Showing posts with label नववी मराठी. Show all posts
Showing posts with label नववी मराठी. Show all posts

Sunday, May 19, 2019

राजे लोकीं बहुत सगुण असावें


रामचंद्रपंत नीलकंठ अमात्य
रामचंद्रपंत नीलकंठ अमात्य

सारांश : 


हा पाठ म्हणजे यादवकालीन गद्याचा उत्कृष्ट नमुना आहे. शिवशाहीतील राजनीतीचे अनेक विशेष आज्ञापत्रातून विशद होतात. आपल्या अधिकाèयांनी प्रजेशी कसे वागावे याच्या सूचना देणारे हे आज्ञापत्र आहे. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू यातून दिसून येतात. मानवी स्वभावाची उत्तम जाण असणारा प्रजाहितदक्ष राजा, मार्मिक निरीक्षणशक्ती, राज्यरक्षण हेच ध्येय बाळगणारा सुव्यवस्थित व दूरदर्शी राज्यकारभार करणारा अनन्यसाधारण, निष्ठावान, कर्तव्यदक्ष, अर्थशास्त्र जाणणारा, जनकल्याणाचा आग्रह धरणारा लोककल्याणकारी राजा. या आज्ञापत्रातील भाषा प्रशासकीय आहे. सूत्रबद्ध संवेदनशील अत्यंत सावध, काय करावे, काय करू नये असे सांगणारी आणि आदेशात्मक सुस्पष्ट अशी भाषा आहे.

आज्ञापत्रातील तिसèया प्रकरणातील भाग येथे संक्षिप्त स्वरूपात घेण्यात आला आहे. या प्रकरणात  प्रथम जनतेच्या हितासाठी व धर्मरक्षणाकरिता ईश्वराने राजा निर्माण केल्याबद्दलची हकीकत सांगितली आहे. जसा राजा तशी त्याची प्रजा या न्यायाने राजावरील जबाबदारी  फार महत्त्वाची ठरते राजाच्या अंगचे गुण, त्याची कर्तव्ये, प्रजेशी त्याचे वर्तन, स्वसंरक्षणाविषयी त्याने घ्यावयाची सावधगिरी सेवकांशी त्याची वर्तणूक, त्याचे शिक्षण, विद्या शास्त्र व कला याविषयी त्याची दृष्टी, कारभारी व मंत्री वा अधिकारी व इतर जबाबदार सेवक यांशी त्यांचे वर्तन राज्यरक्षणाविषयी त्याने घ्यावयाची काळजी, खजिन्याच्या वाढीबद्दलचे त्याचे धोरण, हुजरातीची त्याने करावयाची व्यवस्था, त्याने करावयाचा मनुष्यसंग्रह इ. विषयी आज्ञापत्रकारांनी फार बारकाईने सूचना केल्या आहेत. ‘राजा कालस्य कारणम’या वचनावर त्यांचा विश्वास असल्याने राजावरची जबाबदारी फार मोठी मानली गेली आहे. राजा हा प्रत्यक्ष ईश्वराने प्रजेच्या रक्षणार्थ निर्माण केलेला असल्याने त्याने आपले कर्तव्य अत्यंत दक्षतेने पार पाडावयास हवे. राजे लोकांनी गुणमंडित व्हावे असा निष्कर्ष आज्ञापत्रकारांचा आहे.
 या सगळ्या सृष्टीचा निर्माता हा ईश्वर आहे. त्याचे सर्व गोष्टीवर नियंत्रण असते. त्यानेच राजाची सर्वप्रथम निर्मिती केली आहे. राजाही इतर लोकांसारखाच एक. परंतु समाजात प्रत्येक व्यक्ती ही भिन्न स्वरूपाची असते. परंतु राजा हा स्वत: ईश्वराचा अंश आहे ही कल्पना प्राचीनकाळी सर्वत्र रूढ होती. अनेकविध प्रकृतीच्या लोकांचे रक्षण करून त्यांना धर्मप्रवण बनविण्यासाठी परमेश्वराने राजा निर्माण केला व त्यास राज्य मिळवून दिले. या श्रद्धेतील भावार्थ इतिहास काळातील रसिकता आठवून ध्यानात घ्यावयास हवा. राजा नसता तर आपसात विरोध करून सारी प्रजा नष्ट होईल असे होऊ नये यासाठीच राजाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी राजाची आहे. आपली सारी प्रजा ही निरूपद्रवीन होता ती धर्मपथप्रवर्तक असावी त्या लोकांना धर्मप्रवण बनविण्यासाठी परमेश्वराने राजा निर्माण केला व त्यास राज्य मिळवून दिले. ही ईश्वराचीच आज्ञा आहे. ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे न वागल्यास क्षोभ होईल ही भीती पूर्णपणे हृदयात बाळगून राजाने नेहमी नम्र राहून प्रजेच्या हिताचा विचार केला पाहिजे.  जे काही आपले चांगले होईल ते ईश्वरामुळेच होत असते त्यामुळे ईश्वराच्या आज्ञेचे पालन करून ईश्वरास शरण असावे. परंपरागत धर्म आचरून कीर्तिलाभ करावा. दुसèयाचे आधीन न होता सेवक लोकांनी केलेल्या सेवेची निंदा किंवा अपमान न करता यथान्याय यथाधिकार यथोचित सेवकांशी वागावे. वाडवडिलांनी आचरण केलेल्या परंपरागत धर्माचे आचरण करून कीर्तिलाभ करावा. सगळ्या कार्यामध्ये अपकीर्तीचे भय बाळगावे. धर्मरक्षण हे राजाचे प्रमुख कर्तव्य सांगितले आहे किंबहुना मानवी जीवनाचे एक प्रधान अंग म्हणजे धर्म असल्याने तेच एक रक्षणीय अशीही श्रद्धा प्राचीन परंपरेत होती. त्यामुळेच धर्माचरण करण्याबरोबरच ब्राह्मण, वैदिक, शास्त्रज्ञ, निस्पृह, अयाचित, वनवासी, तपस्वी, सत्पुरुष यांच्याप्रती परमनिष्ठा व्यक्त करून ते जेथे असतील तेथे त्यांच्या चरितार्थाची सोय करून देऊन त्यांना संतुष्ट करावे व आपल्या कल्याणभिवृद्धीविषयी आशीर्वाद घ्यावा. वेषधारी फकीर, जोगी, जंगमादी जे केवळ भुताटकी करून फिरणारे आहेत यांच्या पाठीमागे लागू नयेत. त्यांच्यावर विश्वास दाखवू नये. त्यांच्या नादी न लागता थोडी भिक्षा  देवून बाहेरच्या बाहेर मार्गी लावावे. तपस्वी, शीघ्रकोपी यांचा सहवास न करता दुरूनच त्यांचा परामर्श घेऊन ते संतुष्ट होतील, आशीर्वाद देत राहतील असे करावे.आंधळे, पांगळे, आतुर, अनाथ, अनुत्पन्न जे असतील त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवून तेे जिवंत असेपर्यंत त्यांच्या चरितार्थाची सोय करून द्यावी. आणि हे तत्कालीन शिवशाहीच्या राजनीतीस धरूनच आहे.

