Sunday, May 19, 2019

माझी मुक्ताई

बहिणाबाई चौधरी 

कवी परिचय : 
बहिणाबाई चौधरी (1880-1951) एक अशिक्षित कवयित्री. जीवनातील विविध अनुभव समर्थपणे कवितेतून व्यक्त केले. जिव्हाळ्याची बोली हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य. जळगाव येथे शेतकरी कुटुंबात आयुष्य गेल्यामुळे त्यांच्या लेखनात खानदेशी व वèहाडी भाषेचा वापर झाला आहे. (या भाषेत ‘ल’ बद्दल ‘य’चा वापर आढळतो.) ‘बहिणाबाईंची गाणी‘ हा कविता संग्रह प्रसिद्ध.

मूल्य : व्यक्तिमाहात्म्य
साहित्य प्रकार :  व्यक्तिचित्र
संदर्भ ग्रंथ : ‘बहिणाबाईंची गाणी‘
मध्यवर्ती कल्पना : मुक्ताई ही ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण. ती दहा वर्षाची होती तरीसुद्धा उपजत ज्ञानामुळे चांगदेवांची गुरू झाली. आपल्या रागावलेल्या मोठ्या भावाची (ज्ञानेश्वरांची) समजूतही तिनेच काढली. अशा या मुक्ताईचे भावपूर्ण चित्रण या कवितेत केले आहे.

टीप :

1. चांगदेव - योग साधना केलेला ज्ञानी पुरुष. त्यांना स्वत:बद्दल गर्व होता. ज्ञानदेवांना भेटण्यासाठी वाघावर बसून आला होता. पण मुक्ताईच्या ज्ञानाने प्रभावित होऊन त्याने तिला गुरु मानले.

2. ताटीचे अभंग - ज्ञानेश्वर कंटाळून (रागावून) दार बंद करून स्वत:ला कोंडून घेऊन बसले. त्यावेळी त्यांची समजूत काढून दार उघडण्यासाठी मुक्ताईने केलेले अभंग. तेच ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत.

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. मुक्ताई ही कोण होती?
उत्तर : मुक्ताई ही ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण होती.

2. मुक्ताईला गुरू कोणी मानले?
उत्तर : चांगदेवाने मुक्ताईला गुरु मानले.

3. मुक्ताईचे वय किती होते?
उत्तर : मुक्ताई दहा वर्षाची होती.

4. ज्ञानदेव घरात का दडले?
उत्तर : लोकांच्या बोलण्याला कंटाळून  ज्ञानदेव दार बंद करून, स्वत:ला कोंडून घेऊन बसले.

प्र. 2.  खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1. ज्ञानेश्वर भाग्यवंत आहेत असे बहिणाबाई का म्हणते?
उत्तर : मुक्ताई ही ज्ञानेश्वरांपेक्षा लहान होती. परंतु आपल्या उपजत ज्ञानामुळे ती चांगदेवांची गुरू झाली होती. चांगदेव तिच्या ज्ञानाने प्रभावित झाले होते. ज्ञानदेवांनी स्वत:ला कोंडून घेतल्यावर या धाकट्या बहिणीनेच त्यांची समजूत काढली होती. त्यामुळे ज्ञानेश्वरांनाही गहिवरून आले होते. अशी समंजस बहीण त्यांना लाभल्यामुळे ज्ञानेश्वर भाग्यवंत आहेत असे बहिणाबाई  म्हणते.

2. मुक्ताईच्या अभंगाचा ज्ञानदेवांवर कोणता परिणाम झाला?
उत्तर : घरात स्वत:ला कोंडून घेतलेल्या ज्ञानेश्वरांची समजूत काढण्यासाठी मुक्ताईने ताटीचे अभंग रचले तिच्या हृदयाचा ठाव घेणाèया अभंगामुळे ज्ञानदेवसुद्धा गहिवरले. त्यांचे डोळे भरून आले.

प्र. 3. खालील प्रश्नाचे चार-पाच वाक्यात उत्तर लिहा.

1. मुक्ताईबद्दल बहिणाबाईंनी कोणते गौरवोद्गार काढले आहेत?


उत्तर : मुक्ताई ही ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण ती केवळ दहा वर्षाची होती परंतु आपल्याकडील ज्ञानामुळे हजारोवर्षे तपश्चर्या करून योगी बनलेल्या चांगदेवाने तिला गुरू मानले होते. लोकांच्या बोलण्याला कंटाळून ज्ञानेश्वरांनी दरवाजा लावून स्वत:ला कोंडून घेतले होते. परंतु लहान असून सुद्धा  ताटीचे अभंंग रचून  मुक्ताईने त्यांची समजूत काढली. हे तिचे अभंग आपल्या हृदयाचा ठाव घेतात. शिवाय एकेका अभंगात तिने पांडुरंग साकार केला आहे.




प्र. 4. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. माझी मुक्ताई मुक्ताई दहा ..................... लेकरू.

2. उबगले ग्यानदेव घडे ..................... संग.

3. ताटीचे अभंग ..................... चा ठाव घेतात.

4. मुक्ताईचा ................ हा भाग्यवंत भाऊ होय.

उत्तरे : 1. वर्साचं  2. असंगाशी  3. हृदयाचा  4. ज्ञानेश्वर  

कवितेचा सारांश : 

ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण असलेल्या मुक्ताईचे भावपूर्ण चित्रण या कवितेत बहिणाबाईंनी केलेले पाहायला मिळते. माझी मुक्ताई म्हणजे दहा वर्षाचं लेकरू आहे. हजारो वर्षे तपश्चर्या करून योगी बनलेल्या चांगदेवानं तिला गुरू मानले.  संन्याशाची पोरं म्हणून  मुक्ताईला व तिच्या भावंडानं लोक हिणवत असतं. टाकून दिलेल्या पोरांचं तोंडदेखील पाहू नये असे बोलत असत. लोकांचे हे बोलणे ऐकून कंटाळलेल्या ज्ञानदेवांनी त्यामुळेच असं माझे हे तोंड मी लोकांना कसे दाखवू म्हणून दार लावून घेऊन स्वत:ला घरामध्ये कोंडून घेतले. वाईट लोकांशी संबंध आला तर वाईटच घडत जाते. समाजातून त्यांच्यावर होणाèया या साèया घटनांना ज्ञानेश्वर कंटाळले होते. त्यामुळेच त्यांनी स्वत:ला कोंडून घेतले होते.  हे पाहून त्यांची धाकटी बहीण मुक्ताई ही कळवळली. तिला अतिशय वाईट वाटले त्यामुळेच आपल्या भावाची (ज्ञानदेव) समजूत काढण्यासाठी तसेच त्याने दार उघडावे यासाठी मुक्ताईने ताटीचेे अभंग रचले. तिने रचलेले  हे ताटीचे अभंग ऐकल्यानंतर ते आपल्या हृदयाचा ठाव घेतात असे आपणास जाणवते. तिने एकेका अभंगात  पांडुरंग साकार  केला आहे. तिच्या अभंगाचा शेवटी ज्ञानेश्वरांवरही परिणाम झाला. तिची विनंती ऐकून ज्ञानदेव गहिवरले; त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांनी दार उघडले. असा हा भाग्यवंत भाऊ ज्ञानेश्वर होय आणि त्याची बहीण मुक्ताई होय असे बहिणाबाई म्हणतात.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024