Wednesday, July 7, 2021

इयत्ता आठवी विषय : समाज विज्ञान वार्षिक अंदाज पत्रक .

 

SOCIAL  SCIENCE

8TH STANDARD

year   PLAN

 

मराठीत

प्रथमच

      नमुना  1

 

Prepared By..



                          Ranjit Chaugule    

                      Govt. Sardars High School, Belgaum                 




SL. NO.

MONTH & DAYS

FROM        TO

 

UNIT

 

CORE LEARNING OUTCOMES OF THE UNIT

1

जुलै

23

 

सेतुबंध

पूर्वपरीक्षा

साफल्य परीक्षा

1.      सामर्थ्यावर आधारित विद्यार्थी पूर्व परीक्षा देतील.

2.   साफल्य परीक्षेतून विद्यार्थी सामर्थ्य समजावून घेतील.

2

ऑगस्ट

25

इतिहास             

1. साधने                                  

1. इतिहासाच्या अभ्यासासाठी आवश्यक साधनांचा अभ्यास करतात. 2. वेगवेगळी ऐतिहासिक साधने समजावून घेतात 3. महत्त्वाची पुरातत्व साधने. कोणती ओळखतात. 4. शिलालेखाचे महत्व समजून घेतात. 5.मौखिक साधने इतिहासाच्या अभ्यासाला पूरक ठरतात हे अभ्यासतात.

3

 

राज्यशास्त्र

1.  राज्यशास्त्राचा अर्थ आणि महत्त्व                                        

1. राज्यशास्त्राचा अर्थ समजावून घेतात.  2. राज्यशास्त्रातील प्रगतीचा आढावा घेतात. 3. राज्यशास्त्र तज्ज्ञ आणि त्यांचे योगदान याबद्दल माहिती करून घेतात. 4. राज्यशास्त्राचे महत्त्व समजावून घेतात.

4

 

समाजशास्त्र

1. समाजशास्त्राचा परिचय                                        

1. समाजशास्त्राचा उदय अर्थ, स्वरूप, विस्तार आणि महत्त्व जाणून घेतात.  2. समाजशास्त्राचा इतर सामाजिक शाखांशी असणारा संबंध समजावून घेतात. 3. प्रारंभिक पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ

1) ऑगस्ट काम्ते 2) कार्ल मार्क्स, 3) एमिली डर्कहेम 4) मॅक्स वेबर   भारतातील प्रमुख समाजशास्त्रज्ञ 1) बी.आर. आंबेडकर 2) जी. एस. घुरे 3) एम. एन. श्रीनिवास 4) सी. पार्वतम्मा 5) इरावती कर्वे 6) ए. आर. देसाई यांची माहिती करून घेतात.

5

 

भूगोल   

1. पृथ्वी - आमचा सजीवांचा ग्रह                        

1. पृथ्वीचे महत्त्व आणि विविध नावाचे परिचय करून घेतात.  2. पृथ्वीचे आकारमान आणि जमीन व पाण्याची विभागणी माहिती  करून घेतात. 3. जगातील खंड आणि महासागरांची ओळख करून घेतात.  4. अक्षांश, रेखांश, वेळ, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, दिशा आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा यांची माहिती करून घेतात. 5. जगाच्या नकाशात खंड आणि महासागर दाखवितात.

6

 

अर्थशास्त्र

1. अर्थशास्त्र परिचय                                         

1. अर्थशास्त्राचा अर्थ आणि त्याच्या मूलभूत संकल्पना अभ्यासतात. 2. अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व जाणून घेतात. 3. मूलभूत आर्थिक समस्यांच्या विवरणातून विविध आर्थिक उपक्रम करतात. 4. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यातील फरक समजावून घेतात.

7

 

व्यवहार अध्ययन

1. व्यवहार अध्ययनाचे घटक                                        

1. व्यवहार अध्ययनाची मूळ वैशिष्ट्ये, आर्थिक व्यवहार आणि त्यांचे प्रकार अभ्यासतात. 2. व्यापार प्रारंभातील वेगवेगळ्या अवस्था (टप्पे) समजावून घेतात. 3. आर्थिक प्रगतीमध्ये व्यापार आणि वाणिज्य यांची भूमिका जाणून घेतात.  4. एकविसाव्या शतकातील व्यापाराच्या विकासाची प्रक्रिया जाणून घेतात.

