(इ.स.पू.3 ते इ.स.13 व्या
शतकापर्यंत)
(सातवाहन घराण्याचा कालावधी इ.स.पू.230 ते इ.स.220)
( कदंब घराण्याचा कालावधी इ.स. 325 ते इ.स.540)
( गंग घराण्याचा कालावधी इ.स. 350 ते इ.स.1004)
गोमटेश्वर बाहुबली |
प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. सिमूकाने श्रीकाकूलम ही आपली राजधानी केली.
2. हलाने गाथासप्तशती हा ग्रंथ लिहिला.
3. कानडी भाषेतील पहिला शिलालेख हाल्मीडी होय.
4. कदंबाची राजधानी ही आताच्या उत्तर कन्नड या जिल्ह्यात
आहे.
5. गंग घराण्यातील दुर्विनीत हा मुख्य राजा होय.
6. चौंडरायने लिहिलेला ग्रंथ चौडपुराण.
प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे लिहा.
1. सातवाहन घराण्यातील शेवटचा राजा कोण ? सातवाहन
घराण्याचा èहास कसा
झाला ?
उत्तर : यज्ञर्षी सातकर्णी हा सातवाहनांचा
शेवटचा राजा होता. त्याच्या कालावधीत शकांनी सतत आक्रमण केल्यामुळे त्यांचे
साम्राज्य खिळखिळे झाले आणि त्यांचा èहास झाला.
2. सातवाहन काळातील कलेबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तर : सातवाहन राजांनी कला, साहित्य आणि
शिक्षणाला उत्तेजन दिले. अजंठा आणि अमरावतीमधील चित्रकला सातवाहनांच्या काळात सुरू
झाली. राजवाडे,
देवळे विहार, चैत्यालय आणि किल्ले बांधले गेले. बनवासीचा व्यापारी
भूतपालाने कार्ले येथे चैत्यगृह बांधले आहे.
3. गंगाच्या कारकीर्दीत कोणत्या सामाजिक मूल्यांना
महत्त्व होते ?
उत्तर : प्रामाणिकपणा, एकनिष्ठता, शौर्य आणि संयम, धैर्य या सामाजिक
मूल्यांना गंगाच्या कारकीर्दीत महत्त्व होते.
4. गंगाच्या कालावधीतील चार पुस्तकांची नावे लिहा.
उत्तर : गंगाच्या कालावधीत दुसरा माधवने
दत्तकसूत्र लिहिले. दुर्विनिताने संस्कृतमध्ये शब्दावतार ही रचना व गुणाढ्याच्या वोड्डकथांचे
संस्कृतमध्ये भाषांतर केले. श्रीपुरुषाने गजशास्त्र लिहिले. शिवमाधवाने गजाष्टकची
रचना केली. हेमसेनाने राघव पांडवीय, वादीबसिंहाने गद्यचिंतामणी आणि शास्त्रचुडामणी तर
नेमचंद्राने द्रव्यसार संग्रह आणि चौंडरायाने चौडपुराण लिहिले.
कार्लेतील चैत्यालय |
मधुकेश्वर मंदिर, बनवासी |
पाताळेश्वर मंदिर, तलकाडू |
Nice Funny birthday wishes in marathi
ReplyDeleteStudy material and notes Free
ReplyDeleteNotes of pharmacy
ReplyDeleteसुपर
ReplyDelete