Wednesday, July 7, 2021

इयत्ता दहावी. विषय : समाज विज्ञान. वार्षिक अंदाज पत्रक. नमुना 1

 

SOCIAL  SCIENCE

10TH STANDARD

year   PLAN


Prepared By
..

              

                          Ranjit Chaugule            

                      Govt. Sardars High School, Belgaum                     


SL. NO.

MONTH / DAYS

FROM         TO

UNIT

CORE LEARNING OUTCOMES OF THE UNIT

         1.          

जुलै
25
 

सेतुबंध
पूर्वपरीक्षा
साफल्य परीक्षा

1.         सामर्थ्यावर आधारित विद्यार्थी पूर्व परीक्षा देतील.
2.       साफल्य परीक्षेतून विद्यार्थी सामर्थ्य समजावून घेतील.

         2.       

ऑगस्ट
25

इतिहास          
1. युरोपियनांचे भारतात आगमन                                   

1.  भारताचे युरोपियनांशी असलेले व्यापारी संबंध अभ्यासतात.  2. व्यापाराच्या निमित्ताने युरोपियनांचे भारतातील  आगमन माहिती करून घेतात. 3. युरोपियनांचे राजकीय पार्श्वभूमी समजावून घेतात.    4.  कार्नाटिक युद्धे  5. प्लासीचे युद्ध  6. बक्सारचे युद्ध  7. दुहेरी राज्य पद्धती 8. ब्रिटिशांचे राज्य विस्ताराचे धोरण यांची माहिती करून घेतात.

         3.       

 

राज्यशास्त्र  
1. भारतासमोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना                        

पुढील समस्या व त्यावरील उपायांची माहिती करून घेतात. 1. बेकारी (बेरोजगारी) 2. . भ्रष्टाचार  3. असमानता किंवा भेदभाव (लिंग, जात, प्रांतवाद) 4. जातीयवाद  5. दहशतवाद 6. स्त्रियांचे स्थान 7. कार्पोरेट धोरण

         4.       

 

समाजशास्त्र        
1. सामाजिक स्तर                                                         
 

1.  सामाजिक असमानता (शिक्षण, लिंग, व्यवसाय, उत्पन्न. संधी आणि इतर) समजावून घेतात.  2. सामाजिक स्तर. 3. अस्पृश्यता-एक सामाजिक समस्या आहे सांगू शकतात. 4. अस्पृश्यता निर्मूलनासाठी अंमलात आणलेली कायदेशीर उपाय योजना अभ्यासतात.

          5.       

 

भूगोल     
1. भारताचे स्थान आणि विस्तार

1.  भारताचे आशिया खंडातील व जगातील स्थान ओळखतात. 2. भारताचा विस्तार आणि सीमा दाखवू शकतात.  3.  भारताच्या शेजारील राष्ट्रे दाखवितात

         6.       

 

   भूगोल
2.  भारताची प्राकृतिक वैशिष्ट्ये                                        

1.  भारतातील भू स्वरूपांची सर्व सामान्य वैशिष्टये माहिती करून घेतात. 2. भारताचे प्राकृतिक (स्वाभाविक) विभाग सांगू शकतात. 3. प्राकृतिक विभागांचे महत्त्व जाणून घेतात.

          7.        

 

अर्थशास्त्र 
1. विकास (प्रगती)                                

1.  विकास आणि विकसनशीलता यांचे स्वरूप व अर्थ जाणून घेतात.  2. मानवी विकासाचे सूचक ओळखतात.  3. लिंग संबंधी विकास माहिती करून घेतात.

         8.       

 

व्यवहार अध्ययन    
1.  बँकेचे व्यवहार                                                         

1.  बँकांचा अर्थ जाणून घेतात. 2. बँकेचे आणि पोस्टाचे आर्थिक व्यवहार समजून घेतात. 3. बँकांची वैशिष्ट्ये सांगू शकतात. 4. बँकेत उघडता येणारी वेगवेगळी खाती परिचय करून घेतात.  5. बँकेत खाते उघडण्याच्या पद्धती. सांगू शकतात.  6. बँक खात्याचे फायदे समजून घेतात.

         9.       

