Friday, May 24, 2019

मौर्य आणि कुशाण

Image result for ashok stambh lion
अशोक स्तंभ 
  

प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. चाणक्य कौटिल्य या नावानेही ओळखला जातो.
2. मौर्य साम्राज्याच्या राजधानीची ठिकाणे पाटलीपुत्र, तक्षशीला, उज्जैन, कलिंग व सुवर्णगिरी ही होती.
3. कुशाण साम्राज्याचा संस्थापक कजुल कडफायसिस हा होय.
4. कनिष्काच्या नव्या पर्वाला शक काळ असे म्हटले जाते.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1. अशोक काळातील प्रमुख शहरांची नावे सांगा. 
उत्तर : पाटलीपुत्र, तक्षशीला, उज्जैन, कलिंग व सुवर्णगिरी ही अशोक काळातील प्रमुख शहरे होती.

2. अशोकाच्या व्यवस्थापनांचे वर्णन करा.
Image result for samrat ashok
सम्राट अशोक 
उत्तर : आपल्या विस्तृत साम्राज्यावर व्यवस्थित राज्यकारभार करण्यासाठी अशोकाने अनेक केंद्रे (सूत्रे) स्थापन केली होती. त्यासाठी अनेक अधिकारी कार्यरत होते. ही केंद्रे राजाच्या मर्जीनुसार चालत असत. यासाठी त्याला कायमस्वरूपी सैन्याची आवश्यकता असे. सर्व कार्यासाठी करांची आवश्यकता होती. जमीन महसूल राजाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. त्यामुळे अधिकाèयांना कठोर परिश्रम घ्यावे लागत. गुप्तहेर राजाला माहिती पुरवित. व्यापार उदीम व्यवस्थित चालण्यासाठी सर्वत्र वाहतुकीची सोय केली होती. जकात कर लादले होते. कायदे केले होते. हे कायदे शिळेवर व स्तंभावर आढळून येतात. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी धर्म महामात्रांची नेमणूक केली होती.





3. कुशाण कोणत्या वंशाचे होते ?
उत्तर : कुशाण यूची जमातीच्या वंशाचे होते.


4. कनिष्काचे साम्राज्य कोठे विस्तारले होते ?

उत्तर : कनिष्काचे साम्राज्य दक्षिणेकडील सांची आणि पूर्वेकडे बनारसपर्यंत पसरले होते. त्याच्या साम्राज्यात मध्य आशियाचाही समावेश होता. पुरुषपूर ही त्याची राजधानी होती.


Image result for gupta dynasty map in hindi
मौर्यकालीन साम्राज्य 
Image result for gandhara style buddha
गंधर्व शैलीतील बुद्ध


No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...