Sunday, May 19, 2019

अतिथी


लेखक परिचय : 




वामन कृष्णा चोरघडे   (1914-1994) नागपूर येथे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून काम केले. मराठीतील श्रेष्ठ कथाकार. त्यांनी गांधीजींच्या विचारसरणीचा खोलवर अभ्यास केला होता. ‘सुषमा‘, ‘यौवन‘, ‘संस्कार‘ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच ‘साहित्याचे मूलधन‘ हे लोकगीतांचे विवेचन करणारे पुस्तक आणि लहान मुलांसाठीही विपुल गोष्टी लिहिल्या आहेत.





मूल्य : भूतदया
साहित्य प्रकार : ग्रामीण कथा
संदर्भ ग्रंथ : संपूर्ण चोरघडे
मध्यवर्ती कल्पना : भारतीय संस्कृती नेहमी कृतज्ञतेचा धडा शिकविते. आपल्याकडे सणांच्या निमित्ताने झाडावेलींची, नागांची, जमिनीची पूजा करून आपण कृतज्ञता व्यक्त करतो. असाच हा पैकू आणि त्याची पत्नी आपल्या घरच्या बैल जोडीचे कौतुक करतात. त्यांना ओवाळतात, सजवतात. त्यांचा देव म्हणून सत्कार करतात.


टीपा :


बैलपोळा - ज्येष्ठ किंवा आषाढ पौर्णिमेला शेतकरी बैलांना काम लावीत नाहीत. त्यांना आंघोळ घालून रंगाने रंगवून सजवितात. त्यांची पूजा करतात. त्यांना ओवाळतात, गावातून मिरवितात, पुरणपोळी त्यांना खायला घालतात. वर्षभर बैलांनी केलेल्या श्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! कर्नाटकात या सणाला कारहुण्णीवे किंवा कारवणी म्हणतात.


मारबत - परसातील रोगराई उत्पन्न करणारी देवता. पोळ्याच्या दुसèया दिवशी ह्या देवतेची मिरवणूक काढतात. हिच्याकडे रोगराई इडा पिडा घालविण्यासाठी मागणं मागतात त्याला मारबत ओरडा म्हणतात.

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

1. बैलांच्या कोडकौतुकाचा दिवस कोणता?
उत्तर : बैलपोळा हा सण म्हणजे बैलांच्या कोडकौतुकाचा दिवस होय.

2. पोळा या सणाच्या दिवशी बैलांना काय म्हणून बोलवतात?
उत्तर : पोळा या सणाच्या दिवशी बैलांना ‘अतिथी’ म्हणून बोलवतात.

3. बैलांच्या पाठीवर पंजे कोणी मारले?
उत्तर : बैलांच्या पाठीवर पैकूच्या मुलाने पंजे मारले.

4. पैकूने आपली बैलजोडी प्रथम कोणाकडे नेली?
उत्तर : पैकूने आपली बैलजोडी प्रथम पाटलांकडे नेली.

5. बैलांना जेवू घालण्यासाठी कोणते पदार्थ केले होते?
उत्तर : बैलांना जेवू घालण्यासाठी वडे पुराण पदार्थ केले होते.

6. इनाम म्हणून डॉक्टरीणबाईनी काय दिले?
उत्तर : इनाम म्हणून डॉक्टरीणबाईनी एक रुपया दिला.

7. कर सुरू झाल्यावर पैकूने केलेल्या ओरड्याला काय म्हणतात?
उत्तर : कर सुरू झाल्यावर पैकूने केलेल्या ओरड्याला मारबत म्हणतात.



प्र. 2.  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन-तीन वाक्यात लिहा.

1. पैकूने आपल्या बैलांना कसे स्वच्छ करून सजविले?
उत्तर : पैकूने डोहात नेऊन आपल्या बैलांच्या सर्वांगावर हात फिरवून चोळून चोळून त्यांना स्वच्छ केले. नंतर बाहेर काढून त्यांचे अंग काठावर ठेवलेल्या कोरड्या उपरण्याने पुसून काढले. शेपटीचे गोंडे हातावर ठोकून कोरडे केले. घराकडे पैकूच्या मुलाने गेरूच्या पाण्यात आपले हात बुडवून त्याने बैलांच्या पाठीवर पंजे मारले तर पैकूने गेरूच्या भांड्यात गाडगे बुडवून त्याच्या गोल तोंडाने बैलांच्या अंगावर गोल गोल ठिपके दिले. नंतर बैलांची शिंगे लाल करून त्यावर निळ्या चंदेरी बेगडाच्या गोल गोल पट्ट्या चिकटवल्या.