सप्टेंबर 
25

इतिहास          
2. ब्रिटिश सत्तेचा विस्तार

1. अँग्लो - मराठा युद्धे  माहिती करून घेतात. 2. सहाय्यक सैन्य पद्धत अभ्यासतात.   3. ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण जाणून घेतात.   4. अँग्लो-शीख युद्धे  5. राज्य खालसा धोरण अभ्यासतात.

         10.     

 

इतिहास             
3. ब्रिटिश सत्तेचे  भारतावरील परिणाम                                          
 

1.  प्रशासकीय आणि न्यायालयीन पद्धत समजावून घेतात.  2. नागरी परीक्षा. 3. पोलीस पद्धत  4. मिलिटरी पद्धत 5.  जमीन महसूल व्यवस्था जाणून घेतात. . 6. आधुनिक शिक्षण पद्धती समजावून घेतात. 7.  लॉर्ड मेकॉले 7. वुड्स आयोगाची माहिती करून घेतात.   8. ब्रिटिशकालीन कायदे समजावून घेतात..

         11.       

 

राज्यशास्त्र   
2. भारताचे परराष्ट्र धोरण

1.  भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरुप जाणून घेतात.  2. अलिप्ततावाद 3. पंचशिल तत्वे समजून घेतात. 4. निःशस्त्रीकरण अभ्यासतात.  5. वर्णभेदाला विरोध का करायचा सांगू शकतात.

         12.     

 

भूगोल    
3. भारताचे हवामान                                     

1.  भारतातील हवामानाचे प्रकार व त्यावर परिणाम करणारे घटक माहिती करून घेतात.  2. हवामानातील ऋतू व त्यांची प्रमुख वैशिष्टये सांगू शकतात. 3. भारतातील पावसाची विभागणी माहिती करून घेतात.

         13.     

 

भूगोल   
4. भारतातील माती                                              

1.  मातीचा अर्थ व भारतातील मातीचे महत्त्व समजावून घेतात.  2.  मातीचे प्रकार व त्यांची विभागणी माहिती करून घेतात.  3.  मातीची धूप, कारणे व परिणाम जाणून घेतात.  4. मातीचे संरक्षण कसे करायचे सांगू शकतात.

         14.     

 

भूगोल
5. भारतातील अरण्यसंपत्ती
 

1.  अरण्यांचा अर्थ व त्यांचे महत्त्व अभ्यासतात.  2. अरण्यांचे प्रकार व विभागणी सांगू शकतात.  3. अरण्यांचे संरक्षण माहिती करून घेतात. 4. वन्यजीव अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने माहिती करून घेतात. 5. भारतातील जैविक संरक्षण क्षेत्रे अभ्यासतात.

         15.     

 

अर्थशास्त्र    
2.  ग्रामीण  विकास

1. ग्रामीण विकासाचा अर्थ आणि महत्त्व समजावून घेतात.  2. ग्रामीण विकास आणि विकेंद्रीकरण जाणून घेतात.  3.  ग्रामीण विकास आणि पंचायतराज संस्था अभ्यासतात. 4.ग्रामीण विकास आणि महिला सबलीकरण माहिती करून घेतात.

         16.     

ऑक्टोबर
15

इतिहास             
4. ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध            
 

1. हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल माहिती करून घेतात.  2. अँग्लो-म्हैसूर युद्धे अभ्यासतात.  पुढील नेत्यांची कारकीर्द माहिती करून घेतात. 3.कित्तूरचे बंड- राणी चन्नम्मा व संगोळ्ळी रायण्णा 4.  अमर सुळ्याचे बंड 5. पुट्ट बसाप्पा 6.  सूरपूर आणि कोप्पळचे बंड. 7. हलगलीच्या बेरडांचे बंड

         17.      

 

समाजशास्त्र 
2. श्रम                                                                                

1. श्रम विभागणी माहिती करून घेतात.   2. नोकरी, व्यवसाय अथवा श्रमामधील असमानता आणि भेदभाव समजावून घेतात. 3. मजुरीसहित आणि मजुरीरहित श्रम माहिती करून घेतात.  4. संघटित व असंघटित क्षेत्रातील मजूर / कामगार फरक स्पष्ट करू शकतात.  5. असंघटीत कामगारांसमोरील आव्हाने अभ्यासतात.

