Monday, July 26, 2021

भारताचे गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय इ.

 

भारताचे गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय 

अ. क्र.

छायाचित्र

नाव  (जन्म मृत्यु)   कार्यकाल

महत्त्वाच्या घटना

बंगालचे गव्हर्नर  (1756 -1774)

1


 


रॉबर्ट क्लाईव्ह

जन्म : 1725

मृत्यु : 1774

 

कार्यकाल :

1757 -1760 व  1765 ते 1767

·   भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला. 

·   प्लासीचे युद्ध :- जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.

·   बक्सारची लढाई :- बंगालचा नवाब मीरकासीम, अयोध्येचा  नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सार येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.

·   अलाहाबादचा तह :- बक्सारच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.

2

 



वॉरेन हेस्टिंग्ज

जन्म : 1732

मृत्यु : 1818

 

कार्यकाल :

 1772-1774

·   सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली.

·   भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले.

·   बंगालमध्ये दुहेरी राज्यपद्धती थांबवली (जी रॉबर्ट क्लाईव्हने सुरू केली होती.)

·   1773 चा रेग्युलेटिंग अॅक्ट

गव्हर्नर जनरल  (1773  -1833)

1

 



वॉरेन हेस्टिंग्ज

जन्म : 1732

मृत्यु : 1818

 

कार्यकाल :

1774-1785

 

·   जेम्स ऑगस्टस हिकीचे बंगाल गॅझेट पहिले भारतीय वृतपत्र प्रसिद्ध (१७८०)

·   पहिले अँग्लो- मराठा युद्ध (1775-1782) (सूरत, पुरंदर, वडगाव, साल्बाई असे तह झाले.

·   दुसरे अँग्लो – मैसूर युद्ध (1780 ते 1784) (मंगळूरचा तह )

·   कलकत्ता येथे मदरसाची स्थापना (1781)

·   पिटस इंडिया अॅक्ट (1784)

·   फोर्ट विल्यम येथे सर्वोच्च न्यायालयची स्थापना झाली  (१७७४)

2

 



लॉर्ड चार्ल्स कॉर्नवॉलीस

जन्म : 1738

मृत्यु : 1805

 

कार्यकाल :

1786-1793

·   लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.

·   कॉर्नवॉलिस कोडची सुरुवात (खटला चालविण्यासाठी वकिलांची गरज असेल)

·   कनिष्ठ न्यायालय आणि अपील न्यायालयाची स्थापना केली

·   कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली. (इ.स. १७९३)

·   तिसरे अँग्लो -म्हेसुर युद्ध (१७९० ते १७९३)

·   भारतामध्ये नागरी सेवेला सुरूवात.  स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली.

·   पोलिस विषयक सुधारणा घडवून आणल्या. भारतीय पोलिस व्यवस्थेचे जनक म्हणतात.

3

 



लॉर्ड रिचर्ड वेलस्ली

जन्म : 1760

मृत्यु : 1842

 

कार्यकाल :

1798 – 1805

·  सहाय्यक सैन्य पद्धतीचा (तैनाती फौज) जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.

·  तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.

·  सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्वीकार केला.

·  चौथे अंग्लो म्हैसूर युद्ध (इ.स. १७९९) टिपूचा मृत्यु

·  दुसरे अंग्लो मराठा युद्ध (१८०३–०५)

·  फोर्ट विल्यम कॉलेज कलकत्ता येथे स्थापन.

·  मद्रास प्रेसिडेंन्सीची स्थापना(निर्मिती) १८०१

4



लॉर्ड मिंटो

जन्म : 1751

मृत्यु : 1814

कार्यकाल :

 1807 ते 1813 

·   महाराज रणजित सिंग सोबत १८०९ मध्ये अमृतसरचा तह केला

·   १८१३ चा चार्टर ॲक्ट

5

 

 


लॉर्ड हेस्टिंग्ज

जन्म : 1754

मृत्यु : 1826

 

कार्यकाल :

1813 – 1823

·   अहस्तांतरणीय धोरण बंद केले

·   तिसरे अँग्लो - मराठा युद्ध (१८१६-१८१८) पेशवाई समाप्त.

·   १८१७ मध्ये कलकत्ता येथे हिंदू कॉलेज स्थापन (आताचे प्रेसिडेन्सी विद्यापीठ)

·   मुंबई(बॉम्बे) प्रेसिडेंन्सीची निर्मिती (१८१८)

·   मद्रास प्रांतात रयतवारीला सुरूवात (1820)

·   महालवारी पद्धत मध्य भारत, पंजाब, आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सुरूवात

6

 



लॉर्ड विल्यम बेंटिक

जन्म : 1774

मृत्यु : 1839

 

कार्यकाल :

1828 -1833

·   सती बंदी कायदा बंगाल प्रांतात पास केला. (1829)

·   मुलकी व फौजदारी न्यायालयाची स्थापना (अलाहाबाद)

भारताचे गव्हर्नर जनरल  (1833-1858)

तिसर्‍या चार्टर अॅक्टनुसार (1833) बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरलचा दर्जा देण्यात आला.