 युद्धाव्यतिरिक्त स्वशरीर संरक्षणाविषयी राजे लोकांनी स्वत:च्या रक्षणाविषयी किती जागरूक असावे याविषयीचे फार मार्मिक विवेचन रामचंद्रपंत अमात्यांनी केले आहे. राजाने युद्धाव्यतिरिक्त इतर वेळीही अत्यंत सावध असले पाहिजे. पाकालय, जलस्थान, फलस्थान, वसनागार इ. नाजूक महालाच्या ठिकाणी तसेच प्रमुख कारखाने याठिकाणी माणसांची नेमणूक करताना त्यांची चांगली परीक्षा घेऊन त्यांची नेमणूक करावी. ते अतिशय विश्वासू, प्रामाणिक व निर्लोभी असले पाहिजेत. नेमणूक केलेल्या माणसांना त्याचा अधिकार मिळवून देऊन अधिकारपरत्वे सर्वांवर सारखाच लोभ केला पाहिजे.  त्यांच्या चरितार्थाची अशी सोय करून दिली पाहिजे की जेणेकरून तो दुसèयांकडे काही अपेक्षा करणार नाही.
आपल्याजवळील सेवक नेमताना ते अत्यंत विश्वासू, सूज्ञ, आपला मनोभिप्राय जाणून वागणारे, मनातील भाव जाणणारे, शूर, दर्शनीय असावेेत. आपल्या कामात हलगर्जीपणा न करणारे, निर्दयी, दुराग्रही व दुष्ट वृत्तीचे नाहीत याची पारख करूनच त्यांची नेमणूक करावी. हा नेमणूकीविषयीचा त्यांचा बारकावा चिंतनीय आहे. राजे लोकांना विनोदाचे व्यसन नसावे. कारण विनोद करताना सुहृद झाले तर सेवक लोकांशी विनोद करीत असताना विनोदात मर्यादा राहत नाही व आपणच आपली मर्यादा उणी करून घेतली असे होते. विनोदाविषयीचे त्यांचे हे सूत्र व त्याचे स्पष्टीकरणही अतिशय मार्मिक आहे.
खजिना म्हणजे राज्याचे जीवन असते. जमाखर्चाचा विचार करून त्यात कशी भर पडत जाईल ते  पाहिले पाहिजे. कारण संकटाच्या प्रसंगी हा खजिनाच सर्व गोष्टींचा परिहार करण्यास उपयोगी पडू शकतो. ही गोष्ट ध्यानात ठेवूनच खजिन्यात भर घालत गेली पाहिजे.
सेवक लोकांचे वेतन निश्चित करावे व वेळेवर ते त्यांना मिळेल याची दक्षता घ्यावी. एखाद्या सेवकाने विशेष कार्य केले तर त्यास बक्षीस म्हणून काहीतरी द्यावे. तèहेवाईक, शेरखोर (उन्मत्त), अमर्याद, बालभाष्य, व्यसनी, कुचोद्य (कुचाळे करणारे) व एका धन्यापासून हरामखोरी (गद्दारी, विश्वासघात) करून आला असेल असे लोक आपल्या सैन्यात (हुजरात) ठेवू नये. राजाने लहान अथवा थोर असू दे कोणत्याही सेवकाचा दोष आपल्या तोंडातून दुसèयाकडे उच्चारित जाऊ नये. एखाद्या सेवकाचा दोष आढळल्यास दुसèयाजवळ तो बोलू नये. आपल्याच हृदयात ठेवून त्याच्यावरील उपायांची योजना करावी.

गुराख्याचे नेत्रपतन

 - म्हाइंभट्ट


टीपा :
लीळाचरित्र

लीळाचरित्र : एकांक - यामध्ये श्री चक्रधरस्वामींच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. या आठवणी एकांक, पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा तीन भागात आहेत. एकांकातील श्रीचक्रधर हे आपल्याला  संसारी माणसासारखे सामान्य, रागलोभ असणारे वाटतात. जीवनातील पुत्र, पती, मित्र, खेळगडी, सेवक, कैदी, मुक्तिदाता अशा विविध नात्यांच्या अनुषंगाने त्यांचे दर्शन आपल्याला घडते. प्रथम माणूस आणि नंतर अवतार या क्रमामुळे त्यांचे व्यक्तित्व आपल्याला भावते.


प्रमाण मराठीत सारांश 


चक्रधरस्वामी

: एकदा श्री चक्रधरस्वामी, गावच्या शिवेवर असलेल्या एका वृक्षाखाली बसले होते तेथे एक गुराखी चोरून आपली गुरे दुसèयाच्या मालकीच्या जागेत चारीत असे याबद्दल त्यास लाच मिळत असे तेव्हा गावातील दोन गटात भांडण जुंपले. त्यास पकडण्यासाठी धावपळ सुरू झाली. जणू काही श्रीचक्रधरच त्या पक्षापैकी एक होत. तो गुराखी पुढे पळत असता चक्रधरांनी कंबर कसून त्याचा पाठलाग केला व तो आटोक्यात येत नाहीसे पाहून गुराख्यास धडा शिकविण्यासाठी स्वत: चक्रधरांनी हाणामारीत भाग घेतला, त्यावेळी त्यांच्याकडून गुराख्याच्या डोळ्यास सपाटून मार बसला. डोळा कामातूनच गेला, याबद्दल वाईट वाटून लगेच त्यांनी आपल्या तोंडातील तांबूळ त्याच्या डोळ्यावर बांधून तो डोळा परत नीट करून दिला. जशास तसे वागावे पण दु:खितावर प्रेमही करावे ही शिकवण, पटवून देऊन श्री चक्रधरस्वामी पुढील मुक्कामास गेले.

पाखरांनो तुम्ही

 रमेश तेंडुलकर




सारांश : 