8

सप्टेंबर

25

इतिहास             

2. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये व प्राचीन भारत                        

1. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये अभ्यासतात. 2. भारत हे द्वीपकल्प आणि उपखंड आहे हे समजावून घेतात. 3. भारताच्या शेजारी राष्ट्रांची ओळख करून घेतात.  4. इतिहासपूर्व काळातील मानवाची जीवन पद्धती समजावून घेतात.  5. इतिहासपूर्व काळातील पाषाण युग अभ्यासतात.

9

 

इतिहास             

3. भारताच्या प्राचीन संस्कृती         

 

1. भारताच्या प्राचीन संस्कृती समजावून घेतात.  2. नगरांचा विकास, वैशिष्ट्ये, नगररचना, नागरी जीवन व नगरांचा ऱ्हास यांचा आढावा घेतात 3. वैदिक काळातील प्रगती, जीवन शैली आणि वेदोत्तर काळ समजावून घेतात. 

10

 

समाजशास्त्र

2.  संस्कृती                                     

1. संस्कृतीचा अर्थ व स्वरूप समजावून घेतात. 2. संस्कृतीची वैशिष्ट्ये जाणून घेतात.  3. समाज व संस्कृतीतील नाते अभ्यासतात. 4. सांस्कृतिक रुढींचे महत्त्व व विविधता माहिती करून घेतात.

11

 

अर्थशास्त्र

2. अर्थव्यवस्थेचा अर्थ व प्रकार                                          

1. अर्थव्यवस्थेचा अर्थ व प्रकार अभ्यासतात. 2. विविध अर्थव्यवसायांची तुलना व त्यांच्या गुणदोषांची नोंदणी करतात.  3. भारताच्या अर्थ व्यवस्थेची वैशिष्ट्ये जाणून घेतात. 4. भारतातील सार्वजनिक क्षेत्राचे मूल्यमापन करतात.

12

ऑक्टोबर

15

इतिहास

4. जगाच्या प्राचीन संस्कृती                                

1.  जगातील थोर संस्कृती - इजिप्त, मेसापोटेमिया आणि चीन  यांचा अभ्यास करतात. 2. वेगवेगळ्या संस्कृतीतील जीवनशैली, कला-शिल्पकला अभ्यास करतात.  

13

 

इतिहास            

5. ग्रीक, रोमन आणि अमेरिकन संस्कृती                                         

1.  ग्रीक संस्कृतीचा विकास आणि त्यांचे योगदान . 2. रोम संस्कृतीचा विकास आणि त्यांचे योगदान जाणून घेतात. 3. अमेरिकेतील प्राचीन कोलंबियन संस्कृती - माया, अ‍ॅझटेक व इंका संस्कृती अभ्यासतात.

14

 

राज्यशास्त्र        

2. सार्वजनिक प्रशासन                               

 

1.  सार्वजनिक प्रशासनाचा अर्थ व महत्त्व समजावून घेतात  2. सार्वजनिक प्रशासनाची व्याप्ती माहिती करून घेतात.  3. भरती पद्धती आणि अर्थ समजावून घेतात. 4. प्रशिक्षण पद्धती आणि अर्थ माहिती करून घेतात.  समजावून घेतात  :  5. केंद्रीय लोकसेवा आयोग. 6. कर्नाटक लोकसेवा आयोग 7. केंद्रीय सचिवालय. 8. राज्य सचिवालय. 9.  कायदा आणि सुव्यवस्था. 

15

 

भूगोल            

2. शीलावरण                                     

1. शिलावरणाचा अर्थ व महत्त्व जाणून घेतात. 2. पृथ्वीचा आराखडा व रचना समजावून घेतात. 3. खडकांची उत्पत्ती आणि रचना समजावून घेतात.  4. अंतर्गत शक्ती - ज्वालामुखी, भूकंप, त्सुनामी वगैरे बद्दल आणि त्यांचे पृथ्वीच्या जीवांवर होणारे परिणाम यांची माहिती करून घेतात. 5. बाह्यशक्ती - तापमान, वारे, पाऊस, नद्या. 6. भूजलाचा अर्थ व महत्त्व जाणतात.

16

नोव्हेंबर

23

इतिहास          

6. जैन व बौद्ध धर्माचा उदय                                 

1. जैन व बौद्ध धर्मांचा उदय कसा झाला अभ्यासतात. 2. जैन आणि बौद्ध धर्म उमजून घेतात. 3. जैन आणि बौद्ध धर्माची तत्त्वे समजावून घेतात.  4. नव्या धर्मांचा प्रसार कसा झाला जाणून घेतात.

