Sunday, May 19, 2019

दिव्य दृष्टी


लेखक परिचय : 

डॉ. विजया विजय वाड (1945) शिक्षण बी.एससी., बी.एड., एम.ए., पीएच.डी. बाल साहित्याची आवड, नाटके रंगभूमीवर आणण्याची आवड, मराठी विश्वकोशाच्या मुख्य संपादिका, मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड ही त्यांची कन्या होय.

मूल्य : जिद्द
साहित्य प्रकार : कथा
संदर्भ ग्रंथ : किशोर दिवाळी अंक 2010
मध्यवर्ती कल्पना : शारीरिक व्यंग असले तरी मनुष्याकडे वेगळीच शक्ती असते. तिचा उपयोग होतो. हे पाठातून शिवांगीच्या रूपातून दाखविण्यात आले आहे.

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. गौरीला न्यायला कोण कोण येणार होते?
उत्तर : गौरीला नेण्यासाठी दादा, आई, बाबा येणार होते.

2. गौरी व इतर मंडळी ‘जीवाची मुंबई’ करायला कशाने गेले?
उत्तर : गौरी व इतर मंडळी ‘जीवाची मुंबई’ करायला मुंबई दर्शनच्या बसने गेली.

3. शिवांगीने गौरीच्या आईला कोणत्या नावाने हाक मारली?
उत्तर : शिवांगीने गौरीच्या आईला ‘काकू’ म्हणून हाक मारली.

4. चोराने काय चोरले?
उत्तर : चोराने गौरीच्या आईच्या बांगड्या चोरल्या.

5. शहाळेपाणीवाल्याने कोणता सल्ला दिला?
उत्तर : सर्वप्रथम पोलीसात तक्रार नोंदवा असा सल्ला शहाळेपाणीवाल्याने दिला.

6. शिवांगीने कोणत्या वासावरून चोर ओळखला?
उत्तर : चोराने वापरलेल्या मोगèयाच्या अत्तराच्या वासावरून शिवांगीने चोर ओळखला.

प्र. 2.  खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1. गौरीला पळस्पेला काय काय खायला मिळणार होते?
उत्तर :  गौरीला पळस्पेला घरची भाजी पोळी, गुळाचे घारगे, कैèया, बर्फाचा गोळा खायला मिळणार होते.

2. गौरी जीवाची मुंबई कशी करणार आहे?
उत्तर : गौरी चौपाटीवर जाऊन लाटांशी खेळणार आहे, कमला नेहरू पार्कमधील म्हातारीचा बूट बघणार आहे अशातèहेने ती जीवाची मुंबई करणार आहे.

3. गौरीची आई धाय मोकलून का रडू लागली?
उत्तर : गिरगाव चौपाटीवर फिरण्यासाठी गेले असताना एका चोराने गौरीच्या आईला जोराचा हिसडा देऊन तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पळविल्या. त्यामुळे गौरीची आई धाय मोकलून रडू लागली.

4. आईला बांगड्या कोणी व केव्हा घेतल्या होत्या?
उत्तर : गौरीच्या आईचा तीस एप्रिलला वाढदिवस होता त्यानिमित्ताने गौरीच्या बाबानी हौसेने सोन्याच्या बांगड्या  खरेदी करून वाढदिवसाला भेट म्हणून दिल्या होत्या.

प्र. 3. पुढील प्रश्नांची प्रत्येकी चार-पाच वाक्यात उत्तरे लिहा.

1. गौरी आणि शिवांगीने मुंबई दर्शनमध्ये काय काय आणि कसे पाहिले?
उत्तर : दादासह गौरी आणि शिवांगी  कमला नेहरू पार्कमध्ये फिरल्या होत्या. त्या बागेत बसून दोघींनी गप्पा मारल्या होत्या. त्या पार्कमधील म्हातारीचा बूट आपल्या हातांनी स्पर्श करून त्यांनी पाहिला होता. गिरगाव चौपाटीवर ते सर्वजण गेले होते. तेथे शहाळेपाणी पिण्यासाठी शिवांगी गौरीच्या आईसह थांबली असताना एका चोराने हिसडा देऊन बांगड्या पळविल्या होत्या. त्याला पकडण्याचा प्रयत्नही शिवांगीने केला होता.

2. शिवांगीने चोराला कशा पद्धतीने ओळखले?
उत्तर : चोर बांगड्या घेऊन पळून जात असताना शिवांगीने त्याच्या पाठीला स्पर्श केला होता त्यामुळे काही चोरांना इन्स्पेक्टर राणेंनी पोलीस स्टेशनमध्ये आणले असता शिवांगीने त्या चोरांच्या पाठीला स्पर्श करण्याची परवानगी मागितली आणि ती मिळाल्यानंतर चौघांच्या पाठीही चाचपून पाहिल्या परंतु त्यापैकी एकही बांगड्या चोरलेला चोर नव्हता. पाचवा पुढे आला तेव्हा मात्र त्या चोराने लावलेल्या मोगèयाच्या अत्तराच्या वासावरून तसेच त्याची पाठ चाचपल्यानंतर त्याला असलेल्या आवाळूवरून तिने सदर व्यक्तीच बांगड्या चोर असल्याचे सांगितले.

