गुप्त काळातील भारत |
व |
मेहरूलीतील लोहस्तंभ |
प्रश्न 1 - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. गुप्तांनी आपली कारकीर्द मगध या ठिकाणाहून सुरू केली.
2. पहिल्या चंद्रगुप्ताला महाराजाधिराज असे म्हटले जात
असे.
3. कालिदासाचे प्रसिद्ध
नाटक शाकुंतल होय.
4. विशाखा दत्तची मुद्राराक्षस ही प्रसिद्ध साहित्यकृती
होय.
5. शुद्रकाने मृच्छकटिक ही साहित्यकृती लिहिली.
6. वर्धन घराण्याचा संस्थापक पुष्यभूती हा होय.
शाकुंतल |
कवी कालिदास |
प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे लिहा.
1. दुसऱ्या चंद्रगुप्ताबद्दल माहिती लिहा.
उत्तर : दुसऱ्या चंद्रगुप्ताने
समुद्रगुप्ताचे मौर्य साम्राज्य वाढविले आणि स्थैय आणले. शकांचा पराभव करून पश्चिम
भारत आपल्या अंमलाखाली आणला. भारतातील अनेक राजघराण्याशी वैवाहिक संबंध
जोडल्यामुळे तो प्रभावशाली झाला. त्याने ‘विक्रमादित्य’ पदवी मिळविली.
त्याची कारकीर्द ही त्याने केलेल्या लढायापेक्षा साहित्य आणि कलेला दिलेल्या
उत्तेजनामुळे संस्मरणीय झाली आहे. प्रसिद्ध कवी व नाटककार कालीदास हा त्याच्याच
काळातील होय. विशाखा दत्त, शुद्रक हे ही त्याकाळातील प्रसिद्ध साहित्यिक होत.
2. गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे कोणती
?
उत्तर : गुप्त साम्राज्याच्या èहासाची कारणे 1.हुणांचे सतत
आक्रमण होत होते. 2.त्यांचे स्वत:चे सुसज्ज सैन्य नव्हते. 3.युद्धाच्या
प्रसंगी मांडलिक राजे सैन्य पुरवित त्यामुळे त्यांचे प्राबल्य वाढले. 4. पुरोहितांमुळे
समाजात बिकट परिस्थिती निर्माण झाली. 5. गुप्तांचा पाश्चिमात्यांशी चाललेला
व्यापार ठप्प झाल्यामुळे अंतर्गत व्यापाराला त्याची झळ बसली आणि पाटलीपुत्र
नगरीलाही खेड्याचे स्वरूप प्राप्त झाले.
3. गुप्तकालीन प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोण होते ?
उत्तर : गुप्तकालीन प्रसिद्ध शास्त्रज्ञ
म्हणजे धन्वंतरी (ज्याला भारतीय वैद्यक शास्त्राचा जनक म्हणतात) 2.चरक (वैद्यक
शास्त्रज्ञ) 3.सुश्रुत
(शल्यचिकित्सक) 4.आर्यभट (खगोल शास्त्रज्ञ व गणित तज्ज्ञ) 5.वराह मिहीर (खगोल
शास्त्रज्ञ) 6.भास्कर
(खगोल शास्त्रज्ञ)
4. वर्धनाचा राज्यकारभार कसा होता ?
उत्तर : गुप्तांच्या विभाजनानंतर उदयास
आलेल्या वर्धनांनी थानेश्वर येथून राज्यकारभार केला. राजाला राज्यकारभारात मंत्रिमंडळाची मदत होत असे. महासंधी विग्रह
(मध्यस्थ), महाबलाधीकृत
(महासेनापती),
भोगपती (महसूल अधिकार) आणि दूत अशी नोकरशाहीची चौकट होती. राज्याचे
प्रांतामध्ये विभाजन केले होते. जमीन महसूल राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन
होते. मांडलिक राजे खंडणी देत असत. राजा त्यांना जमिनी बहाल करीत असे व त्या
बदल्यात युद्ध काळात सैन्याची मदत घेत असे.
नालंदा विद्यापीठ |
धन्वंतरी |
सुश्रुत |
चरक |
आर्यभट्ट |
वराहमिहीर |
No comments:
Post a Comment