Sunday, May 19, 2019

फटका



अनंत फंदी

या संदर्भातील  गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी/ऐकण्यासाठी क्लिक करा  CLICK ME


कवितेचा सारांश  : 

अनंत फंदीचे ‘फटके’ हे उपदेशपर फटके म्हणून प्रसिद्ध आहेत. यातून जनसामान्यांना सरळमार्गी आयुष्य व्यतीत करण्याचा उपदेश केलेला आहे. संसारामध्ये गुंतलेल्या माणसांने संसारातच आपले मन रमवावे उगीच आपले इकडे तिकडे भटकत फिरू नये. कठीण वाट  ही वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको असा उपदेश अनंत फंदी करतात. येथे निष्पापपणाचा आव आणून उगाच खोट्या मिजासकी मारीत फिरू नये. अंगात सदा नम्रता असावी उगीच कुणावर राग धरू नये. आपणाला समाजातील देवतांविषयक काही गोष्टी पटत नसल्या तरी लोकांच्यात तसे दाखवू नये. नास्तिकपणा आपण लोकांच्यात दाखवू लागलो तर लोकं आपणाला नाव ठेवतात. यासाठी ते आपण टाळावे. आपण काहीही भले केलो तरी अधर्म मार्गाने ते करू नये. वाईट मार्गाला आपण जाऊ नये. तो टाळावा. आपल्या आई वडिलांवर रूसून दूर एकटा बसू नको असे सांगतानाच माणसाने कधी रिकामटेकडे बसू नये आणि पोट भरण्यासाठी नस्त्या उचापती करू नये. आणि व्यवहार करताना फसू नये असे सांगितले आहे.
एखाद्याशी बोलताना आपण सांभाळून बोलावे दुसèयाचे वर्म (उणीव) काढून त्याला शरमायला लागावे असे वाईट बोलू नये. एखाद्याचा हेवा करून दुसèयाचा ठेवा बुडविण्यासाठी झटू नये. या जगात मी काय तो तेवढाच शहाणा, मीच काय तो श्रीमंत, माझ्यापाशी तेवढीच संपत्ती हा गर्व उगाच बाळगू नये. या जगात एकापेक्षा एक वरचढ असे लोक आहेत त्यामुळे स्वत:च्या थोरपणाला मिरवू नको. आपल्या बळाच्या जोरावर गोरगरिबांवर गुरकावू नये. आपल्या हाती आलेली सत्ता ही कायमस्वरूपी आपल्याकडे राहणार नाही आहे. दोन दिवसांनी ही सत्ता जाईल अपयशही माथी घेऊ नकोस. कर्ज मिळतय म्हणून ते घेऊन कर्जबाजारी होऊ नये त्यामुळे आपला मान,रूबाब आपण गमावून बसू नये. आपल्या मित्रांसाठी प्रसंगी पदरचे पैसे खर्च करावेत परंतु जामीन कोणाला राहू नको असा सल्ला फंदी देतात. उगीच भरीस पडून पैजेचा विडा उचलू नये किंवा कुणाला कमी माप देवू नये. कुणाची वस्तू आपल्याकडे गहाण असतील तर ती डुबवू नये तसेच आपल्याकडे सर्व गोष्टी असतील तर भीक मागत फिरू नये. आणि काहीच जर आपल्यापाशी नसेल तर कोणी भीक माग म्हणून सांगायची गरज नाही हे गाव तुझेच आहे. भीड न करता भीक माग असे सांगतात.
स्वत:च्या हितासाठी उगीच कुणाची निंदा किंवा स्तुती करू नकोस. एकवेळ शहाण्याची खुशामत करावी परंतु मूर्खाची मैत्रीसुद्धा करू नये. येथे कष्टाला, श्रमाला महत्त्व देताना फंदी सांगतात कष्टाने मिळविलेली भाजी भाकरी गोड लागते परंतु तूपसाखरेची चोरी करू नये. घरी आलेल्या पाहुण्याला मूठभर द्यायला मागे पुढे पाहू नको. देवाने दिलेल्या स्थितीतच सुख मानावे त्याला कधी कंटाळू नको. कष्ट करून धनाचा संचय करावा परंतु सत्कार्यासाठी खर्च करताना मागे हटू नको. सत्कर्मासाठी मागे ओसरू नको. मग सर्वत्र तुझ्या सत्कीर्तीचा डंका वाजेल यात शंकाच नाही. चांगले विचार करण्यास संकोच करू नकोस तसेच सत्संगतीपासून दूर जाऊ नकोस किंवा द्वैताला (दुही) अनुसरू  नकोस देवाचे नामस्मरण करण्यास विसरू नको. तसेच या अनंत फंदीचे फटके गाण्यासही मागे सरू नकोस......... असा उपदेश फंदी करतात.


000000000000000000000000000000000000000

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024