Wednesday, July 7, 2021

इयत्ता नववी, विषय : समाज विज्ञान. वार्षिक अंदाजपत्रक

 

 SOCIAL  SCIENCE

9TH  STANDARD

year   PLAN

 

मराठीत

प्रथमच

      नमुना  1

 

Prepared By..

                   


                              Ranjit Chaugule         

                          Govt. Sardars High School, Belgaum                         

             

 

SL. NO.

MONTH & DAYS

FROM            TO

UNIT

CORE LEARNING OUTCOMES OF THE UNIT

1

जुलै
25  
 

सेतुबंध
पूर्वपरीक्षा
साफल्य परीक्षा

1.         सामर्थ्यावर आधारित विद्यार्थी पूर्व परीक्षा देतील.
2.      साफल्य परीक्षेतून विद्यार्थी सामर्थ्य समजावून घेतील.

2

ऑगस्ट
25

इतिहास            
1.  ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म 

1.  ख्रिश्चन व इस्लाम धर्माचा आरंभ माहिती करून घेतात.  2. येशू ख्रिस्त व मोहम्मद पैगंबर यांचे जीवन व शिकवण समजावून घेतात.  3. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा प्रसार व योगदान जाणून घेतात. 4. ख्रिश्चन व इस्लाम धर्मातील पंथ अभ्यासतात.

3

 

राज्यशास्त्र 
 1. आपली राज्यघटना (संविधान)                                          

1. संविधान रचना समिती आणि त्यातील सदस्यांची नावे माहिती करून घेतात.  2.घटना निर्मिती समिती व घटना रचना समिती  अभ्यासतात. 3. घटनेची प्रस्तावना किंवा उद्देश पत्रिका जाणून घेतात.  4. घटनेची मुख्य वैशिष्ट्ये 5. मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याची अधिकृत तत्त्वे व धोरणे समजावून घेतात, सांगू शकतात.

4

 

समाजशास्त्र      
1. कुटुंब                                          

1.  कुटुंबाचा अर्थ  2. कुटुंबाचे प्रकार   3. कुटुंबाची वैशिष्ट्ये  4. अविभक्त कुटुंबाची वैशिष्ट्ये वरील सर्व गोष्टींची माहिती करून घेतात.

5

 

भूगोल       
1. आपले राज्य कर्नाटक                                          

1.  आपल्या भूमीची थोरवी आणि परंपरा  जाणून घेतात. 2. कर्नाटक या नावाची पार्श्वभूमी आणि राज्याचा उगम  माहिती करून घेतात. 3. कर्नाटकाचे भौगोलिक स्थान, आकारमान, भू व जल सीमा आणि शेजारील राज्ये समजावून घेतात.

6

 

अर्थशास्त्र           
1. नैसर्गिक साधन संपत्ती         

1.  नैसर्गिक साधन संपत्तीच्या टंचाईचा अर्थ समजावून घेतात.   2. नैसर्गिक साधन संपत्तीच्या  संवर्धनाचे महत्त्व सांगू शकतात. 3. पर्यावरणीय पावलाचाा ठसा कमी करण्याचे उपाय अभ्यासतात.

7

 

व्यवहार अध्ययन                   1. उद्योगधंद्यांचे व्यवस्थापन                                         

1. व्यवस्थापनाचा अर्थ समजावून घेतात.  2. व्यवस्थापनाची तत्त्वे  जाणून घेतात. 3. निर्णय घेण्याचे महत्त्व आणि त्याची प्रक्रिया अभ्यासतात. 4. व्यवस्थापकीय कर्तव्य सांगू शकतात.    

8

सप्टेंबर
25

इतिहास             
2. मध्ययुगीन भारत व राजकीय घडामोडी.           
 