         18.     

 

व्यवहार अध्ययन      
2. उद्योजकता                                                         

1.  उद्योजकता-अर्थ  समजून घेतात. 2. उद्योजकतेचे महत्त्व आणि भूमिका समजून घेतात. 3.  स्वयं उद्योगाची संधी जाणून घेतात.   4. स्वयं उद्योग योजना समजावून घेतात.  5. प्रमुख उद्योजकांची माहिती करून घेतात.

         19.     

नोव्हेंबर
23

इतिहास             
5. सामाजिक व धार्मिक सुधारणांची चळवळ
 

1.  ब्राम्हो समाजाची स्थापना व सुधारणा जाणून घेतात.   2.आर्य समाजाची स्थापना व सुधारणा अभ्यास करतात.  3. सत्यशोधक समाजाची शिकवण अभ्यासतात.  4. रामकृष्ण मिशनची शिकवण जाणून घेतात. 5. नारायण गुरू धर्म परिपालन योगम याबद्दल माहिती करून घेत. 6.  तरूण बंगाली चळवळ अभ्यासतात. 7. प्रार्थना समाजाची सुधारणा सांगू शकतात.  8.  अलिगढ चळवळ. 9. थिऑसॉफिकल सोसायटी. 10. पेरियार यांचा अभ्यास करतात.

          20.  

 

इतिहास             
6. भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध                        

1.  पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची कारणे समजावून घेतात.  2. बंडाची तत्कालीन कारणे समजून घेतात.  3. बंडाचा विस्तार आणि त्याचे स्वरूप  माहिती करून घेतात. 4. बंडाचे अपयश  5. बंडाचे परिणाम यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवितात.

       21.     

 

राज्यशास्त्र  
3. भारत आणि इतर राष्ट्रांचे नातेसंबंध                                  

इतर राष्ट्रांचे नातेसंबंध यांची माहिती करून घेतात. भारत - चीन संबंध 2. भारत - पाकिस्तान संबंध 3. भारत - रशिया संबंध  4. भारत - अमेरिका संबंध

     22.   

 

भूगोल 
6. भारतातील जलसाधन संपत्ती                                        
 

1.  जलसाधनसंपत्तीचे महत्त्व समजावून घेतात.  2. भारतातील प्रमुख नद्या ओळखतात.  3. पाणी पुरवठा - त्याचा अर्थ व महत्त्व समजावून घेतात.  4. भारतातील  पाणीपुरवठ्याची आवश्यकता जाणून घेतात.  5. पाणी पुरवठ्याचे प्रकार व त्याची विभागणी माहिती करून घेतात.   6. बहुद्देशीय पाणीपुरवठा योजना सांगू शकतात.

      23.   

 

भूगोल    
7. भारतातील भूमी संसाधन                                       
 

1.  भारतातील जमिनीचा वापर अभ्यासतात.  2. भारतातील शेती आणि त्याचे महत्त्व जाणून घेतात.  3. भारतातील शेतीचे प्रकार सांगू शकतात. 4.  भारतातील प्रमुख पिके सांगू शकतात.  5. पिकांचा मोसम ओळखू शकतात. 6.  पिकांची विभागणी जाणून घेतात. 7. बागायती पिके व फूलशेती अभ्यासतात.

       24.  

 

अर्थशास्त्र  : 
3. पैसे आणि कर्ज                                        
 

1. पैशाचा अर्थ, स्त्रोत व कार्ये समजावून घेतात.  2. बँकांचे महत्त्व जाणतात. 3. भारतीय रिझर्व बँकेची कार्ये समजावून घेतात. 4. पैशांचा पुरवठा व त्याचे मोजमाप समजावून घेतात. 5. भारतीय रिझर्व बँकेंने सुचविलेले कर्ज नियंत्रणाचे उपाय अभ्यासतात.

       25.  

डिसेंबर
26

इतिहास             
7. स्वातंत्र्याची चळवळ                                          

1.  राष्ट्रीयतेचा उदय समजून घेतात.  2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस  3. मवाळ, जहाल आणि क्रांतीकारक या साऱ्यांची माहिती करून घेतात.

