Monday, June 10, 2019

सनावळी


1453 ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकले.
1498 पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकतला आला.
1600 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना.
1602 युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची नेदरलँडमध्ये स्थापना. (डच)
1619 सम्राट जहांगीरकडून ईस्ट इंडिया कंपनीला सूरत आणि हुगळीत  व्यापारासाठी परवानगी.
1639 मद्रास येथे इंग्रजांनी पहिली व्यापारी वखार स्थापन केली.
1664 फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची फ्रान्समध्ये स्थापना.
1737 इंग्रजांचे दक्षिण कन्नड प्रदेशाशी संबंध सुरू.
1742 फ्रेंच गव्हर्नर म्हणून डुप्लेची नेमणूक
1746-48          पहिले कर्नाटक युद्ध
1749-54          दुसरे कर्नाटक युद्ध
1756 बंगालमधील कृष्णरंध्र शोकांतिका.
1757 प्लासीची लढाई (रॉबर्ट क्लाईव्ह वि. सिराजउद्दौला)
1758-63         तिसरे कर्नाटक युद्ध
1760 पाँडेचेरीजवळ वाँदिवॉशची  लढाई (फ्रेंच वि. इंग्रज)
1761 नंजराजय्याला दूर सारून हैदर अलीने म्हैसूर ताब्यात घेतले.
1763 हैदर अलीने बिदनूरवर हल्ला करून मंगळूर ताब्यात घेतले.
1764 बक्सारची लढाई
1767 मराठे, हैद्राबादचा निजाम व इंग्रजांचे म्हैसूरवर आक्रमण.
1769 इंग्रजांशी लढत हैदर अली मद्रासपर्यंत पोहोचला.
1771 मराठ्यांनी म्हैसूरवर हल्ला केला.
1773 रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट
1776 अमेरिकेचे  स्वातंत्र्य युद्ध
1778 लॉर्ड लिटनने भारतीय वृत्तपत्रांवर ताबा ठेवण्यासाठी स्थानिक वृत्तपत्र अधिकार  कायदा केला
1780 मुंबईच्या सेनापतीने कुंदापूर ताब्यात घेतले.
1780 जेम्स ऑगस्ट हिकीने ‘दि बंगाल गॅझेट’ हे वर्तमानपत्र सुरू केले.
1781 सर आयरे कूटने हैदर अलीला पराभूत केले.
1782 जेम्स ऑगस्ट हिकी विरुद्ध मानहानीचा गुन्हा नोंदवून वॉरन हेस्टिंग्जने  त्याला कैदेत पाठविले.
1783 इंगजांशी झालेल्या लढाईत टिपूने होन्नावर गमावले.
1784 पिट्स इंडिया अ‍ॅक्ट
1789 फ्रेंच राज्यक्रांती
1790 तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध सुरू.
1792 श्रीरंगपट्टणचा तह.
1798 लॉर्ड वेलस्लीने म्हैसूरवर तैनाती फौज लादण्याचा प्रयत्न केला.
1799 श्रीरंगपट्टणला इंग्रज सैन्याने घेरले. टिपू सुलतानचा मृत्यू.
1811 पर्यंत राणी देवम्माने कोडगु सांभाळले.
1818 बंगाली भाषेत दिग्दर्शन हे मासिक आणि समाचार दर्पण हे साप्ताहिक सुरू
1820 कोडगुचा राजा लिंगराजचा मृत्यू. शेवटचा राजा चिक्कवीर सिंहासनावर  बसला.
1827 कलकत्ता येथे कामगार चळवळ सुरू झाली.
1836 स्वामी अपरांपर यांना अटक.
1836 बेळगाव... धारवाडपासून वेगळे करण्यात आले.
1837 कल्याणस्वामींना फाशी देण्यात आली.
1837 सुळ्याचे शेतकèयांचे सैन्य मंगळूरला पोहोचले.
1840 शेरामपूर (प.बंगाल) येथे हुगळी नदीच्या काठी पहिला कागद उद्योग  सुरू.
1853 चार्टर अ‍ॅक्टद्वारे सरकारी सेवेत भरती करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा सुरू करण्यात आल्या.
1853 मुंबई ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे सुरू.
1854 मुंबईत भारतातील पहिला कापड कारखाना सुरू.
1857 भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध
1857-58         नरगुंदचा उठाव
1858 व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा (भारताचा मॅग्ना चार्टा)
1858 ब्रिटिश सरकारकडून राणीचा सर्वाधिकार घोषित.
1860 बंगालमधील शेतकèयांच्या नीळ चळवळीला ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या  सोमप्रकाश  वृत्तपत्राने                            पाठिंबा दिला.
