Thursday, May 23, 2019

ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म

        

 प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. येशू ख्रिस्ताचा जन्म ................ येथे झाला.

2. येशू ख्रिस्ताला ................ या टेकडीवर क्रुसावर चढविण्यात आले.

3. ................ च्या राजवटीत ख्रिश्चन धर्म रोमन साम्राज्याचा राज धर्म बनला.

4. मोहम्मद पैगंबराचा जन्म ................ येथे झाला.

5.         इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ ................ होय.

6. मोहम्मद पैगंबरांच्या उत्तराधिकाèयांना ................ म्हणतात.

उत्तरे : 1. बेथलहेम 2. गोलगोथा 3. कॉन्स्टन्टाईन 4. मक्का 5. कुराण 6. खलिफा

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. येशू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल माहिती लिहा ?

उत्तर : 1. येशूच्या प्रारंभिक जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्याचा जन्म ज्युडिया प्रांतातील बेथलहेम  येथे झाला. 2. जोसेफ आणि मेरी या गरीब दांपत्याचा तो एकुलता मुलगा होता. 3. त्याचे अरेबिक व सेमिटिक भाषांवर त्याचे प्रभुत्व होते. 4. यहुदी लोक त्याला त्यांचे रक्षण करणारा मसीहा’ किंवा महारक्षक’ असे संबोधत. 5. येशू आपल्या जवळ येणाèयांना बाप्तिस्मा (दीक्षा) देत असत. 6. जॉनने येशूला मसीहा’ किंवा महारक्षक’ म्हणून लोकांसमोर आणले. त्यावेळी येशू 30 वर्षाचा होता. 7. येशूने देशभर फिरून धर्मप्रसार व उपदेशाचे कार्य केले. कालांतराने आपला धर्मप्रमुख म्हणून यहुदींनी (ज्यू) येशूचा स्वीकार केला. 8. येशूला सुरुवातीस 12 अनुयायी लाभले. त्यांना अ‍ॅपॉस्टल्स म्हणतात. पीटर हा त्यांचा प्रथम अनुयायी होता. 9. येशूच्या मनात दीन दुबळ्यांबद्दल अपार दया होती. आपल्याजवळील अलौकिक दैवी शक्तीच्या जोरावर त्यांने दीन दुबळ्यांना रोगातून बरे केले. बहुजनांचे रक्षण केले. 10. येशू हा अर्थहीन धार्मिक कृत्यांवर उघडपणे टीका करीत त्यामुळे ज्यू धर्मगुरु त्याच्या विरुद्ध होते. 11. येशूची लोकप्रियता रोमन सम्राटास सहन झाली नाही. रोमन गव्हर्नर पाँटियस पिलेटसच्या आज्ञेनुसार त्याला गोलगोथा टेकडीवर क्रूसावर चढविण्यात आले.  12. येशू ख्रिस्ताची शिकवण ही आचरण्यास अत्यंत साधी व सुलभ होती.

2. येशू ख्रिस्ताच्या शिकवणींची यादी करा.
उत्तर : येशू ख्रिस्ताची शिकवण ही आचरण्यास अत्यंत साधी व सुलभ होती. ती कथा किंवा दृष्टांताच्या रूपात त्यांने सांगितली. त्याची शिकवण प्रेमसेवा आणि बंधुभाव यावर आधारलेली होती ती पुढीलप्रमाणे - 1. देवाला पित्याच्या स्थानी मानावे तसेच सर्व माणसे ही ईश्वराची लेकरे आहेत. 2. माणसा माणसात बंधुभाव बाळगावा. 3. कोणत्याही खर्चिक व धार्मिक कर्मकांडावर विश्वास ठेवू नये. 4. मानवाने आपण केलेल्या पापाची कबुली देवाजवळ द्यावी तेव्हा देव त्याला क्षमा करतो. 5. दुसèयांनी आपल्याशी कसे वागावे  असे आपल्याला वाटते तसे प्रथम तुम्ही दुसèयाशी वागा. 6. मानवाची सेवा करा तीच देवाच्या सेवेच्या सेवेसमान आहे. यावर त्याने जास्त भर दिला.

3. ख्रिश्नन धर्माचा प्रसार कसा झाला ?
उत्तर : रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईनच्या कारकीर्दीत ख्रिश्चनधर्म रोमन साम्राज्याचा राजधर्म बनला. त्यानंतर ख्रिश्चन धर्माचा संपूर्ण युरोप खंडात प्रसार झाला.

4. मोहम्मद पैगंबरांच्या जीवनाबद्दल माहिती लिहा.
उत्तर : मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक होत. 2. त्यांचा जन्म ख्रिस्त शके 570 मध्ये मक्का येथे झाला. 3. त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल्ला व आईचे नाव अमीना असे होते. 4. याच्या जन्माच्या आधी काही महिन्यापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. तर तो 6 वर्षाचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. 5. अनाथ झालेल्या मोहम्मदचे पालनपोषण त्याचे काका अबूतालिब यांनी केले. 6. अबू तालिब हे व्यापारी असल्यामुळे मोहम्मदनेही त्यांच्याबरोबर अनेक प्रदेशांचा प्रवास केला. 7. मोहम्मद एका विधवेच्या घरी नोकरी करीत असताना त्याच विधवेशी त्याचा विवाह झाला. त्याला दोन मुले आणि चार मुली होत्या. 8. मोहम्मद सदैव चिंतनात मग्न असे आणि एकटाच प्रार्थना करीत बसे. एक दिवस चिंतन करीत असताना त्याला देवदूत गॅब्रियलचा आवाज त्याने ऐकला. तो देवदूत मोहम्मदला म्हणाला तू अल्लाचा प्रेषित आहेस.’ 9. मोहम्मद पैगंबराने नंतर सर्वांना आपण अल्लाचा प्रेषित असल्याचे पटवून दिले. त्याने स्वत:ला कधीच देव म्हटले नाही. 10. त्याला आयुष्यात अनेक दृष्टांत झाले. अशा प्रसंगी तो काहीतर गूढ शब्द पुटपुटत असे त्याचे ते विचार नंतर कुराण’ म्हणून पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले.

5.  हिजरा  म्हणजे काय ?
उत्तर : मक्केमधील मूर्तीपूजा करणाèया सांप्रदायिक लोकांनी (क्युरेशी) मोहम्मद पैगंबरला विरोध करण्यास प्रारंभ केला. यामुळे मोहम्मदाने इ.स. 622 मध्ये मक्केहून मदिनेस प्रयाण केले.  ही प्रयाणाची घटना इतिहासात हिजरा’ या नावाने प्रसिद्ध आहे.

6. इस्लाम धर्माचे नियम कोणकोणते ?
उत्तर : इस्लाम धर्माच्या प्रत्येक अनुयायांनी पाळावयाचे व आचरणात आणण्याचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. 1. देव एकच आहेतो म्हणजे अल्ला. व मोहम्मद पैंगबर हा त्याचा प्रेषित आहे. यावर दृढविश्वास ठेवणे. 2. दिवसातून पाच वेळा पवित्र अशा मक्केकडे तोंड करून प्रार्थना (नमाज) करणे. 3. रमजान महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापासून निर्जल उपवास करणे. 4. श्रीमंतानी आपल्या मिळकतीच्या 1/4 भाग गरजू व दीनदुबळ्यांना दान करणे. 5. जीवनात एकदा तरी मक्केची यात्रा (हाज यात्रा) करणे.  





No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024