Sunday, May 19, 2019

प्रेमस्वरूप आई !

माधव जूलियन

  या संदर्भातील गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी  क्लिक करा CLICK ME

                                    

 कवितेचा  सारांश :

 ‘प्रेमस्वरूप आई !’ या कवितेचे खरे नाव  ‘‘आईची आठवण’’ असे आहे. तिचा वाङ्मयप्रकार गज्जल आहे. माधवराव जूलियनांनी आपल्या काव्यात कौटुंबिक जीवनातील अनेक भावनांना आपल्या काव्यात स्थान देऊन प्रत्यक्ष जीवनातील हा रितेपणा भरून काढला असे दिसते. उदा. त्यांची  ‘‘आईची आठवण’’ ही कविता. आईवर प्रसिद्ध झालेल्या तत्कालीन कवितेतील ही कविता अग्रस्थान पटकावणारी आहे. माधवरावांच्या पोरक्या जीवनात या विषयाला विशेष महत्त्व असल्याने ही कविता अत्यंत भावनोत्कट व सरस उतरली आहे.
ही कविता म्हणजे मातृप्रेमाचे एक महन्मंगल स्तोत्र आहे. मातृप्रेमाचा कवीच्या अंत:करणात जो एक स्त्रोत वाहत आहे त्याच्या ओलाव्याने ही कविता न्हावून निघाली आहे. कवीच्या ज्ञात जीवनात आईच्या वात्सल्य प्रेमाचा अनुभव त्यांना आलेला नाही. प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधू आई ! असे गौरवगीत गाऊन माधव जूलियनांनी ‘आईची’ आठवण केली आहे. ही कविता वाचून कवी यशवंतांच्या ‘आई’ या कवितेची, त्यातील काही काही शब्दांची, भावनांची व विचारांचीही आठवण होण्यासारखी आहे.    आईच्या वियोगाने कवी आईला आता तुला मी आता कोणत्या उपायी बोलावू असा प्रश्न करीत आहे. आई गेल्यानंतर या जीवाची (कविची) जगात आबाळ झाली नाही. परंतु आईची उणीव मात्र त्याला सतत भासली आहे. तिची उणीव त्याला जाणवत आहे. आईची रूपरेखा कवीला नीटशी आठवतही नाही आहे तरीसुद्धा त्याला आई हवी आहे.  आई हवी आहे म्हणून तिचा हेका कवीचे मन सोडायला तयार नाही. आज कवीने आपल्या बळावर विद्या, धन व प्रतिष्ठा प्राप्त केली आहे तरी आईविना पोरका असल्याची पोरकेपणाची जाणीव नष्ट होत नाही. ‘सारे मिळे परंतु, आई पुन्हा न भेटे’ हा विचार कवीला अस्वस्थ करून सोडीत आहे. आईची भेट न झाल्यामुळे कवीच्या हृदयात जणू आगडोंब पेटला आहे! तिच्या वियोगामुळे कवीस खूप दु:ख होत आहे.  ब्रह्मांड आठवू लागले आहे. त्यामुळेच कवी तिला आवाहन करीत आहे की कैलास सोडून उल्केसमान वेगाने तू परत माझ्याकडे ये. का तुझा आत्मा माझ्याभोवतीच फिरत आहे?  आणि म्हणूनच या मायेच्या धारा तुझ्या अव्यक्त डोळ्यातून वहात आहेत ? अन्य आयांचे वात्सल्य पाहून माझ्यासारख्या पोरक्या मुलाची भूक शमत नाही आणि म्हणूनच या मनात कोणत्या आशा नाचतात ? हे कवीने फार सुंदररित्या व्यक्त केले आहे. दुसèयाचे वात्सल्य पाहून त्याला अधिकच हुरहुर लागली आहे.
वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !
तुझ्यापोटी पुन्हा जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे असे कवी म्हणतो.
कवी गिरीश म्हणतात त्याप्रमाणे ‘आई’ वरील कवितात प्रस्तुत कवितेचे स्थान फार मोठे आहे. या कवितेतील भावनोत्कट आहे. पण हे सर्व आत्मकथन खèया दिवंगत आईला उद्देशून केलेले नसून एका काल्पनिक मातेभोवती कवीच्या या भावना पिंगा घालीत आहेत हे लक्षात घेतले तर अतीव संवेदनारूप कवीच्या जीवनात प्रत्यक्षात किती रितेपणा होता याची कल्पना येऊन कवीच्या जीवनात प्रत्यक्षांत किती रितेपणा होता याची कल्पना येऊन कवीच्या दैवदुर्विलासाबद्दल एकप्रकारची रूखरूख लागते. कवीची प्रेमळ मातेची कल्पनाही या काव्यात अतिशय चेतोहरपणे समूर्त झाली आहे.
 लता मंगेशकर यांनी हे गीत गायिले आहे. त्याला वसंत प्रभू यांनी संगीताचा साज चढविला आहे. मधमाद सारंग या रागात हे गीत गायिले आहे.

माधव जूलियन हे नाव का ?

कवी गिरीश म्हणतात, माधव जूलियन या गंगाजमनी नावाबद्दल लोकांच्या मनात अगदी प्रथमपासून कुतूहल निर्माण केले आहे. सुप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकर्ती मेरी कॉरेली हिने ‘गॉडस् गुड मॅन’ ही कादंबरी लिहून तीत ‘जूलियन अ‍ॅडरले’ या नावाचे एक पात्र निर्माण केले आहे. ही व्यक्ती म्हणजे एक शिक्षककवी आहे. तीवरून माधवरावांच्या सहाध्यायी प्रेयसीने (काशीबाई हेर्लेकर यांची कन्या शांताबाई हेर्लेकर) त्यांना ‘तुम्ही त्या जूलियन अ‍ॅडरलेसारखे आहात’  असे सहज लीलेने म्हटले त्याबरोबर माधवरावांनी  ‘जूलियन अ‍ॅडरले’ हे नाव धारण केले व त्या नावाने ते पत्रे व कविता लिहू लागले. आधीच त्यांनी ‘महादेव’ या स्वत:च्या नावाचे ‘माधव’ असेे नाव केले होते. त्यात पुन्हा हे नवीन नाव त्यांनी धारण केले. परंतु कालांतराने यातील ‘अ‍ॅडरले’ ही काढून टाकून ‘माधव जूलियन’ हे नाव कायम केले. हे नाव पुढे पुष्कळच प्रसिद्धी पावले व मराठीचा जाज्ज्वल्य अभिमान जागृत होऊनही, मग ते बदलणे हे त्यांच्या हातात राहिले नाही.

ही आई कोण ?

सदर कविता ही कवीने आपल्या आईवर लिहिलेली नाही तर बडोद्यास रहात असताना त्यांच्या शेजारी असलेल्या व ‘आदर्श आई’ म्हणून लाभलेल्या प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधु आईचे म्हणजे श्रीमती काशीबाई हेर्लेकर यांचे हे स्तोत्र आहे.
000000000000000000000000000000

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024