Sunday, May 19, 2019

आचंद्रसूर्य नांदो


ग.दि. माडगूळकर

 गाणे युट्यूब वर ऐकण्यासाठी क्लिक करा click me

                                         


सारांश : 


‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ओळखल्या जाणाèया गजानन दिगंबर माडगूळकर ऊर्फ गदिमा यांची ही अप्रतिम कविता कम गीत आहे. आपला प्रियतम भारत देश किती महान आहे हे एक स्तवनात गदिमांनी ओजस्वी शब्दात शब्दबद्ध केलेले आहे.  कवीने हे राष्ट्र देवतांचे व प्रेषितांचे आहे असे संबोधून भारताचा गौरव केला आहे.  अशा या महान भारत देशाचे स्वातंत्र्य पृथ्वीतलावर जोवर सूर्य,चंद्र उगवत आणि मावळत आहेत तोवर अखंड राहो अशी चिरंजीवी प्रार्थनाच त्यांनी या स्तवनात केलेली आहे. हा देश म्हणजे सीतारघूत्तमाची कर्तव्यदक्षभूमी आहे आणि येथे पराक्रमाची रामायणे घडावी. भारताच्या संरक्षणाची जबाबदारी पेलत असलेल्या हिमालय पर्वताचे हे शिर उंच व्हावे अशी अपेक्षा कवीने व्यक्त केली आहे.
थोडा पराभव झाला म्हणून आम्हाला निराशा येत नाही. कारण याच देशात युद्धभूमीवर कृष्णाने अर्जुनाला भगवतगीतेद्वारा उपदेश केला आहे. हा देश भगवतगीतेचे स्तन्य प्याला आहे म्हणजेच भगवतगीतेतील गोष्टी व त्यातील बोध, संस्कारातूनच या देशातील जनतेचे पालनपोषण झाले आहे. म्हणून आम्ही पराभवाची चिंता कधी बाळगीत नाही.
या भूमीतच आपणास सामर्थ्य आणि संयमाचा मेळ साधला गेलेला दिसतो. जगाला शांतीचे धडे देणाèया सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म या देशातच झाला आहे. ही भूमी म्हणजे भगवान तथागताची आहे. त्यामुळे हे अत्यंत पुण्यदायी क्षेत्र आहे.
हे राष्ट्र म्हणजे विक्रमांचे  व शांततेचे राष्ट्र आहे.  सत्यासाठी झुंज द्यावी ही या भूमीतील जागती प्रथा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हे या भूमीत होऊन गेलेले थोर राज म्हणजे नरसिंह योग्यतेचे आहेत असे कविला वाटते.
चांगल्या परंपरांचा अभिमान बाळगणारी अशी ही भूमी आहे. येथे नेहमी परंपरांचा सन्मान केला जातो. कारण येथील जनशासनाचा जो पाया आहे तोच मुळी ‘सत्यावर’ आधारलेला आहे. यामुळे अशा या पवित्र मंगलमय भूमीत जागृताचे जयगीत सदा निनादत राहो असे कवीला वाटते.
या देशभक्तीपर गीताचा वापर ‘घरकुल’ नावाच्या सिनेमात करण्यात आला आहे. हे गीत राणी वर्मा यांनी गायिले असून सी. रामचंद्र यांनी त्याला संगीताचा साज चढविला आहे. या गीताची चाल इतकी सुरेख आहे की ते गीत ऐकले की विद्यार्थ्यांना ही कविता पटकन पाठ होऊन जाते.

 Gamyachi Link  CLICK ME

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024