1861 उत्तर कन्नडचा प्रदेश मुंबई प्रांतात समाविष्ट.
1861 इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
1861 टाइम्स ऑफ इंडिया (मुंबई) वृत्तपत्र सुरू
1862 कुंदापूरच्या उत्तरेकडील प्रदेश मुंबई प्रांतात समाविष्ट.
1865 द पायोनियर (अलाहाबाद) वृत्तपत्र सुरू
1867 बळी (कलकत्ता-बंगाल) येथे मशिनवर पहिल्यांदा कागद तयार करण्यात  आला.
1870 कुल्ली (बंगाल) येथे बेंगाल आयर्न कंपनी लिमिटेडतर्फे पहिला पोलाद  कारखाना  स्थापन.
1872 भारतात पहिली जनगणती झाली.
1875 द मद्रास मेल (मद्रास) ) वृत्तपत्र सुरू
1875 द स्टेटसमन (कलकत्ता) वृत्तपत्र सुरू
1876 द सिव्हील आणि मिलिटरी गॅझेट (लाहोर)वृत्तपत्र सुरू
1885 अ‍ॅलन ऑक्टेव्हियन ह्यूमनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली.
1886 अ‍ॅल्युमिनियमचा शोध लागला.
1893 शिकागो सर्वधर्म संमेलनात स्वामी विवेकानंदांचे भाषण
1905 लॉर्ड कर्झनकडून बंगालची फाळणी त्याला जहालांचा विरोध.
1905 जपानने रशियाला हरविले.
1906 मोहम्मद अली जीनांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश.
1907 जमशेदपूर जवळ टाटा आयर्न अँड स्टील कंपनीतर्फे पोलाद कारखाना स्थापन
1909 मिंटो-मोर्ले सुधारणा अ‍ॅक्ट
1911 बंगालची फाळणी रद्द.
1911 सन एत सेन (क्योमिंग्टन पक्ष) नेतृत्वाखाली चीनच्या सम्राटाविरोधात  क्रांती
1911 अप्पिको चळवळ सुरू (सल्यानी जि. उत्तर कन्नड)
1914 जुलै          पहिले महायुद्ध सुरू (28 जुलै )
1914 जुलै         आस्ट्रियाचा युवराज आर्च ड्यूक फ्रान्झ फर्डिनँड याची हत्या झाली.
1916 भारतात होमरूल चळवळीचा प्रारंभ
1917 अ‍ॅनी बेझंट काँगे्रस अधिवेशनाच्या अध्यक्ष झाल्या.
1917 फेब्रु. रशियात राज्यक्रांती (फेब्रुवारी क्रांती) झाली.
1917 ऑक्टो. बोलशेविक्सच्या नेतृत्वाखाली रशियात क्रांती झाली.
1917 नोव्हें. रशियात समाजवादी क्रांती झाली.
1917 नोव्हें. लेनिनने रशियाला समाजसत्तावादी प्रजासत्ताक घोषित केले. (7 नोव्हेंबर)
1918 नोव्हें. पहिले महायुद्ध संपले (11 नोव्हेंबर)
1919 माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा अ‍ॅक्ट
1919 रौलट अ‍ॅक्ट
1919           जनरल डायरकडून जालियानवाला बाग हत्याकांड (13 एप्रिल 1919)
1919          कायद्यानुसार भारतीयांना निवडणूक लढविण्याची संधी दिली गेली.
1919 मित्रराष्ट्रांच्या व्हर्सेलिन (व्हर्साय) तहावर सह्या.
1919 राष्ट्रसंघाची (लीग ऑफ नेशन्स) स्थापना.
1919 बर्नपूर (बंगाल) येथे दि इंडियन आयर्न अँड स्टील कंपनीतर्फे पोलाद  कारखाना स्थापन.
1920-47         गांधीयुग
1920 महात्मा गांधींकडून असहकार चळवळीचा प्रारंभ.
1922 चौरीचौरा  (उ.प्र) येथे जमावाने 22 पोलिसांना जिवंत जाळले.
1922 मोतीलाल नेहरू व सी.आर. दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
1922-43         मुसोलिनी हा इटलीचा पंतप्रधान होता.
1923 भद्रावती (कर्नाटक) येथे म्हैसूर आयर्न अँड स्टील कंपनी सुरू.
1924 म. गांधीजींची अनारोग्यामुळे कारावासातून मुक्तता.
1924 कलकत्ता नगरपालिका निवडणुकीत स्वराज्य पक्षाची सरशी.
1924 बेळगाव येथे महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन.
1924 बेळगाव अधिवेशनात स्वराज्य पार्टीचा काँग्रेसमध्ये प्रवेश.
1924 रशियाच्या व्ही.आय. लेनिनचा मृत्यू.
1925 इटलीच्या मुसोलिनीने लोकशाही विसर्जित करून कायदेशीररित्या  हुकूमशाही अवलंबिली.
1925 चीनमध्ये साम्यवादी पक्षाचा उदय.
1926 ट्रेड युनियन अ‍ॅक्ट अंमलात आला.
1926 राष्ट्रकुल संघटना (कॉमनवेल्थ नेशन्स) स्थापन
1927 मे          जॉन सायमनच्या अध्यक्षतेखाली ‘सायमन कमिशनची’ स्थापना.