विज्ञानाने मानवाची जशी एकामागून जशी प्रगती झाली तशीच दुसèया बाजुने त्याचे दुष्परिणामही मानवाला जाणवू लागते आहेत. विकासासाठी मानवाने अनेक कारखाने उभारले त्यामाध्यमातून त्याने प्रगती साधली परंतु दुसèया बाजूने या कारखान्यातून बाहेर पडणारा धुर हा प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. पर्यावरण प्रदूषणामुळे मानवाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा फटका निसर्गातील जीवजंतूना पाखरांनाही बसला आहे. आजचे विज्ञानयुग हे कविताला युद्ध्यमान जीवनसंघर्षाची अनुभूती देते. कवीला जे जाणवले ते या कवितेतून त्यांनी मांडले आहे.
त्या उद्वेगातूनच कवी म्हणतो, पांखरानो मनुष्याला जसे कारखान्याच्या सायरनची सवय झाली आहे तशीच तुम्हालाही आता सवय झाली असेल... या सायरनच्या बंधनात मनुष्य अडकला आहे. सकाळी सायरनच्या आवाजाबरोबर तो कामाला जुंपला जातो आणि त्याच्या आवाजानंतरच तो जेवणाला बसतो आणि त्याच्या आवाजानंतरच त्याची कामावरून सुटका होते. त्यामुळे त्या पाखरांनाही सायरनची सवय झाली असेल असे कवीला वाटत आहे. स्वच्छ, निळ्या आकाशात रोज सकाळी सायरनचे सूर पसरतात त्यावेळी तुम्ही कुठे असता? असा सवाल कवी पक्षांना करतो. तुम्ही जशी आकाशात उंच उंच भरारी घेत जाता तशीच सायरनच्या सुरांची उंच उंच कंपने हवेत चढत जातात... त्यावेळी तुम्ही कोठे जाता. हे सायरनचे आवाज म्हणजे तुम्हाला धोक्याचे इशारे आहेत. ते तुम्हाला समजतात काय ? नंतर ऑल क्लिअर म्हणजेच सारे काही आलबेल असल्याचेही दिलासे दिले जातात..
आम्हा मानवाचे जीवन तर सतत युद्धाच्या परिस्थितीत असल्यासारखे झाले आहे. त्याची आता आम्हाला सवय झाली आहे. सायरनच्या आवाजाबरोबरच आमचा जीवनसंघर्ष सुरु होतो. हे पाखरांने तुम्ही काय करता ? असा सवाल कवी करतो. आमचे जीवन घड्याळावर अवलंबून आहे. या सायरनच्या आवाजाबरोबरच आम्ही आमची घड्याळे लावूनच सारे कामकाज करीत असतो. घड्याळातील वेळेनुसारच कामाला जायला किती वेळ आहे याचा अंदाज घेतो. हे पाखरांनो आम्ही चाकोरीबद्ध जीवन जगत आहे परंतु तुम्ही कसे जीवन जगत आहात.......... असा प्रश्न उपस्थित करून कवी साèया प्रश्नांची उत्तरे वाचकांना शोधायला लावतो.

000000000000000000

सुंदर ते ध्यान


 पु.ल. देशपांडे


सारांश : 

कवीने विठ्ठलाच्या जागी कष्टाळू शेतकèयाचे रूपक करून वर्णन केले आहे. शेतकèयाचा कष्टाळूपणा वर्णन केले आहे.  औत खांद्यावर घेऊन हे सुंदर ध्यान म्हणजे शेतकरी शेतावर कष्ट करण्यासाठी जातो. विठ्ठल कासे पीतांबर घालतो परंतु येथे कष्टाळू शेतकèयाचे कासे पीतांबर म्हणजे त्याची खादीची लंगोटी होय. औत घेऊन तो शेतामध्ये नांगरण करण्यासाठी जात आहे. त्याची मकरकुंडले म्हणजे त्याच्या घामाच्या धारा आहेत. थंडीच्या दिवसात त्याला घोंगडीची ऊब मिळते. तेवढाच त्याचा उबारा. त्याच्या गळ्यात तो तुळशी हार घालीत नाही. म्हणजे त्याला दैनंदिन जीवनात इतके कष्ट करावे लागतात की त्याला पूजा अर्चा करायला वेळच मिळत नाही. परंतु त्याच्या कमरेला मात्र विळा आढळतो. तो त्याच्या कष्टाचं प्रतीक आहे. त्याच्या माथ्यावर टिळा पाहायला मिळतो तोही अबीर गुलालाचा नव्हे तर चिखलाचा. या कष्टकरी शेतकèयाची रखुमाई मात्र झोपडीत राहते तीही भुकेलेली आहे. तिला खायला अन्न मिळालेले नाही तरीसुद्धा ती अन्नावीण शेतात कष्ट करीत आहे. तिची पोरेही भुकेलेली आहेत आणि ती पोटाचे नगारे वाजवून आरती म्हणत आहेत.

हिरवळ आणिक पाणी

 बा.भ. बोरकर



सारांश : 


कवी बा.भ. बोरकर यांनी निसर्ग आणि माणसे यांच्या सान्निध्यात कविता कशा स्फुरतात याचे प्रत्ययकारी वर्णन या कवितेत केले आहे. निसर्गातील प्रतीकांतून त्यांनी मानवी भावभावनांचे सुंदर शब्दात चित्रण केले आहे.
जिथे गवताची हिरवी पाती डोलतात आणि वाहते पाणी असते, त्या निसर्गात मला गाणी स्फुरतात. आकाशाच्या निळाईतून पांढरी पाखरे थव्यांनी किलबिलत उडत जातात, तिथे मला गाणी स्फुरतात.
माळरानावर गुरेवासरे सुखाने चरत असतात. वाèयाच्या झुळकेमुळे कोवळ्या गवताच्या लवेतून थरथर लहरत जाते. जिथली हवा इतकी गार आणि आरशासारखी स्वच्छ आणि निरोगी आहे की जणू त्या हवेतून आरोग्य खेळत असते, असल्या शुद्ध मोकळ्या हवेत मला गाणी स्फुरतात.
मातीचा जिव्हाळा हृदयात साठवून झाडाची हिरवी सावली उन्हावर आपली माया पसरते. झाडाच्या पानापानांतून कोवळी आनंदाची पाझर (ओल) सांडत जाते, तिथे मला गाणी सुचतात.
जिथे अशा प्रकारची समृद्ध धरती आहे. जिथे घराघरांतून पोराबाळांचा आवाज घुमतो. माहेराच्या नैसर्गिक सौंदर्याने जिथे कष्ट करणारी कुलवधू नांदते, तिथे मला गाणी स्फुरतात.
मैत्रीशिवाय जिथे कोणतेही बंधन नाही. जिथे स्मितामध्ये शरद ऋतूतील चांदण्यासारखे मधुर आमंत्रण आहे. जिथे मुखातून सहज निघालेल्या बोलांमध्ये गडद चांदणे आहे आणि जिथे स्पर्शामध्ये शीतल स्नेह, प्रेमभाव आहे, तिथे मला गाणी सुचतात.
जिथे प्रत्येक ऋतूत उघड्यावर मोकळेपणी सोहळे साजरे होतात आणि जिथे अंगणामध्ये प्रीतीची निर्मळ अमृतासारखी बोलणी बोलली जातात. जिथे शुद्ध मनमोकळ्या गोड गप्पा रंगतात, तिथे मला गाणी सुचतात.
जिथे माणूस हवाहवासा आपलासा वाटतो. जिथल्या अभंग ओव्यांमधून जगण्याचे आश्वासन मिळते. जिथले जीवन एकमेकांच्या विश्वासावर चांगल्याप्रकारे स्थिर आहे व निष्ठा अगदी प्रामाणिक आहे, तिथे मला गाणी स्फुरतात.
जिथे प्रत्येक हृदयात नेहमी देव वसतो. जिथे भविष्याचा भार मनात नसतो. दुसèयाच्या सुखाने जिथे मनात समाधानाची हिरवळ पसरते आणि दुसèयाच्या दु:खाने डोळ्यांत पाणी तरळते, तिथे मला माझी गाणी सुचतात असे कवी म्हणतो.

