Sunday, May 19, 2019

वाट चुकल्याचा आनंद


नारायण सीताराम फडके

लेखक परिचय : 
नारायण सीताराम फडके (1894-1978) लेखक, प्राध्यापक, कथा, लघुनिबंध, चरित्र, आत्मचरित्र, नाटक या सर्व क्षेत्रात लीलया संचार करणारे म्हणून ना.सी. फडकेना ओळखले जाते. ‘अल्ला हो अकबर’, ‘कुलाब्याची दांडी’, ‘दौलत’, ‘निरंजन’, ‘अखेरचे बंड’ अशा 84 कादंबèया; अनेक कथासंग्रह, ‘गुजगोष्टी, ‘नव्या गुजगोष्टी’ हे लघुनिबंध संग्रह तसेच ‘प्रतिभासाधन’, ‘प्रतिभाविलास’ हे समीक्षात्मक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांना लघुनिबंधाचे प्रवर्तक असे म्हटले जाते.

मूल्य : निसर्गप्रेम
साहित्य प्रकार : लघुनिबंध
संदर्भ ग्रंथ : गुजगोष्टी
मध्यवर्ती कल्पना : एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर आपली वाट चुकते. लेखक एकदा महाबळेश्वरला गेले असताना बाजारातून घरी परतताना त्यांची वाट चुकते. पण वाट चुकल्यामुळे त्यांना दु:ख होण्याऐवजी आनंदच झाला.
शब्दार्थ आणि टीपा

स्वाध्याय

प्र. 1.   योग्य पर्याय लिहा.

1. लेखक बाजारात का गेले होते?
अ) भाजी आणण्यास ब) कागद आणण्यास क) गाव पाहण्यास ड) फिरण्यासाठी

2. लेखक मित्राच्या घरी कशासाठी गेले होते?
अ) चहासाठी ब) भेटण्यास क) पुस्तक  आणण्यासाठी ड) लग्न ठरविण्यासाठी

3. लेखकांनी घरच्या मंडळींना काय कबूल केले होते?
अ) सिनेमाला जाण्याचे ब) मंदिराला जाण्याचे क) फिरायला जाण्याचे ड) नाटकाला जाण्याचे

4. ‘वाट चुकल्याचा आनंद’ या पाठाचे मूल्य कोणते?
अ) लघुनिबंध ब) व्यक्तिमाहात्म्य क) निसर्गप्रेम ड) प्रामाणिकपणा

उत्तरे : 1. ब) कागद आणण्यास   2. अ) चहासाठी   3. क) फिरायला जाण्याचे    4. क) निसर्गप्रेम 


प्र. 2. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. ना.सी. फडके यांचे पूर्ण नाव काय?
उत्तर : ना.सी. फडके यांचे पूर्ण नाव नारायण सीताराम फडके.

2. वाट चुकल्याचा आनंद हा पाठ कोणत्या पुस्तकातून निवडला आहे?
उत्तर : ‘गुजगोष्टी’ या लघुनिबंध संग्रहातून ‘वाट चुकल्याचा आनंद’ हा पाठ निवडण्यात आला आहे.

3. लेखक कोठे रहावयास गेले होते?
उत्तर : लेखक महाबळेश्वरला रहावयास गेले होते.

प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा.

1. लेखक दचकून केव्हा उठले?
उत्तर : बाजारात गेले असताना मित्र भेटला म्हणून लेखक त्याच्या घरी चहा घेण्यासाठी गेले होते. तेथे चहा घेऊन गप्पांच्या ओघात खूप वेळ निघून गेला. त्यावेळी साडेचार वाजल्याचं कुणीतरी सहज बोललं, तेव्हा लेखक दचकून उठले.

2. लेखक उजव्या हाताकडील झाडीत का घुसले?
उत्तर : मित्राच्या घराकडून घराकडे परतत असताना आपणाला घरी परतायला उशीर होईल असे लेखकाला वाटत होते. कारण हा रस्ता अनेक चढ उतार करीत अन् वळण घेत गेलेला होता. त्यामुळे लेखकाच्या मनात एक कल्पना आली की मळलेल्या वाटेनं जायच्याऐवजी उजव्या हाताकडच्या झाडीत घुसून बंगल्याच्या दिशेने आपण गेलो तर, आपला कितीतरी वेळ वाचेल व आपण लवकर घरी पोहोचू. या कल्पनेनं मनात निश्चय करून लेखक उजव्या हाताकडच्या झाडीत घुसले.

प्र. 3. खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा.

1. लेखकाने कोणती निसर्गशोभा पाहिली?

उत्तर : वाट चुकल्यामुळे लेखकाला महाबळेश्वराच्या डोंगराचे कधी पाहिले नव्हते ते भाग पाहायला मिळाले. एका दरीच्या ऐन तोंडावर तो कडा होता. तेथून शेकडो फूट उंचीचे डोंगराचे कडे दिसत होते. काळे काळे प्रचंड ढग लेखकाच्या माथ्यावर येऊन तरंगू लागले होते. जणू मोठ मोठी काळ्या काळ्या रंगाची कुठली तरी विमानेच तेथे येवून हवेत क्षणभर विसावा घेत होती. लेखकाने ढगांकडे पाहिलंही नाही. तोच वाèयाचे वाकडे तिकडे झोत हवेत उठले अन् ढगातून पाण्याचे थेंब पडू लागले. शत्रूवर अचानक छापा घालून पुढे निघून जाणाèया सैन्याच्या थव्याप्रमाणे ढग भराभरा निघून चालल्यामुळे आकाशाचा निळा रंग पुन्हा प्रकट झाला होता. नंतर दहा पंधरा मिनिटांनी इंद्रधनुष्य प्रकट झालं आणि ती कमान आपल्याजवळ सरकत येत आहे असे लेखकाला वाटले.

2. क्षितिजावर इंद्रधनुष्य केव्हा प्रकट झाले?

उत्तर : लेखक ज्या कड्यावर थांबला होता तेथे काळे काळे प्रचंड ढग माथ्यावर येऊन तरंगू लागले होते. वाèयाच्या झोतामुळे त्या ढगातून पाण्याचे थेंबही पडले होते. जलधारांची दाटी विरळ विरळ व्हायला लागली होती शत्रूवर अचानक छापा घालून पुढे निघून जाणाèया सैन्याच्या थव्याप्रमाणे ढग भराभरा निघून चालले होते.  आकाशाचा निळा रंग पुन्हा प्रकट झाला होता. नंतर दहा पंधरा मिनिटांनी सूर्यप्रकाशही पुन्हा पहिल्या थाटाने जिकडे तिकडे भरला अन् अखेर पूर्व क्षितिजावर प्रचंड इंद्रधनुष्य प्रकट झालं  

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024