1929 लाहोर काँग्रेस अधिवेशन (अध्यक्ष : जवाहरलाल नेहरू)
1929 अमेरिकेतील आर्थिक विकास मंदावला.
1929 सोविएत रशियाने आर्थिक योजना सुरू केली
1930 रावी नदीच्या काठी जवाहरलाल नेहरूंनी भारतीय तिरंगा फडकविला.   (1 जानेवारी 1930)
1930 जाने. काँग्रेसकडून संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन साजरा. (26 जानेवारी 1930)
1930 सविनय कायदेभंग चळवळ
1930 दांडी यात्रा (साबरमती ते दांडीपर्यंत)
1930 सुभाष चंद्र बोस यांनी विदेशी भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास सज्ज  केले.
1930 पहिली गोलमेज परिषद
1930 युरोप आणि अमेरिकेत आर्थिक मंदी.
1931 गांधी-आयर्विन करार
1931 दुसरी गोलमेज परिषद
1932 तिसरी गोलमेज परिषद
1934 जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांच्याकडून काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना.
1934 विश्वेश्वरय्यांच्या भारताला योजित अर्थव्यवस्था पुस्तकाचे प्रकाशन. 
1934 ऑक्टो. चीनमध्ये माओ त्से तुंगद्वारा दि लाँग मार्चचे आयोजन.
1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट
1935 भारतीय सरकार कायद्याची स्थापना
1935 हिटलरने न्युरेनबर्ग लॉज नावाचे स्वत:चे कायदे बनविले.
1935 ऑक्टो. लाँग मार्चची सांगता.
1937 निवडणुकीनंतर सरकारमध्ये समाविष्ट होण्यासाठी मुस्लीम लीगला बोलाविले नाही.
1937 निवडणुकीनंतर काँग्रेस-मुस्लीम लीग संमिश्र सरकार स्थापण्यात अयशस्वी.
1938 त्रिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झाले.
1939 ऑग. रशियाने जर्मनीबरोबर युद्धबंदीचा करार केला. Ÿ(24 ऑगस्ट)
1939 दुसरे महायुद्ध सुरू
1939 सप्टें.         पोलंडच्या विरोधात दुसरे महायुद्ध सुरू. (1 सप्टेंबर)
1940 मुस्लीम लीगच्या लाहोर अधिवेशनात मोहम्मद अली जीनांकडून देशाच्या अखंडत्वाविरोधात                              घोषणा.
1941 हिटलरचा रशियावर हल्ला
1942 छोडो भारत (चले जाव) चळवळ (9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू)
1942 ईसूर घटना (म्हैसूर संस्थानातील शिकारीपूरजवळ)
1942 स्टॅलीनग्राड युद्धात रशियाने जर्मनीच्या तुकड्यांचा पराभव केला.
1943 पूर्व युरोपमध्ये जर्मनीला पराभवांच्या मालिकेला सामोरे जावे लागले.
1945 मुसोलिनीचा खून करण्यात आला.
1945 हिटलरने आत्महत्या केली.
1945 अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब  टाकला.
1945 जपानचा दुसèया महायुद्धात पराभव.
1945 ऑ.          रशियाकडून मांचुरियाची सुटका (15 ऑगस्ट)
1945 अन्न आणि कृषिविषयक संघटना स्थापन.
1945 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना.
1945 ऑक्टो. संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना (24 ऑक्टोबर)
1945 नंतर अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनले.
1945 नंतर अमेरिका व कम्युनिस्ट रशिया अशा दोन गटात जग विभागले गेले.
1946 मार्च         लॉर्ड माऊंटबॅटन भारताचा व्हाईसरॉय बनला
1946 मुस्लीम लीगने स्वतंत्र राष्ट्र स्थापण्यासाठी प्रत्यक्ष कृतिदिन साजरा केला  (16 ऑगस्ट)
1946 पंडित नेहरूनी रेडिओवरून भारताच्या परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली.
1946 संघटित राष्ट्रांची युद्धपातळीवरील शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. (युनेस्को)
1946 संघटित राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय बालकाचा आपत्कालीन निधी (युनिसेफ)
1947 जुलै          भारतीय स्वातंत्र्याचा मसुदा पास होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले.
1947 जून          लॉर्ड माऊंटबॅटनच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्रे उदयाला  आली (3 जून)