17

 

इतिहास          

7. मौर्य आणि कुशाण                         

1.  भारताने पाहिलेले पहिले साम्राज्य - मौर्य साम्राज्य अभ्यासतात. 2. मौर्य साम्राज्यातील प्रसिद्ध सम्राट अशोक यांची कामगिरी, राज्य कारभार, कला आणि शिल्पकला क्षेत्रातील योगदान समजून घेतात. 3. कुशाणांचा इतिहास, राज्यकारभार आणि कनिष्काचे योगदान अभ्यासतात.  4. भारताच्या नकाशात मौर्यांच्या काळातील सम्राट अशोकांचा साम्राज्य विस्तार दाखवितात.

18

 

राज्यशास्त्र

3. मानवी हक्क                                           

1. मानवी हक्क अर्थ आणि विकास अभ्यासतात. 2. मानवी हक्कांची घोषणा माहिती करून घेतात.  3.  मानवी हक्क आणि भारतीय राज्य घटना अभ्यास करतात.  4. मानवी हक्क लागू करण्याचे मार्ग समजावून घेतात.

19

 

भूगोल   

3. वातावरण                                         

1.  वातावरणाचा अर्थ, महत्व, रचना आणि संघटन माहिती करून घेतात. 2. वातावरणाचे घटक, तापमान, दाब, वारे, आर्द्रता, ढग आणि त्यांचे कार्य व परिणाम अभ्यासतात. 3. हवा आणि हवामान    यातील फरक ओळखतात.

20

 

व्यवहार अध्ययन

2. व्यापार आणि उद्योगधंदे                                           

1. व्यापाराची उद्दिष्ट्ये जाणून घेतात.. 2. व्यापाराच्या वेगवगेळ्या पद्धती देशांतर्गत व्यापार, विदेशी व्यापार, आणि पुनर्निर्यात यांचा अर्थ आणि महत्त्व समजावून घेतात. 3. उद्योगांचे प्रकार अभ्यासतात.   4. लघुउद्योग व कुटीरोद्योग 5. व्यवसाय, व्यापार आणि उद्योगांच्या समस्या. 6. व्यावसायिक नितीमत्ता जाणून घेतात.

21

डिसेंबर

26

इतिहास          

8. गुप्त आणि वर्धन                         

1.  गुप्त साम्राज्यातील प्रसिद्ध राज्यकर्ते, राजकीय कामगिरी अभ्यासतात.  2. गुप्त साम्राज्याची साहित्यिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील देणगी समजावून घेतात.  3. वर्धन साम्राज्याची वाढ, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान जाणून घेतात.  4. भारताच्या नकाशात गुप्त साम्राज्याचा विस्तार दर्शवितात. 

22

 

समाजशास्त्र

3.  सामाजिक संस्था                                           

1. अर्थ, स्वरूप व सामाजिक संस्थांचे महत्त्व जाणून घेतात. 2. मानव व सामाजिक संस्थातील संबंध समजावून घेतात.  3. सामाजिक संस्थांची भूमिका व कार्ये यांचा अभ्यास करतात.

23

 

भूगोल

4. जलावरण             

1. विविध प्रकारच्या जलसाठ्यांची ओळख करून घेतात.  2. सागरतळाची रचना समजून घेतात 3. सागरी प्रवाह व त्याचे प्रकार आणि महासागरांचे संरक्षण कसे करायचे माहिती करून घेतात.  4. भारताच्या नकाशात महासागर, आखात, खाडी आणि सामुद्रधुनी दाखवतात.  

24

 

अर्थशास्त्र  

3. राष्ट्रीय उत्पन्न व भारताच्या अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रे                

1. राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न यांची संकल्पना समजावून घेतात.  2. भारताच्या अर्थ व्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या प्रगतीचे विवरण करतात. 3. भारतातील लघुउद्योगांचे महत्त्व अभ्यासतात. 4. कृषि व्यवसायातील समस्यांची कारणे व ते निवारण करण्याचे उपाय अभ्यासतात.

25

जानेवारी

24

इतिहास             

9. दक्षिण भारत सातवाहन, कदंब व गंग                                         

 1. दक्षिण भारतातील सातवाहनांचा राज्यविस्तार, त्यांचे कार्य राज्यकारभार, कला आणि शिल्पकला. गौतमीपुत्र शातकर्णीचे योगदान अभ्यासतात. 2. शातकर्णीची कारकीर्द जाणून घेतात. 3. कर्नाटकामध्ये प्रथम साम्राज्य स्थापन करणारा कदंब वंश माहिती करून घेतात.  4. गंग घराण्याची स्थापना, कला, शिल्पकला व साहित्य क्षेत्रात गंगांची देणगी अभ्यासतात. 5. गंग आणि कदंबांचा साम्राज्य विस्तार नकाशात दर्शवितात.