2. तोरणाखाली कोणकोणत्या बैलजोड्या आल्या होत्या?
उत्तर : बैलपोळ्याचे तोरण नदीच्या वाळवंटाकडे होते. त्या तोरणात पाटलांच्या, गावच्या मानकèयांच्या झूल घातलेल्या शिंगाना पेटत्या मशाली लावलेल्या, धष्टपुष्ट, सकस, सुंदर सजलेल्या बैलजोड्या आल्या होत्या. त्या तोरणाखाली पैकूचीही लाल्या-ढवळ्याची जोडी उभे राहण्यासाठी गेली होती.

3. आपली बैलजोडी घेऊन मिरवायला गेलेल्या पैकूला इनाम म्हणून काय काय मिळाले?
उत्तर : बैलपोळ्याच्या निमित्ताने आपली बैलजोडी घेऊन मिरवायला गेलेल्या पैकूला इनाम म्हणून प्रत्येकाच्या घरी बैलांच्या कपाळी कुंकवाचा टिळा आणि पायावर फुले पडली. पैकूच्या हातावर गुळाचा खडा, कानावर गोड शब्द आणि मुलाच्या हातावर अनुकूल असे द्रव्य मिळाले.

4. बायजाने पैकूला कमाईबद्दल विचारल्यानंतर पैकूने काय सांगितले ?
उत्तर : बायजाने पैकूला कमाईबद्दल विचारल्यानंतर पैकूने कुणी काय दिले याचा हिशेब केला व सांगितले डॉक्टरीणीनं लाल्या-ढवळ्याची पूजाच केली नाही. ती जनावरं त्यांची काय पूजा करायची? आम्ही तुला ओळखतो म्हणून तिनं एक रुपया दिला असल्याचं सांगितलं.

5. डॉक्टरीणबाईंनी इनामाचा एक रूपया दिल्यानंतर पैकूला काय वाटले?
उत्तर : डॉक्टरीणबाईंनी इनामाचा एक रूपया दिल्यानंतर पैकूला वाटले

प्र. 3. पुढील प्रश्नांची उत्तरे चार-पाच वाक्यात लिहा.

1. पैकूने बैलांविषयी कृतज्ञता कशी दाखविली?

उत्तर : पोळा हा  बैलांना अतिथी म्हणून जेवायला बोलाविण्याचा सण. त्या दिवशी बैलांकडून काम करवून घ्यायचे नाही. त्यांचे काम माणसाने सांभाळावयाचे. त्या कामाने वर्षभराच्या त्यांच्या कष्टांचा कृतज्ञतेने मोबदला चुकवायचा. मुलाला सांभाळतो तसे त्यांना त्या दिवशी सांभाळावयाचे. एक दिवसाची सेवा बैलांच्या चरणी वाहून आपले जीवन विशाल भूतदयाप्रेरित करावयाची इच्छा असा हा पोळ्याचा दिवस. म्हणून पोळ्यादिवशी पैकूने उठताक्षणीच बैलांच्या अंगावरून हात फिरविला. त्याच्या कृतज्ञतेचा प्रत्यय त्या मुक्या जनावरांनाही आला असेल.  त्यानंतर त्यांना घेऊन डोहामध्ये नेऊन सर्वांग चोळून चोळून स्वच्छ केले व नंतर बाहेर काढून कोरड्या उपरण्याने पुसून काढले. शेपटीचे गोंडे कोरडे  केले. घराकडे गेरूच्या पाण्याचे पंजे त्याच्या मुलाने त्या बैलावर उमटविले. पैकूनेही बैलांची शिंगे लाल करून त्यावर निळ्या चंदेरी बेगडाच्या गोल गोल पट्ट्या चिकटविल्या.  पोळ्याच्या तोरणात नेऊन त्यांना उभे केले. आणि ओळखीच्या घरात नेऊन बैलांना मिरवून आणले. वडे पुरणाने आपल्या बैलांना जेवू घातले.   घरी दावणीला बांधल्यावर बायजेने त्यांची पूजा केली. त्यानंतर त्या पैकूच्या कुटुंबीयानी उपवास सोडला.  अशाप्रकारे पैकूने बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

