Thursday, May 23, 2019

मध्ययुगीन भारत व राजकीय घडामोडी



प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. प्रतिहारच्या गुर्जर घराण्याची स्थापना ............... यांनी केली.

2. पृथ्वीराज चौहानने ............... मोहम्मद घोरी याला तरायनच्या पहिल्या लढाईत पराभूत केले.

3. ............... हा मोहम्मद घोरीचा सेनापती होता.

4. ............... हा दिल्लीच्या सुलतानपदी बसलेली पहिली स्त्री राज्यकर्ती होती.

5.         खिलजी घराण्यातील ............... हा प्रसिद्ध राज्यकर्ता होय.

6. तुघलकाच्या काळात राजधानी दिल्लीचे स्थलांतर ............... येथे करण्यात आले.

उत्तरे : 1. हरिश्चंद्र 2. मोहमद घोरी 3. कुतुबुद्दीन ऐबक 4. रझिया सुलतान 5. अल्लाउद्दीन खिलजी 6. देवगिरी

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. राजपूतांनी साहित्याच्या क्षेत्रात घातलेली भर याबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तर : राजपूतांनी एनक विद्वानांना प्रोत्साहन देऊन साहित्याच्या क्षेत्रात मोलाची भर घातली. 1. भोज आणि मुंजा राजे स्वत: विद्वान होते. मुंजा राजाने पद्मगुप्तहलायुद्ध यांना राजाश्रय दिला होता.  2. राजा भोजने  शांतीसेनप्रभाचंद्र सुरीधनपल या जैन विद्वानांना आश्रय दिला होता. 3. जयदेवाचे गीत गोविंदभारवीयाचे किरातार्जुनभर्तहरिचे रावणवधमहिंद्रपालाची काव्यमीमांसा या काळातील महत्त्वाच्या साहित्यकृती होत. 4. चांद बरदाईचे पृथ्वीराज रासो’ आणि बल्लाळाचे भोजप्रबंध’ ही चरित्रे प्रसिद्ध आहेत.  5. नाटककार राजशेखर यांने रचलेले बाल रामायण’  कर्पूर मंजिरी’ तसेच भवभूती हा संस्कृत कवी होता त्यांने मालती माधवमहावीर चरित्र व उत्तर राम चरित्र या संस्कृत साहित्यकृतीची निर्मिती केली.  कल्हणची ऐतिहासिक कृती असलेले राजतरंगिणी’, जयनिकरचे पृथ्वीराज विजय’ आणि हेमचंद्रचे कुमारपाल चरित्र’ महत्त्वाच्या साहित्यकृती आहेत. तसेच हेमचंद्रने देशीनाम माला नावाचा प्राकृत भाषेतील शब्दकोष लिहिला. 6. या काळात गुजरातीराजस्थानी आणि हिंदी भाषांची प्रगती झाली. नालंदाकाशीविक्रमशीला आणि उज्जैन या विद्यापीठांना प्रोत्साहन मिळाले होते.

2. इल्तमशच्या राज्यव्यवस्थेचे वर्णन करा.
उत्तर : इल्तमश हा अतिशय चाणाक्ष राज्यकर्ता होता. त्याने आपले राज्य अनेक इख्त (प्रांत) मध्ये विभागले होते. त्यावर देखरेख करण्यासाठी इख्तेदारांची नेमणूक केली होती. 2. स्वत:ला मदत करण्यासाठी त्यांनी चाळीस गुलामांची एक समिती नेमली होती. 3. प्रधानमंत्री आणि न्यायाधीश सुलतानाला सल्ला देत असत. 4. त्याने अरेबिक पद्धतीच्या नाण्यांची सुरुवात केली. ही नाणी सोने आणि चांदीची असत. 

3. अल्लाउद्दीन खिलजीच्या राजकीय सुधारणा कोणत्या ?
उत्तर : अल्लाउद्दीन खिलजीने अनेक राजकीय सुधारणा केल्या. 1. धार्मिक देण्यग्याईनाम किंवा जमिनी बहाल करण्याची पद्धत त्याने रद्द केली. 2. त्याने गुप्तहेरांची संघटना निर्माण केली. 3. दारू आणि नशिल्या पदार्थांच्या सेवनावर बंदी घातली. 4. आंतरजातीय विवाहसरदारांच्या सभासर्वसामान्यांचे सभासमारंभ यावर बंदी घातली. 5. प्रजेकडून अतिरिक्त कर गोळा करण्याचा हुकूम दिला.

4. मोहमद बिन तुघलकाने केलेल्या राजकीय सुधारणा कोणत्या ?
उत्तर : मोहमद बिन तुघलकाने साम्राज्याला मिळणाèया सगळ्या जमीन महसूलाची नोंद ठेवण्यासाठी नोंदवही ठेवण्याचे आदेश दिले. 2. पडीक जमीन मशागतीखाली आणून कृषी व्यवसायाचा विकास केला. 3. शेतकèयांना आर्थिक मदत दिली. 4. दुआब प्रदेशातील जमिनीवर कर वाढविला. 5. आपली राजधानी मध्यभागी आणि शत्रूच्या आक्रमणापासून सुरक्षित असावी या हेतूने ती दिल्लीहून देवगिरी येथे हलविली. 6. नाण्याची टांकसाळ सुरू करून दिनार हे सोन्याचे आणि अधेली हे चांदीचे नाणी अंमलात आणले. काही वर्षांनी तांबे आणि पितळेची नाणी अंमलात आणली.

5. दिल्लीच्या सुलतानांनी कला आणि शिल्पकला क्षेत्रात कोणती भर घातली.
उत्तर : 1. दिल्लीच्या सुलतानांनी भारतात इंडो-सिरॅमीक बांधकाम शैलीचा प्रारंभ केला. 2. उंच कमानीघुमटमीनार हे या शैलीचे वैशिष्ट्य होते. 3. त्यांनी किल्लेमशिदीमहालसार्वजनिक इमारतीमदरसाधर्मशाळा यांची निर्मिती केली. 4. इंडो-सिरॅमीक बांधकाम शैलीची उत्तम उदाहरणे म्हणजे दिल्लीची कुवत-अल-इस्लाम ही मशीदकुतुबमिनारअलाई दरवाजाजमैत खाना मशीद इ.


No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024