1.  उत्तर भारतात राज्य केलेली राजपूत घराणी अभ्यासतात. 2. साहित्य कला आणि शिल्पकलेतील राजपुतांचे योगदानाची माहिती करून घेतात. 3. तुर्कांचे आगमन, महमद गझनी आणि मोहम्मद घोरीच्या भारतावरील स्वाऱ्यांचे परिणाम जाणून घेतात. 4. दिल्लीच्या सुलतान शाहीची स्थापना, राज्यकारभार आणि त्यांचे विविध क्षेत्रातील योगदानाची माहिती करून घेतात.

9

 

राज्यशास्त्र
2. केंद्र सरकार     
 

1. राज्यसभा, लोकसभा, त्यांची रचना, सदस्यत्व, अर्हता आणि केंद्रीय कायदे मंडळाची कार्ये  समजावून घेतात. 2. राष्ट्रपतींची नियुक्ती, अर्हता आणि केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या कार्यालयासंबंधीची माहिती करून घेतात. 3. पंतप्रधान आणि त्यांचे कार्य माहिती करून घेतात. 4. समान कायदे मंडळ पद्धतीतील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या जबाबदाऱ्या आणि कार्य समजून घेतात.

10

 

समाजशास्त्र  
2. सामाजिकीकरण

1. सामाजिकीकरणाचा अर्थ समजावून घेतात.  2. सामाजिकीकरणाची कार्ये  अभ्यासतात. 3. लिंग व सामाजिकीकरण जाणून घेतात.   4. सामाजिकीकरणाचे प्रतिनिधी/साधने माहिती करून घेतात.

11

 

भूगोल   : 
2. भौगोलिक विभाग                                          

1.  कर्नाटकाची भौगोलिक वैशिष्ट्ये  माहिती करून घेतात. 2. कर्नाटकाचे स्वाभाविक विभाग समजावून घेतात.   3. कर्नाटकातील पर्वत आणि उंच शिखरे यांची माहिती करून घेतात.

12

ऑक्टोबर
15

इतिहास            
3. धर्म प्रसारक व समाज सुधारक

1.  भारतातील समाजसुधारकांचा परिचय, त्यांची शिकवण आणि तत्त्वज्ञान  समजावून घेतात. 2.शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, बसवेश्वर यांचे जीवन आणि शिकवण अभ्यासतात.  3. द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत आणि इतर तत्त्वज्ञान माहिती करून घेतात.

13

 

भूगोल   3. कर्नाटकाचे हवामान, माती, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणीजीवन

1.  कर्नाटकाच्या हवामानाची प्रमुख वैशिष्ट्ये माहिती करून घेतात.   2. कर्नाटकाच्या हवामानातील मौसमी बदल सांगू शकतात.   3. कर्नाटकातील मोसमी पावसाचे प्रमाण आणि परिणाम  समजावून घेतात. 4. कर्नाटकातील मातीचे वेगवेगळे प्रकार आणि प्रमाण यांची माहिती करून घेतात.   5. नैसर्गिक वनस्पती, प्रकार व विभागणी आणि प्राणीजीवन अभ्यासतात.

14

 

भूगोल    4.कर्नाटकातील जलसंपदा                                          

1.  कर्नाटकातील महत्त्वाच्या नद्या माहिती करून घेतात.   2. कर्नाटकातील पाटबंधारे  3. जलविद्युत प्रकल्पांचे महत्त्व जाणतात.  4. कर्नाटकातील प्रमुख धरणे माहिती करून घेतात.   5. प्रमुख नद्यांच्या जलवाटपाबद्दलचे वाद आणि नदी जल संरक्षणाचे महत्त्व सांगू शकतात.

15

नोव्हेंबर
23

इतिहास
4. विजयनगर आणि बहामनी राज्य           

1.  विजयनगर आणि बहामनी राज्यांची स्थापना अभ्यासतात. 2. विजयनगर आणि बहामनी राज घराणी यांचा अभ्यास करतात.  3.कृष्णदेवरायांचे कार्य आणि योगदान जाणून घेतात.  4.विजयनगरची सांस्कृतिक देणगी व  5. बहामनी राज्याची सांस्कृतिक देणगी समजावून घेतात.

