कवी परिचय :
गजानन लक्ष्मण ठोकळ (1909-1984) सुरुवातीला काही वर्षे शिक्षक म्हणून काम पाहिले. नंतर श्री लेखन वाचन भांडार सुरू केले. त्यांचे लेखन वैविध्यपूर्ण आहे. त्यांचे ‘कडूसाखर‘, ‘गोंदण’, ‘ठोकळगोष्टी’ हे कथासंग्रह; ‘कशासाठी पोटासाठी’ हे नाटक; ‘गावगुंड’, ‘टेंभा’, ‘ठिणगी’, या कादंबèया; ‘मीठभाकर’, ‘सुगी’ हे ग्रामीण काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
मूल्य : आतिथ्य
साहित्य प्रकार : ग्रामीण कविता
संदर्भ ग्रंथ : सुगी
मध्यवर्ती कल्पना : खेड्यातील लोकांचे जीवन साधेसुधे असते. गरीब शेतकèयाकडे आलेल्यांचा पाहुणचार तो किती प्रेमाने करतो याचे वर्णन या कवितेत आढळते.
.
स्वाध्याय
प्र. 1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1. कारभाèयाने पाहुण्याला बसायला काय दिले?उत्तर : कारभाèयाने पाहुण्याला बसायला घोंगडी दिली.
2. कारभाèयाने पाहुण्याला आंघोळ लवकर उरकण्यास का सांगितली?
उत्तर : ताट वाढून ठेवलं होतं म्हणून कारभाèयाने पाहुण्याला आंघोळ लवकर उरकण्यास सांगितली.
3. जेवणात कोणकोणते पदार्थ होते?
उत्तर : जेवणात ज्वारीची भाकरी, कांद्याचे बेसन व लसणीची चटणी असे पदार्थ होते.
4. कारभाèयाने सुगरण कोणास म्हटले आहे?
उत्तर : स्वत:च्या बायकोस कारभाèयाने सुगरण म्हटले आहे.
5. कोणता पदार्थ अपरूक झाला होता?
उत्तर : कांद्याचे बेसन हा पदार्थ चवदार (अपरूक) झाला होता.
6. कोणता पदार्थ तिखट होता?
उत्तर : लसणीची चटणी तिखट होती.
प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिहा.
1. घरी आलेल्या पाहुण्याचा प्रवासात झालेला त्रास कमी व्हावा म्हणून घरच्या कारभाèयाने काय केले?उत्तर : घरी आलेल्या पाहुण्याचा प्रवासात झालेला त्रास कमी व्हावा म्हणून घरच्या कारभाèयाने आल्या आल्या त्याला गाठोडं ठेवण्यास सांगून बसण्यास घोंगडी दिली व त्या घोंगडीवर बसा असं सांगितलं. आता हे आपलंच घर समजा हयगय करू नका. पुष्कळ चालल्यामुळे आपण दमला असाल हे आंघोळीसाठी पाणी काढलंय पटकन आंघोळ करून घ्या असे सांगितले.
2. पाहुण्याच्या जेवणाची व्यवस्था कशा तèहेने केली?
उत्तर : पाहुण्याला जेवणाची व्यवस्था करण्यापूर्वी कारभाèयाने त्याला लवकर अंघोळ उरकून घेण्यास सांगितली. त्यानंतर त्याच्यासाठी पाट घातला व ताटामध्ये ज्वारीची जाड भाकरी वाढली. त्याबरोबर खाण्यासाठी कांद्यांचे बेसनही केले होते. ते अतिशय चवदार झाले होते. त्याच्या जोडीने लसणीची तिखट चटणीही वाढली होती. ती मधून तोंडी लावा असेही तो सांगत होता. ही गरिबाची मीठ भाकर आहे ती गोड करून घ्या असे तो सांगत होता.
3. आपल्या कारभारणीचा मोठेपणा कारभारी कसा व्यक्त करतो?
उत्तर : पाहुण्याची सरबराई करताना कारभारी आपल्या कारभारणीचा (पत्नीचा) मोठेपणा व्यक्त करताना म्हणतो माझी बायको मोठी सुगरण आहे, तिने केलेलं हे कांद्याचं बेसन मोठं चवदार झालं आहे बघा. ज्वारीची भाकरी, लसणीची चटणी असा बेतही त्याच्या बायकोनं केला होता.
प्र. 3.खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा.
1. घरी आलेल्या पाहुण्याचा आदर सत्कार कारभारी कशा तèहेने करतो?उत्तर : राम राम करून झाल्यानंतर घरी आलेल्या पाहुण्यास कारभाèयाने त्याचं गाठोडं ठेवण्यास सांगून बसण्यास घोंगडी देवून त्यावर बसण्यास सांगितलं. आता हे आपलंच घर समजा हयगय करू नका. पुष्कळ चालल्यामुळे आपण दमला असाल हे आंघोळीसाठी पाणी काढलंय पटकन आंघोळ करून घ्या असे सांगितले. कारण जेवणाचं ताट वाढून ठेवलं आहे. त्यानंतर पाट पुढे करून त्याला खाऊ पिऊ घातलं. त्यासाठी ज्वारीची भाकरी, कांद्याचं बेसन व लसणीची चटणी असा बेत केला होता. शांत मनाने जेवणाचा आस्वाद घ्या असं सांगतो.
2. पाहुण्याला आणखी राहण्याचा आग्रह शेतकèयाने कसा केला आहे?
