Sunday, May 19, 2019

तिथे


कवी परिचय : 
गणेश हरी पाटील   (1906-1989) बी.ए.,बी.टी.पर्यंत शिक्षण झाले होते. शाळेत शिक्षक, शिक्षणाधिकारी, ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली. ग्रामीण कविता व बालकविता हे त्यांचे विशेष लेखन होते. बालकवितांबद्दल त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. निसर्ग वर्णन, संवाद, गेयता, नाट्य यांचा संगम त्यांच्या कवितेत आढळतो. त्यांचे ‘रानजाई’, ‘पाखरांची शाळा’, ‘लिंबोळ्या’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.


मूल्य : निसर्गप्रेम
साहित्य प्रकार : निसर्ग कविता
संदर्भ ग्रंथ : कविता विसाव्या शतकाची : संपा. शांता शेळके व सहकारी.
मध्यवर्ती कल्पना : कवीला निसर्गाबद्दल अतीव प्रेम आहे. पक्षांच्या रान फुलांच्या जगात कवीचे मन रमते. ‘तिथे’ कवीला रहावेसे वाटते.

टीपा :
1. खुळखुळे - तरवडीला शेंगा लागतात त्या वाळल्या की खुळखुळ आवाज करतात.

2. मखमलीची फुले - झेंडूबरोबरच जांभळ्या रंगाची छोटी गच्च फुले, ती जांभळ्या रंगाची असतात. त्यांना सुपारीची फुले म्हणतात.

3. गोकर्ण - वेलीवर लागणारी गाईच्या कानाच्या आकाराची गडद निळ्या रंगाची फुले ती लोंबत्या कर्णफुलांप्रमाणे वाटतात.

4. न्हाव्यांची घरकुले - बाभळीच्या काट्यांचा वापर करून बागेश तयार करतात. त्यात राहणारा काळ्या रंगाचा किडा त्याला न्हावी म्हणतात.

5. समशेरी - घायपाताची पाने लांबसडक निमुळती असतात म्हणून त्याला तलवार (समशेर) म्हटले आहे.

6. भोरडी - काळ्या रंगाचा स्थलांतरित पक्षी. साळुंकी एवढा असतो. त्याची पाठ काळी व खालच्या बाजूस गुलाबी रंग असतो.

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

1. कवीचे भान केव्हा हरपते?
उत्तर : रानजाईच्या दरवळलेल्या सुगंधामुळे कवीचे भान हरपते.

2. झरा कोठून वाहतो?
उत्तर : चहूबाजूनी टेकड्या असलेल्या दोन डोंगरामधून झरा वाहतो.

3. वाèयावर कोणती फुले डुलतात?
उत्तर : वाèयावर सोनवळिची फुले डुलतात.

4. निळी कुंडले असे कोणास म्हटले आहे?
उत्तर : गोकर्ण फुलांना निळी कुंडले असे म्हटले आहे.

5. झाडांवर कलकलाट कोण करतात?
उत्तर : भोरड्या झाडांवर कलकलाट करतात.

6. पांदीतून रहदारी केव्हा चालते?
उत्तर : बाजाराच्या दिवशी पांदीतून रहदारी चालते.

7. समशेरी कोणी रोखल्या?
उत्तर : घायपाताने समशेरी रोखल्या आहेत.

प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा.

1. तरवडीच्या फुलांचे वर्णन कवीने कसे केले आहे?
उत्तर : तरवड म्हणजे रानातील पिवळ्या रंगाची फुले असणारे झुडूप होय. या तरवडीच्या फुलांना ज्या शेंगा येतात त्या वाळल्या की त्यातून खुळखुळ्यासारखा आवाज येतो. जणू बाळांना झोपविण्यासाठी वापरल्या जाणाèया खुळखुळ्यासारखा आवाज त्यातून येतो. 

2. बाभळीच्या झाडाजवळ कोणकोण आहेत?
उत्तर : बाभळीचे झाड रूक्ष भासते आहे. त्यावर न्हाव्यांनी (एकप्रकारचे किडे) यांनी बाभळीच्या काट्यांचा वापर करून आपली घरकुले बांधली आहेत. तेथेच शेळ्या (शेरड) आपल्या पिलांसह (करडं) बागडत आहेत तर भोरड्या  (एक प्रकारचा पक्षी) झाडांवर कलकलाट करीत आहेत.