1947-48          भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध.
1947 भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे अस्तित्वात आली (15 ऑगस्ट)
1947 भारतात तात्पुरते सरकार स्थापन (15 ऑगस्ट)
1947 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यास प्रारंभ.
1947 आय.बी.आर.डी. (पुनर्बांधणी आणि विकास बँक)
1948 जाने. महात्मा गांधीजींची नथुराम गोडसेकडून हत्या (30 जानेवारी)
1948 हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन.
1948 डिसें. संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून मानवी हक्कांची घोषणा. (10 डिसेंबर)
1948 जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना.
1949 जाने. संयुक्त राष्ट्रसंघाकडून युद्धबंदीचा आदेश जारी.
1949 जुनागढ संस्थान भारतात विलीन.
1949 ऑक्टो. लोकमुक्ती सैन्याने पेकिंग (बीजिंग) शहरात प्रवेश केला. (1 ऑक्टोबर)
1949 दिल्लीत आशियायी संमेलन झाले
1949 चीनमध्ये कम्युनिस्ट राजवटीला सुरुवात.
1950 जाने. भारताची स्वतंत्र घटना अंमलात आली (26 जानेवारी)
1950 राष्ट्रीय योजना मंडळाची नेमणूक
1951 भारतात पहिली पंचवार्षिक योजना सुरू 
1952 भाषावार प्रांतरचनेसाठी पोट्टी श्रीरामलूचे उपोषण व प्राणत्याग. (52  दिवसानंतर)
1952 राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना
1953 आंध्र प्रदेश हे भाषावार प्रांतरचनेतील पहिले राज्य उदयास आले.
1953 फाजल अली आयोगाची रचना. (भाषावार प्रांतरचनेसाठी)
1954 पाँडिचेरी, माहे, करैकल, चंद्रनगर ही संस्थाने भारतात विलीन.
1954 भारत व चीन यांच्यात पंचशील करार झाला. (29 एप्रिल 1954)
1955 पोर्तुगीजाविरुद्ध गोवा मुक्ती आंदोलन सुरू
1955 बांडुंग येथेे आशियायी संमेलन झाले
1955 अस्पृश्यता विरोधी कायदा जारी
1955 दि एअर पोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना.
1956 राज्य पुनर्रचना कायदा संसदेकडून संमत.
1956 नोव्हें. म्हैसूर राज्याचे राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद यांनी उद्घाटन केले. (1 नोव्हेंबर)
1956    सुवेझ कालवा प्रकरणी कोंडी.
1956 भाषावार प्रांतरचना करण्यात आली.
1957 युनिसेफचे स्थान निश्चित.
1958 लीप फॉरवर्ड पॉलिसी चीनमध्ये राबविण्यात आली.
1960 जागतिक हरित क्रांती. (डॉ. नॉर्मन बोरलाग)
1960 भौगोलिक माहिती व्यवस्थेचा (जीआयएस) कॅनडामध्ये प्रारंभ
1961 गोवा स्वतंत्र झाला.
1961 बर्लिनमध्ये आणीबाणीचा प्रसंग.
1961 हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला.
1962 क्युबाचा पेचप्रसंग
1962 चीनचे भारतावर आक्रमण
1963 पाँडिचेरीला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले.
1963 अमेरिका व रशिया यांच्यात अनेक द्विपक्षीय करार.
1963 आफ्रिकन एकीकरणांची संघटना स्थापन. (ओ.ए.यू.)
1964 पंडित नेहरूंचे निधन
1965 भारत-पाकिस्तान युद्ध
1965 भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध
1965 युनिसेफला नोबेल पारितोषिक मिळाले.
1966 चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीची चळवळ सुरू.
1966 भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार.
1967 दक्षिणपूर्व आशियायी देशांची संघटना  (एसियन)
1967-70         भारतात हरित क्रांती  (डॉ. एम.एस. स्वामीनाथन)
1971 भारत-पाकिस्तान युद्ध
1971 भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध
1971 स्वतंत्र बांग्ला देशाची निर्मिती
1971 भारत व रशिया यांच्यात 20 वर्षाचा शांती, मैत्री व सहकार्याचा करार.
1973 चिपको चळवळ सुरू (तेहरी गढवाल, उत्तर प्रदेश)
