कवी परिचय :
कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर (1912-1999) मराठीतील ज्येष्ठ कवी, नाटककार, कादंबरीकार व ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘जीवनलहरी’, ‘किनारा’, ‘मराठी माती’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘प्रवासी पक्षी’, ‘मुक्तायन’ हे काव्यसंग्रह; ‘दूरचे दिवे’, ‘कौंतेय’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘नटसम्राट’ ही नाटके तसेच ’वैष्णवी’, ‘जान्हवी’, कल्पनेच्या तीरावर या कादंबèया आणि ‘आहे आणि नाही’, ‘प्रतिसाद’ हे ललित लेखसंग्रह लिहिले आहेत. 1964 साली मडगाव (गोवा) येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यांनी भूषविले होते. 1988 साली त्यांना ज्ञानपीठ हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला.
मूल्य : माणुसकी, आशा
साहित्य प्रकार : सामाजिक कविता
संदर्भ ग्रंथ : मराठी माती
मध्यवर्ती कल्पना : परमेश्वराकडून माणसाला पराक्रम, शास्त्र, वैभव मिळाले तरी माणसाला खèया आनंदाचा स्वर्ग दिसलाच नाही. म्हणून तो माणूस पुन्हा परमेश्वराला शरण जातो. तेव्हा देव त्याला अंत:करणातील माणुसकीचा दिवा लाव म्हणजे तुला स्वर्गानंद मिळेल असे सांगतो. माणसाने माणसाबरोबर प्रेमाने वागावे हाच संदेश ही कविता देत आहे.
स्वाध्याय
प्र. 1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1. प्रसन्न झालेला देव माणसाला काय म्हणाला?उत्तर : प्रसन्न झालेला देव माणसाला तुला काय हवे ते माग असे म्हणाला.
2. प्रथमत: माणसाने देवाकडे काय मागितले?
उत्तर : प्रथमत: माणसाने देवाकडे शस्त्र मागितले.
3. दुसèयांदा माणसाने देवाकडे काय मागितले?
उत्तर : दुसèयांदा माणसाने देवाकडे शास्त्र मागितले.
4. पुन्हा मानव प्रभूच्या दारी का गेला?
उत्तर : शस्त्र आणि शास्त्र मिळूनसुद्धा खèया आनंदाचा स्वर्ग मिळालाच नाही म्हणून पुन्हा मानव प्रभूच्या दारी गेला.
5. मानवाजवळ कोणता दिवा आहे असे देव म्हणाला?
उत्तर : मानवाजवळ अंत:करणातील माणुसकीचा दिवा आहे असे देव म्हणाला.
प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा.
1. शस्त्र मिळाल्यावर मानवाने काय केले?उत्तर : प्रसन्न झालेल्या देवाने माणसाला शस्त्र दिल्यानंतर ते शस्त्र घेऊन मानवाने सारे जग हे युद्धभूमी समजून सगळ्या भूमातेच्या हृदयावर जखमा केल्या. सगळीकडे रक्तपात करून त्या रक्ताने तो माखून राहिला.
2. शास्त्र मिळवून मानव काय करणार होता?
उत्तर : शास्त्र मिळवून मानव सगळे जीवन मंगलमय करणार होता. ज्ञानसाधना करून तो स्वर्ग व पृथ्वीचे मीलन करणार होता.
प्र. 3. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन-चार वाक्यात लिहा.
1. शस्त्र, शास्त्र मिळवूनही माणूस हताश का झाला?उत्तर : परमेश्वराकडून माणसाला शस्त्र आणि शास्त्र मिळाले. त्यामुळे आपण सुखी होऊ असे त्याला वाटत होते.सारे जीवन मंगलमय होईल असे त्याला वाटत होते. परंतु ते मिळवूनसुद्धा माणसाला खèया आनंदाचा स्वर्ग दिसलाच नाही. तो त्याच्या स्वप्नातच राहिला. त्यामुळे माणूस हतबल आणि हताशच झाला.
2. माणूसपणाचा दिवा लाव म्हणजे काय?
उत्तर : शस्त्र आणि शास्त्र मिळूनसुद्धा सुखी न झालेला माणूस पुन्हा परमेश्वराला शरण जातो. या अंधारातून वाट काढण्यासाठी देव त्याला अंत:करणातील माणुसकीचा दिवा लाव म्हणजे तुला स्वर्गानंद मिळेल असे सांगतो. म्हणजेच माणसाने माणसाबरोबर प्रेमाने वागावे हाच संदेश तो देतो.