उत्तर : पाहुणा ज्यावेळी जाण्यासाठी निघतो त्यावेळी शेतकरी त्याला म्हणतो एवढ्यातचं जायचं काय म्हणता ? झोप घ्या जरा. विश्रांती घ्या. एवढी काय घाई लागली आहे. हा बेत काही बरा नाही. उद्या जावा म्हणे म्हणून तो त्याला राहण्याचा आग्रह करीत असतो.
प्र. 4. खालील ओळीचे संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1. हे पगा काढलंय पाणी आंघुळ कराया चला.उत्तर : संदर्भ : सदर काव्यपंक्ती ‘पाहुणचार’ या ग.ल.ठोकळ लिखित कवितेतील आहे. शेतकèयांने पाहुणचार करताना पाहुण्याला उद्देशून म्हटले आहे.
स्पष्टीकरण : शेतकèयाच्या घरी पाहुणा येतो त्यावेळी शेतकरी त्याला म्हणतो हयगय करू नका हे आपलेच घरं समजा. पुष्कळ चालून आपण जणू थकला असेल हे पहा अंघोळीला पाणी काढलं आहे. अंघोळ करायला चला असं म्हणतो.
2. लसणीची चटणी अजून पगा वाढली.
उत्तर : संदर्भ : सदर काव्यपंक्ती ‘पाहुणचार’ या ग्रामीण कवितेतील असून कवी ग.ल.ठोकळ आहेत. शेतकèयांने पाहुणचार करताना पाहुण्याला उद्देशून म्हटले आहे.
स्पष्टीकरण : घरी आलेल्या पाहुण्याला पाट वगैरे घालून शेतकरी त्याच्या जेवणाची व्यवस्था करतोय. त्याच्या ताटात ज्वारीची जाड भाकरी, कांद्याचं बेसन घालून ते खाण्याचा आग्रह करतो. तसेच लसणीची चटणी सुद्धा वाढली आहे. ती मधून तोंडी लावा चांगली तिखट लागते असे सांगतो.
प्र. 2. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. ..................... चालला जणू लई भागला.2. पाव्हणं चला या आता हे पगा ................. टाकलं.
3. लई .......................... मपली बरं कारभारीण.
4. .................... चटणी उजुन पगा वाढली.
5. .................... गरिबाची घ्या गोड करूनी.
6. गरिबाची ................. ठेवा या बरं रामराम घ्या.
7. निचितीन जेवा आता हे समजा ............... घर.
उत्तरे : 1. वाटुळ 2. पिढं 3. सुगरण 4. लसणीची 5. मीठ भाकरी 6. ओळख 7. आपलं
प्र. 3. समानार्थी शब्द लिहा.
1. पाहुणचार - आदरातिथ्य, मानपान, आदरोपचार, आदरसत्कार2. गाव - ग्राम, खेडे, समूह
3. पाहुणा - अतिथी, पांथस्थ,
4. तोंड - मुख, चेहरा, वदन
5. आंघोळ - स्नान, न्हाणे
6. झोप - निद्रा, नीज
कवितेचा सारांश :
ग.ल. ठोकळ यांनी लिहिलेली ही ग्रामीण कविता आहे. खेड्यातील लोकांचे जीवन साधेसुधे असते. अशाच एका खेड्यातील गरीब शेतकèयाकडे आलेल्यांचा पाहुणचार तो किती प्रेमाने करतो याचे वर्णन या कवितेत आढळते.परगावाहून आलेल्या पाहुण्याची शेतकरी आपुलकीने सरबराई करतो. त्याला तो म्हणतो या बसा पाव्हणं आमचा राम राम घ्या. कोणत्या गावाहून तुम्ही आला? तुमचं गाठोडं तिथंच कोपèयात राहू द्या. आणि इकडं घोंगडी घातली आहे त्यावर बसा असं तो म्हणतो. आता संकोच करू नका हे आपलंच घर समजा. पुष्कळ चालल्यामुळे तुम्ही थकला भागला असणार. थोडी विश्रांती घ्या. हे बघा अंघोळीसाठी पाणी काढलंय तुम्ही पटकन अंघोळ उरकून घ्या. ताट वाढून ठेवलं आहे. अंघोळ झाल्यावर तो त्याला म्हणतो चला पाव्हणं आता जेवायला म्हणून त्याला बसण्यासाठी पाटं पुढं करतो. ताटात ज्वारीची जाड भाकरी वाढली आहे पहा. तुम्हाला शेतावर जायचं आहे ना, तुम्ही शांत चित्ताने जेवा. माझी कारभारणी मोठी सुगरण आहे. ती उत्तम स्वयंपाक करते. तिने केलेलं हे कांद्याचं बेसन मोठं चवदार झालं आहे. ती पहा ताटात लसणीची चटणी वाढली आहे तीही मधून तोंडी लावून बघा, चांगली तिखट आहे ती. भरपूर खाऊन घ्या. काही कमी करू नका. गरिबाची ही मीठभाकरी आहे; ती गोड मानून घ्या. आता जायचं काय म्हणता? झोप घ्या जरा. विश्रांती घ्या. जाण्यासाठी एवढी घाई का करता आहात. उद्या जाशीला म्हणे. आजच जाण्याचा हा आपला बेत बरा नाही आहे. शेवटी निघालाच आहात ना? तर जरा जपूनचं जावा. या गरिबाची ओळख ठेवा. आमचा राम राम घ्या.
No comments:
Post a Comment