1

 


लॉर्ड विल्यम बेंटिक

जन्म : 1774

मृत्यु : 1839

 

कार्यकाल :

1833 - 1835

·   भारताचे पहिले गव्हर्नर जनरल

·   चार्टर ॲक्ट, इ.स. १८३३

·   इंग्रजी शिक्षण कायदा इ.स. १८३५ ( भारतीयांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.)

·   कलकत्ता  वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय

2

 


लॉर्ड हेन्री हार्डिंग 

जन्म : 1785

मृत्यु : 1856

 

कार्यकाल :

1844 – 1848

·   पहिले अँग्लो - शिख युद्ध (१८४५–४६)

·   दुसरे ॲंग्लो - शिख युद्ध  (१८४८–४९)

·   लाहोर करार समझोता (1846)

·   सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी सुरू केली.

3

 



लॉर्ड डलहौसी

जन्म : 1812

मृत्यु : 1860

 

कार्यकाल :

1848 -1856

·   भारतातील आधुनिक सुधारणेचा जनक असे म्हणतात.

·   1848 -1849 दुसरे इंग्रज व शीख युद्ध

·   मुंबई ठाणे पहिली रेल्वे धावली (१८५३)

·   चार्लस वूडचा खलीता (१८५४)

·   भारतीय टपाल व तार खात्याची स्थापना केली. (1854)

·   हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा इ.स. (१८५६)

·   सार्वजनिक बांधकाम विभाग (१८५४)

·   दत्तक वारस नामंजूर कायदा (खालसा धोरण) 

·   पोस्टल तिकीटांची सुरुवात

·   भारताचे चलन रुपया म्हणून सुरुवात.   

4

 

लॉर्ड व्हिस्काउंट कॅनिंग

जन्म : 1812

मृत्यु : 1862

 

कार्यकाल :

1856 – 1858

·   विधवा पुनर्विवाह कायदा (1856)

·   भारतीय स्वातंत्र्य चळवळ उठाव

·   कलकत्ता (कोलकाता) , मुंबई, व मद्रास(चेन्नई)   येथे विद्यापीठे स्थापन. (1857)  

भारताचे व्हाईसरॉय  (1858- 1947 )

5

 


लॉर्ड व्हिस्काउंट कॅनिंग

जन्म : 1812

मृत्यु : 1862

 

कार्यकाल :

1858 – 1862

·  भारताचा पहिला व्हाईसरॉय 

·  भारत सरकारचा कायदा(गवर्नमेंट ऑफ इंडिया ॲंक्ट), १८५८ (राणीचा जाहीरनामा)

·  इंडियन पिनल कोड लागू  (1860)

·  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण स्थापना (१८६१)

  

6

 

लॉर्ड मेयो

जन्म : 1822

मृत्यु : 1872

 

कार्यकाल :

1869 – 1872

·  स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना.

·  भारतीय जनगणना सुरू  (१८72)

 

7

 



लॉर्ड लिटन

जन्म : 1831

मृत्यु : 1819

 

कार्यकाल :

1876 -1880

·  पहिला दिल्ली  दरबार भरवून राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी किंवाकैसर-ए-हिंद‘ हा किताब दिला. (1877)

·   व्हर्नाक्यूलर प्रेस अॅक्ट (देशी वृत्तपत्र कायदा) पास करून देशी वृत्तपत्रावर अनेक बंधने लादली. (मार्च 1878)

·  भारतीय शस्त्र कायदा (1878)

·  1879 मध्ये लॉर्ड लिटनने स्टॅट्युटरी सिव्हील अॅक्ट पास करून सनदी सेवेचे वय 21 वर्षावरून 18 वर्षावर आणले.

·  अलिगड मुस्लिम विद्यापीठास प्रोत्साहन दिले.

8

 



लॉर्ड रिपन

जन्म : 1827

मृत्यु : 1909

 

कार्यकाल :

1880 – 1884

·  इंग्लंडप्रमाणे भारतात ‘फॅक्टरी अॅक्ट पास केला. (1881)

·  व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट रद्द केला (१८८२)  लॉर्ड लिटनने केलेला देशीवृत्तपत्रबंदी कायदा रद्द करून मुद्रण स्वातंत्र्य दिले.

·  सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली ‘हंटर शिक्षण आयोग’ नेमला. (1882)

·  लॉर्ड रिपनने 18 मे 1882 रोजी प्रत्येक प्रांतात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी एक ठराव पास केला. त्यामुळे त्यास ‘स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते.

