Thursday, May 23, 2019

विजयनगर आणि बहामनी राज्य



प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. विजयनगर साम्राज्याची स्थापना ................ यावर्षी झाली.

2. मधुराविजयम ही साहित्यकृती ............... यांनी लिहिली.

3. प्रयुध देवरायचा मंत्री ............... हा होय.

4. अमुक्तमाल्यदा ही तेलगु साहित्यरचना ............... यांनी लिहिली.

5. बीदरचा मदरसा ............... यांने बांधला.

6. किताब-ए-नवरस हे पुस्तक ............... यांने लिहिले.

उत्तरे : 1. 1336  2. गंगादेवी 3. लकन्ना दंडेश 4. कृष्णदेवराय 5. मोहमद गवाण 6. दुसरा इब्राहिम आदिलशहा

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. विजयनगरवर राज्य केलेली घराणी कोणती ?
उत्तर : विजयनगरवर चार घराण्यांनी राज्य केले. - 1. संगम घराणे 2. साळुव घराणे 3. तुळुव घराणे 4. अरविंदु घराणे.

2. दुसèया देवरायाने कोणते कार्य केले ?
उत्तर : 1. दुसरा देवराय हा संगम घराण्यातील प्रसिद्ध राजा होता. त्याला प्रौढ देवरायअसेही म्हटले जात. त्याला गज शिकारीही पदवी दिली होती 2. त्यांने आपल्या सैन्याची पुनर्रचना करून मुस्लिमांना सैन्यात भरती करून घेतले. 3. ओडिसाचा गजपती कपिलेंद्रचा पराभव करून कोंडविदु जिंकले. 4. त्यांने केरळ व श्रीलंका जिंकून तेथून खंडणीवसूल केली म्हणून त्याला दक्षिणपथ चक्रवर्तीअसे संबोधले गेले. या विजयानंतर विजयनगर साम्राज्य श्रीलंका ते गुलबर्गा असे पसरले. 5. आपला शत्रू बहामनी अहमदशहाचा विजापूरपर्यंत पाठलाग करून मुदगल आणि बंकापूर आपल्या ताब्यात घेतले. 6. त्याच्या सेनापतीने नौका विजय यात्रा हाती घेऊन साम्राज्याचा विस्तार केला. 

3. कृष्णदेवरायाला राज्यावर येताच कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले ?
उत्तर : कृष्णदेवराय गादीवर येताच त्याला राज्यांतर्गत आणि राज्याबाहेरील अनेक जटील समस्यांना तोंड द्यावे लागले. 1. नवीन जलमार्गाने भारताच्या पश्चिम किनाèयावर पोहोचलेल्या युरोपियनांनी आपले वर्चस्व आणि संस्कृती पसरविण्यास सुरुवात केली. 2. उत्तरेकडील मुघल दक्षिणेकडे राज्यविस्ताराच्या प्रयत्नात होते. 3. बहामनी राज्याचे पाच शाही सुलतान कृष्णदेवरायाच्या विरोधात युद्धाच्या तयारीत होते. 4. उमतूर आणि ओडीशाचे राज्यकर्ते विजयनगर साम्राज्याकडे मत्सराने पहात होते.

4. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात विजयनगर साम्राज्याचे योगदान काय ?
उत्तर : सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील विजयनगर साम्राज्याचे योगदान पुढीलप्रमाणे :
सामाजिक व्यवस्था : 1. समाज व्यवस्था चातुर्वणावर आधारित होती. 2. व्यवसायावर आधारित जातीपद्धत देखील अस्तित्वात होती. 3. कलाकार, भांडी तयार करणारे, सोनार, लोहार, विणकर, चर्मकार यांची संख्या समाजात लक्षणीय होती. 4. सती, बालविवाह आणि देवदासी पद्धत अस्तित्वात होती. 5. सामान्यपणे एकपत्नीत्व पद्धत रूढ होती. राजे आणि श्रीमंतामध्ये बहुपत्नीत्व पद्धत प्रचलित होती. 6. स्त्रियांना मानाचे स्थान होते. राजवाड्याच्या पहारेकरी म्हणून स्त्री कुस्तीपटूंना नियुक्त केले जात होते. व्यापार उदीमात देखील स्त्रियांचा सहभाग होता. 7. होळी, दसरा, दीपावली हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असत. दसरा सण मोठ्या प्रमाणात आणि दिमाखाने राजकीय छत्रछायेखाली साजरा होत असे. 8. नृत्य आणि संगीत खूप लोकप्रिय होते.
आर्थिक व्यवस्था : विजयनगरची आर्थिक स्थिती भक्कम होती. 1. जमिनीवरील कर हा राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. 2. शेतकरी आपल्या उत्पन्नाचा 1/4 भाग कराच्या स्वरूपात देत असत. 3. व्यवसाय कर, घरफाळा, वाहतूक कर, बाजार कर, वाणिज्य कर, आयात कर, निर्यात कर, मांडलिकांच्याकडून मिळणारी खंडणी ही उत्पन्नाची इतर साधने होती. 4. कृषी व्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा कणा होता. शेतकरी वर्षाकाठी दोन पिके घेत असत. केळी व भाजीपाला यांचीही लागवड केली जात होती. 5. राज्यकर्त्यांनी शेतीला उत्तेजन देण्यासाठी विहिरी, तलाव आणि कालवे बांधून पाणीपुरवठ्याची सोय केली. 6. गणी, गुत्तीगे, सिद्धाय, वर आणि गडी इ. जमीनधारणेच्या पद्धती अस्तित्वात होत्या. 7. व्यापार आणि उद्योगधंद्यात प्रचंड प्रगती झाली होती. वस्त्रोद्योग अस्तित्वात होता. अनेक वस्तू निर्यात केल्या जात होत्या. 8. सोन्याचे वराह, गद्यान, पगोड, आणि चांदीचा तारा, तांब्याचा पण, अ‍ॅल्युमिनियमचा दुड्डू आणि कासू ही नाणी चलनात होती. 9.अरब राष्ट्रे, चीन, पोर्तुगाल इ. देशांशी साम्राज्याचे व्यापारी संबंध होते.

5. विजयनगर काळातील कला आणि शिल्पकलेबद्दल माहिती लिहा.
उत्तर : विजयनगर साम्राज्याचे कलेच्या क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे. ते कलेचे भोक्ते होते. त्यांच्या काळात देवालये, राजवाडे, किल्ले, मनोर, महामंटप, वसंतमहाल, सार्वजनिक इमारती, धरणे, तलाव, कालवे आणि अनेक इमारती बांधण्यात आल्या. 2. होयसळ, चोळ आणि चालुक्यांच्या शिल्पकलेची शैली त्यांनी पुढे चालू ठेवली. 3. त्यांच्या शैलीचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे अनेक खांबांनी मिळून तयार झालेला विशाल सभामंटप किंवा कल्याण मंटप. देवळांची उंच गोपुरे, कमानी, कोरीव काम. 4. भव्यता, सौंदर्याबरोबरच मूर्तीमध्ये गंभीर आणि उग्र भावांना दिलेले स्थान आणि खडीचा बांधकामात वापर ही इतर वैशिष्ट्ये होत. 5. हंपी (विरूपाक्ष, विजय विठ्ठल), श्रृंगेरी (विद्याशंकर देवालय), तिरुपती, कांची, लेपाक्षी, कारकळ, मूडबिद्रे, भटकळ, चिदंबरम, कालहस्ती, नंदी श्रीशैल, कोलार इ. ठिकाणी देवालये बांधण्यात आली. 6. हंपी ही राजधानीसुद्धा 7 अभेद्य किल्ल्यांनी वेढलेली होती. यापैकी चारच अस्तित्वात आहेत.

