Sunday, May 19, 2019

हिरवळ आणिक पाणी

 बा.भ. बोरकर



सारांश : 


कवी बा.भ. बोरकर यांनी निसर्ग आणि माणसे यांच्या सान्निध्यात कविता कशा स्फुरतात याचे प्रत्ययकारी वर्णन या कवितेत केले आहे. निसर्गातील प्रतीकांतून त्यांनी मानवी भावभावनांचे सुंदर शब्दात चित्रण केले आहे.
जिथे गवताची हिरवी पाती डोलतात आणि वाहते पाणी असते, त्या निसर्गात मला गाणी स्फुरतात. आकाशाच्या निळाईतून पांढरी पाखरे थव्यांनी किलबिलत उडत जातात, तिथे मला गाणी स्फुरतात.
माळरानावर गुरेवासरे सुखाने चरत असतात. वाèयाच्या झुळकेमुळे कोवळ्या गवताच्या लवेतून थरथर लहरत जाते. जिथली हवा इतकी गार आणि आरशासारखी स्वच्छ आणि निरोगी आहे की जणू त्या हवेतून आरोग्य खेळत असते, असल्या शुद्ध मोकळ्या हवेत मला गाणी स्फुरतात.
मातीचा जिव्हाळा हृदयात साठवून झाडाची हिरवी सावली उन्हावर आपली माया पसरते. झाडाच्या पानापानांतून कोवळी आनंदाची पाझर (ओल) सांडत जाते, तिथे मला गाणी सुचतात.
जिथे अशा प्रकारची समृद्ध धरती आहे. जिथे घराघरांतून पोराबाळांचा आवाज घुमतो. माहेराच्या नैसर्गिक सौंदर्याने जिथे कष्ट करणारी कुलवधू नांदते, तिथे मला गाणी स्फुरतात.
मैत्रीशिवाय जिथे कोणतेही बंधन नाही. जिथे स्मितामध्ये शरद ऋतूतील चांदण्यासारखे मधुर आमंत्रण आहे. जिथे मुखातून सहज निघालेल्या बोलांमध्ये गडद चांदणे आहे आणि जिथे स्पर्शामध्ये शीतल स्नेह, प्रेमभाव आहे, तिथे मला गाणी सुचतात.
जिथे प्रत्येक ऋतूत उघड्यावर मोकळेपणी सोहळे साजरे होतात आणि जिथे अंगणामध्ये प्रीतीची निर्मळ अमृतासारखी बोलणी बोलली जातात. जिथे शुद्ध मनमोकळ्या गोड गप्पा रंगतात, तिथे मला गाणी सुचतात.
जिथे माणूस हवाहवासा आपलासा वाटतो. जिथल्या अभंग ओव्यांमधून जगण्याचे आश्वासन मिळते. जिथले जीवन एकमेकांच्या विश्वासावर चांगल्याप्रकारे स्थिर आहे व निष्ठा अगदी प्रामाणिक आहे, तिथे मला गाणी स्फुरतात.
जिथे प्रत्येक हृदयात नेहमी देव वसतो. जिथे भविष्याचा भार मनात नसतो. दुसèयाच्या सुखाने जिथे मनात समाधानाची हिरवळ पसरते आणि दुसèयाच्या दु:खाने डोळ्यांत पाणी तरळते, तिथे मला माझी गाणी सुचतात असे कवी म्हणतो.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024