2. बायजाने एक रुपयाच्या नोटेला जहर का म्हटले आहे?
उत्तर : पोळा हा  बैलांना अतिथी म्हणून जेवायला बोलाविण्याचा सण. त्या दिवशी डॉक्टरीणबाईंनी त्यांची पूजा केली नाही उलट ती जनावरं त्यांची काय पूजा करायची ?असं म्हणून त्यांनी एक रुपयाचा कागद पैकूच्या हातात दिला होता. त्याचा बायजाला राग आला. ती म्हणाली लाल्या-ढवळ्या आज आपल्या घरचे पाव्हणे. ती काही आज जनावरं नव्हती. त्या बाईनं अपमान केला त्यांचा. हा गोडपणा नव्हे, ती नोट म्हणजे आपल्यासाठी जहर आहे. त्याचा पैसा होणार नाही कधी.

3. पैकूने मारबत म्हणून का ओरडा केला?
उत्तर : मारबत म्हणजे परसातील रोगराई उत्पन्न करणारी देवता. पोळ्याच्या दुसèया दिवशी ह्या देवतेची मिरवणूक काढतात. हिच्याकडे रोगराई इडा पिडा घालविण्यासाठी मागणं मागतात त्याला मारबत ओरडा म्हणतात. ती मारबत ओरडायला पैकू विसरला होता म्हणून झोपण्यापूर्वी तो मारबत ओरडला होता.  माशा मुरकुट्या, खरूज, खोकला, मानअपमान घेऊन जारे मारबत ! घेऊन जारे मारबत ! घेऊन जारे मारबत असे तो ओरडला होता.


प्र. 4. पुढील प्रश्नांची प्रत्येकी सात ते आठ वाक्यात उत्तरे लिहा.

1. पैकूने आपल्या अतिथींचा सत्कार कसा केला?
उत्तर : पोळा हा  बैलांना अतिथी म्हणून जेवायला बोलाविण्याचा सण. त्यामुळे पैकूने उठताक्षणीच बैलांच्या अंगावरून हात फिरविला. त्यांना घेऊन डोहामध्ये सर्वांग चोळून स्वच्छ केले व नंतर बाहेर काढून कोरड्या उपरण्याने पुसून काढले. शेपटीचे गोंडे कोरडे  केले. गेरूच्या पाण्याचे पंजे त्याच्या मुलाने त्या बैलावर उमटविले. पैकूनेही बैलांची शिंगे लाल करून त्यावर निळ्या चंदेरी बेगडाच्या गोल गोल पट्ट्या चिकटविल्या. वडे पुरणाने आपल्या बैलांना जेवू घातले. पोळ्याच्या तोरणात नेऊन त्यांना उभे केले. नंतर घरी बांधल्यावर त्यांची पूजा बायजेने केली. नंतर त्या माणसांच्या कुटुंबाने उपवास सोडला.  ओळखीच्या घरात नेऊन बैलांना मिरवून आणले.

2. डॉक्टरीणबाईकडे गेल्यावर काय घडले? त्यानंतर बायजेने काय केले? का?
उत्तर : डॉक्टरांच्या घरी पूजेसाठी बैलजोडी घेऊन गेल्यावर डॉक्टर बाहेर गेलेले असल्यामुळे पैकूने डॉक्टरीणबाईंना बाई दारी देव आणले आहेत पूजा करा असे सांगितले. परंतु डॉक्टरीणबाईनी कसली पूजा करायची रे? या बैलांची ? कशाला त्यांची पूजा करायची त्या जनावरांना त्यात काही कळत तरी का? अशिक्षितांचे  हे  खेळ आणि समजुती. आम्हाला यात विश्वास नाही. पूजा बिजा काय करायची? तू आमच्याकडे आलास आम्ही तुला ओळखतो हे घे तुझे इनाम म्हणून त्यांनी एक रुपया पैकूच्या हातात टेकविला होता. ही गोष्ट पैकूने बायजेला सांगितल्यानंतर तिला राग आला. ती म्हणाली लाल्या-ढवळ्या आज आपल्या घरचे पाव्हणे. ती काही आज जनावरं नव्हती. त्या बाईनं अपमान केला त्यांचा. हा गोडपणा नव्हे, ती नोट म्हणजे आपल्यासाठी जहर आहे . त्याचा पैसा होणार नाही कधी असं ती म्हणाली. त्यावर पैकूने ती नोट सरळ दिव्यावर जाळून टाकली.

प्र. 5. खालील वाक्यांचे संदर्भासहीत स्पष्टीकरण करा.

