांचा परस्पर संबंध नाही असे वाक्यांश जेव्हा मोठ्या वाक्यात येतात तेव्हा त्या निरनिराळ्या वाक्यांशामध्ये अर्धविराम वापरतात.
  2. संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी.
  3. दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता.
  1. ढग खूप गर्जत होते; पण पाऊस पडत नव्हता.
  2. त्या देशात राजा होता; तरी सत्ता लोकांच्या हाती होती.
  3. वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही; परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्वं संपत्ती उधळून टाकली.
अपूर्णविराम
(:)
वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास.
संगम महाराजांच्या मते पुढील दिवस शुभ आहेत : , १२, १८, २२.
प्रश्नचिन्ह
(?)
  1. याचा वापर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी करण्यात येतो.
  2. वाक्यात प्रश्न आला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते.
  1. रमाची परीक्षा कधी आहे?
  2. सुरेशचे लग्न कधी होणार?
उद्गारवाचक चिन्ह
(!)
उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापर होतो.
  1. शाब्बास, असाच अभ्यास कर!
  2. छान, हीच खरी देशसेवा आहे!
अवतरण चिन्ह
(“ ’’)
(‘ ’)
  1. एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास ‘ ’ एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.
  2. एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता “ ’’ दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो.
  1. अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे.
  2. आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख ’’ असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.
संयोगचिन्ह
(-)
  1. एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास ‘ ’ एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.
  2. एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता “ ’’ दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो.
  1. अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे.
  2. आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख ’’ असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.
अपसरण चिन्ह
(-)
  1. पूर्वी सांगितलेला मजकूर अधिक स्पष्ट करण्यासाठी त्या ओळीत मजकुराच्या मागे पुढे हे चिन्ह वापरतात.
  2. विशेष स्पष्टीकरणार्थ यादी देताना.
  1. भक्तीने वाहिलेली फुले - मग ती कोणतीही असोत देवाला प्रियच वाटतात.
  2. दशरथाचे पुत्र चार राम, लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न
लेखन करताना विरामचिन्हांचा वापर महत्त्वपूर्ण असा आहे. जर विरामचिन्हे लेखनात आली नाहीत तर लिहिलेला मजकूर समजण्यास अडचण तर येतेच पण अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो. म्हणून लेखन करताना योग्य विरामचिन्हांचा वापर करावा. 

१५ अलंकार  
अलंकारांचे शब्दालंकारआणि अर्थालंकारअसे दोन मुख्य प्रकार आहेत.

1.        शब्दालंकार :

जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारीत अलंकारांना शब्दालंकारम्हणतात.
प्रकार-    अनुप्रास कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
(
गडद गडद जलदची पुनरावृत्ती)
                                 i.        यमक - शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यांत यमकहा अलंकार महत्वाचा आहे. एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे यमकहा अलंकार होतो.
उदा.
1.       मना चंदनाचे परी त्वा झिजावे |  परी अंतरी सज्जना नीववावे ||
2.       या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |
अशा शब्दांनी नादमाधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितांतून निवडून काढा.
                               ii.        श्लेष - एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा श्लेषहा अलंकार होतो.
उदा.
1.       मित्राच्या उद्याने कोणास आनंद होत नाही. (मित्र = सखा, मित्र = सूय)
2.       श्रीकृष्ण नवरा मी नवरी |  शिशुपाल नवरा मी न-वरी ||
2.        अर्थालंकार :



दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते. तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्वाच्या असतात.
A.      ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात उपमेयअसे म्हणतात. मुख कमलासारखे सुंदर आहेया वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून मुखहे उपमेयआहे.
B.       उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला उपमानअसे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून कमलहे तेथे उपमानआहे.
C.      उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्यकिंवा समान धर्मअसे म्हणतात. वाक्यात उपमेय मुखआणि उपमान कमळयांमध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे.
D.      उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला साधर्म्यसूचक शब्दकिंवा साम्यसूचक शब्दम्हणतात.  
वरील वाक्यात कामलासारखे मुखयातील सारखेहा साधर्म्यसूचकशब्द आहे.
प्रकार -
                               v.               उपमा उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे उपमाहा अलंकार असतो. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.
1.       लाट उसळोनी जळी खळे व्हावे,  त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे, उचंबळूनी लावण्या वर वहावे ||
                            vi.               उत्प्रेक्षा उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे उत्प्रेक्षाहा अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.
1.       विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही
2.       तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||
                          vii.               व्यतिरेक या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
उदा.
1.       अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा
2.       तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा
                       viii.               अतिशयोक्ती -कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो.
उदा.
1.       दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला ||
                            ix.               दृष्टान्त एखादे तत्त्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टान्तअलंकार होतो.
उदा.
1.       लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||
तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात ते कशासाठी हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते आणि ऐश्वर्यसंप ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो अशी उदाहरणे देतात.
                               x.               स्वभावोक्ती एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो तेव्हा स्वभावोक्तीअलंकार होतो.
उदा.
1.       मातीत ते पसरले अति रम्य पंख |
केले वरी उदर पांडुर निष्कलंक ||
चंचू तशीच उघडी पद लांबविले |
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ||
                            xi.               विरोधाभास एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो. तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.
उदा.
1.       जरी आंधळी मी तुला पाहते.
2. मरणात खरोखर जग जगते ||      


