CLICK ME
कवी परिचय :
सुरेश श्रीधर भट (1928-2003) मराठीतील एक प्रसिद्ध कवी. यांनी मराठीत गझल या काव्य प्रकाराचे पुनरुज्जीवन केले व त्याला आशयसंपन्न असे नवे रूप दिले. त्यामुळे गझल या प्रकाराला बहुमान्यता मिळाली. त्यांनी निसर्ग कविता, सामाजिक कविता, प्रेम कविता, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’ हे त्यांचे काव्य संग्रह आहेत. गेयता हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे.
मूल्य : जिद्द
साहित्य प्रकार : भूपाळी
संदर्भ ग्रंथ : रंग माझा वेगळा
मध्यवर्ती कल्पना : प्रस्तुत कवितेत श्रीकृष्णाला जागवत असल्याचे वर्णन, तसेच प्रात:काळच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे.
टीपा
राधा - गोकुळात राहणारी अनय नावाच्या गवळ्याची पत्नी. कृष्णाची बाल मैत्रीण, श्रीकृष्णाची भक्त.
उत्तर : यशोदा मुकुंदाला म्हणजे श्रीकृष्णाला उठवित आहे.
2. पहाटवारा कसा आला?
उत्तर : पहाटवारा चोरपावलांनी आला.
3. बेचैन गोकुळाने कोणाचा पुकारा केला?
उत्तर : बेचैन गोकुळाने श्रीकृष्णाचा पुकारा केला.
उत्तर : पहाट झाली होती. लख्ख उजाडले होते तरी कृष्ण अजून झोपेतून जागे झाला नव्हता. त्यामुळे बेचैन झालेल्या गोकुळाने त्याचा पुकारा केला होता.
उत्तर : प्रात:काळी यशोदा माता कृष्णाला उठवित आहे त्यावेळी बाहेर चांदण्याला जाग आली आहे. गगनातील शुक्रताराही मंदावला आहे. चोर पावलांनी पहाट वारा आला आहे. उषेच्या म्हणजेच पहाटेच्या गालावर लाली पसरली आहे. गोकूळही बेचैन होऊन कृष्णाचा पुकारा करीत आहे. पाखरेही त्याची गीत गात उडून गेली आहेत. यमुना नदीही त्याला दूरून हाक मारीत आहे. कुंजातल्या कळ्यांनीही त्याला उठण्यासाठी इशारा केला आहे. इतकेच नव्हे तर त्याची मैत्रीण राधाही पुन्हा निघाली आहे.
उत्तर : संदर्भ : सदर काव्यपंक्ती कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या ‘चल ऊठ रे मुकुंदा’ या कवितेतील आहेत. झोपेत असलेल्या कृष्णाला उठविताना यशोदेने असे म्हटले आहे.
स्पष्टीकरण : पहाट झाली तरी श्रीकृष्ण अजून झोपेतच आहे त्यामुळे यशोदा त्याला जागवित आहे. तुझ्या स्वप्नांचा पसारा आता आवर, सारे गोकूळ बेचैन होऊन तुझा पुकारा करीत आहे इतकेच नव्हे तर तुझे गीत गात सारी पाखरेही उडून गेली आहेत असे सांगून यशोदा श्रीकृष्णाला जागे करीत आहे.
प्र. 5. जोड्या जुळवा
अ ब
1. चांदण्याला 1. चोरपावलांनी
2. शुक्रतारा 2. हाक मारी
3. पहाटवारा 3. जाग
4. कालिंदीचा किनारा 4. इशारा केला.
5. फुलांनी (कळ्यानी) 5. मंदावला
उत्तर : अ ब
1. चांदण्याला 1. जाग
2. शुक्रतारा 2. मंदावला
3. पहाटवारा 3. चोरपावलांनी
4. कालिंदीचा किनारा 4. हाक मारी
5. फुलांनी (कळ्यानी) 5. इशारा केला.
शोदा करीत आहे. कृष्णाने झोपेतून उठावे व सृष्टीतील नजराणा पहावा हाही तिचा हेतू आहे.
कवी परिचय :
मूल्य : जिद्द
साहित्य प्रकार : भूपाळी
संदर्भ ग्रंथ : रंग माझा वेगळा
मध्यवर्ती कल्पना : प्रस्तुत कवितेत श्रीकृष्णाला जागवत असल्याचे वर्णन, तसेच प्रात:काळच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे.
