Sunday, May 19, 2019

तो राजहंस एक

हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी येथे  क्लिक करा CLICK ME

                                           

                                       
कवी परिचय :

गजानन दिगंबर माडगूळकर  (1919-1977) प्रसिद्ध कवी, कथाकार, कादंबरीकार, पटकथा लेखक. ‘जोगिया’, ‘चैत्रबन’, ‘गीतरामायण’ इ. काव्यसंग्रह. ‘आकाशाची फळे’ ही कादंबरी, ‘वाटेवरल्या सावल्या’ हे आत्मचरित्र. मराठमोळ्या जीवनाचे विविधरंगी चित्रण, उत्कट भावनाशीलता, प्रसन्न रसाळ आणि नाट्यपूर्ण शैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. ‘गीतरामायणा’च्या रचनेनंतर ‘आधुनिक वाल्मीकी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
मूल्य : आत्मविश्वास
साहित्य प्रकार : भावकविता
संदर्भ ग्रंथ : गदिमा साहित्य नवनीत

मध्यवर्ती कल्पना : एका तळ्यात बदकाच्या पिल्लाबरोबर एक राजहंसाचे पिल्लू पण वाढत असते. बदकाची पिल्ले त्याला वेगळा म्हणून वाईट वागणूक देत असतात. त्यामुळे ते पिल्लू दु:खी असते. सर्वांहून वेगळे पोहत असते. पण एकदा त्या कुरूप पिल्लाच्या जीवनात वेगळाच दिवस उगवतो. चोरून पाण्यात पाहताना आपले प्रतिबिंब हे राजहंसाचे आहे हे त्याला उमगते आणि आनंदाच्या भरात त्याचे भय वाèयाबरोबर उडाले आणि आत्मविश्वास जागृत झाला. त्याची कमीपणाची भावना संपली.

 टीपा अर्थ




राजहंस : मानस सरोवरात दिसून येणारा एक दुर्मीळ पक्षी. हा पांढèया काळ्या रंगाचा बदकाच्या जातीचा पक्षी आहे. हा पक्षी मोत्याचा चारा खातो आणि दूध व पाणी वेगळे करतो अशा त्याच्याबद्दलच्या दंतकथा (मिथक) प्रसिद्ध आहेत.



स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. बदकाची पिल्ले कशी होती?
उत्तर : बदकाची पिल्ले सुरेख होती.

2. ते पिल्लू वेगळे का तरंगत होते?
उत्तर : त्या पिल्लाला आपल्याबरोबर खेळावयास कोणी घेत नसल्यामुळे ते पिल्लू वेगळे तरंगत होते.

3. त्या पिल्लाला कोण विचारत नसे?
उत्तर : बदकाची पिल्ले म्हणजे  त्याची भावंडे त्या पिल्लाला विचारत नसत.

प्र. 2.  खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1. लोक हसून काय म्हणत असत?
उत्तर : ते पिल्लू वेगळे तरंगत असताना लोक हसून त्याच्याकडे पहात व  बोट करून कुरूप, वेडे म्हणत असत.

2. पिल्लास कोणते दु:ख होते?
उत्तर : ते पिल्लू इतरांपेक्षा वेगळे होते. कोणी त्याला खेळायला सुद्धा घेत नसत.  बदकाची पिल्ले त्याला वेगळा म्हणून वाईट वागणूक देत असत. कुरूप म्हणून लोक त्याच्याकडे बोट करीत व त्याला हसत. ते आपले दु:खसुद्धा कुणाला सांगू शकत नव्हते. त्यामुळे ते पिल्लू दु:खी होते.

3. राजहंस असल्याचे पिल्लाला केव्हा कळाले?
उत्तर : कोणीही त्या पिल्लाला खेळायला घेत नसल्यामुळे ते सर्वांहून वेगळे पोहत असे पण एकदा त्या  कुरूप पिल्लास चोरून पाण्यात पाहताना आपले प्रतिबिंब राजहंसाचे आहे हे त्याला उमगले.

प्र. 3. या कवितेचा सारांश लिहा.