·  इल्बर्ट  बिल पास (1833)

9

 



लॉर्ड कर्झन

जन्म : 1859

मृत्यु : 1925

 

कार्यकाल :

1899 -1904 व 1904 ते 1905

·  सर अ‍ॅन्ड्र्यू फ्रेझर अंतर्गत पोलिस आयोगाची नेमणूक

·  दुसरा दिल्ली दरबार भरविला. (1903)

·  रेल्वे बोर्डाची स्थापना (1903)

·  भारतीय विद्यापीठ कायदा पारित केला. (1904)

·  प्राचीन स्मारक संरक्षण कायदा (1904)

·  बंगालची फाळणी (1905)

·  लाल, बाल, पाल  यांनी फाळणीच्या विरोधात दुसरे स्वदेशी  आंदोलन केले. (1905 ते 1911)

10

 


लॉर्ड मिंटो

जन्म : 1845

मृत्यु : 1914

 

कार्यकाल :

1905 - 1910

·  मुस्लिम लीगची स्थापना (1906)

·  १९०७ मध्ये काँग्रेसमध्ये फुट (सूरत)

·  वृत्तपत्र अधिनियम (1908)

·  मोर्ले मिंटो सुधारणा (1909)

11

 


लॉर्ड हार्डिंग

जन्म : 1858

मृत्यु : 1944

 

कार्यकाल :

1910-1916

·  तिसरा दिल्ली दरबार भरविला. (1911)

·  राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांचा राज्याभिषेक

·  राजधानी कलकत्तावरून दिल्लीला हलवली.

·  बंगालची फाळणी रद्द (1911)

 

12

 



लॉर्ड चेम्सफोर्ड

जन्म : 1868

मृत्यु : 1933

 

कार्यकाल :

1916 – 1921

·  इंडियन होमरूल लीग चळवळ (1916)

·  लखनौ करार  (1916)

·  मॉन्टेंग्यु – चेम्सफोर्ड सुधारणा कायदा (1919)

·  भारत सरकार कायदा (1919)

·  रौलेट अॅक्ट (1919)

·  असहकार व खिलाफत चळवळ (1919)

·  जालियानवाला बाग हत्याकांड  (13 एप्रिल 1919)

13

 


लॉर्ड रीडिंग

जन्म : 1860

मृत्यु : 1935

 

कार्यकाल :

1921 -1926

·                       असहकार   चळवळ (1921-1922)

·                       चौरीचौरा घटना (1922)

14

 



लॉर्ड आयर्विन

जन्म : 1881

मृत्यु : 1959

 

कार्यकाल :

1926 – 1931

·   सायमन कमिशन (1928)

·   नेहरू अहवाल (1928)

·   लाला लजपत राय यांचा मृत्यु (1928)

·   लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्य घोषणा (1930)

·   मिठाचा सत्याग्रह  (1930)

·   सविनय कायदेभंग चळवळ (1930)

·   प्रथम गोलमेज परिषद (1930-31)

·   गांधी – आयर्विन करार (1931)

15

 


लॉर्ड वेलिंग्टन

जन्म : 1866

मृत्यु : 1941

 

कार्यकाल :

1931– 1934

·                      दुसरी  गोलमेज परिषद (1931)

·                         पुणे करार (1932)

·   कॉंग्रेस समाजवादी पक्ष स्थापन. जयप्रकाश नारायण व आचार्य नरेंद्र देव यांच्याकडून  (1934)

16

 


लॉर्ड लिनलिथगो

जन्म : 1887

मृत्यु : 1952

 

कार्यकाल :

1934 -1937 व

1938 -1943

 

·                     भारत सरकारचा कायदा (1935)

·                      भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना (1935)

·                     लाहोर ठराव (1940)

·                     क्रिप्स मिशन (1942)

·                    चलेजाव चळवळीची घोषणा (1942)

17

 


लॉर्ड माऊंटबॅटन

जन्म : 1900

मृत्यु : 1979

 

कार्यकाल :

  21 फेब्रूवारी 1947 ते 15 ऑगस्ट 1947

·   माऊंटबॅटन  योजनेची घोषणा (3 जून 1947)  (भारत व पाकिस्तान नवीन राष्ट्रांची निर्मिती केली जाईल)

·                   भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यास संमती (18 जुलै 1947)

·                   भारतास स्वातंत्र्य (15 ऑगस्ट 1947)

·                     भारताचे शेवटचे व्हाईसरॉय .

स्वातंत्र्योत्तर भारताचे गव्हर्नर जनरल  (1947-1950)

1

 


लॉर्ड माऊंटबॅटन

जन्म : 1900

मृत्यु : 1979 

कार्यकाल :

15 ऑगस्ट 1947 ते 21 जून 1948

·  भारताचे शेवटचे व्हाईसरॉय  व स्वतंत्र भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल 

2

 


चक्रवर्ती राजगोपालचारी

जन्म : 1878

मृत्यु : 1972

 

कार्यकाल :

1948 -1950

·  स्वतंत्र भारताचे  दुसरे गव्हर्नर जनरल 

·  स्वतंत्र भारताचे  पहिले तसेच  शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल   


RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...