लेखक परिचय :
प्रा. कृष्णाजी बलवंत निकुम्ब (1920-1999) हे बेळगाव येथील लिंगराज कॉलेजात मराठीचेे प्राध्यापक होते. मूळचे नाशिकचे. शालेय व कॉलेज शिक्षण नाशिक येथे झाले. त्यांचा ‘उज्ज्वला’ हा पहिला कवितासंग्रह 1945 साली प्रसिद्ध झाला. त्यांच्या प्रतिमेला शांततेचे वातावरण, सृष्टीचे रम्य, उदास, शांत असे स्वरूप मानवते. ‘उर्मिला’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह, आधुनिक काव्यरचनेचे भावगीत, सुनीत, कणिका, मुक्तछंद, गझल, ओवी वगैरे काव्यप्रकार त्यांच्या या संग्रहात आढळून येतात. त्यांची काव्यरचना निर्दोष व शब्दरचना अभिप्रेत अर्थाची अभिव्यक्ती करणारी अशीच असते. मानवतेच्या कल्याणाची त्यांची तळमळ त्यांच्या कवितेत व्यक्त झालेली आहे. ‘उज्ज्वला’, ‘उर्मिला’, ‘अनुबंध’, ‘अभ्र’, ‘पंखपल्लवी’, ‘सायसाखर’ हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत.
मूल्य : कुतूहल
साहित्य प्रकार : प्रवास वर्णन
संदर्भ ग्रंथ : लाटा आणि लहरी
मध्यवर्ती कल्पना : या पाठात विजापूरच्या प्रेक्षणीय स्थळांचे व तेथील शिल्प सौंदर्याच वर्णन केले आहे.
स्वाध्याय
प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. गुलाब म्हणताच कोणत्या रंगाचे फूल डोळ्यासमोर उभे रहाते?उत्तर : गुलाब म्हणताच गुलाबी रंगाचे फूल डोळ्यासमोर उभे रहाते.
2. उत्तरेतून दक्षिणेत जाताना कर्नाटकात प्रथम .......... या जिल्ह्यात उतरतो.
उत्तर : उत्तरेतून दक्षिणेत जाताना कर्नाटकात प्रथम विजापूर जिल्ह्यात उतरतो.
3. विजापूरची जुम्मा मशीद कोणाच्या कारकिर्दीत बांधली गेली?
उत्तर : विजापूरची जुम्मा मशीद पहिला अली आदिलशहाच्या कारकिर्दीत बांधली गेली.
4. इब्राहिम रोजा ही इमारत कशाने नटली आहे?
उत्तर : इब्राहिम रोजा ही इमारत कोरीव कामाने नटली आहे.
5. महंमद आदिलशहाने गोलघुमट कशासाठी बांधविला?
उत्तर : स्वत:च्या चिरनिद्रेसाठी महंमद आदिलशहाने गोलघुमट बांधविला.
6. गोलघुमट कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर : गोलघुमट प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे.
7. मेहेतर महल म्हणजे काय?
उत्तर : मेहेतर महल हे लहानशा मशिदीच्या भोवती असणाèया एका बागेचे शोभिवंत प्रवेशद्वार आहे.
प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन ओळीत लिहा.
1. तऱ्हेतऱ्हेचेगुलाब मानवाच्या बागेत कसे डोलू लागले?उत्तर : गुलाब म्हटल्यावर आपल्याला जाणवतो तो त्याचा मोहक गुलाबी रंग, पण माणसाचे केवळ एकाच गुलाबी रंगावर समाधान झाले नाही. त्याने कलमे केली. नाना प्रकारचे प्रयोग केले आणि मग तèहेतèहेचे गुलाब त्याच्या बागेत डोलू लागले. पांढरा गुलाब, पिवळा गुलाब, मोतिया रंगापासून तो लालबुंद रंगापर्यंतच्या आणि फिक्या पिवळ्यापासून तो धुंद केसरीपर्यंतच्या शेकडो छटांचे गुलाब माणसाने तयार केले.
2. सौंदर्य निर्माण करणाèया कला कोणत्या आहेत?
उत्तर : सौंदर्य माणसाला आवडते पण तेच सौंदर्य तèहांतèहांनी वेगवेगळेपणाने अनुभवण्यात त्याला विशेष आनंद होतो. सौंदर्याच्या विविधतेतला आनंद वेगळाच असतो. चित्रकला, संगीतकला, शिल्पकला या सौंदर्य निर्माण करणाèया कला आहेत.
3. विजापुरात कोणत्या गोष्टीची रेलचेल करून ठेवली आहे?
उत्तर : एकेकाळी आदिलशाहीची राजधानी असलेल्या विजापुरात या आदिलशाही राजांनी तट आणि बुरूज, राजवाडे आणि महाल, मशिदी आणि मनोरे, थडगी, तळी, किल्ले यांची रेलचेल करून ठेवली आहे. काळाच्या प्रवाहात कित्येकांची पडझड झाली असली तरी विजापूर हे अव्वल दर्जांच्या शिल्पांचे आणि इमारतीचे शहर आहे.
4. इब्राहिम रोजाबद्दल जाणकार मंडळी काय म्हणतात?