3. राणे साहेबांनी तपासणीची पूर्व तयारी कशी केली?
उत्तर : चोरीची लेखी तक्रार दाखल झाल्यानंतर राणेसाहेबांनी त्यांना सायंकाळी या, त्यावेळी मी काही चोर हजर करतो असे सांगितले.  कारण वारंवार चोèया करणाèया त्या भागातील माणसांची पोलिसांना चांगलीच माहिती होती. अशा काही माणसांना त्यांनी  तीन तासात राणेसाहेबांसमोर उभे केले. ती माणसे राणेसाहेबांनी शिवांगी व तिच्या आईसमोर उभी केली व चोर ओळखण्यास सांगितले.

प्र. 4. पुढील प्रश्नांची प्रत्येकी सात ते आठ वाक्यात उत्तरे लिहा.

1. इन्स्पेक्टर आणि इतर सर्वजण शिवांगीकडे कौतुकाने का बघत होते?
उत्तर : अंध असूनसुद्धा शिवांगीने चोराने लावलेले मोगèयाचे अत्तर व त्याच्या पाठीवरील आवाळूवरून सुरतीलाल या चोराला बरोबर ओळखले होते. त्यावेळी इन्स्पेक्टर राणेसाहेबांनी त्या सुरतीलालला  चोरी कबूल आहे का ? असे विचारले होते. त्यावेळी शिवांगी मोठ्या तडफेने म्हणाली, ‘‘तो काय नाकबूल करेल ? त्याला वाटले असेल. अंधोको क्या खबर ? पण हे बघ माझे नाक तेज आहे. आणि कान खोलून ऐक, ही माझी दोन हातांची दहा बोटे आहेत ना, ते दहा डोळे आणि एक अंत:चक्षु. मजजवळ अकरा डोळे आहेत. अकरा. आहे तुझ्याकडे दिव्यदृष्टी ?  यामुळेच  इन्स्पेक्टर राणेसाहेब आणि इतर सर्वजण शिवांगीकडे कौतुकाने  बघत होते.

2. मोठेपणी गुप्तहेर बनण्याचे कोणते गुण शिवांगीच्या अंगी दिसून येतात?
उत्तर : शिवांगीला मोठेपणे गुप्तहेर बनण्याची इच्छा होती. क्षणार्धात एका गोष्टीवरून त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा गुण तिच्याकडे होता. ती अंध असली तरी आपल्या अंत:चक्षूने ती समोरील गोष्टी पाहू शकत होती.  त्यामुळेच बांगड्या घेऊन पळालेल्या त्या सुरतीलाल चोराने पळून जाताना तोंडावर कपडा बांधलेला होता त्यामुळे गौरीच्या आईला तोच चोर म्हणून ओळखता येणे कठीण होते. परंतु शिवांगीने मात्र केवळ त्या चोराने वापरलेल्या मोगèयाच्या अत्तरावरून तसेच त्याच्या पाठीवरील आवाळूला तिचा जो एकदाच स्पर्श झाला होता. त्यावरून बरोबर ओळखून काढले होते. यावरून मोठेपणी गुप्तहेर बनण्याचे गुण  शिवांगीकडे होते हे दिसून येते.

प्र. 5. संदर्भासह स्पष्टीकरण करा.

1. ‘‘आज मात्र शिवांगीसह आपण सगळेच जीवाची मुंबई करू!’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य डॉ विजया वाड लिखित ‘दिव्य दृष्टी’ या पाठातील आहे. हे वाक्य गौरीच्या दादाने गौरीला व शिवांगीला उद्देशून म्हटले आहे.
स्पष्टीकरण : गौरीचे कुटुंबीय तिला भेटण्यासाठी व मुंबई दर्शनाला तिला घेऊन जाण्यासाठी वसतीगृहात आलेले असतात. त्यावेळी गौरीचा दादा गौरीची मैत्रीण शिवांगीला तुला न्यायला कोणी आले नाहीत का ? असा प्रश्न विचारतो. त्यावेळी शिवांगीला कोणी नसल्याची आठवण गौरी त्याला करून देते तेव्हा तो गौरीला म्हणतो मी विसरलो गं पण आज मात्र शिवांगीसह आपण सगळेच जीवाची मुंबई करू.

2. ‘‘मला गुप्तहेर व्हायचं आहे गौरीची आई !’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य डॉ विजया वाड लिखित ‘दिव्य दृष्टी’ या पाठातील आहे. हे वाक्य  शिवांगीने गौरीच्या आईकडे म्हटले आहे.
स्पष्टीकरण : मुंबई दर्शनाच्यावेळी बसमध्ये शिवांगी गौरीच्या आईच्या बाजूला बसलेली होती तेव्हा बोलताना आईने शिवांगीला विचारले की तू नववीत नव्वद टक्के गुण मिळविले आहेस पुढे काय करायचं तू ठरवल आहेस ? तेव्हा शिवांगीने मला गुप्तहेर व्हायचं आहे असं गौरीच्याआईला सांगितले.