आचंद्रसूर्य नांदो


ग.दि. माडगूळकर

 गाणे युट्यूब वर ऐकण्यासाठी क्लिक करा click me

                                         


सारांश : 


‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ओळखल्या जाणाèया गजानन दिगंबर माडगूळकर ऊर्फ गदिमा यांची ही अप्रतिम कविता कम गीत आहे. आपला प्रियतम भारत देश किती महान आहे हे एक स्तवनात गदिमांनी ओजस्वी शब्दात शब्दबद्ध केलेले आहे.  कवीने हे राष्ट्र देवतांचे व प्रेषितांचे आहे असे संबोधून भारताचा गौरव केला आहे.  अशा या महान भारत देशाचे स्वातंत्र्य पृथ्वीतलावर जोवर सूर्य,चंद्र उगवत आणि मावळत आहेत तोवर अखंड राहो अशी चिरंजीवी प्रार्थनाच त्यांनी या स्तवनात केलेली आहे. हा देश म्हणजे सीतारघूत्तमाची कर्तव्यदक्षभूमी आहे आणि येथे पराक्रमाची रामायणे घडावी. भारताच्या संरक्षणाची जबाबदारी पेलत असलेल्या हिमालय पर्वताचे हे शिर उंच व्हावे अशी अपेक्षा कवीने व्यक्त केली आहे.
थोडा पराभव झाला म्हणून आम्हाला निराशा येत नाही. कारण याच देशात युद्धभूमीवर कृष्णाने अर्जुनाला भगवतगीतेद्वारा उपदेश केला आहे. हा देश भगवतगीतेचे स्तन्य प्याला आहे म्हणजेच भगवतगीतेतील गोष्टी व त्यातील बोध, संस्कारातूनच या देशातील जनतेचे पालनपोषण झाले आहे. म्हणून आम्ही पराभवाची चिंता कधी बाळगीत नाही.
या भूमीतच आपणास सामर्थ्य आणि संयमाचा मेळ साधला गेलेला दिसतो. जगाला शांतीचे धडे देणाèया सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म या देशातच झाला आहे. ही भूमी म्हणजे भगवान तथागताची आहे. त्यामुळे हे अत्यंत पुण्यदायी क्षेत्र आहे.
हे राष्ट्र म्हणजे विक्रमांचे  व शांततेचे राष्ट्र आहे.  सत्यासाठी झुंज द्यावी ही या भूमीतील जागती प्रथा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हे या भूमीत होऊन गेलेले थोर राज म्हणजे नरसिंह योग्यतेचे आहेत असे कविला वाटते.
चांगल्या परंपरांचा अभिमान बाळगणारी अशी ही भूमी आहे. येथे नेहमी परंपरांचा सन्मान केला जातो. कारण येथील जनशासनाचा जो पाया आहे तोच मुळी ‘सत्यावर’ आधारलेला आहे. यामुळे अशा या पवित्र मंगलमय भूमीत जागृताचे जयगीत सदा निनादत राहो असे कवीला वाटते.
या देशभक्तीपर गीताचा वापर ‘घरकुल’ नावाच्या सिनेमात करण्यात आला आहे. हे गीत राणी वर्मा यांनी गायिले असून सी. रामचंद्र यांनी त्याला संगीताचा साज चढविला आहे. या गीताची चाल इतकी सुरेख आहे की ते गीत ऐकले की विद्यार्थ्यांना ही कविता पटकन पाठ होऊन जाते.

 Gamyachi Link  CLICK ME

पोया (पोळा) -

  
बहिणाबाई चौधरी


पोळा सणाचे वर्णन कवयित्रीने कसे केले आहे,  तुमच्या शब्दात लिहा. 

सारांश : 
मराठी साहित्यातील ‘‘निसर्गकन्या’’ म्हणूनही गौरविल्या गेलेल्या बहिणाबाई चौधरी यांची ही ‘ग्रामीण कविता’ आपणास कृषीजीवनविषयक दर्शन घडवून जाते. पोया म्हणजे पोळा. अहिराणी भाषेतील ही कविता आहे. आपल्याकडे हा सण शेतकरी बैलपोळा म्हणून साजरा करतात. शेतकèयाला वर्षभर मदत करणाèया बैलांविषयीची कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. पोळा म्हणजे आमंत्रण देऊन आपल्या घरी बैलांना अतिथी म्हणून जेवायला बोलाविण्याचा सण. अशी महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश भागात समजूत आहे. यासंबंधीची एक पाठ इयत्ता आठवीत वामन चोरघडेंच्या ‘अतिथी’ कथेच्या स्वरूपात आपण साèयांनी अभ्यासला आहे. त्याचीच ही अहिराणी भाषेतील आवृत्ती म्हणावी लागेल.
बहिणाबाईनीसुद्धा आपल्या कवितेतून बैलांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. अहिराणी ही मराठीचीच एक बोली भाषा असून या बोलीत ‘ळ’ चा ‘य’होतो. त्यामुळेच पोळा ऐवजी पोया असा उच्चार आपण करतो.
शेतकèया आला रे आला पोळ्याचा सण मोठा ! त्यामुळे आता हाती वाट्या घेऊन त्यामध्ये शेंदूर घालून तो चांगला घोटा.
आता तोरण बांधून आपले घरदार सजवा. बैलांना आंघोळ घालून त्याला चांगले सजवा. त्याच्या शिंगाला शेंदूर लावा.
शेंदूर लावल्यानंतर शिंगाच्या टोकाला पितळी टोपणाच्या घुंगराच्या शेंब्या लावा. बैलांना मिरविण्यासाठी त्यांच्या गळ्यांमध्ये घंट्या घुंगरू बांधा.
कवड्याची माळ गळ्यात घाला. अंगावर छानशी झूल चढवा डोक्यावर रेशमाचे गोंडे लावा. चारी पायात पैंजण बांधा.










उठा उठा बहिणींनो चुली पेटवा आता. आज बैलांना नैवेद्य म्हणून पुरणाच्या पोळ्या ठेवा.
ही बैल वर्षभर नांगर व शेतीची अवजारे ओढून शेती करण्यासाठी मदत करीत असतात त्यांच्या कष्टाची गणती होणार नाही. यांच्या जीवावरच शेतकरी शेती करीत असतो. यांच्या कष्टामुळेच शेतकèयांच्या हाती पीक येते.
कष्टाचे ढिग हा उपसत असतो. कष्ट करणारा बैल एकमेव असा बंदा आहे.  याच्या अंगावर चढविलेल्या झूलीचे काहीच वाटत नाही. दाना चाèयाचाच तो मिंधा असतो.
आयाबायांनो उठा चुल पेटवा वर्षभर तुमच्यासाठी कष्ट करणाèया बैलाला आज खुराक म्हणून देण्यासाठी पुरणाच्या पोळ्या बनवा.
आज त्याला पोटभर खायला द्या.ते खाऊन तो सुस्त झाला तरी चालेल. बशीसनी यायला आज करू द्या बागूल.
आता माझ्या मनातलं ऐका, माझं एकटीचे  सांगणं आहे, आज पोळ्याच्या सणाला माझं एवढं मागणं आहे.
......



आज बैलांना झोंबाझोंबी करू नका माझं ऐका जरासं यामुळे आपली हौस होत असली तरी बैलांना मात्र त्रास होतो.
आज बैलाची पूजा करा आणि त्याच्या उपकाराचं देणं फेडा. बैला हा खरा तुझा सण आहे आणि शेतकèया तुला त्याचे ऋण फेडायची ही संधी आहे.




प्रेमस्वरूप आई !