१६ वृत्त विचार

वृत्ताचे दोन प्रकार आहेत.

     . अक्षरगण वृत्त        . मात्रावृत्त

. र्‍हस्व अक्षरांना लघु असे म्हणतात. . दीर्घ अक्षरांना गुरू असे म्हणतात.

. लघु अक्षराची खूण U अशी अर्धचंद्राकृती असते तर गुरू अक्षरांची खूण - अशी आडवी रेषा असते.

    पद्याच्या ओळीत तीन अक्षरांचे गट करतात व त्यांना लघु गुरू क्रम देतात याला गण पाडणे असे म्हणतात. ते असे.

                 U लघु नुसार

.   आद्य लघु         य मा ता          य गण

                              U - -

.   मध्य लघु          रा ज भा          र गण

                                - U  -

.   अंत्य लघु         ता रा प           त गण

                               - -  U

.   सर्व लघु          न म न            न गण
                           U U U 
              
- गुरू नुसार
.   आद्य गुरू         भा स्क र         भ गण
                              -  U  U
.   मध्य गुरू         ज ना स          ज गण
                                 U  - U 
.   अंत्य गुरू         स म रा            स गण
                                U U  - 
.   सर्व गुरू          मा ना वा          म गण
                               -   -  -
वरील उदाहरणावरून लक्षात येते की र्‍हस्व अक्षरांना लघु म्हणतात व दीर्घ अक्षरांना गुरू म्हणतात. तसेच अनुस्वार असेल तर ते अक्षर गुरू म्हणतात. तसेच विसर्गाच्या अगोदरचे अक्षर, रफारच्या अगोदरचे अक्षर, जोर पडणारे अक्षर, कवितेतील शेवटचे अक्षर गुरू मानण्याची पद्धत आहे.
यती - कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरावर थांबतो, त्या थांबण्याच्या जागेला यतीअसे म्हणतात. यतीच्या जागी शब्द पुरा व्हावा.

 

वृत्त
अक्षरे
गण
यति अक्षरावर
           १
               भुजंगप्रयात
         १२       
          य, , , ,
        ६ व १२
          २
               वसंततिलका
        १४
         त, , , , ,   
          ८ व १४
          ३
                मालिनी
        १५
          न, , , ,
       ८  १५
          ४     
               मंदाक्रांता
         १७
        म, , , , , , ग    
          ४, १० व १७
          ५
               पृथ्वी 
        १७
       ज, , , , , ,
         ८  १७
          ६       
              शिखरिणी
        १७
      य, , , , , ,
         ६  १२
          ७
              शार्दूलविक्रीडित
        १९
       म, , , , , ,
         १२ व १९
          ८
             मंदारमाला
         २२
     त, , , , , ,,
        ४, १०, १६ व २२
         ९
            सुमंदारमाला 
         २३
    य, , , , , , ,,
         ५, ११  १७ 


















समूहदर्शक शब्द 

महत्त्वाचे शब्द -
विलींचा- कुंज
नारळांचा- ढीग
हत्तीचा- कळप
करवंदाची -जाळी
उंटाचा- तांडा
काजुंची- गाथण
हरिणींचा- कळप
माशांची- गाथण
मुग्यांची- रांग
किल्ल्यांचा-जुडगा
पक्ष्यांचा- थवा
केसाचा- झुबका, पुंजका
प्रवाशांची- झुंबड
केसांची- बट, जट
गुरांचा-कळप
नाण्यांची- चळत
गाई-गुरांचा- खिल्लार
दुर्वांची- जुडी
खेळाडूंचा-संघ
धान्याची- रास
लमाणांचा- तांडा
नोटांचे- पुडके
माणसांचा- जमाव
केळ्यांचा- घड,
मुलांचा- घोळका
द्राक्षांचा-घड, घोस
विद्यार्थ्यांचा- गट
गवताचा-भारा
साधूंचा-जथा
तारकांचा- पुंज
सैनिकांचे -पथक
ताऱ्यांचा- पुंजका
सैनिकांची-पलटण/तुकडी
वेलींचा- कुंज
मेंढ्यांचा-कळप
विटांचा- ढीग
उतारूंची- झुंड
 झुंबड कलिगडांचा-ढीग
रुपयांची- चवड
मडक्यांची- उतरंड
माणसांचा- जमाव
भाकऱ्यांची- चवड
फुलांचा- गुच्छ
प्रश्नपत्रिकांचा- संच
फुलझाडांचा-ताटवा
पाठ्यपुस्तकांचा-संच
वाद्यांचा- वृंद
विमानांचा- ताफा
लाकडाची- मोळी
उसाची- मोळी
बांबूंचे-बेट
फळांचा- घोस
भक्तांची - मांदियाळी