3. ‘‘पण तू पाहू शकत नाहीस’’
उत्तर : संदर्भ : वरील वाक्य ‘दिव्य दृष्टी’ या पाठातील असून त्याच्या लेखिका डॉ विजया वाड आहेत. हे वाक्य  इन्स्पेक्टर राणेनी शिवांगीला उद्देशून म्हटले आहे.
स्पष्टीकरण : गौरीच्या आईच्या चोरी झालेल्या बांगड्या संदर्भात तक्रार देण्यासाठी गौरीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यावर गेले असता तेथे इन्स्पेक्टर राणेंना शिवांगीने सांगितले की, मी काकूबरोबर होते; या तपासात माझा नक्की उपयोग होईल.  तेव्हा राणेसाहेब तिला म्हणाले होते पण तू पाहू शकत नाहीत.

4. ‘‘जाने दो काका ! अभी पहले पुलीस कंप्लेट लिखवावो !’’
उत्तर : संदर्भ : वरील वाक्य ‘दिव्य दृष्टी’ या पाठातील असून त्याच्या लेखिका डॉ विजया वाड आहेत. शहाळेपाणीवाल्याने गौरीच्या वडिलांना उद्देशून म्हटले आहे.
स्पष्टीकरण : चोरांने गौरीच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या पळवून नेल्यानंतर आई धाय मोकलून रडू लागली. तेव्हा तेथे आलेल्या बाबानी काय झाले ? म्हणून चौकशी केली तेव्हा बांगड्या चोरी झाल्याचे त्यांना समजले. तेव्हा ते वैतागून गौरीच्या आईवर खेकसले काय गरज होती ? सोनं अंगावर वागवत फिरायची, मिरवायची हौस होते पण आमचा जीव जातो. तेव्हा येथे वाद घालण्यापेक्षा प्रथम पोलीस ठाण्यावर जाऊन तक्रार नोंदवा असा शहाणपणाचा सल्ला तेथे उपस्थित असलेल्या शहाळेपाणीवाल्यानं गौरीच्या बाबांना दिला.

5. ‘‘तुमची हौस होते पण आमचा जीव जातो.’’
उत्तर : संदर्भ : हे वाक्य डॉ. विजया वाड यांनी लिहिलेल्या ‘दिव्य दृष्टी’ या कथेतील आहे. बांगड्या चोरी झाल्यानंतर गौरीच्या बाबांनी तिच्या आईला उद्देशून म्हटले आहे.
स्पष्टीकरण : चौपाटीवर गौरीच्या आईच्या बांगड्या चोरी झाल्यानंतर ती धाय मोकलून रडू लागली. तेव्हा गौरीचे बाबा तेथे आले. त्यांना चोरीची गोष्ट समजल्यावर ते वैतागून ओरडले सोनं अंगावर मिरवायची तुमची हौस होते. पण आमचा जीव जातो.

6. ‘‘कमालकी लडकी है ये !’’
उत्तर :  संदर्भ : वरील  वाक्य डॉ. विजया वाड यांनी लिहिलेल्या ‘दिव्य दृष्टी’ या कथेतील आहे.  शिवांगीची हुशारी पाहून राणेसाहेबांनी तिला उद्देशून म्हटले आहे.
स्पष्टीकरण : चौपाटीवरून गौरीच्या आईच्या बांगड्या चोरणाèया चोरट्यास शिवांगीने  त्यांने वापरलेले मोगèयाचे अत्तर व पाठीवरील आवाळूवरून पकडून दिले होते. तिची ही हुशारी पाहूनच इन्स्पेक्टर राणेसाहेब उद्गारले होते. कमालकी लडकी है ये !


प्र. 6. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर दिलेल्या जागेत लिहा.

1. गौरीच्या गावचे नाव काय?
अ) मुंबई ब) पळसवणे क) पळस्पे ड) पाळींद्रे

2. गौरीबरोबर अंधशाळेच्या वसतिगृहात कोण रहात होते?
अ) शिवांगी ब) शिवानी क) शुभांगी ड) सुहानी

3. शिवांगीची आई कोठे गेली होती?
अ) माहेरी ब) देवाघरी क) सासरी ड) मावशीच्या घरी

4. शिवांगीला किती गुण मिळाले होते?
अ) 92 टक्के ब) 85 टक्के क) 90 टक्के ड) 95 टक्के

5. राणेसाहेबांनी सर्वांना काय दिले?
अ) चहा-बिस्कीट ब) चहा-पाव क) पेढे-लाडू ड) कॉफी-बिस्कीट

6. बाबा मळ्यातून काय आणतात?
अ) काकडी ब) कैèया क) फणस ड) जांभळे

7. शिवांगीला काय व्हायचं होते?
अ) पोलीस ब) वकील क) गुप्तहेर ड) डॉक्टर

उत्तरे : 1. क) पळस्पे  2. अ) शिवांगी  3. ब) देवाघरी  4. क) 90 टक्के   5. अ) चहा-बिस्कीट  6. ब) कैèया 7. क) गुप्तहेर

No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...