3. निवडुंगाच्या झुडुपाजवळ कोणते दृष्य दिसते?
उत्तर : निवडुंगाच्या झुडुपाजवळ आल्यावर लेखकाला घायपाताची लांबसडक निमुळती असणारी पाने  समशेरीसारखी भासतात आणि  निवडुंगाच्या बेटाभोवती समशेरी रोखल्या आहेत असे दिसते.

4. झाडीत शिरल्यावर कवीला काय वाटते?
उत्तर : झाडीत शिरल्यावर लेखकाला जादूच्या अद्भुत बेटामध्ये राहिल्यासारखे वाटते. बालपणी लेखकाला तिथे जी मौज वाटली होती तीच मौज आजही त्याला तिथे अनुभवायला मिळाली.

5. कवीला कोणते आकर्षण वाटते?
उत्तर : कवीने लहानपणापासून आजतागायत जगातील अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. मात्र ‘त्या‘ ठिकाणी म्हणजे त्याने लहानपणी पाहिलेली, आनंद उपभोगलेली जागा आजही तशीच नांदत असल्याचे त्याला जाणवते. जगात याहून अधिक रम्य स्थळे असतील परंतु स्वाभाविकपणे कवीला आजही तिथल्याच गोष्टींचे आकर्षण आहे.

प्र. 3. खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा.

1. रानजाईपाशी कोणते दृष्य दिसते?
उत्तर : रानजाईपाशी आल्यावर लेखकाला तेथे रानजाईच्या वेली फुललेल्या दिसतात. त्यांचा गंध चहूकडे दरवळत असल्यामुळे लेखकाचे भान त्यामुळे हरपते. त्याठिकाणी चहुबाजूनी टेकड्या असून दोन डोंगरामधील खोलगट जागेतून छोटासा झरा वाहताना दिसतो. त्याठिकाणी पाखरे चिवचिवाट करताना दिसतात.

2. आज कवी तिथे कोणती मौज अनुभवतो आहे?
उत्तर : आज कवीला तेथल्या झाडीत शिरल्यावर जादुच्या अद्भुत बेटात  राहिल्याप्रमाणे वाटते. लहानपणी कवी याठिकाणी येऊन जी मौज अनुभवत होता. त्याचीच प्रचीती आज मोठेपणीही तो अनुभवतो.

3. कवीला ‘त्या’ ठिकाणाचे आकर्षण का वाटते?
उत्तर : कवीने आपल्या आयुष्यात अनेक बदल पाहिले आहेत. अथवा बदल हाच जगाचा नियम आहे. मात्र त्या ठिकाणी कवीने लहानपणी जी स्थिती पाहिली होती. आजही तीच स्थिती नांदते आहे. त्यात काही बदल घडलेला नाही.  जगात याहूनही अधिक रम्य स्थळे असतील परंतु स्वाभाविकच आजही कवीला त्या ठिकाणचे आकर्षण आहे.

प्र. 4. खालील प्रश्नांची उत्तरे सात ते आठ वाक्यात लिहा.

1. ‘त्या’ ठिकाणी गेल्यानंतर कवी निसर्गातील कोणकोणती मौज अनुभवतो?
उत्तर : कवी त्या ठिकाणी गेल्यावर तेथे त्याला रानजाईच्या वेली फुललेल्या दिसतात. त्याचा सुगंध चहूकडे दरवळीत आहे. त्याठिकाणी चोहोबाजूनी टेकड्या आहेत व डोंगरदèयामधून छोटासा झरा वाहतो आहे. तेथे पाखरे चिवचिवाट करीत आहेत. वाèयावर सोनसळीची फुले डुलत आहे. तरवड खुळखुळ्यासारखा आवाज करीत आहे. छोटी झेंडुची बहीण असलेली मखमलीची फुले डुलत आहेत. गोकर्ण आपली निळी कुंडले झुलवित आहे. काटेरी बाभळीच्या झाडावर न्हाव्यांनी (किडा) आपली घरकुले बांधली आहेत. तेथे करडांसह शेरड्या बागडत आहेत. तर झाडांवर भोरड्या कलकलाट करीत आहेत. तेथे आसपास निवडुंगाची झुडपे आहेत. त्याच्या भोवती घायपात समशेरी रोखल्यासारखा वाटत आहे. त्या शेजारच्या पांदितूनी बाजाराच्या दिवशी रहदारी चाले. त्यामुळे तेथल्या झाडीत शिरल्यावर लेखकाला जादूच्या अद्भुत बेटामध्ये राहिल्यासारखे वाटते. लेखकाने तेथे बालपणी जी मौज अनुभवली होती आजही तीच मौज त्याठिकाणी तो अनुभवतो.