माधव जूलियन

  या संदर्भातील गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी  क्लिक करा CLICK ME

                                    

 कवितेचा  सारांश :

 ‘प्रेमस्वरूप आई !’ या कवितेचे खरे नाव  ‘‘आईची आठवण’’ असे आहे. तिचा वाङ्मयप्रकार गज्जल आहे. माधवराव जूलियनांनी आपल्या काव्यात कौटुंबिक जीवनातील अनेक भावनांना आपल्या काव्यात स्थान देऊन प्रत्यक्ष जीवनातील हा रितेपणा भरून काढला असे दिसते. उदा. त्यांची  ‘‘आईची आठवण’’ ही कविता. आईवर प्रसिद्ध झालेल्या तत्कालीन कवितेतील ही कविता अग्रस्थान पटकावणारी आहे. माधवरावांच्या पोरक्या जीवनात या विषयाला विशेष महत्त्व असल्याने ही कविता अत्यंत भावनोत्कट व सरस उतरली आहे.
ही कविता म्हणजे मातृप्रेमाचे एक महन्मंगल स्तोत्र आहे. मातृप्रेमाचा कवीच्या अंत:करणात जो एक स्त्रोत वाहत आहे त्याच्या ओलाव्याने ही कविता न्हावून निघाली आहे. कवीच्या ज्ञात जीवनात आईच्या वात्सल्य प्रेमाचा अनुभव त्यांना आलेला नाही. प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधू आई ! असे गौरवगीत गाऊन माधव जूलियनांनी ‘आईची’ आठवण केली आहे. ही कविता वाचून कवी यशवंतांच्या ‘आई’ या कवितेची, त्यातील काही काही शब्दांची, भावनांची व विचारांचीही आठवण होण्यासारखी आहे.    आईच्या वियोगाने कवी आईला आता तुला मी आता कोणत्या उपायी बोलावू असा प्रश्न करीत आहे. आई गेल्यानंतर या जीवाची (कविची) जगात आबाळ झाली नाही. परंतु आईची उणीव मात्र त्याला सतत भासली आहे. तिची उणीव त्याला जाणवत आहे. आईची रूपरेखा कवीला नीटशी आठवतही नाही आहे तरीसुद्धा त्याला आई हवी आहे.  आई हवी आहे म्हणून तिचा हेका कवीचे मन सोडायला तयार नाही. आज कवीने आपल्या बळावर विद्या, धन व प्रतिष्ठा प्राप्त केली आहे तरी आईविना पोरका असल्याची पोरकेपणाची जाणीव नष्ट होत नाही. ‘सारे मिळे परंतु, आई पुन्हा न भेटे’ हा विचार कवीला अस्वस्थ करून सोडीत आहे. आईची भेट न झाल्यामुळे कवीच्या हृदयात जणू आगडोंब पेटला आहे! तिच्या वियोगामुळे कवीस खूप दु:ख होत आहे.  ब्रह्मांड आठवू लागले आहे. त्यामुळेच कवी तिला आवाहन करीत आहे की कैलास सोडून उल्केसमान वेगाने तू परत माझ्याकडे ये. का तुझा आत्मा माझ्याभोवतीच फिरत आहे?  आणि म्हणूनच या मायेच्या धारा तुझ्या अव्यक्त डोळ्यातून वहात आहेत ? अन्य आयांचे वात्सल्य पाहून माझ्यासारख्या पोरक्या मुलाची भूक शमत नाही आणि म्हणूनच या मनात कोणत्या आशा नाचतात ? हे कवीने फार सुंदररित्या व्यक्त केले आहे. दुसèयाचे वात्सल्य पाहून त्याला अधिकच हुरहुर लागली आहे.
वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !
तुझ्यापोटी पुन्हा जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे असे कवी म्हणतो.
कवी गिरीश म्हणतात त्याप्रमाणे ‘आई’ वरील कवितात प्रस्तुत कवितेचे स्थान फार मोठे आहे. या कवितेतील भावनोत्कट आहे. पण हे सर्व आत्मकथन खèया दिवंगत आईला उद्देशून केलेले नसून एका काल्पनिक मातेभोवती कवीच्या या भावना पिंगा घालीत आहेत हे लक्षात घेतले तर अतीव संवेदनारूप कवीच्या जीवनात प्रत्यक्षात किती रितेपणा होता याची कल्पना येऊन कवीच्या जीवनात प्रत्यक्षांत किती रितेपणा होता याची कल्पना येऊन कवीच्या दैवदुर्विलासाबद्दल एकप्रकारची रूखरूख लागते. कवीची प्रेमळ मातेची कल्पनाही या काव्यात अतिशय चेतोहरपणे समूर्त झाली आहे.
 लता मंगेशकर यांनी हे गीत गायिले आहे. त्याला वसंत प्रभू यांनी संगीताचा साज चढविला आहे. मधमाद सारंग या रागात हे गीत गायिले आहे.

माधव जूलियन हे नाव का ?

कवी गिरीश म्हणतात, माधव जूलियन या गंगाजमनी नावाबद्दल लोकांच्या मनात अगदी प्रथमपासून कुतूहल निर्माण केले आहे. सुप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकर्ती मेरी कॉरेली हिने ‘गॉडस् गुड मॅन’ ही कादंबरी लिहून तीत ‘जूलियन अ‍ॅडरले’ या नावाचे एक पात्र निर्माण केले आहे. ही व्यक्ती म्हणजे एक शिक्षककवी आहे. तीवरून माधवरावांच्या सहाध्यायी प्रेयसीने (काशीबाई हेर्लेकर यांची कन्या शांताबाई हेर्लेकर) त्यांना ‘तुम्ही त्या जूलियन अ‍ॅडरलेसारखे आहात’  असे सहज लीलेने म्हटले त्याबरोबर माधवरावांनी  ‘जूलियन अ‍ॅडरले’ हे नाव धारण केले व त्या नावाने ते पत्रे व कविता लिहू लागले. आधीच त्यांनी ‘महादेव’ या स्वत:च्या नावाचे ‘माधव’ असेे नाव केले होते. त्यात पुन्हा हे नवीन नाव त्यांनी धारण केले. परंतु कालांतराने यातील ‘अ‍ॅडरले’ ही काढून टाकून ‘माधव जूलियन’ हे नाव कायम केले. हे नाव पुढे पुष्कळच प्रसिद्धी पावले व मराठीचा जाज्ज्वल्य अभिमान जागृत होऊनही, मग ते बदलणे हे त्यांच्या हातात राहिले नाही.

ही आई कोण ?