16

 

राज्यशास्त्र        
3.राज्य सरकार                                          

1. राज्य कायदे मंडळाचे स्वरूप, विधानसभा आणि विधान परिषद, त्यांचे सदस्यत्व आणि त्यांचे कार्य समजावून घेतात. 2. राज्य कार्यकारी मंडळाचे स्वरूप, राज्यपाल, त्यांची पात्रता आणि कार्ये माहिती करून घेतात. 3. मुख्यमंत्र्यांची निवड आणि त्यांचे कार्य अभ्यासतात. 4. खालच्या दर्जाची विविध न्यायालये व त्यांची कार्ये  5. लोक अदालतीचे स्वरूप व जबाबदाऱ्या माहिती करून घेतात.

17

 

समाजशास्त्र      3. सामाजिक परिवर्तन (बदल)                                          

1. सामाजिक परिवर्तनाचा अर्थ  समजून घेतात.  पुढील मुद्दे अभ्यासतात - 2. तडजोड  3. सहजीवन  4. संघर्ष   5. सहकार्य  6. स्पर्धा.

18

 

भूगोल 
5. कर्नाटकाची भू साधन संपत्ती                                       

1.  कर्नाटकातील भू साधन संपत्तीचा विविध वापर जाणून घेतात.   2. शेतीचे विविध प्रकार आणि त्यांचे महत्त्व अभ्यासतात.   3. कर्नाटकातील प्रमुख पिके त्यांचे उत्पादन माहिती करून घेतात.

19

 

भूगोल   
6. खनिज संपत्ती                                        

1.  कर्नाटकात उपलब्ध असलेली खनिजे  आणि त्यांचे महत्त्व जाणून घेतात. 2. कर्नाटकातील मुख्य खनिजे, उपलब्धता आणि उत्पादन यांची माहिती करून घेतात.

20

 

अर्थशास्त्र           
2. मानवी साधन संपत्ती                                        
 

1.  मानवी साधन संपत्तीचा अर्थ आणि महत्त्व समजून घेतात.  2. भारतातील लोकसंख्या वाढ, जन्म दर, लोकसंख्येची घनता या संकल्पना स्पष्ट करून घेतात. 3. आर्थिक विकासात लोकसंख्येच्या रूपांतराची भूमिका समजून घेतात. 4. जीवनाची गुणवत्ता सुधारण्याचे उपाय (प्रजोत्पादन, लोकसंख्येची गुणवत्ता आणि आरोग्य यावर चर्चा करू शकतील

21

डिसेंबर
26

इतिहास             
5. मोंगल आणि मराठे                
 

1. भारतातील राज्य केलेल्या मोंगलांची माहिती करून घेतात. 2. साहित्य, कला आणि शिल्पकलेच्या क्षेत्रात मोंगल सुलतानांचे योगदान जाणून घेतात. 3. मराठी साम्राज्याची स्थापना आणि शिवाजी महाराजांचा कारभार समजावून घेतात.

22

 

राज्यशास्त्र  
4. केंद्रीय न्यायव्यवस्था (न्यायमंडळ)                                          

1.  सर्वोच्च न्यायालयाची रचना व कार्ये माहिती करून घेतात. 2. उच्च न्यायालयाची रचना व  माहिती करून घेतात.  3. खालच्या (दुय्यम) दर्जाची न्यायालये व 4. महसूल न्यायालये समजावून घेतात.

23

 

भूगोल     
 7. दळणवळण                                          

1.  कर्नाटकातील दळणवळण व्यवस्थेचे महत्त्व समजावून घेतात. 2. रस्ते वाहतूक - वेगवेगळ्या प्रकारची वाहतूक आणि हमरस्त्यांचे महत्त्व समजावून घेतात.   3. रेल्वे वाहतुकीचे महत्त्व आणि महत्त्वाचे रेल्वेमार्ग जाणून घेतात. 4. जल आणि हवाई वाहतूक यांची माहिती करून घेतात.