2. कवीने कोणकोणत्या फुलांचे, पक्षांचे वर्णन या कवितेत केले आहे?
उत्तर : कवीला निसर्गाबद्दल अतिशय प्रेम आहे. पक्षांच्या रान फुलांच्या जगात कवीचे मन रमते. त्यामुळे कवीला तिथेच रहावेसे वाटते.  त्याठिकाणी दिसलेल्या अनेक गोष्टींचे वर्णन त्यांने आपल्या कवितेतून केले आहे. तेथे सुगंध पसरविणाèया रानजाईच्या वेली कवीने फुललेल्या पाहिल्या आहेत. तेथून वाहणाèया झèयाजवळ पाखरे चिवचिवाट करीत आहेत. सोनवळीची फुले तेथे वाèयावर डोलत आहेत. तरवड आपल्या झाडाच्या शेंगांचा आवाज करीत आहे. झेंडुची बहीण शोभावी अशी मखमलीची फुले तेथे डुलत आहेत. गोकर्णाची फुले आपली निळी कर्णफुले झुलवित आहे. काटेरी बाभळी आहेत. त्यावर न्हाव्यांनी घरे बांधली आहेत. करडांसह (शेळीची पिल्ले) तेथे शेरड्या  (शेळ्या) बागडत आहेत. निवडुंगाची बेटे आहेत. त्याच्या भोवती घायपात आहे. जो समशेरी रोखून उभा राहिल्यासारखा वाटतो.

प्र. 5. संदर्भासहीत स्पष्टीकरण करा. 

1. ‘‘दरवळे गंध त्यामुळे भान हरपते!’’
उत्तर : संदर्भ : सदर काव्यपंक्ती ‘तिथे’ या निसर्ग कवितेतील असून कवी ग.ह.पाटील आहेत. निसर्गातील गोष्टींमुळे भान हरपून जाते असे कवी म्हणतो.
स्पष्टीकरण : कवीने लहानपणी पाहिलेल्या निसर्गातील गोष्टींचे आकर्षण त्याला आजही आहे. त्यामुळे मोठेपणी तो तेथे गेला असताना रानजाईच्या वेली त्याठिकाणी त्यांने फुललेल्या पाहिल्या आहेत. त्यांचा गंध दरवळत असतो त्यामुळे भान हरपून जाते असे कवी म्हणतो.

2. ‘‘काटेरी वेड्या रूक्ष तिथे बाभळी’’
उत्तर : संदर्भ : वरील काव्यपंक्ती ‘तिथे’ या कवितेतील असून कवी ग.ह.पाटील आहेत. निसर्गातील गोष्टींचा पुन:आनंद घेताना कवीने हे उद्गार काढले आहेत.
स्पष्टीकरण : कवीने बालपणी पाहिलेल्या  ‘तिथल्या’ गोष्टींचा आनंद घेण्यासाठी तो पुन्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी काटेरी बाभळी रूक्षपणे आजही वेड्यासारख्या उभ्या असलेल्या दिसतात. त्यावर न्हाव्यांची घरकुले लटकलेली आहेत.

3. ‘‘मी कितीक स्थित्यंतरे जगी पाहिली’’
उत्तर : संदर्भ : या काव्यपंक्ती ‘तिथे’ या  कवितेतील असून कवी ग.ह.पाटील आहेत. निसर्गातील तसेच जगातील अनेक बदल कवीने अनुभवले आहेत, पाहिले आहेत असे कवी म्हणतो.
स्पष्टीकरण : कवीला आजही ‘तिथे’ त्या निसर्गरम्य ठिकाणी रहावेसे वाटते. तिथेच त्याचे मन रमते. कवी म्हणतो जगात मी अनेक बदल पाहिले आहेत. परंतु त्या ठिकाणी मात्र आजही तीच स्थिती नांदते आहे असे कवी म्हणतो.

प्र. 6.   योग्य  पर्याय निवडून पुढे लिहा.