सदर कविता ही कवीने आपल्या आईवर लिहिलेली नाही तर बडोद्यास रहात असताना त्यांच्या शेजारी असलेल्या व ‘आदर्श आई’ म्हणून लाभलेल्या प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधु आईचे म्हणजे श्रीमती काशीबाई हेर्लेकर यांचे हे स्तोत्र आहे.
000000000000000000000000000000

अखंड

- महात्मा जोतीराव फुले



सारांश : 

संतांनी ज्या प्रमाणे ‘अभंग’ ही काव्यरचना केली त्याप्रमाणेच महात्मा जोतीराव फुले यांनी स्वतःच्या काव्यरचनेला ‘अखंड’ हे नाव दिले आहे.  मानवी आचार - विचारामध्ये सत्य, ज्ञान, सद्विवेकबुद्धी व मानवता असणे हाच मानवाचा धर्म आहे. असे प्रतिपादन खालील ‘अखंडा’तून व्यक्त झाले आहे.
महात्मा जोतीराव फुले आपल्या अखंडात म्हणतात -
सत्याचा जिव्हाळा असला की मनाची स्वच्छता राहते. जेथे सत्य आहे त्या सत्यामुळे माणसाच्या चित्तास, मनास समाधान असते. Ÿ।।1।।
जेथे जागा मिळेल तेथे मानवाने सदा हृदयात धीर धरावा नेहमी सत्यवर्तन करण्यातच आपले आयुष्य खर्ची घालावे. Ÿ।।2।।
पीडा, दु:ख सहन करण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे तरच आपल्यावरील संकटांचे निवारण होऊ शकते. जगामध्ये गांजलेल्यांना आपण तारले पाहिजे. Ÿ।।3Ÿ।।
धीर धरून सर्वांना सुख दिले पाहिजे तेच लोक आयुष्यात यशवंत होतात असे महात्मा जोतीराव म्हणतात. Ÿ।।4।।
खरेपणाशिवाय दुसरा चांगला व स्पष्ट धर्म नाही. सत्य हाच खरा धर्म होय. सत्य नसेल तेथे मतभिन्नता निर्माण होते. मतभेद कधीही लोकांना रूचत नाही. मतभेदाचे लोकांना वावडे असते. Ÿ।।1।।
सत्याची कास कधी सोडू नये. सत्य सोडले की भांडण निर्माण होते. सत्य सोडले की जन्मभर बुद्धी भ्रष्ट होते. Ÿ।।2।।
(म्हणून) सत्य हाच धर्म कायम ठेवावा. सत्यामुळे माणसाला सर्व ठिकाणी सुखसमाधान मिळते. Ÿ।।3।।
सत्याने वागणे हा सदाचार आहे. सत्याचे आचरण करणे, मानवाचा धर्म आहे. महात्मा जोतीराव म्हणतात, सत्य सोडून बाकीचे वागणे, हा दुराचार आहे. Ÿ।।4।।
ज्याला लोभ झाला आहे त्या माणसाने सत्याने वागावे. तोच मनुष्य पदाला शोभून दिसेल तोच मानव सुखी होईल. Ÿ।।1।।
सर्वांनी सुखी व्हावे असे अशी आशा जो करीत असेल आणि आयुष्यात जो सद्गुणांची हाव करतो तोच खरा ज्ञानी होय. Ÿ।।2।।
दुसèयाचे सुखदु:ख जो जाणतो, त्याचे दु:ख आपले समजून त्यांच्याशी जो वागतो तो धन्य होय. ।।3।।
अशा मानवाला सद्गुणी म्हणावे. त्याला भावंड मानावे असे महात्मा जोतीराव म्हणतात.Ÿ।।4।।


फटका



अनंत फंदी

या संदर्भातील  गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी/ऐकण्यासाठी क्लिक करा  CLICK ME


कवितेचा सारांश  : 

अनंत फंदीचे ‘फटके’ हे उपदेशपर फटके म्हणून प्रसिद्ध आहेत. यातून जनसामान्यांना सरळमार्गी आयुष्य व्यतीत करण्याचा उपदेश केलेला आहे. संसारामध्ये गुंतलेल्या माणसांने संसारातच आपले मन रमवावे उगीच आपले इकडे तिकडे भटकत फिरू नये. कठीण वाट  ही वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको असा उपदेश अनंत फंदी करतात. येथे निष्पापपणाचा आव आणून उगाच खोट्या मिजासकी मारीत फिरू नये. अंगात सदा नम्रता असावी उगीच कुणावर राग धरू नये. आपणाला समाजातील देवतांविषयक काही गोष्टी पटत नसल्या तरी लोकांच्यात तसे दाखवू नये. नास्तिकपणा आपण लोकांच्यात दाखवू लागलो तर लोकं आपणाला नाव ठेवतात. यासाठी ते आपण टाळावे. आपण काहीही भले केलो तरी अधर्म मार्गाने ते करू नये. वाईट मार्गाला आपण जाऊ नये. तो टाळावा. आपल्या आई वडिलांवर रूसून दूर एकटा बसू नको असे सांगतानाच माणसाने कधी रिकामटेकडे बसू नये आणि पोट भरण्यासाठी नस्त्या उचापती करू नये. आणि व्यवहार करताना फसू नये असे सांगितले आहे.
एखाद्याशी बोलताना आपण सांभाळून बोलावे दुसèयाचे वर्म (उणीव) काढून त्याला शरमायला लागावे असे वाईट बोलू नये. एखाद्याचा हेवा करून दुसèयाचा ठेवा बुडविण्यासाठी झटू नये. या जगात मी काय तो तेवढाच शहाणा, मीच काय तो श्रीमंत, माझ्यापाशी तेवढीच संपत्ती हा गर्व उगाच बाळगू नये. या जगात एकापेक्षा एक वरचढ असे लोक आहेत त्यामुळे स्वत:च्या थोरपणाला मिरवू नको. आपल्या बळाच्या जोरावर गोरगरिबांवर गुरकावू नये. आपल्या हाती आलेली सत्ता ही कायमस्वरूपी आपल्याकडे राहणार नाही आहे. दोन दिवसांनी ही सत्ता जाईल अपयशही माथी घेऊ नकोस. कर्ज मिळतय म्हणून ते घेऊन कर्जबाजारी होऊ नये त्यामुळे आपला मान,रूबाब आपण गमावून बसू नये. आपल्या मित्रांसाठी प्रसंगी पदरचे पैसे खर्च करावेत परंतु जामीन कोणाला राहू नको असा सल्ला फंदी देतात. उगीच भरीस पडून पैजेचा विडा उचलू नये किंवा कुणाला कमी माप देवू नये. कुणाची वस्तू आपल्याकडे गहाण असतील तर ती डुबवू नये तसेच आपल्याकडे सर्व गोष्टी असतील तर भीक मागत फिरू नये. आणि काहीच जर आपल्यापाशी नसेल तर कोणी भीक माग म्हणून सांगायची गरज नाही हे गाव तुझेच आहे. भीड न करता भीक माग असे सांगतात.
स्वत:च्या हितासाठी उगीच कुणाची निंदा किंवा स्तुती करू नकोस. एकवेळ शहाण्याची खुशामत करावी परंतु मूर्खाची मैत्रीसुद्धा करू नये. येथे कष्टाला, श्रमाला महत्त्व देताना फंदी सांगतात कष्टाने मिळविलेली भाजी भाकरी गोड लागते परंतु तूपसाखरेची चोरी करू नये. घरी आलेल्या पाहुण्याला मूठभर द्यायला मागे पुढे पाहू नको. देवाने दिलेल्या स्थितीतच सुख मानावे त्याला कधी कंटाळू नको. कष्ट करून धनाचा संचय करावा परंतु सत्कार्यासाठी खर्च करताना मागे हटू नको. सत्कर्मासाठी मागे ओसरू नको. मग सर्वत्र तुझ्या सत्कीर्तीचा डंका वाजेल यात शंकाच नाही. चांगले विचार करण्यास संकोच करू नकोस तसेच सत्संगतीपासून दूर जाऊ नकोस किंवा द्वैताला (दुही) अनुसरू  नकोस देवाचे नामस्मरण करण्यास विसरू नको. तसेच या अनंत फंदीचे फटके गाण्यासही मागे सरू नकोस......... असा उपदेश फंदी करतात.


