Thursday, May 23, 2019

धर्म प्रसारक व समाज सुधारक



प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. शंकराचार्यांचा जन्म केरळ राज्यातील ................ येथे झाला.

2. जग हे मिथ्या आणि ब्रह्म हे सत्य असे  ................ यांनी सांगितले.

3. रामानुजाचार्यांच्या अनुयायांना  ................ असे म्हणतात.

4. द्वैत सिद्धांताचे प्रतिपादन ................ यांनी केले.

उत्तरे : 1.  कलादी (केरळ) 2.शंकराचार्य 3. श्री वैष्णवपंथीय 4. मध्वाचार्य

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. अद्वैत सिद्धांत कोणी मांडला?
उत्तर : शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांत मांडला.

2. रामानुजाचार्यांनी कोणता सिद्धांत मांडला ? त्यांच्या धर्माला काय म्हणतात?
उत्तर : रामानुजाचार्यांनी माणूस आणि निसर्ग हे ब्रह्मावर अवलंबून आहेत. आत्मा (व्यक्ती) किंवा परमात्मा (देव) हे एकच किंवा एकसारखे नाही असा विशिष्टाद्वैत सिद्धांत मांडला. त्यांच्या धर्माला श्रीवैष्णव पंथ म्हणतात.

3. रामानुजाचार्यांनी लिहिलेल्या गं्रथांची नावे लिहा.
उत्तर : रामानुजाचार्यांनी  वेदांत संग्रह, वेदांतसार, वेदांतदीपिका, श्रीभाष्य आणि गीतेवरील भाष्य असे गं्रथ लिहिले.

4. मध्वाचार्यांनी कोणते तत्त्वज्ञान सांगितले ?
उत्तर : मध्वाचार्यांनी द्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. 1. त्यांच्या मतानुसार ब्रह्म (देव) व माणूस वेगळा आहे. 2. जग हे मिथ्या नाही तर ते ब्रह्मचैतन्याने भरलेले आहे. देवाचे स्वरूप हे स्वतंत्र अस्तित्व आहे. 3. मानवजात ही देवावर अवलंबून आहे. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. 4. देव आणि मानव यामध्ये देव हा मालक आणि माणूस हा देवाचा दास आहे असे नाते आहे. 5.विष्णू अथवा नारायण हा सर्वोच्च आत्मा आहे. 6. श्रीविष्णूची तीव्र भक्ती करण्याने मुक्ती मिळते.

5. बसवेश्वरांनी सांगितलेल्या कायकवे कैलासया तत्त्वाबद्दल माहिती लिहा.
उत्तर : 1. शिवशरणांनी कोणताही भेद मानू नये. 2. परिशुद्ध भक्ती हा शिवाला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग आहे. 3. माणसाने स्वत:चे अन्न स्वत: मिळविले पाहिजे. याला ते कायक असे म्हणत. कायकवे कैलासहे तत्त्व सांगून बसवेश्वरांनी श्रमाची प्रतिष्ठा वाढविली.

6. अनुभव मंटपाची स्थापना कोणी केली ? त्याचा उद्देश काय होता?
उत्तर : संत बसवेश्वरांनी बीदर तालुक्यातील बसवकल्याण येथे अनुभव मंटपाची स्थापना केली. सर्व शिवशरणांनी एकत्र येऊन अध्यात्मिकतेवर आपआपली मते मांडता यावीत या उद्देशांनी   त्यांनी याची स्थापना केली. येथे त्यांनी स्वातंत्र्य आणि समानतेला प्रोत्साहन दिले.

7. शंकराचार्यांच्या साहित्यिक रचना कोणत्या ?
उत्तर : शंकरभाष्य, सौंदर्यलहरी, शिवानंदलहरी, विवेक चुडामणी, प्रबुद्ध सुधारक आणि दक्षिणमूर्ती स्तोत्र इ. ग्रंथांची रचना शंकराचार्यांनी केली.


No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024