कवितेचा सारांश : विद्यार्थ्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करावयास लावणारे असे हे गदिमांचे सुंदर काव्यशिल्प आहे.  अतिशय गाजलेले असे हे भावगीत आहे. एका तळ्यामध्ये बदकाची अनेक सुरेख पिले रहात होती. त्या बदकाच्या पिल्लांबरोबर एक राजहंसाचे पिल्लू पण वाढत  होते.  पण दिसायला ते पिल्लू त्या बदकाच्या पिल्लांपेक्षा वेगळे होते.  ते अतिशय कुरूप वाटत होते. त्यामुळे ती बदकाची पिल्ले त्याला वेगळा म्हणून वाईट वागणूक देत असत. ते पिल्लू आपल्यापैकी नव्हे अशी त्या बदकाच्या पिल्लांची भावना झाली होती. त्यामुळे कोणीसुद्धा त्याला आपल्याबरोबर खेळावयास सुद्धा घेत नव्हते,  ते पिल्लू एकटे पडले होते. सर्वांहून निराळे भासणारे ते पिल्लू एकटेच वेगळे पाण्यामध्ये पोहत असे. लोकही त्याच्याकडे पाहून हसत असत. त्याच्याकडे बोटकरून त्याला कुरूप, वेडे म्हणून त्याची हेटाळणी करीत असत.  त्यामुळे त्या पिल्लाला दु:ख होई. सदैव ते दु:खीकष्टी असे. आपले दु:ख कोणाला सांगायचे म्हटले तरी त्याची भावंडे म्हणजेच बदकाची पिल्लेसुद्धा त्याला विचारत नसत. त्यामुळे ते भोळे पिल्लू रडत बसे. ते  पूर्णत: एकटे पडले होते.  त्याची बोच त्याला लागून राहिली होती.  इतरजण त्याला धाक दाखवित असत. पण एकदा त्या कुरूप पिल्लाच्या जीवनात वेगळाच दिवस उगवतो. चोरून पाण्यात पाहताना आपले प्रतिबिंब हे राजहंसाचे आहे हे त्याला उमगले आणि आनंदाच्या भरात त्याची भीतीसुद्धा वाèयाबरोबर उडाली त्याच्यात आत्मविश्वास जागृत झाला. त्याची कमीपणाची भावना संपली. आपण कोणी साधे नाही आहोत तर इथे पोहोणाèयांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत ही भावना त्याला स्पर्श करून गेली.

हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी येथे  क्लिक करा CLICK ME


प्र. 4.   योग्य तो पर्याय निवडून पुढे लिहा.

1. या कवितेत कोणत्या पक्षाचे वर्णन केले आहे?
अ) बदक ब) पोपट क) कावळा ड) राजहंस

2. बदकाची पिल्ले कुठे रहात होती?
अ) तळ्यात ब) पिंजèयात क) समुद्रात ड) घरट्यात

3. गीतरामायणाच्या रचनेनंतर ग.दि.माडगूळकरांना ............ या नावानी ओळखले जाते.
अ) गीतरामायणकार ब) आधुनिक वाल्मीकी क) ग.दि.मा. ड) श्रीराम

4. या कवितेचा काव्य प्रकार हा आहे.
अ) प्रेमगीत ब) देशगीत क) भावगीत ड) बालगीत

उत्तरे : 1. ड) राजहंस  2. अ) तळ्यात  3. ब) आधुनिक वाल्मीकी   4. क) भावगीत 


** कविता पाठांतरासाठी आहे.

तो राजहंस एक

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयात एक
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनी निराळे, ते वेगळे तरंगे
दावुनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयात एक
पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वत:शी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे, पिल्लू तयात एक
एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय, वेड पार त्याचे, वाèयासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक.
ग.दि.माडगूळकर

5 comments:

  1. कुरूप पिल्लास इतर पिले कशी वागणूक देत असत

    ReplyDelete
  2. Replies
    1. पाठाचे संदर्भ व स्पष्टकरन पाठवा please

      Delete
  3. गुराख्याचे नेत्रपतन questions and answers

    ReplyDelete

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...