1976 मूलभूत हक्क संरक्षण कायदा अस्तित्वात आला.
1976 समान वेतन कायदा लागू
1976 बॉम्बे हाय येथे तेल शोधून काढले.
1976 तेल व्यापारी उत्पादनाला सुरुवात.
1978 जिल्हा उद्योग केंद्र (डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रिज सेंटर्स) स्थापना.
1978 बायोकॉन लिमिटेड ही जैविक तंत्रज्ञान संस्था सुरू
1979 चीनमध्ये डेंग शिओपिंग सत्तेवर आला.
1980 भारतात जैविक तंत्रज्ञान विकासासाठी संस्थेची स्थापना.
1985     रशियात ग्लॉसनॉस्ट (मोकळेपणा) तत्त्वाचा गॉर्बाचेव्ह यांच्याकडून वापर.
1985 दक्षिण आशियायी देशांची प्रादेशिक सहकार संघटना(सार्क) स्थापन.  (8 डिसेंबर)
1985 डिसें. दक्षिणपूर्व आशियायी  (सार्क) स्थापन (8 डिसेंबर)
1986 कर्नाटक लोकायुक्त अधिनियम लागू करण्यात आला.
1986 सार्कचे संमेलन बेंगळूर (कर्नाटक) मध्ये झाले. 
1986 हुंडा प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून कायदा कडक करण्यात आला.
1986 बालमजूर प्रतिबंधक व नियंत्रण कायदा लागू
1987 केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला.
1987 रशियात पेरेस्त्रोईका (पुनर्रचना) तत्त्वाचा गॉर्बाचेव्ह यांच्याकडून वापर.
1987 बालमजूर पुनर्वसन व कल्याण निधी स्थापन.
1988 राष्ट्रीय शिक्षण अभियान (नॅशनल लिटरसी मिशन)
1988 राष्ट्रीय बाल मजूर योजना अमलात आली.
1989 रशियातील कम्युनिस्ट राजवट ढासळली.
1989 अस्पृश्यता निर्मूलनाची जबाबदारी राज्यांना देण्यात आली.
1989 राष्ट्रीय राजमार्ग महामंडळाची स्थापना.
1990 भारत सरकारने उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग अधिकृतरित्या सुरू केला.
1990 मानवी विकास सूचीची निर्मिती.
1991 भारतात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कची स्थापना.
1991 भारतात आर्थिक सुधारणांचा प्रारंभ (विदेशी थेट (सरळ) गुंतवणुकीला प्रारंभ).
1991 भारतात मुक्त हवाई धोरण सुरू. (ओपन स्काय पॉलिसी)
1992 युरोपियन समुदायाची स्थापना 
1993 भारतात पंचायत राज संस्था अस्तित्वात आली. (73 व्या कलमानुसार)
1994  प्रसूतीपूर्व गर्भ लिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा जारी.
1995 जागतिक व्यापार संघटना (1 जानेवारी) स्थापन.
1995 जागतिक व्यापार संस्था स्थापन. (1 जानेवारी) 
1999 भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध (कारगील युद्ध)
1999 सोनेरी चौपदरी योजनेचा प्रारंभ.
1999 इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेडची स्थापना.
2001 सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात.
2001 अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला.
2001 एकता कपूरला यशस्वी उद्योजिका म्हणून एर्नेस्ट यंग संस्थेकडून गौरविण्यात  आले.
2004 आंतरराष्ट्रीय तहानुसार वादळांना नावे देण्यात येऊ लागली. 
2006 बालमजुरी निर्मूलन आणि पुनर्वसन कायदा जारी.
2007 बॅन की मून (द.कोरिया) युनोचे सचिव झाले. 
2009 घटनेच्या कलम 21 नुसार शिक्षणाचा हक्क (आर.टी.ई) देण्यात आला.
2011 जनगणतीनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी झाली.
2011 शिरगणतीनुसार पुरुष साक्षरता प्रमाण 82.14 टक्के.
2011 शिरगणतीनुसार महिला साक्षरता प्रमाण 65.46 टक्के.
2015 संयुक्त राष्ट्रसंघाची मिलेनियम घोषणा (सक्तीचे प्राथमिक शिक्षक आणि  लिंग समानता)

Saturday, June 1, 2019

जग बदल घालुनी घाव

कवी : शाहीर अण्णाभाऊ साठे 

शाहीर अण्णाभाऊ साठे



यु ट्युब वर हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा ...

                                     

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...