१८ कल्पना विस्तार  
कल्पना विस्तार करणे म्हणजे दिलेल्या विषयावर लहानसा निबंधच लिहून दाखविणे होय यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक ठरते
१  कल्पना विस्ताराला जास्तीत जास्त तीन परिच्छेदांची मर्यादा असावी
२ प्रास्ताविक, मध्य आणि शेवट असे ह्या परिच्छेदांचे स्वरूप असावेŸ
३ दिलेला जो विषय असेल त्याचा सुबोध असा स्पष्टार्थ प्रथम सांगावा
४  कल्पनेचा विस्तार करताना समर्पक गोष्टींचे सारांश, प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणे अवश्य द्यावीत
५ कल्पना विस्तारासाठी दिलेले वााŠय कोणी अन्‌ कोणत्या प्रसंगी उद्‌गारलेले आहे हे निश्चित माहीत असल्यास त्याचाही उल्लेख करावा
६ शŠक्य असल्यास त्याच अर्थाची इतर सुभाषिते, म्हणजी यांचा वापर जरूर करावा
७ मूळ दिलेल्या विचाराच्या अगर कल्पनेच्या बरोबर विरुद्ध असाही एखादा विचार असण्याची शŠयता आहेच त्याचा फक्त उेख तेवढाच करावा

८ हे सर्व लेखन माहितीचा आराखडा होऊ नये, वाङ्‌मयीन गुणांनीही ते समृद्ध असले पाहिजे.

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 


आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?


लुसलुशीत- पोळी/ पुरणपोळी
खुसखुशीत- करंजी
भुसभुशीत- जमीन
घसघशीत- भरपूर
रसरशीत- रसाने भरलेले
ठसठशीत- मोठे
कुरकुरीत- चकली, कांदा भजी
चुरचुरीत- अळूवडी
झणझणीत- पिठले, वांग्याची भाजी
सणसणीत- मोठया आकाराची पोळी, भाकरी, पराठा
ढणढणीत- मोठ्या आवाजात लावलेले संगीत
ठणठणीत- तब्येत
दणदणीत- भरपूर
चुणचुणीत- हुशार
टुणटुणीत- तब्येत
चमचमीत- पोहे, मिसळ
दमदमीत- भरपूर नाश्ता
खमखमीत- मसालेदार
झगझगीत- प्रखर
झगमगीत- दिवे
खणखणीत- चोख
रखरखीत- ऊन
चटमटीत/ चटपटीत- खारे शंकरपाळे, भेळ
खुटखुटीत- भाकरी/ दशमी
चरचरीत- अळूची खाजरी पाने
गरगरीत- गोल लाडू
चकचकीत- चमकणारी गोष्ट
गुटगुटीत- सुदृढ बालक
सुटसुटीत- मोकळे
तुकतुकीत- कांती
बटबटीत- मोठे डिझाइन
पचपचीत- पाणीदार
खरखरीत- रफ
खरमरीत- पत्र
तरतरीत- फ़्रेश
सरसरीत/सरबरीत- भज्यांचे पीठ
करकरीत- सफरचंद, पेरूच्या फोडी
झिरझिरीत- पारदर्शक
फडफडीत- मोकळा भात
शिडशिडीत- बारीक

मिळमिळीत- कमी तिखट मसाला असलेला पदार्थ
गिळगिळीत- मऊ लापशी
बुळबुळीत- ओलसर चिकट वस्तूचा स्पर्श
झुळझुळीत- साडी
कुळकुळीत- काळा रंग
तुळतुळीत- टक्कल
जळजळीत- टिळकांचे अग्रलेख
टळटळीत- दुपारचे रणरणते ऊन
ढळढळीत- सत्य
डळमळीत- पक्के नसलेले
गुळगुळीत- स्मूथ
गुळमुळीत- स्पष्ट न बोलणे

ह्या शब्दांना
इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा.

आहे जगातली इतर कोणती भाषा इतकी समृद्ध ?

2 comments:

  1. Atishay sunder an khup upyukt ase srv ektra marathi vyakaran .Dhnyawad.

    ReplyDelete
  2. This blog post is really useful,such amazing
    I have started blog by taking inspiration from you, named as viral Marathi blog
    From my website you can generate contact us page.
    Thanks a lot for inspiring many lives...

    ReplyDelete

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...