000000000000000000000000000000000000000

सुश्लोक वामनाचा

 - वामन पंडित

भावार्थ

1. मगरीच्या दाढेत अडकलेला मणी आपण सामर्थ्यानिशी काढू शकतो, बाहुसामर्थ्याने महासागराच्या लाटातून आपण पैलतीराला जाऊ शकतो, मोठ्या सापाला आपण फुलाप्रमाणे मस्तकावर एक वेळ धारण करू शकू. परंतु आपण क्षणभरही मूर्ख माणसाच्या मनाची समजूत घालू शकत नाही. (म्हणजेच मूर्ख माणसाच्या मनाची समजूत घालणे कठीण आहे.)
2. झाडे फळांच्या ओझ्याने खाली वाकतात. काळे ढग पाणी घेऊन (जमिनीच्या दिशेने) खाली वाकतात. थोर मनाचे लोक आपल्याजवळील संपत्तीचा गर्व करीत नाहीत. दुसèयावर उपकार करणाèया माणसांचा वैभवकाळ जवळ असताना नम्रपणे वागणे हा स्वभावच असतो.
3. तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब पडला असता तो शिल्लकही रहात नाही. (त्याचा लवलेशही राहत नाही) तोच पाण्याचा थेंब कमळाच्या पाकळीवर पडला असता सुंदर मोत्याप्रमाणे चमकतो. तोच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातील शिंपल्यात पडला तर त्याचा सुंदर मोती बनतो. यावरून संगतीने अनुक्रमे अधम, मध्यम व उत्तम अवस्था प्राप्त होतात.
4. काळानुसार द्रव्याचे खर्च होण्याचे पुढीलप्रमाणे मार्ग आहेत. दान करणे, उपभोग घेणे व द्रव्याचा नाश होणे. जो पैशाचा उपभोग घेत नाही, सत्पात्री दान करीत नाही त्याच्या पैशाला नाश होणे ही अवस्था प्राप्त होते.
    5.  या श्लोकात सांगितलेल्या बारा गोष्टी माणसाच्या हातातून नाहीशा झाल्यास जीवन वाया जाते म्हणून या गोष्टी वाया घालू नका. दुष्ट, स्वार्थी, लाचखाऊ मंत्र्यांच्यामुळे राजाचे जीवन नष्ट होते. प्रापंचिक माणसाच्या संगतीने संन्यासी माणसाचे जीवन नष्ट होते. मुलाचे खूप लाड केल्यामुळे तो बिघडतो. वेदांचा अभ्यास न केल्याने व आत्मसात केलेले ज्ञान इतरांना न दिल्यामुळे ब्राह्मण जात नष्ट होते. दुराचारी पुत्रामुळे कुळाचा नाश होतो. दुष्टांच्या संगतीने शील बिघडते. शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे (शेतीची नीट देखभाल न केल्यामुळे)  शेती नष्ट होते. उन्मत्तपणाच्या वागण्याने लक्ष्मी निघून जाते. मद्यपानामुळे अब्रू (प्रतिष्ठा) नष्ट होते. लबाडीने वागल्यास मैत्री नष्ट होते. सतत प्रवासाला गेल्याने स्नेह नष्ट होतो. चुकीच्या मार्गाने पैसा खर्च केल्याने पैसा नष्ट होतो.


00000000000000000000000

आंधळा पांगळा

   



आंधळा पांगळा या भारूडाचा सारांश आपल्या शब्दात लिहा. 

सारांश : दृष्टी असून आंधळा झालो. ज्यांनी आपंगले म्हणजे आपला म्हटले त्यापासून वेगळा झालो. माझे आईवडील माझ्या बाळा म्हणतात पण शेवटी काळाच्या हाती सोपवितात. हे सज्जनांनो तुम्हीच माझे आईवडील माझ्यावर दया करा. तुमच्या पाया पडून मी विनवितो. माझी इंद्रिये क्षणभर ही चालत नाहीत. मायेच्या मोहाने संसाराच्या फेèयात मी गुंतलो आहे. हे म्हणजे जणू इंगळाच्या शेजेवर अंथरूण घातले आहे. आता कशी झोप यायची ! कोण मला यातून निर्धारपूर्वक सोडवेल बरे ? मायबाप संतांनो तुम्ही उपकार करा. जगात जो जनीजनार्दन आहे. त्याच्या पायी डोके ठेवून मी प्रार्थना करतो. जनार्दनातील एकनाथ म्हणतात ही विनंती ऐका.
सद्गुरुने दिलेले नाम घेत घेत प्रपंचाने आंधळा झालेला सत्संगाची आस ठेऊन कृपेची भीक मागत आहे. साधे भिक्षेकरी भीकेची कृपा मागत असतात पण ज्याच्या जीवाला तळमळ लागते त्याला गुरुकृपा हवी असते. त्यासाठी त्याचा प्रयास चालू असतो. प्रपंच हा विंचवांचा पलंग आहे त्यावर सुखाची झोप कशी येणार असे ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात. तोच दृष्टान्त नाथांनी येथे वापरलेला दिसतो. पण म्हणून काही विंचवा-इंगळ्यांच्या विषाच्या भीषणतेत उणेपण येत नाही. प्रपंच दु:खद तो दु:खदच. आई वडील सुद्धा मी, माझे म्हणतात. पण प्रसंग येताच टाकून देतात. नाकातोंडात पाणी चालले तेव्हा माकडीणीने पिलाला पायी घातले. प्रत्यक्ष जन्मदात्यांची ही अवस्था तर इतरांची कथा काय वर्णावी ? तशात सर्व ज्ञानेंद्रिये परमार्थांच्या या मार्गावर चालत नाहीत. कर्मेंद्रिय संसारातच गुंतून राहतात. अशावेळी अडचणींचे, दु:खाचे जे अफाट वारे सुटते त्याने प्रपंच्याची नाव डगमगू लागते, बिथरते. यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे रामरायाला बोलावणे हे आठवतही नाही. मग फितुरांनी पोखरलेला किल्ला लढविणाèया किल्लेदारसारखी जीवाची अवस्था होते. असे होऊ नये म्हणून संतांच्या पाया पडून सत्संगाची, कृपेची, उद्धाराची मागणी दृष्टांतातील हा अंध करीत आहेत. जनातच जनार्दन आहे आणि जनार्दन हा सद्गुरुही आहे. सद्गुरुत एकरूप झालेले एकनाथ म्हणतात या आंधळ्याची विनंती ऐका हो म्हणजेच तशी विनवणी करायला शिका ना हो (अवधारा) !


000000000000000000

अभंग त्रिदल


संत गोरा कुंभार
संत मुक्ताबाई
संत नामदेव
संत गोरा कुंभार
 

संत गोरा कुंभांराच्या अभंगाचा भावार्थ लिहा.