26

 

राज्यशास्त्र        

4. स्थानिक स्वराज्य संस्था                           

1.  स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व जाणून घेतात. 2. स्थानिक स्वराज्य संस्थांची उद्दिष्टे व कार्य जाणून घेतात.  3. विविध स्थानिक स्वराज्य संस्थाची रचना, व्यवस्थापन, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांचा अभ्यास करतात.

27

 

भूगोल            

5. जीवावरण                                           

1. जीवावरणाचे महत्त्व आणि अर्थ जाणून घेतात. 2. पर्यावरणाचा अर्थ, पर्यावरणाचे प्रदूषण, प्रदूषणाचे प्रकार आणि ते रोखण्याचे उपाय समजावून घेतात.

28

 

व्यवहार अध्ययन

3. विविध व्यापारी संघटना                                     

1. व्यापारी संघटनांचा अर्थ जाणून घेतात. 2. भागीदारी व्यवसायाची वैशिष्टये, फायदे आणि तोटे जाणून घेतात. 3. भागीदारी व्यवसायाची नोंदणी प्रक्रिया समजावून घेतात.  4. हिंदू अविभक्त कुटुंबातील व्यवसाय माहिती करून घेतात.

29

फेब्रुवारी

24

इतिहास             

10. बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव                                           

1. बदामीच्या चालुक्यांचे साम्राज्य, दुसऱ्या पुलकेशीचा राज्यविस्तार माहिती करून घेतात. 2. धार्मिक, सामाजिक, संरक्षण आणि न्यायव्यवस्था अभ्यासतात.  3. बदामीच्या चालुक्यांचे साम्राज्य नकाशात ओळखतात. 4. कांचीच्या पल्लवांचे साहित्य, धर्म, कला शिल्पकला आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान समजावून घेतात.

30

 

समाजशास्त्र      

4. समाजाचे प्रकार                                    

1.  समाजाचा अर्थ व प्रकार माहिती करून घेतात.  2. शिकारी व सामुदायिक समाज. 3. धनगर समाज (पशुपालक). 4. भटके व विमुक्त समाज. 5. शेतकरी समाज. 6. ग्रामीण व शहरी समाज. 7. औद्योगिक समाज. 8. माहिती समाज. यांची माहिती करून घेतात.

31

 

अर्थशास्त्र

4. सरकार आणि अर्थव्यवस्था                                          

 

1. आर्थिक विकासामध्ये योजनेचे महत्त्व समजून घेतात. 2. भारतातील योजनांच्या यशापयशाचे मूल्यमापन करतात.  3. उदारीकरण (व्याप्ती), खासगीकरण व जागतिकीकरणाचा अर्थ समजून घेतात. 4. भारतात विकासासाठी सुरु असलेल्या प्रमुख कार्यक्रमांचा अभ्यास करतात.

32

मार्च

26

इतिहास          

11. मान्यखेटचे राष्ट्रकुट आणि कल्याणचे चालुक्य                                     

1.  या घराण्याचा संस्थापक दंतीदुर्ग आणि प्रसिद्ध राज्यकर्ता अमोघवर्ष माहिती करून घेतात. 2. त्यांची राज्यव्यवस्था, साहित्य व शिल्पकला या क्षेत्रातील योगदान समजावून घेतात.  3. कल्याणच्या चालुक्यांचे प्रशासन आणि साहित्य क्षेत्रातील योगदान यांची माहिती करून घेतात.  4. भारताच्या नकाशात राष्ट्रकूटांचे प्रदेश दर्शवितात.

33

 

इतिहास                      

12. चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ                                         

1. चोळ साम्राज्याचा विस्तार आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांची कामगिरीचा आढावा घेतात.  2. होयसळ घराण्याची स्थापना आणि त्यांचे धार्मिक, साहित्य, कला व शिल्पकला या क्षेत्रातील योगदान माहिती करून घेतात.

34

 

अभ्यासाची उजळणी करणे.

जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे.

परीक्षेची तयारी होते.  प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे आत्मविश्वास निर्माण होवून परीक्षेची भीती नाहीशी होते.

35

 

वार्षिक परीक्षा

 

 

 


No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...