Thursday, May 23, 2019

भक्ती पंथ



प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. भक्ती म्हणजे ............... होय.

2. रामानंदाच्या शिष्यापैकी प्रसिद्ध शिष्य ............... होय.

3. कबीराच्या अनुयायांना ............... म्हटले जाते.

4. चैतन्यांच्या कृतींचा संग्रह ...............

उत्तरे : 1. देवाला पूर्णपणे शरण जाणे 2. कबीर 3. कबीर पंथीय 4. चैतन्य चरित्रामृत


प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. राम सीतेच्या भक्तीला कोणी लोकप्रिय केले ? त्यांनी कोणते कार्य केले ?
उत्तर : रामानंद यांनी राम सीतेच्या भक्तीला लोकप्रिय केले. प्रेम व भक्तीवर आधारित वैष्णव धर्माचा त्यांनी पुरस्कार केला. जातीप्रथेला विरोध केला. सर्व धर्मातील लोक त्यांचे अनुयायी होते.

2. शीख कोणाला म्हणतात ? त्यांचा पवित्र ग्रंथ कोणता ?
उत्तर : गुरुनानक यांच्या अनुयायांना शीख म्हटले जाते. गुरु ग्रंथसाहेब हा शिखांचा पवित्र ग्रंथ होय.

3. भक्तीमार्गाच्या चळवळीचा परिणाम काय झाला ?
उत्तर : भक्तीमार्गाच्या चळवळीचे अनेक परिणाम झाले ते म्हणजे 1. संतांनी प्रेम आणि भक्तीची शिकवण दिली. 2.हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. 3. हिंदू-मुस्लीम धर्मीयांत ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले. 4. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यात संत समाजसुधारक यशस्वी ठरले. 5. भक्तीपंथातील संतांनी आपल्या रचना बोली भाषेत केल्यामुळे  भारतातील देशी भाषांचा विकास होऊन त्याच्या साहित्यरचनांची वाढ झाली. यामुळे भारतीय साहित्य व संस्कृतीमध्ये मोलाची भर टाकली गेली. 6. संतांच्या शिकवणुकीमुळे समाजात जातीभेद, परंपरावाद, सामाजिक असमानता यांचा निषेध व विरोध झाला.
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024