Friday, May 24, 2019

चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ


                                   (चोळ घराण्याचा कालावधी इ.स. 850 ते इ.स.1279)
                                      (द्वारसमुद्राचे होयसळांचा कालावधी इ.स. 984 ते इ.स.1346) 



Image result for brihadeshwara temple tanjore
बृहदेश्वर मंदिर, तंजावर 

 



Image result for chennakeshava temple belur
चन्नकेशव मंदिर, बेलूर  

     Image result for chennakeshava temple belur
            चन्नकेशव मंदिर, बेलूर 

शिलाबालिका   

प्रश्न 1 - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. चोळांची राजधानी तंजावर ही होती.
2. प्रत्येक खेड्यातील ग्रामसभेला  महासभा अथवा पेरंगुरी असे म्हटले जात असे.
3. चोळांच्या काळातील अग्रहार असलेले प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र उत्तर मेरूर
4. बेंगळूरजवळील बेगूर येथे चोळांनी चोळेश्वर हे मंदिर बांधविले.
5. होयसळ राजाच्या अंगरक्षक दलाला गरूड म्हटले जायचे.

6. राघवंकाने हरिश्चंद्रकाव्य ही कविता लिहिली.

प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे द्या.

1. चोळ साम्राज्याचा संस्थापक कोण ?
उत्तर : करीकळ हा चोळ साम्राज्याचा संस्थापक होय.
2. चोळ राज्यकारभाराची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती
उत्तर : चोळांनी समर्थ आणि योग्य राज्यकारभार केला. मंडळ, कोटवंगी, नाडू, कुर्रम किंवा ग्रामसमुदाय आणि तरकुर्रम असे साम्राज्याचे वेगवेगळे भाग पाडले होते. प्रत्येक गावात उर नावाची लोकांची समिती असे.
खेड्यांचा स्वतंत्र कारभार हे राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते. ग्रामसभा या प्रथम सभा असत. तरकुर्रम म्हणजे खेडे. प्रत्येक कुर्रमला ग्रामसभा असे. त्याला महासभा म्हटले जात असे. याला पेरंगुरी असेही म्हटले जात असे. त्यातील सभासदांना पेरुमक्कल म्हणत. सभासदांची निवड निवडणूक प्रक्रियेतून होत असे. संस्कृत विद्वान आणि श्रीमंतानाच फक्त निवडणुकांना उभे राहण्याचा अधिकार असे.
उत्पन्नाच्या 1/6 महसूल गोळ केला जात असे. पाणी पुरवठा पद्धतीवर विशेष लक्ष दिले जात असे. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षणाला उत्तेजन दिले.
3. होयसळांनी साहित्याला कसे प्रोत्साहन दिले त्याचे वर्णन करा.
उत्तर : या काळात कन्नड साहित्याची भरभराट झाली. रुद्रभटाने जगन्नाथ विजय लिहिले. जन्न कवीने यशोधरा चरित्र लिहिले. हरिहराने चंपू कविता गिरिजा कल्याण लिहिली. राघवंकाने हरिश्चंद्रकाव्य, केशिराजने शब्दमणी दर्पण लिहिले. संस्कृतमध्ये देखील अविस्मरणीय साहित्यकृती निर्माण झाल्या. रामानुजाचार्यांचे श्रीभाष्य व प्रसारभट्टाने लिहिलेला श्री गुण रत्नकोश ही महत्त्वाची उदाहरणे होत.

 अवांतर प्रश्न 

1. चोळांच्या काळातील साहित्यकृती कोणत्या ?
उत्तर : चोळांच्या कालावधीत कंबाने रामायण लिहिले. सिक्कीलरने पेरीयपुराण, तर तिरुक्कदेवाने जीविका चिंतामणी रचले.
Related image
होयसळांची सिंहमुद्रा 
2. होयसळांच्या मंदिराबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तर : होयसळांनी मृदू दगडात असंख्य मंदिरांची निर्मिती केली. त्यांच्या देवळात दिसून येणारी पाच वैशिष्ट्ये म्हणजे 1.नक्षत्राकृती सभागृह 2.उपपीठे 3.सुशोभित भिंती 4.कळस 5.खांब. अनेक सुंदर नर्तिकांचे पुतळे उभे केले आहेत. विष्णुवर्धनने चोळांवरील आपल्या विजयाच्या स्मरणार्थ तलकाडू येथे कीर्तीनारंग मंदिर आणि बेलूर येथे चन्नकेशव (विजयनारायण) ही मंदिरे बांधली. केटमल्ल सैन्याधिकारीने हळेयबीडू येथील होयसळेश्वर मंदिर बांधले. सोमदंड नायकाने सोमनाथपूर येथे केशवपूर मंदिर बांधले. अर्सिकेरी, गोविंदनहळ्ळी, दोड्डगड्डावळी आणि भद्रावती येथे अनेक मंदिरे आणि बस्ती बांधल्या. नाजूक कोरीव कामासाठी या कलाकृती प्रसिद्ध आहेत. दासोजा, चव्हाण, जकनाचार्य आणि डंकन हे त्या काळातील प्रमुख शिल्पकार होते.
3. विष्णुवर्धनने चोळांवरील आपल्या विजयाच्या स्मरणार्थ कोणती मंदिरे बांधली ?
उत्तर : विष्णुवर्धनने चोळांवरील आपल्या विजयाच्या स्मरणार्थ तलकाडू येथे कीर्तीनारंग मंदिर आणि बेलूर येथे चन्नकेशव (विजयनारायण) ही मंदिरे बांधली.
Image result for saint ramanujacharya
रामानुजाचार्य 

4. होयसळांच्या काळात कोणते धर्म अस्तित्वात होते ?
उत्तर : होयसळांच्या काळात जैन, बौद्ध, शैव, वैष्णव, वीरशैव, श्रीवैष्णव इ. धर्म अस्तित्वात होते.
5. होयसळांच्या काळात शैक्षणिक संस्था कोठे होत्या ?
उत्तर : मेलुकोटे, सालगाम, अर्सीकेरे आदी ठिकाणी उत्तम शैक्षणिक संस्था होत्या. अग्रहार, मठ आणि देवळे ही शैक्षणिक केंद्रे होती.

Related image
6. ‘गरुडविषयी माहिती द्या.
 उत्तर :  होयसळांच्या काळात राजाचे वेगळे सुरक्षा सैन्य (अंगरक्षक) सैन्य होते. त्याला गरुड म्हटले जात असे. या सैन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे जर राजाचा मृत्यू झाला तर यातील सैनिकदेखील बलिदान करीत असत. 








या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 






No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024