Sunday, May 19, 2019

राजे लोकीं बहुत सगुण असावें


रामचंद्रपंत नीलकंठ अमात्य
रामचंद्रपंत नीलकंठ अमात्य

सारांश : 


हा पाठ म्हणजे यादवकालीन गद्याचा उत्कृष्ट नमुना आहे. शिवशाहीतील राजनीतीचे अनेक विशेष आज्ञापत्रातून विशद होतात. आपल्या अधिकाèयांनी प्रजेशी कसे वागावे याच्या सूचना देणारे हे आज्ञापत्र आहे. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू यातून दिसून येतात. मानवी स्वभावाची उत्तम जाण असणारा प्रजाहितदक्ष राजा, मार्मिक निरीक्षणशक्ती, राज्यरक्षण हेच ध्येय बाळगणारा सुव्यवस्थित व दूरदर्शी राज्यकारभार करणारा अनन्यसाधारण, निष्ठावान, कर्तव्यदक्ष, अर्थशास्त्र जाणणारा, जनकल्याणाचा आग्रह धरणारा लोककल्याणकारी राजा. या आज्ञापत्रातील भाषा प्रशासकीय आहे. सूत्रबद्ध संवेदनशील अत्यंत सावध, काय करावे, काय करू नये असे सांगणारी आणि आदेशात्मक सुस्पष्ट अशी भाषा आहे.

आज्ञापत्रातील तिसèया प्रकरणातील भाग येथे संक्षिप्त स्वरूपात घेण्यात आला आहे. या प्रकरणात  प्रथम जनतेच्या हितासाठी व धर्मरक्षणाकरिता ईश्वराने राजा निर्माण केल्याबद्दलची हकीकत सांगितली आहे. जसा राजा तशी त्याची प्रजा या न्यायाने राजावरील जबाबदारी  फार महत्त्वाची ठरते राजाच्या अंगचे गुण, त्याची कर्तव्ये, प्रजेशी त्याचे वर्तन, स्वसंरक्षणाविषयी त्याने घ्यावयाची सावधगिरी सेवकांशी त्याची वर्तणूक, त्याचे शिक्षण, विद्या शास्त्र व कला याविषयी त्याची दृष्टी, कारभारी व मंत्री वा अधिकारी व इतर जबाबदार सेवक यांशी त्यांचे वर्तन राज्यरक्षणाविषयी त्याने घ्यावयाची काळजी, खजिन्याच्या वाढीबद्दलचे त्याचे धोरण, हुजरातीची त्याने करावयाची व्यवस्था, त्याने करावयाचा मनुष्यसंग्रह इ. विषयी आज्ञापत्रकारांनी फार बारकाईने सूचना केल्या आहेत. ‘राजा कालस्य कारणम’या वचनावर त्यांचा विश्वास असल्याने राजावरची जबाबदारी फार मोठी मानली गेली आहे. राजा हा प्रत्यक्ष ईश्वराने प्रजेच्या रक्षणार्थ निर्माण केलेला असल्याने त्याने आपले कर्तव्य अत्यंत दक्षतेने पार पाडावयास हवे. राजे लोकांनी गुणमंडित व्हावे असा निष्कर्ष आज्ञापत्रकारांचा आहे.
 या सगळ्या सृष्टीचा निर्माता हा ईश्वर आहे. त्याचे सर्व गोष्टीवर नियंत्रण असते. त्यानेच राजाची सर्वप्रथम निर्मिती केली आहे. राजाही इतर लोकांसारखाच एक. परंतु समाजात प्रत्येक व्यक्ती ही भिन्न स्वरूपाची असते. परंतु राजा हा स्वत: ईश्वराचा अंश आहे ही कल्पना प्राचीनकाळी सर्वत्र रूढ होती. अनेकविध प्रकृतीच्या लोकांचे रक्षण करून त्यांना धर्मप्रवण बनविण्यासाठी परमेश्वराने राजा निर्माण केला व त्यास राज्य मिळवून दिले. या श्रद्धेतील भावार्थ इतिहास काळातील रसिकता आठवून ध्यानात घ्यावयास हवा. राजा नसता तर आपसात विरोध करून सारी प्रजा नष्ट होईल असे होऊ नये यासाठीच राजाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी राजाची आहे. आपली सारी प्रजा ही निरूपद्रवीन होता ती धर्मपथप्रवर्तक असावी त्या लोकांना धर्मप्रवण बनविण्यासाठी परमेश्वराने राजा निर्माण केला व त्यास राज्य मिळवून दिले. ही ईश्वराचीच आज्ञा आहे. ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे न वागल्यास क्षोभ होईल ही भीती पूर्णपणे हृदयात बाळगून राजाने नेहमी नम्र राहून प्रजेच्या हिताचा विचार केला पाहिजे.  जे काही आपले चांगले होईल ते ईश्वरामुळेच होत असते त्यामुळे ईश्वराच्या आज्ञेचे पालन करून ईश्वरास शरण असावे. परंपरागत धर्म आचरून कीर्तिलाभ करावा. दुसèयाचे आधीन न होता सेवक लोकांनी केलेल्या सेवेची निंदा किंवा अपमान न करता यथान्याय यथाधिकार यथोचित सेवकांशी वागावे. वाडवडिलांनी आचरण केलेल्या परंपरागत धर्माचे आचरण करून कीर्तिलाभ करावा. सगळ्या कार्यामध्ये अपकीर्तीचे भय बाळगावे. धर्मरक्षण हे राजाचे प्रमुख कर्तव्य सांगितले आहे किंबहुना मानवी जीवनाचे एक प्रधान अंग म्हणजे धर्म असल्याने तेच एक रक्षणीय अशीही श्रद्धा प्राचीन परंपरेत होती. त्यामुळेच धर्माचरण करण्याबरोबरच ब्राह्मण, वैदिक, शास्त्रज्ञ, निस्पृह, अयाचित, वनवासी, तपस्वी, सत्पुरुष यांच्याप्रती परमनिष्ठा व्यक्त करून ते जेथे असतील तेथे त्यांच्या चरितार्थाची सोय करून देऊन त्यांना संतुष्ट करावे व आपल्या कल्याणभिवृद्धीविषयी आशीर्वाद घ्यावा. वेषधारी फकीर, जोगी, जंगमादी जे केवळ भुताटकी करून फिरणारे आहेत यांच्या पाठीमागे लागू नयेत. त्यांच्यावर विश्वास दाखवू नये. त्यांच्या नादी न लागता थोडी भिक्षा  देवून बाहेरच्या बाहेर मार्गी लावावे. तपस्वी, शीघ्रकोपी यांचा सहवास न करता दुरूनच त्यांचा परामर्श घेऊन ते संतुष्ट होतील, आशीर्वाद देत राहतील असे करावे.आंधळे, पांगळे, आतुर, अनाथ, अनुत्पन्न जे असतील त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवून तेे जिवंत असेपर्यंत त्यांच्या चरितार्थाची सोय करून द्यावी. आणि हे तत्कालीन शिवशाहीच्या राजनीतीस धरूनच आहे.

