Thursday, May 23, 2019

मोंगल आणि मराठे



प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. मोंगल साम्राज्याची स्थापना ............... यांने केली.

2. मोंगलाच्यातील प्रसिद्ध सम्राट ............... हा होता.

3. आग्रा येथील ताजमहाल ............... यांने बांधला.

4. दिने ईलाही या नवीन धर्माची स्थापना ............... या सम्राटाने केली.

5. शिवाजी महाराजांची आई ............... या होत.

उत्तरे : 1. बाबर 2. अकबर 3. शहाजहान 4. अकबर 5. जिजाबाई

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1. बाबराच्या सैनिकी मोहिमांबद्दल वर्णन करा.
उत्तर : 1. स्वत:चे राज्य हातातून गेल्यानंतर भटके जीवन जगत असताना या काळातच भारतावर आक्रमण करण्याची लालसा त्याच्या मनात निर्माण झाली. त्याने भारतावर पाच वेळा आक्रमण केले. 2. इ.स. 1526 मध्ये पानिपत येथे दिल्लीचा राज्यकर्ता इब्राहिम लोदीचा पराभव करून बाबरने भारतात आपली सत्ता स्थापन केली. हीच पानिपतची पहिली लढाई होय. 3. आपल्या चार वर्षाच्या कारकीर्दीत त्याने मेवाडचा राणा संग्रामसिंह, चंदेरीचा मेदीनराय, सिकंदर लोदीचा भाऊ मोहम्मद लोदी यांना पराभूत केले व उत्तर भारतात मोंघलाचे राज्य स्थापन केले.

3. अकबराने जिंकलेले प्रदेश कोणते ?
उत्तर : आपल्या प्रबळ सैन्याच्या बळावर अकबराने माळवा, जयपूर, गोंडवन, चितोड, रणथंबोर, कलिंग, गुजराथ, बंगाल इ. ताब्यात घेतले. कालांतराने काश्मीर, सिंध, बलुचिस्तान, कंदहार आणि अहमदनगर जिंकून घेतले.

4. शहाजहानच्या काळातील कला आणि शिल्पकलेच्या क्षेत्रातील प्रगतीबद्दल माहिती लिहा.
उत्तर : शहाजहानची कारकीर्द म्हणजे मोंघल कला आणि शिल्पकलेचा सुवर्णकाळ मानला जातो. 1. शहाजहानने दिल्ली आपली राजधानी करून लाल किल्ला, दिवाण-ए-खास, रंगमहाल, मोती मशीद, नक्कर खाना अशा अनेक इमारती बांधल्या. 2. जमिया मशीद ही भारतातील एक मोठी मशीद त्यांने बांधली. 3. शहाजहानने आपली पत्नी मुमताजमहल हिच्या स्मरणार्थ जगप्रसिद्ध ताजमहल बांधला. जगातील सात आश्चर्यापैकी एक कलाकृती म्हणून ताजमहाल आज ओळखला जातो.

5. शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे वर्णन करा.
उत्तर : शिवाजी महाराजांनी आपल्या विशाल साम्राज्याची राज्यव्यवस्था चोख ठेवली होती. साम्राज्याची विभागणी अनेक प्रांतात केली होती. सरकारी व्यवहार प्राकृत आणि मराठी भाषेत चालत असत. राजा हा केंद्रीय राज्यव्यवस्थेचा प्रमुख असे. त्यांना सहाय्य करण्यासाठी अष्टप्रधान मंडळ नियुक्त करण्यात आले होते. प्रांत, जिल्हे आणि खेडी हे राज्यकारभाराचे घटक असून त्यावर देखरेख करण्यासाठी अधिकाèयांची नेमणूक केली होती.   त्यांची महसूल व्यवस्था ही शेतकèयांच्या हिताची होती. जहागिरदारी पद्धत रद्द करून रयतवारी सुरू केली. कर रोख रक्कम किंवा रोख वस्तुच्या स्वरूपात गोळा केले जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी हे कर अस्तित्वात होते. राज्यात न्यायदान पद्धती अस्तित्वात होती. नीती आणि संस्कृतीच्या आधारे अंतिम न्याय देत असत.  राज्यात पायदळ, अश्वदळ, गजदळ आणि फिरंगीदळ अस्तित्वात होते. किल्लेदार हा किल्ल्यांची व्यवस्था व देखरेख करत असे. सैन्यामध्ये अनेक छोटे छोटे विभाग होते.

6. पहिल्या बाजीरावाच्या कार्याचे वर्णन करा.
उत्तर : केवळ 19 वर्षाचा असताना पहिला बाजीराव हा अप्रतिम वीरयोद्धा होता. 1. त्यांने मराठी राज्याचा विस्तार उत्तर भारतात गुजरात माळवा येथपर्यंत केला व चौथाई सरदेशमुखी वसूल केली. 2. कर्नाटकातील चित्रदुर्ग, श्रीरंगपट्टणवर आक्रमण करून ताब्यात घेतले. 3. हैद्राबादच्या निजामाला पराभूत करून नर्मदा आणि चंबळ दोआबचा प्रदेश आणि युद्ध भरपाई म्हणून 50 लाख रुपये खंडणी वसूल केली. 4. पोर्तुगीजांकडून साष्टी, वसई आणि सिद्धीकडून जंजीरा किल्ला मिळविला. 5. बाजीरावाने मराठी साम्राज्य आणि वैभव आपल्या योग्य राज्यकारभाराने टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला दुसरा शिवाजीअसे म्हटले जात असे. ---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024