      26.  

 

इतिहास  
8. गांधीयुग आणि राष्ट्रीय चळवळ                                         
                                       

गांधी आणि त्यांच्याशी संबंधित घटना जाणून घेतात - 1.  गांधीजींचे जीवन 2. भारतातील गांधीजींची प्रारंभिक चळवळ 3. गांधीजींची आध्यात्मिक साधना  4. जलियनवालाबाग हत्याकांड 5.  खिलाफत चळवळ 6. असहकार चळवळ  7. सविनय कायदे भंग चळवळ 8. चलेजाव चळवळ  9.  गोलमेज परिषद 10. सुभाषचंद्र बोस व इंडियन नॅशनल 11.आर्मी (आझाद हिंद फौज)  12.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर 13.जयप्रकाश नारायण व त्यांनी केलेल्या सुधारणा  14.  महंदअली जीना 15. जवाहरलाल नेहरू

       27.   

 

समाजशास्त्र  :
3. सामाजिक चळवळी                                        

1.  सामाजिक चळवळींचा अर्थ, स्वरूप, प्रारंभ आणि विकास  जाणून घेतात. पुढील चळवळींचा अभ्यास करतात. - 2. परिसर चळवळी 3. मद्य-प्रतिबंधक चळवळी 4. कामगार चळवळी 5.  महिला चळवळी 6. कृषी चळवळी 7. अस्पृश्यता निर्मूलन चळवळी

       28.  

 

भूगोल  
8. भारतातील खनिेजे व शक्तीसाधने  (उर्जासाधने)                                          

1. खनिजांचा अर्थ व त्यांचे महत्व जाणून घेतात. 2. भारतातील प्रमुख खनिजे, त्यांच्या खाणी, विभागणी व उत्पादन माहिती करून घेतात.  3. उर्जा साधने - त्यांचा अर्थ व महत्त्व समजावून घेतात. 4. पारंपारिक उर्जास्त्रोत - कोळसा, पेट्रोलियम व अणुऊर्जा माहिती करून घेतात. 5. भारतात विद्युत शक्तीचा अभाव (कमतरता) व त्यावरील उपाययोजना जाणून घेतात.

         29.  

 

भूगोल  
9. वाहतूक आणि दळणवळण                                          

1.  वाहतुकीचा अर्थ व महत्त्व समजावून घेतात.  2. भारतातील वाहतुकीचे प्रकार 1) भूमार्ग वाहतूक व त्याचे प्रकार 2) जलमार्ग वाहतूक व त्याचे प्रकार  3) वायुमार्ग वाहतूक व त्याचे प्रकार 3. दळणवळण - अर्थ, महत्त्व व प्रकार यांच्याविषयी जाणून घेतात.

         30.  

जानेवारी
24

इतिहास  
9. स्वातंत्र्योत्तर भारत 

1. भारताच्या विभाजनाचे परिणाम अभ्यासतात. 2. निर्वासितांची समस्या समजून घेतात. 3. राज्यांची पुनर्रचना अभ्यासतात.  4. सरकार स्थापनेची समस्या अभ्यासतात.  5. संस्थानांचे विलिनीकरण माहिती करून घेतात.

         31.     

 

राज्यशास्त्र   
4. जागतिक समस्या आणि भारताची भूमिका                                          

1.  मानवी हक्कांची अवहेलना समजावून घेतात.  2. शस्त्रास्त्र स्पर्धा अभ्यासतात. 3. आर्थिक असमानता जाणून घेतात.

         32.   

 

भूगोल   
10. भारतातील उद्योगधंदे                                          
 

1. उद्योगधंद्याचा अर्थ व महत्त्व अभ्यासतात.  2. उद्योगधंद्याचे स्थायीकरण सांगू शकतात. 3. भारतातील प्रमुख औद्योगिक प्रदेश  ओळखू शकतात. 4. भारतातील प्रमुख उद्योगधंदे - लोह पोलाद उद्योग, अ‍ॅल्युमिनियम, सुतीवस्त्रोद्योग,  साखर व कागद उद्योग, ज्ञानाधारित उद्योगधंदे यांच्याविषयी माहिती सांगू शकतात.

         33.  