 युद्धाव्यतिरिक्त स्वशरीर संरक्षणाविषयी राजे लोकांनी स्वत:च्या रक्षणाविषयी किती जागरूक असावे याविषयीचे फार मार्मिक विवेचन रामचंद्रपंत अमात्यांनी केले आहे. राजाने युद्धाव्यतिरिक्त इतर वेळीही अत्यंत सावध असले पाहिजे. पाकालय, जलस्थान, फलस्थान, वसनागार इ. नाजूक महालाच्या ठिकाणी तसेच प्रमुख कारखाने याठिकाणी माणसांची नेमणूक करताना त्यांची चांगली परीक्षा घेऊन त्यांची नेमणूक करावी. ते अतिशय विश्वासू, प्रामाणिक व निर्लोभी असले पाहिजेत. नेमणूक केलेल्या माणसांना त्याचा अधिकार मिळवून देऊन अधिकारपरत्वे सर्वांवर सारखाच लोभ केला पाहिजे.  त्यांच्या चरितार्थाची अशी सोय करून दिली पाहिजे की जेणेकरून तो दुसèयांकडे काही अपेक्षा करणार नाही.
आपल्याजवळील सेवक नेमताना ते अत्यंत विश्वासू, सूज्ञ, आपला मनोभिप्राय जाणून वागणारे, मनातील भाव जाणणारे, शूर, दर्शनीय असावेेत. आपल्या कामात हलगर्जीपणा न करणारे, निर्दयी, दुराग्रही व दुष्ट वृत्तीचे नाहीत याची पारख करूनच त्यांची नेमणूक करावी. हा नेमणूकीविषयीचा त्यांचा बारकावा चिंतनीय आहे. राजे लोकांना विनोदाचे व्यसन नसावे. कारण विनोद करताना सुहृद झाले तर सेवक लोकांशी विनोद करीत असताना विनोदात मर्यादा राहत नाही व आपणच आपली मर्यादा उणी करून घेतली असे होते. विनोदाविषयीचे त्यांचे हे सूत्र व त्याचे स्पष्टीकरणही अतिशय मार्मिक आहे.
खजिना म्हणजे राज्याचे जीवन असते. जमाखर्चाचा विचार करून त्यात कशी भर पडत जाईल ते  पाहिले पाहिजे. कारण संकटाच्या प्रसंगी हा खजिनाच सर्व गोष्टींचा परिहार करण्यास उपयोगी पडू शकतो. ही गोष्ट ध्यानात ठेवूनच खजिन्यात भर घालत गेली पाहिजे.
सेवक लोकांचे वेतन निश्चित करावे व वेळेवर ते त्यांना मिळेल याची दक्षता घ्यावी. एखाद्या सेवकाने विशेष कार्य केले तर त्यास बक्षीस म्हणून काहीतरी द्यावे. तèहेवाईक, शेरखोर (उन्मत्त), अमर्याद, बालभाष्य, व्यसनी, कुचोद्य (कुचाळे करणारे) व एका धन्यापासून हरामखोरी (गद्दारी, विश्वासघात) करून आला असेल असे लोक आपल्या सैन्यात (हुजरात) ठेवू नये. राजाने लहान अथवा थोर असू दे कोणत्याही सेवकाचा दोष आपल्या तोंडातून दुसèयाकडे उच्चारित जाऊ नये. एखाद्या सेवकाचा दोष आढळल्यास दुसèयाजवळ तो बोलू नये. आपल्याच हृदयात ठेवून त्याच्यावरील उपायांची योजना करावी.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024