कवितेचा सारांश :
कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या या सामाजिक कवितेतून मानवाच्या विद्यमान ‘कर्तृत्वावर’ कवीने प्रकाश टाकला आहे. परमेश्वराकडून माणसाला शस्त्र, शास्त्र मिळाले तर आपण सुखी होऊ असे मानवाला वाटले. त्यामुळे मानवाने देवाची प्रार्थना करून त्याला प्रसन्न करून घेतले. तेव्हा प्रसन्न झालेल्या देवाने मानवाला काय हवे ते मागण्यास सांगितले. तेव्हा शस्त्र असेल तर आपण सुखी होऊ असे माणसाला वाटले. त्यामुळे मला शस्त्र पाहिजे अशी मागणी त्याने देवाकडे केली. शस्त्र असेल तर आपण पराक्रमाच्या जोरावर सर्व ते साध्य करून घेऊ शकू असे त्याला वाटत होते. शस्त्र मिळाल्यानंतर मानवाने या भूमातेलाच युद्धभूमी बनवून तिच्या हृदयावर अनेक जखमा केल्या. अनेक लढाया केल्या. त्यासाठी रक्ताचे पाट वाहिले. रक्तात माखूनसुद्धा त्याला हवे ते साध्य करता आले नाही. त्यामुळे रक्तात न्हाऊनच तो पुन्हा देवाच्या दारात जाऊन उभा राहिला. त्यावेळी देवाने त्याला पुन्हा काय हवे तुला? असे विचारले. त्यावेळी शस्त्राऐवजी शास्त्र मिळाले तर सारे जीवन मंगलमय होऊन जाईल असे वाटल्यामुळे मानवाने त्याच्याकडे शास्त्र मागितले. ज्ञानसाधना करून स्वर्ग व पृथ्वीचे मीलन करून हे जीवन सुखी होईल असे कवीला वाटत होते. परंतु शस्त्र, शास्त्र, वैभव मिळाले तरी माणसाला खèया आनंदाचा स्वर्ग दिसलाच नाही. त्याला हवा असलेला स्वर्ग त्याच्या स्वप्नातच राहिला म्हणून मानव अधिक हतबल व हताश झाला आणि तो पुन्हा परमेश्वराला शरण गेला. तेव्हा देवाने त्याला पुन्हा काय हवे तुला ? असे विचारले तेव्हा मानवाने सांगितले मी बावरलेलो (गोंधळलो) आहे. त्यामुळे या अंधारातून मला वाट दिसेनाशी झाली आहे. तेव्हा देव त्याला म्हणाला यासाठीची गोष्ट तुझ्यापाशीच आहे. तुझ्या अंत:करणातील माणुसकीचा दिवा लाव म्हणजे तुला स्वर्गानंद मिळेल. माणसाने माणसाबरोबर प्रेमाने वागावे हाच संदेश ही कविता देते.
प्र. 5. संदर्भासहीत स्पष्टीकरण करा.
1. स्वर्ग परी स्वप्नातच राही .......... उत्तर : संदर्भ : या काव्यपंक्ती ‘मराठी माती’ या काव्यसंग्रहातून निवडलेल्या ‘दीप लाव तो’ या कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कवितेतील आहेत.
स्पष्टीकरण : मनुष्याने देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून शस्त्र आणि शास्त्र मिळविले त्यामुळे आपण सुखी होऊ असे त्याला वाटले. परंतु या गोष्टी मिळूनसुद्धा माणसाला खèया आनंदाचा स्वर्ग दिसलाच नाही. म्हणून कवी म्हणतो मानवाने पाहिलेला स्वर्ग मात्र अजूनही स्वप्नातच राहिला आहे.
2. हतबल आणिक हताश मानव ............
उत्तर : संदर्भ : या काव्यपंक्ती ‘दीप लाव तो’ या कवितेतील असून कवी कुसुमाग्रज हे आहेत.
स्पष्टीकरण : शस्त्र मिळाल्यामुळे आपण पराक्रमी होऊन सारी सुखे मिळवू व शास्त्र मिळाल्याने आपले जीवन मंगलमय होईल असे मनुष्याला वाटले होते. या गोष्टीमुळे आपणाला स्वर्गीय आनंद प्राप्त होईल असे त्याला वाटे परंतु तो आनंद त्याला मिळालाच नाही. त्यामुळे तो हतबल आणि हताश झाला आहे असे कवी म्हणतो.
3. दीप लाव तो तव माणूसपण ...........
उत्तर : संदर्भ : वरील काव्यपंक्ती ‘दीप लाव तो’ या कवितेतील असून कवी कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर हे आहेत. मानवाला उद्देशून देवाने असे उद्गार काढले आहेत.
स्पष्टीकरण : परमेश्वराकडून माणसाला पराक्रम, शास्त्र, वैभव मिळाले तरी माणसाला खèया आनंदाचा स्वर्ग दिसलाच नाही. म्हणून तो माणूस पुन्हा परमेश्वराला शरण जातो. तेव्हा देव त्याला अंत:करणातील माणुसकीचा दिवा लाव म्हणजे तुला स्वर्गानंद मिळेल असे सांगतो.
प्र. 6. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. ............... हवे मज माणूस वदला.2. करील शास्त्रच ...................
3. स्वर्ग परी ....................... राही.
4. साध्य सर्व हो ....................
5. देव म्हणे .................... आहे.
उत्तर : 1. शस्त्र हवे मज 2. मंगल जीवन 3. स्वप्नातच 4. पराक्रमाने 5. तुज जवळीच
Wow
ReplyDelete