 

भूगोल
11. भारतातील नैसर्गिक आपत्ती                                   

1.  नैसर्गिक आपत्तीचा अर्थ  समजावून घेतात. 2. भारतातील वादळे, महापूर, दरडी कोसळणे, समुद्र किनापट्टीची झीज व भूकंप - यांची कारणे व विभागणी सांगू शकतात.

                   34.  

 

अर्थशास्त्र  : 
4. सार्वजनिक अर्थव्यवस्था आणि अंदाजपत्रक

1. सार्वजनिक अर्थव्यवस्था अर्थ आणि महत्त्व समजावून घेतात. 2. अंदाजपत्रक म्हणजे काय ? जाणून घेतात. 3. सार्वजनिक खर्च आणि उत्पन्न सांगू शकतात. 4. तुटीची अर्थव्यवस्था आणि आर्थिक तुटी याबद्दल माहिती करून घेतात.

             35.  

 

व्यवहार अध्ययन  
3. व्यवसायाचे जागतिकीकरण
 

1. जागतिकीकरणाचा अर्थ अभ्यासतात.  2. जागतिकीकरणातील समाविष्ट घटक जाणून घेतात. 3. जागतिकीकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये सांगू शकतात. 4. जागतिकीकरणाचे फायदे जाणून घेतात.  5. जागतिकीकरणाचे तोटे सांगू शकतात.  6.जागतिक व्यापारी संघटना (W.T.O) माहिती करून घेतात.

    36.  

फेब्रुवारी
24

इतिहास            
 10. विसाव्या शतकातील राजकीय घडामोडी                                          

पुढील महत्त्वाच्या घटना अभ्यासतात -  1. पहिले महायुद्ध  2. रशियन राज्यक्रांती 3. हुकूमशहांचा उदय  4.  दुसरे महायुद्ध  5. चीनची क्रांती 6. शीतयुद्ध 7. अमेरिकेचा उदय

                       37.   

 

राज्यशास्त्र 
5. जागतिक संघटना                                          

1.  युनोची स्थापना माहिती करून घेतात.  2.  युनोची उद्दिष्टये सांगू शकतात. 3. युनोच्या शाखा सांगू शकतात.  4. युनोची सफलता माहिती करून घेतात.  5. युनोची कार्यालये अभ्यासतात.

          38.  

 

समाजशास्त्र
4. सामाजिक समस्या                                          
 

पुढील सामाजिक समस्या अभ्यासतात - 1. बालमजुरी 2. लिंगभेद 3. बालविवाह 4. बालकांवरील लैंगिक अत्याचार 5. भूक आणि कुपोषण 6. समस्या सोडविण्यासाठीचे उपाय 7. बालकांचे अपहरण 8. स्त्री-भ्रूणहत्त्या

                 39.  

 

भूगोल   
 12. भारताची लोकसंख्या                                        

1. भारताच्या लोकसंख्येचा आकार जाणून घेतात. 2. भारतातील लोकसंख्येची वाढ अभ्यासतात.  3. लोकसंख्या वाढीची कारणे जाणून घेतात. 4. लोकसंख्येच्या विभागणीवर परिणाम करणारे घटक समजावून घेतात. 5. लोकसंख्येची घनतेनुसार विभागणी सांगू शकतात.

40.    

 

व्यवहार अध्ययन       
4. ग्राहक शिक्षण आणि संरक्षण                        

 1. ग्राहकांचे हक्क, शोषण, ग्राहक जागृती याविषयी जाणून घेतात . 2. ग्राहक संरक्षण कायद्यातील मुख्य घटक व त्यांचे महत्त्व समजावून घेतात. 3. वस्तू किंवा सेवा विकत घेताना घ्यावयाची खबरदारी  कळते. 4. ग्राहक शिक्षणाचे महत्व आणि ग्राहक न्यायालयात जाण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती समजावून घेतात.

          41.     

 मार्च
26

अभ्यासाची उजळणी करणे.
जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे.

परीक्षेची तयारी होते.  प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे आत्मविश्वास निर्माण होवून परीक्षेची भीती नाहीशी होते.

          42.  

एप्रिल  24

वार्षिक परीक्षा

 


No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...