6. महंमद गवाणाच्या कार्याचे वर्णन करा.
उत्तर : महंमद गवाणाने आपली निष्ठा, निस्वार्थ सेवा, उत्कृष्ट राज्यकारभार यामुळे वजीर म्हणून साम्राज्याला उत्कर्षाच्या शिखरावर नेऊन पोहोचविले. आपल्या विजयाने आणि सुव्यवस्थित राज्यकारभाराने त्याने बहामनी राज्याला नाव प्राप्त करून दिले. गवाणाने कोकण, गोवा आणि बेळगाव काबीज केले. त्यानंतर ओडीशा आणि कोंडविदू प्रदेश जिंकले. 1481 मध्ये कांचीवर आक्रमण करून तेथील अपार संपत्ती लुटली. अशातèहेने बहामनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला तो कारणीभूत ठरला होता.

7. बहामनी सुलतानांच्या महसूल पद्धतीची माहिती लिहा.
उत्तर : 1. बहामनी सुलतानांच्या काळात आमीर ए जुमला हा महसूल विभागाचा प्रमुख असे. 2. जमीन महसूल हे उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. 3. उत्पन्नाच्या 1/3 ते 1/2 भाग जमीन महसूल म्हणून गोळा केला जात असे. 4. जकात, घरफाळा, खाणीवरील कर, तंबाखू, कुरणावर व्यापारकर, व्यवसायकर असे. एकूण 50 प्रकारचे कर होते. 5. करांच्या स्वरूपात गोळा केलेल्या पैशातून किल्ले, राजमहाल, कचेèया यांचे बांधकाम, संरक्षण दलाची व्यवस्था (पगार) विद्वानांना देणग्या आणि युद्धाचा खर्च भागवला जात असे.

8. बहामनी सुलतानांच्या काळातील शिक्षण, कला आणि शिल्पकलेबद्दल माहिती लिहा.
उत्तर : शिक्षण : 1. इस्लाम संस्कृतीची वाढ करणे हा त्यांच्या राजकीय आणि शैक्षणिक नीतीचा उद्देश होता. 2. मक्तबसा नावाच्या शाळा मशीदीकडून नियंत्रित केल्या जात असत. 3. मक्तबसा मध्ये अक्षरज्ञान, धार्मिक शिक्षण, कायदा, काव्य अलंकारशास्त्र इ. शिकविले जात असत. 4. मदरसामध्ये उच्च शिक्षणाची सोय होती.  स्वत: विद्वान असलेल्या गवाणाने बीदर येथे मदरसा स्थापन करून इस्लाम धर्म व कायद्याच्या शिक्षणास प्रोत्साहन दिले होते. विद्यार्थी, शिक्षक आणि धार्मिक लोकांना इथे आश्रय दिला जात असे. 6. खगोलशास्त्र, व्याकरण, गणित, तत्त्वज्ञान, इतिहास राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास इथे केला जात असे.
कला आणि शिल्पकला : 1. सुलतानांनी इंडो-सिरॅमिक बांधकाम शैलीला उत्तेजन दिले. पहिल्या अली आदिलशहाने बांधलेली जामा मशीद हे अशा शैलीचे उत्तम उदाहरण आहे. 2. इब्राहिम रोजा, गोल घुमट, गगन महाल, आसार महाल या प्रमुख इमारती (स्मारके) आहेत. 3. गोलघुमटमुळे आदिलशहाला जगप्रसिद्धी मिळाली. या थडग्याचा विस्तार 1800 चौ.फूट असून चारी बाजूला मिनार आहेत. ही सात मजली इमारत एका गोल घुमटाने आच्छादलेली आहे.  4. महंमद गवाणने बीदर येथे बांधलेली मदरसा सुद्धा प्रसिद्ध असून दख्खन शैलीत हे बांधकाम असलेली ही तीन मजली इमारत 242 फूट लांब, 222 फूट रून 56 फूट उंच आहे.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024