Sunday, May 19, 2019

क्रिकेटवीर - अनिल कुंबळे






लेखक परिचय : 



रवी चतुर्वेदी : खेळ, पत्रकार आणि क्रिकेट जगतात ‘पंडितजी’ या नावाने सुपरिचित. क्रीडाप्रेमींना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे समालोचक, हिंदीतील उत्कृष्ट समालोचक. सध्या वरिष्ठ क्रीडा पत्रकार असून त्यांचे शिक्षण दिल्ली विद्यापीठ, चेकोस्लावाक आणि विंडसर विद्यापीठ ओंटोरिया, कॅनडा येथे झालेले आहे. त्यांची 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 1962 पासून ते क्रिकेटचे समालोचक म्हणून कार्य करीत आहेत. त्यांनी 100 कसोटी व 152 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याचे समालोचन केले आहे. त्यांचे पहिले पुस्तक ‘वेस्टइंडीज-इंडिया टेस्ट क्रिकेट’ 1976 साली प्रसिद्ध झाले.


मूल्य : जिद्द व संघभावना
साहित्य प्रकार : व्यक्तिचित्र
संदर्भ ग्रंथ : भारतीय क्रिकेटमधील सितारे
मध्यवर्ती कल्पना : भारतीय उपखंडात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. यामध्ये आपल्या फिरकी  गोलंदाजीच्या जोरावर यश संपादन केलेल्या अनिल कुंबळे यांचे व्यक्तिचित्र लेखकाने रेखाटले आहे.


टीप :

लेग ब्रेक गुगली-डाव्या यष्टीवर चेंडू वळविण्याची कला.
शारजा-युनायटेड अरब अमिरातीतील एक शहर जिथे क्रिकेटचे सामने भरविले जातात. यात खेळणे प्रतिष्ठेचे मानले जाते.
सरासरी-एखाद्या गोलंदाजाने दिलेल्या एकूण धावा व त्याने घेतलेले बळी यांचा भागाकार.

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. भारतीय संघ यशासाठी कोणत्या गोलंदाजीवर अवलंबून राहिला आहे?
उत्तर : भारतीय संघ यशासाठी  फिरकी गोलंदाजीवर अवलंबून राहिला आहे.

2. कुंबळे यांनी कसोटीमध्ये किती बळी घेतले?
उत्तर : कुंबळे यांनी कसोटीमध्ये 600 बळी घेतले आहेत.

3. कुंबळे यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर : 17 आक्टोबर 1970 रोजी अनिल कुंबळेंचा जन्म झाला.

4. कुंबळेनी शिक्षणात कोणती पदवी संपादन केली आहे?
उत्तर : कुंबळेनी शिक्षणात अभियांत्रिकीची (बी.ई )  पदवी संपादन केली आहे.

5. कुंबळेच्या क्रिकेट कारकिर्दीतील एकूण धावा किती?
उत्तर : कुंबळेच्या क्रिकेट कारकिर्दीतील एकूण धावा 2440 इतक्या आहेत.


 


प्र. 2.  खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1. कुंबळेनी क्रिकेट कारकिर्दीला कशी सुरुवात केली ?
उत्तर : रणजी क्रिकेटमध्ये कर्नाटक संघासाठी चार बळी घेऊन कुंबळेंनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्या आधारावर त्यांची 19 वर्षाखालील संघात निवड झाल्यावर पाकिस्तानच्या दौèयातील कसोटी सामन्यात 113 आणि 76 धावा काढून यशस्वी फलंदाज म्हणून ते पुढे आले. 1990 मध्ये शारजा येथे एक दिवसीय व इंग्लंड येथे कसोटीसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली.

2. 7 फेब्रुवारी 1999 या दिवसाचे महत्त्व काय?
उत्तर : 7 फेब्रुवारी 1999 हा दिवस अनिल कुंबळे व त्यांच्या चाहत्यांना कायमस्वरूपी लक्षात राहील असाच आहे. कारण त्या दिवशी त्यांनी कसोटीच्या एका डावात पाकिस्तानचे दहाही गडी बाद करून विश्वविक्रम नोंदविला. यापूर्वी असा विक्रम इंग्लंडचा माजी माजी ऑफ स्पिनर जिम लेकर यांनी केला होता. या कामगिरीचा गौरव म्हणून कर्नाटक सरकारने बेंगलोरमधील एका चौकाला कुंबळे चौक असे नाव दिले आहे.

प्र. 3. खालील प्रश्नाचे उत्तर चार-पाच वाक्यात लिहा.

1. हिरो होंडा कप स्पर्धेतील कुंबळेच्या यशाची माहिती द्या.
उत्तर :  अनिल कुंबळे यांनी  कोलकाता येथे झालेल्या हिरो होंडा कप स्पर्धेतील एक दिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध 12 धावात 6 बळी घेऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. 1996 च्या विश्वचषक स्पर्धेत 20.74 या सरासरीने 61 बळी घेऊन त्यांनी आपल्या गोलंदाजीत खूपच रंगत आणली.

प्र. 4. रिकाम्या जागा भरा

1. कुंबळेला ....................... या टोपण नावाने संबोधतात.

2. कुंबळेचा जन्म ............... या दिवशी झाला.

3. कुंबळे हे ........................ गोलंदाज आहेत.

4. कुंबळेचा जन्म ............... या गावी झाला.

5. आय.सी.सी. ने जगातील .........  सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून मानांकन दिले आहे.

उत्तर : 1.जम्बो  2.17 आक्टोबर 1970 रोजी  3. लेगस्पिनर  4. कुंबळ  5. पाचवे


No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024