24

 

अर्थशास्त्र            
3. दारिद्र्य व भूक                                          
 

1.  दारिद्र्याचा अर्थ व कारणे जाणून घेतात. 2. दारिद्र्य रेषेची संकल्पना समजावून घेतात.   3. भारतातील दारिद्र्याचे प्रमाण अभ्यासतात.  4. भूक व अन्न सुरक्षा  5.  लिंग भेदानुसार  दारिद्र्य व भुकेचे प्रमाण अभ्यासतात.   6. अन्नसुरक्षेची आवश्यकता व ती साकारण्याचे उपाय  7. दारिद्र्य निर्मूलनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती करून घेतात.

25

जानेवारी
24

इतिहास             
6. भक्ती पंथ   

1. रामानंद, गुरुनानक, चैतन्य इ. बद्दल माहिती करून घेतात.  2. कर्नाटकातील भक्तीपंथ अभ्यासतात. 3. भक्तीपंथाचा परिणाम जाणून घेतात.  4. भक्तीपंथाची  प्रमुख लक्षणे सांगू शकतात

26

 

इतिहास             
7. मध्ययुगीन युरोप            

1.  मध्ययुगीन युरोपमधील परिस्थिती समजावून घेतात.   2.  सरंजामशाहीचा अर्थ सांगू शकतात.   3. सरंजामशाहीतील वेगवेगळे वर्ग  जाणून घेतात.  4. सरंजामशाही पद्धतीचे फायदे तोटे अभ्यासतात.  5. सरंजामशाहीचा ऱ्हास  कसा झाला सांगू शकतात.  

27

 

राज्यशास्त्र     
5. भारताची निवडणूक पद्धती                                         

1.  निवडणूक आयोग 2. निवडणूक प्रक्रिया  3. राजकीय पक्ष  4. संमिश्र सरकार  5. माध्यमे आणि लोकशाही.  या साऱ्या गोष्टींची माहिती करून घेतात.

28

 

समाजशास्त्र     
4. समुदाय                                         

1. भटके समुदाय  व त्यांची वैशिष्ट्ये  जाणून घेतात. 2. आदिवासी समुदाय  व त्यांची वैशिष्ट्ये समजावून घेतात.  3. ग्रामीण समुदाय  व त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेतात.  4. शहरी समुदाय  व त्यांची वैशिष्ट्ये समजावून घेतात.

29

 

भूगोल   
8. कर्नाटकातील उद्योगधंदे                                          

1.  कर्नाटकातील उद्योगधंद्यांचे महत्त्व अभ्यासतात.   2. कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र जाणून घेतात.  3. लोह पोलाद उद्योगांची उत्पादन क्षमता आणि विभागणी माहिती करून घेतात.  4. कापड, साखर, सिमेंट व कागद उद्योगांची विभागणी यांच्याविषयी माहिती सांगू शकतात.

30

 

व्यवहार अध्ययन          
2. आर्थिक व्यवस्थापन                                     

1.  उद्योगात अर्थपुरवठ्याचा अर्थ जाणून घेतात.  2. उद्योगातील अर्थ पुरवठ्याचे महत्त्व आणि भूमिका  समजावून घेतात. 3. आर्थिक स्त्रोत - अल्प मुदत, दीर्घ मुदत जाणून घेतात.  4. आर्थिक संस्था, कॅपिटल मार्केट आणि स्टॉक एक्सचेंज यांची माहिती करून घेतात.

31

फेब्रुवारी
24

इतिहास            
8. आधुनिक युरोप                 

1.  पुनरुज्जीवनाची कारणे आणि परिणाम जाणून घेतात. 2. भौगोलिक संशोधन आणि परिणाम अभ्यासतात.  3. औद्योगिक क्रांती आणि परिणाम समजावून घेतात.