1. ‘‘बाई देव आणले आहेत पूजा करा !’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘अतिथी’ या वामन चोरघडे यांच्या कथेतील आहे. पोळ्याच्या सणाच्यावेळी पैकूने डॉक्टरीणबाईंना म्हटले आहे.
स्पष्टीकरण : पोळाच्या सणादिवशी अतिथी असलेल्या आपल्या बैलजोडीला घेऊन पैकू गावातील ओळखींच्या घरांकडे मिरवायला घेऊन जात होता शेवटी त्याने पूजेसाठी बैलजोडी डॉक्टरांच्या घरी घेऊन गेली. डॉक्टर बाहेर गेले होते. म्हणून पैकूने डॉक्टरीणबाईंना हाक मारली बाई देव आणले आहेत पूजा करा असे तो म्हणाला.

2. ‘‘किती कमाई आणली आज? काय दिलं कुणी कुणी?’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘अतिथी’ या कथेतील असून लेखक वामन चोरघडे आहेत. पोळ्याच्या सणाच्यावेळी बायजाने आपल्या नवèयाला म्हणजे पैकूला विचारलेे आहे.
स्पष्टीकरण : पोळ्याच्या दिवशी आपल्या बैलजोडीला गावातील ओळखीच्या घरात फिरवून पूजा करून आणल्यानंतर पैकू घरी माघारी परतला तेव्हा त्याची बायको बायजाने त्याला विचारलं, किती कमाई आणली आज ? काय दिलं कुणी कुणी?

3. ‘‘कसली पूजा करायची रे? या बैलांची?’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘अतिथी’ या ग्रामीण कथेतील आहे. त्याचे लेखक वामन चोरघडे आहेत. पोळ्याच्या सणाच्यावेळी डॉक्टरीणबाईंनी पैकूला म्हटले आहे.
स्पष्टीकरण : बैलपोळाच्या दिवशी पैकू आपल्या लाल्या-ढवळ्या ही बैलजोडी घेऊन मिरवायला गावातील ओळखीच्या घरांकडे निघाला होता. प्रत्येकाच्या घरी त्यांची पूजा होत होती. बैलजोडी घेऊन पैकू डॉक्टरांच्या घरी गेला व बाईसाहेबांना म्हणाला, बाई देव आणले आहेत पूजा करा. बाईनी बाहेर येऊन विचारले. कोणते देव? कसली पूजा करायची रे?  या बैलांची?  त्या जनावरांना त्यात काही कळत तरी? का. असं डॉक्टरीणबाईनी पैकूला विचारले.

4. ‘‘पैकू ! आज मारबत नाही ओरडलास?’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘अतिथी’ या वामन चोरघडे यांच्या ग्रामीण कथेतील आहे. पोळ्याच्या सणाच्यावेळी बायजाने पैकूला म्हटले आहे.
स्पष्टीकरण : पोळाच्या सणाच्या दिवशी पैकूने आपल्या लाल्या-ढवळ्या बैलजोडीला घेऊन गावात मिरवून तसेच ओळखीच्या घरात पूजा करून आणल्यानंतर तो आडवा झाला त्यावेळी बायजा त्याला म्हणाली पैकू आज मारबत नाही ओरडलास? कर सुरू झाली असेल ओरड, मग आपण झोपू.



प्र. 6.   योग्य उत्तर निवडून पुढे लिहा.

1. बैलांना सन्मानाने आमंत्रण देऊन त्यांचे कोडकौतुक करण्याचा दिवस कोणता?
अ) दिवाळी  ब) दसरा क) पोळा ड) नागपंचमी

2. लाल्या-ढवळ्या ही नावे कोणाची आहेत?
अ) मित्रांची ब) बैलांची क) मुलांची ड) कुत्र्यांची

3. पैकूचा मुलगा कोणते भांडे घेऊन बाहेर आला?
अ) चहाचे ब) दुधाचे क) गेरूचे ड) पाण्याचे

4. पैकू अखेरीस बैलजोडी घेऊन कोणाकडे गेला?
अ) डॉक्टर  ब) वकील क) पाटील ड) गुरव

5. पैकू आज ................ नाही ओरडलास?
अ) चांगभल ब) मारबत क) जयभवानी ड) उदो उदो

उत्तरे : 1. क) पोळा  2.  ब) बैलांची  3. क) गेरूचे  4. अ) डॉक्टर  5. ब) मारबत 

1 comment:

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...