सारांश : निसर्गाने मानवाला वाणी दिली त्यामुळेच इतर प्राण्यांपेक्षा तो वेगळा आहे. अंतरंगातल्या भावसंवेदना व्यक्त करण्यासाठी जिभेचे साधन म्हणजे प्रगतीचे विधान आहे. त्यामुळेच माणूस कोणत्याची गोष्टीची प्रतिक्रिया तात्काळ व्यक्त करू शकतो. मुक्या माणसाला मात्र आपले मन उघड करता येत नाही. सुखदु:ख न सांगता आल्याने आतल्या आत तो घुसमटून जातो. मुक्या माणसाला जरी साखर खायला दिली तरी त्याला तिची गोडी सांगता येत नाही. बोलीच अबोला धारण करते. त्यामुळे शब्दही सुचत नाही.
शब्दाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ ठरते. शब्दच माणसाला अर्थपूर्णता देतात. परंतु जेव्हा शब्दांनाच मुकेपण लाभते तेव्हा संवाद होत नाही. आपला आनंद फक्त मनात राहतो. भक्ती ही अव्यक्त रूप धारण करते तेव्हा ते अद्वैताचे लक्षण असते. परमेश्वर भक्तीचा नि स्तुतीचा हा आनंद मनातच गिळून फक्त गप्प बसावे लागते. त्या परमेश्वराशी तादात्म्य पावले की शब्दांना जागा उरत नाही. रडणारे मूल जेव्हा आईला पिऊ लागते, त्याला जे पाहिजे ते मिळते व ते रडायचे थांबते अगदी तशीच गत संत गोरा कुंभार यांच्या मनाची झाली आहे.
संत नामदेवांशी संवाद साधताना, हा अद्वैत सिद्धांत पटवून देताना संत गोरा कुंभारांनी शब्दापलीकडे परवेश्वर असतो हे सांगितले आहे. मनाची एकाग्रता, तन्मयता, एकरूपता म्हणजे अद्वैत साधणे हाच महत्त्वाचा आनंद संत गोरोबांनी येथे व्यक्त केला आहे.
भक्ती हे मानसिक मुक्तीचे साधन आहे. भक्ती ही मनाची संपन्नता असते. भक्ती ही जगण्याची खरी शक्ती असते. कारण त्यातून भौतिक अहंकाराच्या चौकटी सगळ्या गळून पडतात. आज मात्र ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती आणि गुंडगिरी आहे, तोच चोर बनतो. लोकांना फसविण्यात पाप करण्यात पुढे असणारी माणसे सुखी कशी असणार ? त्यांची तगमग आणि मानसिक भयावस्था हीच त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरते.
माणसाने माणसावर प्रेम करावे. जेथे चांगुलपणा दिसेल तेथे धावून जावे म्हणजे खरा आनंद मिळतो. संत, नामदेवांना वाटले. ‘मी सर्वात चांगला भक्त’ हा मी पणाच न गेल्याने ते मडके कच्चे राहिले. त्यामुळे संत गोरोबांनी त्यांना जीवनमुक्तीचा खरा मार्ग सांगितला. जगाला शहाणे करायचे तर आपण अगोदर शहाणे असले पाहिजे असा संत गोराबांनी येथे उपदेश केला आहे.

00000000000000000000000



संत मुक्ताबाई

संत मुक्ताबाईंच्या अभंगाचा भावार्थ :

सारांश : या अभंगांना ताटीचे अभंग म्हणतात. ताटी म्हणजे दार. आपल्या ज्ञानी भावाचा रुसवा दूर करायला, त्या बारा तेरा वर्षाच्या मुक्ताईला साèया पुरुषार्थाचा खजिनाच त्याच्यापुढे ओतावा लागला ! सामान्य पुरुषाचा तो राग नव्हता ! एकापेक्षां एक सरस असे हे ताटीचे अभंग आहेत. एवढ्याशा लहान मुलीला योग्यांनाही असाध्य असे हे वैराग्य व अनुभव कोणत्याही शाळेत न शिकता कसा मिळाला याचे नवल वाटते !
ज्यांच्यापाशी दया आहे. क्षमा करण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे अशीच मंडळी जगात संत म्हणून ओळखली जातात. ज्यांच्या मनात कशाचा लोभ नाही, ज्यांना कशाचा गर्व नाही. ज्यांनी कशाचा  अहंकार बाळगला नाही अशी मंडळी जगात विरक्त असतात. एकाद्याला कशाचा मोह पडला तर तो माणूस आपण विरक्त म्हणू शकत नाही. आणि या मोहरूपी संसारात माणसाला अनेक गोष्टींचा लोभ जडू शकतो. किंवा अनेक गोष्टींचा अहंकार माणसाला होऊ शकतो. संत माणूसच या सर्व गोष्टीपासून दूर राहू शकतो. ज्याच्या तोेंडात शुद्ध ज्ञान आहे असाच माणूस इहपरलोकी सुखी होऊ शकतो. त्यामुळे ज्ञानेश्वरा साèया खोट्या कल्पना तुम्ही मागे सारा आणि आता दरवाजा उघडा असे आवाहन मुक्ताबाईनी या अभंगातून केले आहे.
00000000000000000000000


संत नामदेव

संत नामदेवांच्या अभंगाचा भावार्थ :

सारांश : या अभंगातून संत नामदेवांनी माणसाने प्रापंचिक जीवनात कसे वागावे याबद्दलचा विचार मांडला आहे. हा संसार मोहरूपी आहे. या जीवनात दुसèया गोष्टीचा मनुष्याला मोह पडू शकतो म्हणून मनुष्याने त्या मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसèयाची बायको ही मातेसमान मानली पाहिजे व त्याच दृष्टीकोनातून तिच्याकडे पाहिले पाहिजे. त्याचप्रमाणे दुसèयाची संपत्तीही आपण दगडासमान (पाषाण) मानली पाहिजे. मनुष्याने संसारात राहताना दुसèयाच्या कल्याणासाठी आपला जीव सार्थकी लावला पाहिजे. दुसèयाचा अंत:करणातील व्यथा ही आपली समजून तिचा परिहार केला पाहिजे. या मोहरूपी संसारात  कोणत्याही गोष्टीची हाव न धरता मिळालेल्या गोष्टीत समाधान मानले पाहिजे.कारण आपण या पृथ्वीतलावर कितीही धन संपत्ती गोळा केली तरी येथून प्रत्येकास कधीतरी परलोकी जायचे आहे. तेथे  जाताना मात्र या साèया गोष्टी येथेच सोडून जाव्या लागणार आहेत. याचसाठी मनुष्याने या मोहमयी गोष्टीत गुंतून न पडता नेहमी संतांच्या सहवासात राहिले पाहिजे. व सतत प्रेमाने हरीचे स्मरण केले पाहिजे. सर्वांच्या प्रती समतेची बुद्धी ठेवूनच संसारातील त्रास पीडा आपण सोडली पाहिजे. परमात्मा हा सर्वकाळी सर्वत्र असतो हा भाव आपण मनात दृढ केला पाहिजे. संत समुदाय जेथे जेथे मिळतील तेथे आपण अगोदर गेले पाहिजे व लोटांगण घालून संतमंडळींचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आणि याची चिंता कधी करू नको तू असे नामदेव सांगतात ही याची खूण मी मनी बाळगली आहे.

00000000000000000000