(राष्ट्रकूट घराण्याचा कालावधी इ.स. 753 ते इ.स. 973)
(कल्याणच्या चालुक्य घराण्याचा कालावधी इ.स. 973 ते इ.स. 1189)
वेरूळ मधील कैलास मंदिर |
प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक दंतीदुर्ग होय.
2. राष्ट्रकूट राजाचा पराभव केलेल्या कल्याणचा चालुक्य
घराण्यातील राजा दुसरा तैलप हा होय.
3. कवीरहस्याचा लेखक हलायुध.
4. पोन्नानी शांतीपुराण ही प्रसिद्ध कविता लिहिली.
5. कल्याणच्या चालुक्यामध्ये सहावा विक्रमादित्य हा
सुप्रसिद्ध राजा होता.
प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे लिहा.
1. राष्ट्रकूटांचा राज्यकारभार कसा होता ?
उत्तर : राष्ट्रकूटांच्या काळात राजपद हे
वारसा हक्काने मिळत असे. मंत्रिमंडळ राजाला मदत करीत असे. मंत्रिमंडळात
महत्त्वाच्या व्यक्तीची नेमणूक केली जात असे त्याला महासंधीविग्रह
(परराष्ट्रमंत्री) म्हटले जात. तो विदेशी व्यवहार पहात असे. राज्यकारभाराच्या
सुविधेसाठी साम्राज्याचे राष्ट्र, मंडळ, विशय, नाडू आणि ग्राम असे भाग पाडले जात असत. त्याचे प्रमुख
त्याचा कारभार पहात. जमीन महसूल, जकात, घर, दुकाने आणि नावाड्यांचा कर हे राजाच्या उत्पन्नाचे
साधन होते. परदेशी व्यापारातून कर मिळत असे.
2. राष्ट्रकूटांच्या काळातील शिक्षण पद्धती कशी होती ?
उत्तर : राष्ट्रकूटांच्या काळात अग्रहार
आणि मठ ही शिक्षण केंद्रे होती. संस्कृत, वेद, खगोलशास्त्र, तर्कशास्त्र आणि
पुराणांच्याबद्दल ज्ञान दिले जात होते. विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील
सालोतगी हे प्रगत शैक्षणिक केंद्र होते.
3. वेरूळ येथील मंदिराबद्दल लिहा.
उत्तर : वेरूळ येथे अखंड दगडात कोरलेले
देऊळ आहे. हे कैलाशनाथ मंदिर पहिल्या कृष्णाने बांधले. हे एका दगडात कोरलेले ‘आश्चर्य’ आहे. हे मंदिर 100 फूट उंच 278 फूट लांब आणि 154 फूट रूंद खडकात
कोरलेले आहे.
4. कल्याणच्या चालुक्यानी साहित्याला कसे उत्तेजन दिले ?
उत्तर : कल्याणच्या चालुक्यानी साहित्याला
उत्तेजन दिले. या काळात जैन विद्वानांच्या सहाय्याने कन्नड साहित्याची भरभराट
झाली. या काळातील प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजे गदायुद्ध अथवा साहसभीम विजय (रण्ण), पंचतंत्र
(दुर्गसिंह), विक्रमांकचरित्र
(बिल्लण), धर्मामृत
(नयनसेन), मिताक्षरी
(विघ्नेश्वर),
मानसोल्लास (तिसरा सोमेश्वर), संगीत चुडामणी (दुसरा जगदेकमल). याशिवाय त्या काळात
वचन साहित्याची निर्मित झाली. अक्कमहादेवी, आलमप्रभू, माचय्या हे
प्रमुख वचन साहित्यकार होते.
----------------------------------------------------------------------------------------------
संत बसवेश्वर |
चालुक्यन काळांतील नाणी |
काशीविश्वेश्वर देवालय, लक्कुडी |
No comments:
Post a Comment