उत्तर : इब्राहिम रोजाबद्दल जाणकार मंडळी म्हणतात की, आग्य्राचा प्रसिद्ध ताजमहाल बांधणाèया कारागिरांनी ताजचा आराखडा तयार करताना, इतर इमारतीबरोबर इब्राहिम रोजाही नक्कीच विचारात घेतला असावा. या इमारतीच्या कलात्मक सौंदर्याचा हा मोठाच गौरव होय.
5. गोलघुमटात कोणता चमत्कार घडतो?
उत्तर : गोलघुमट प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. तेथे शब्द उच्चारायचा अवकाश लागोपाठ त्याचे पडसाद उमटू लागतात. या सज्जातल्या भिंतीकडे तोंड करून पुसट आवाजात बोलावे. बरोबर समोर सज्जात उभ्या असलेल्या व्यक्तीला ते तंतोतंत ऐकू येते. मधले अंतर आहे एकशे चोवीस फुटांचे.
प्र. 3. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी पाच ते सहा ओळीत लिहा.
1. गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचे वर्णन करा.उत्तर : गुलाब म्हटले की आपल्या डोळ्यासमोर गुलाबी रंगाचे फूल उभे राहते. गुलाब म्हटल्यावर आपल्याला जाणवतो तो त्याचा मोहक गुलाबी रंग, पण माणसाचे केवळ एकाच गुलाबी रंगावर समाधान झाले नाही. त्याने कलमे केली. नाना प्रकारचे प्रयोग केले आणि मग तèहेतèहेचे गुलाब त्याच्या बागेत डोलू लागले. पांढरा गुलाब, पिवळा गुलाब, मोतिया रंगापासून तो लालबुंद रंगापर्यंतच्या आणि फिक्या पिवळ्यापासून तो धुंद केसरीपर्यंतच्या शेकडो छटांचे गुलाब माणसाने तयार केले. फुलांच्या एखाद्या प्रदर्शनात तर तपकिरी, गडद जांभळ्या रंगांचे गुलाबही आढळतात. सहज पाहण्यात येत नसला तरी हिरवा गुलाबही असतो.
2. जुम्मा मशिदीबद्दल माहिती लिहा.
जुम्मा मशीद |
3. गोलघुमटाच्या भव्यतेची माहिती लिहा.
उत्तर : गोलघुमट हा महंमद आदिलशहाने स्वत:च्या चिरनिद्रेसाठी बांधला आहे. ही इमारत अतिशय विस्तृत आणि ठसठशीत आहे. या चौकोनी इमारतीची प्रत्येक बाजू दोनशे पाच फूट आहे. तिच्या चारही कोनांना सात मजली, अष्टकोनी मनोरे इमारतीला अगदी चिकटून बांधलेले आहेत. इमारतीची उंची तिचा भव्य घुमट आणि तिची प्रमाणबद्धता दुरूनही नजरेत भरते. खाली एकच एक चौकोनी दालन आहे. बाजूच्या मनोèयातून वर-खाली जा-ये करण्यासाठी वाटोळे जिने आहेत.
गोलघुमट प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. तेथे शब्द उच्चारायचा अवकाश लागोपाठ त्याचे पडसाद उमटू लागतात. या सज्जातल्या भिंतीकडे तोंड करून पुसट आवाजात बोलावे. बरोबर समोर सज्जात उभ्या असलेल्या व्यक्तीला ते तंतोतंत ऐकू येते. हे मधले अंतर एकशे चोवीस फुटांचे आहे. खालच्या भव्य पोकळीत पहावे तर दृष्टी फिरते वरच्या भव्य घुमटाकडे पाहावे तर घाबरल्यासारखे होते. हा प्रतिध्वनींचा चमत्कार आहेच शिवाय साधेपणा, ठसठशीतपणा, भव्यपणा यांच्या कमालीच्या सुसंगतीमुळे तो शिल्परचनेतलाही एक चमत्कारच होऊन बसला आहे.
प्र. 4. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1. विजापूर शहर हे ....................... शिल्पशैलीचे केंद्र आहे.2. जुम्मा मशिदीत एकाच वेळी ................ माणसांना नमाज पडता येतो.
3. टुमदारपणा आणि बारकाईची कलाकारगिरी ही ................... आकर्षण होत.
4. फुलांच्या एखाद्या प्रदर्शनात तर तपकिरी गडद जांभळ्या रंगाचे .............. आढळतात.
उत्तरे : 1. मुस्लीम 2. अडीच हजार 3. इब्राहिम रोजाची 4. गुलाबही
प्र. 5. जोड्या जुळवा
अ ब1. इब्राहिम रोजा अ) प्रतिध्वनी चमत्कार
2. गोलघुमट ब) अली आदिलशहा
3. मेहेतर महल क) ठायीठायी कोरीवकाम
4. जुम्मा मशीद ड) आदिलशहाची राजधानी
5. विजापूर ई) शोभिवंत प्रवेशद्वार
उत्तर : अ ब
1. इब्राहिम रोजा अ) ठायीठायी कोरीवकाम
2. गोलघुमट ब) प्रतिध्वनी चमत्कार
3. मेहेतर महल क) शोभिवंत प्रवेशद्वार
4. जुम्मा मशीद ड) अली आदिलशहा
5. विजापूर ई) आदिलशहाची राजधानी
इब्राहिम रोजा |
मेहेतर महल |
Tq
ReplyDelete