1. वाèयावर डुलती .................. ची फुले ?
अ) कोरांटी ब) गुलबाक्षी क) जाई ड) सोनावळी

2. झाडावर कलकलाट कोण करते ?
अ) चिमण्या ब) भोरड्या क) साळुंक्या ड) मैना

3. घायपाताला कवीने काय म्हटले आहे ?
अ) समशेर ब) चाकू क) चाबूक ड) बंदूक

4. मी कितीक .................. जगी पाहिली?
अ) दृष्ये ब) स्थळे क) स्थित्यंतरे ड) स्वरूपे

5. झाडीत गेल्यावर कविला कोठे राहिल्याप्रमाणे वाटते?
अ) गुहेत ब) अद्भुत बेटात क) अभयारण्यात ड) झाडांच्या पांदीत

उत्तरे : 1.  ड) सोनावळी  2. ब) भोरड्या  3.  अ) समशेर  4. क) स्थित्यंतरे  5. ब) अद्भुत बेटात

कवितेचा सारांश : 

कवीला निसर्गाबद्दल अतिशय प्रेम आहे. पक्षांच्या, रान फुलांच्या जगात कवीचे मन रमते. त्यामुळे कवीला तिथेच रहावेसे वाटते. कवीला त्याठिकाणी दिसलेल्या अनेक गोष्टींचे वर्णन त्यांने आपल्या काव्यातून केले आहे. बालपणी आपल्या मन:चक्षूत साठविलेले ‘तिथले’ चित्रण आजही जसेच्या तसे असल्याचे कवीचे म्हणणे आहे. त्यात काहीही बदल झाला नाही.
कवी त्या ठिकाणी गेल्यावर तेथे त्याला रानजाईच्या वेली फुललेल्या दिसतात. त्याचा सुगंध चहूकडे दरवळीत आहे. त्यामुळे त्याचे भान हरपून जाते. त्याठिकाणी चोहोबाजूनी टेकड्या आहेत व दोन डोंगराच्या दèयामधून चिमुकला झरा पाझरत आहे. तेथे पाखरे चिवचिवाट करीत आहेत. सोनसळीची फुले वाèयावर डुलत आहेत. तरवडीच्या झाडावर त्या तरवडीच्या वाळलेल्या शेंगा खुळखुळ्यासारखा आवाज करीत आहेत. छोटी झेंडुची बहीण असलेली मखमलीची फुले डुलत आहेत. गोकर्ण आपली निळी कुंडले (कर्णफुले) झुलवित आहे. काटेरी बाभळी वेड्यासारख्या तिथे रूक्षपणे उभ्या आहेत.  त्या झाडावर न्हाव्यांची (किडा) घरकुले लटकलेली आहेत. ‘तेथे’ करडांसह(शेळीची पिल्ले) शेरड्या (शेळी) बागडत आहेत. तर झाडांवर भोरड्या (एक प्रकारचा काळ्या रंगाचा छोटा पक्षी) कलकलाट करीत आहेत. तेथे आसपास काटेरी निवडुंगाची झुडपे आहेत. त्याच्या भोवती घायपात ( घायपाताची पाने लांबसडक निमुळती असतात म्हणून त्याला तलवार (समशेर) म्हटले आहे.) समशेरी रोखल्यासारखा वाटतो आहे. त्या शेजारच्या अरूंद पांदितूनी (गाडीवाटेतून) बाजाराच्या दिवशी रहदारी (वर्दळ) चालते. त्यामुळे तेथल्या झाडीत शिरल्यावर लेखकाला जादूच्या अद्भुत बेटामध्ये राहिल्यासारखे वाटते. लेखकाने तेथे बालपणी जी मौज अनुभवली होती आजही तीच मौज त्याठिकाणी तो अनुभवतो. लहानपणापासून निसर्गातील तसेच जगातील अनेक बदल (स्थित्यंतरे) मी अनुभवले आहेत, पाहिले आहेत असे कवी म्हणतो. परंतु त्या ठिकाणी मात्र आजही तीच स्थिती नांदते आहे असे कवी म्हणतो.  जगात याहून अधिक रमणीय, मनाला भुलविणारी रम्य स्थळे असतील परंतु स्वाभाविकपणे कवीला आजही तिथल्याच गोष्टींचे आकर्षण आहे.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024