कवी परिचय
विंदा करंदीकर (1918 2010 ) पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. मराठीतील ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. इंग्रजीचे प्राध्यापक. स्वेदगंगा हा त्यांचा पहिला कवितासंग्रह त्यानंतर मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका हे त्यांचे इतर कवितासंग्रह. राणीचा बाग, एकदा काय झा, परी ग परी, बागुलबुवा वगैरे बालकवितासंग्रह. परंपरां आणि नवता, अरीस्टोटलचे काव्यशास्त्र वगैरे समीक्षा ग्रंथ असे विपुल साहित्य त्यांनी लिहिले. त्यांच्या समीक्षा व काव्य ग्रंथाचे गुजराती, इंग्रजीत, हिंदीत अनुवाद झाले असून महाराष्ट्र शासनाचे दहा पुरस्कार, सीनियर फुलब्राईट पुरस्कार, कबीर पुरस्कार, कोणार्क पुरस्कार टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डि. लीट. अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते आपल्या बहुतेक पुरस्कारांची मिळालेली रक्कम त्यांनी समाजातील विविध संस्थांना वाटून टाकली.मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे .2003 साली हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. प्रस्तुत कविता त्यांच्या धृपद या कवितासंग्रहातून घेतली आहे.
कवी : विंदा करंदीकर
काव्यप्रकार : मुक्तछंद
संदर्भग्रंथ : धृपद
मूल्य : -----
T
ReplyDelete