32

 

राज्यशास्त्र     
6. देशाची संरक्षण व्यवस्था        

1. संरक्षण व्यवस्थेचे विविध विभाग आणि त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून घेतात.   2. सेनादलातील विविध विभागांचे प्रमुख आणि त्यांची पदे  सांगू शकतात. 3. देशाच्या सुरक्षिततेमध्ये सेनादलांचे (लष्कर) योगदान समजून घेतात. 4. सेनादलांव्यतिरिक्त दुय्यम दर्जाची संरक्षण व्यवस्था यांची माहिती करून घेतात.

33

 

भूगोल
9. कर्नाटकातील प्रमुख पर्यटन केंद्रे                                       

1.  कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध व सांस्कृतिक वारसा असलेल्या ठिकाणांचा परिचय व त्यांचे महत्त्व जाणून घेतात.   2. प्रमुख प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन आणि त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महत्त्व माहिती करून घेतात. 3. प्रमुख टेकड्या, धबधबे आणि ऐतिहासिक ठिकाणे समजावून घेतात.

34

 

भूगोल     
10. कर्नाटकाची लोकसंख्या                                      
 

1.  कर्नाटकाच्या लोकसंख्येचे महत्त्व समजावून घेतात.   2. लोकसंख्येची वाढ, प्रमाण आणि लोकसंख्येची विभागणी माहिती करून घेतात.   3. लोकसंख्येचे घनत्व आणि साक्षरता प्रसंग   जाणून घेतात. 4. वाढत्या लोकसंख्येचे परिणाम आणि लोकसंख्येचे घनत्व अधिक असलेली शहरे जाणून घेतात.

35

 

अर्थशास्त्र           
4. श्रम आणि उद्योग                                          
 

1. श्रमाचा अर्थ जाणून घेतात.   2. भारतातील बेकारीच्या समस्येचे स्वरूप समजावून घेतात.   3. उद्योगाच्या संधीची उपलब्धता जाणतात.   4. उद्योगातील लिंग भेदाचे प्रमाण माहिती करून घेतात.  5. भारतातील श्रमशक्तीच्या रचनेचा अभ्यास करतात.

36

मार्च
26

इतिहास            
9. क्रांती आणि राष्ट्रांचे एकीकरण                                        

1. राष्ट्रीय प्रभुत्वाचा उदय व प्रसार जाणून घेतात.  2. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची कारणे व परिणाम  समजावून घेतात.  3. फ्रान्सच्या राज्यक्रांतीची कारणे सांगू शकतात.   4. इटली आणि जर्मनीचे एकीकरण कसे झाले सांगू शकतात.

37

 

राज्यशास्त्र
7. राष्ट्रीय एकात्मता                                          

1. राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ जाणून घेतात. 2. राष्ट्रीय एकात्मतेला सहाय्यक विविधतेतून एकता  3. . राष्ट्रीय एकात्मतेला पोषक घटक अभ्यासतात.   4. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे घटक व त्यावरील उपाय यांची माहिती करून घेतात.

38

 

व्यवहार अध्ययन          
3. व्यवहारातील हिशेबलेखन                                         

1.  जमाखर्च लेखनाचा अर्थ आणि व्याख्या जाणून घेतात.  2. व्यवसायात जमाखर्च लेखनाची आवश्यकता सांगू शकतात.  3. विविध खात्यांचे विवरण, विविध खात्यांचे जमाखर्चाचे नियम सांगू शकतात.   4. व्यवसायाच्या विविध व्यवहाराची नोंद ठेवू शकतात.  5. व्यवहाराच्या व्यवसायाची संपत्ती आणि जबाबदारी विकसित करु शकतात. 6. शेवटी व्यवसायाची ठराविक काळासाठीची फलश्रुती समजून घेतात.

39

 

अभ्यासाची उजळणी करणे.
जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे.

परीक्षेची तयारी होते.  प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे आत्मविश्वास निर्माण होवून परीक्षेची भीती नाहीशी होते.

40

 

वार्षिक परीक्षा
 

 

No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...