टीपा
राधा - गोकुळात राहणारी अनय नावाच्या गवळ्याची पत्नी. कृष्णाची बाल मैत्रीण, श्रीकृष्णाची भक्त.
हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी इथे क्लिक करा CLICK ME
स्वाध्याय
प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. यशोदा कोणाला उठवित आहे?उत्तर : यशोदा मुकुंदाला म्हणजे श्रीकृष्णाला उठवित आहे.
2. पहाटवारा कसा आला?
उत्तर : पहाटवारा चोरपावलांनी आला.
3. बेचैन गोकुळाने कोणाचा पुकारा केला?
उत्तर : बेचैन गोकुळाने श्रीकृष्णाचा पुकारा केला.
प्र. 2. खालील प्रश्नाचे दोन-तीन वाक्यात उत्तर लिहा.
1. गोकुळ बेचैन का झाले होते?उत्तर : पहाट झाली होती. लख्ख उजाडले होते तरी कृष्ण अजून झोपेतून जागे झाला नव्हता. त्यामुळे बेचैन झालेल्या गोकुळाने त्याचा पुकारा केला होता.
प्र. 3. पुढील प्रश्नाचे चार-पाच वाक्यात उत्तर लिहा.
1. कृष्णाला उठविण्याच्या वेळी सृष्टीत काय घडले होते?उत्तर : प्रात:काळी यशोदा माता कृष्णाला उठवित आहे त्यावेळी बाहेर चांदण्याला जाग आली आहे. गगनातील शुक्रताराही मंदावला आहे. चोर पावलांनी पहाट वारा आला आहे. उषेच्या म्हणजेच पहाटेच्या गालावर लाली पसरली आहे. गोकूळही बेचैन होऊन कृष्णाचा पुकारा करीत आहे. पाखरेही त्याची गीत गात उडून गेली आहेत. यमुना नदीही त्याला दूरून हाक मारीत आहे. कुंजातल्या कळ्यांनीही त्याला उठण्यासाठी इशारा केला आहे. इतकेच नव्हे तर त्याची मैत्रीण राधाही पुन्हा निघाली आहे.
प्र. 4. संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1. ‘‘तव गीत गात सारी ही पाखरे उडाली’’उत्तर : संदर्भ : सदर काव्यपंक्ती कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या ‘चल ऊठ रे मुकुंदा’ या कवितेतील आहेत. झोपेत असलेल्या कृष्णाला उठविताना यशोदेने असे म्हटले आहे.
स्पष्टीकरण : पहाट झाली तरी श्रीकृष्ण अजून झोपेतच आहे त्यामुळे यशोदा त्याला जागवित आहे. तुझ्या स्वप्नांचा पसारा आता आवर, सारे गोकूळ बेचैन होऊन तुझा पुकारा करीत आहे इतकेच नव्हे तर तुझे गीत गात सारी पाखरेही उडून गेली आहेत असे सांगून यशोदा श्रीकृष्णाला जागे करीत आहे.
प्र. 5. जोड्या जुळवा
अ ब
1. चांदण्याला 1. चोरपावलांनी
2. शुक्रतारा 2. हाक मारी
3. पहाटवारा 3. जाग
4. कालिंदीचा किनारा 4. इशारा केला.
5. फुलांनी (कळ्यानी) 5. मंदावला
उत्तर : अ ब
1. चांदण्याला 1. जाग
2. शुक्रतारा 2. मंदावला
3. पहाटवारा 3. चोरपावलांनी
4. कालिंदीचा किनारा 4. हाक मारी
5. फुलांनी (कळ्यानी) 5. इशारा केला.
कवितेचा सारांश :
गझलकार म्हणून मराठी साहित्यविश्वात परिचित असलेल्या सुरेश भटांची ही वेगळ्या धर्तीवरची कविता आहे. पहाटेच्यावेळी गायली जाणारी ही भूपाळी आहे. या भूपाळीत यशोदा झोपलेल्या श्रीकृष्णाला जागवत असल्याचे वर्णन, तसेच प्रात:काळच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे. पहाट झाली ऊठ असे म्हणून यशोदा मुकुंदाला (श्रीकृष्णाला) उठवित आहे. तो लवकर उठावा यासाठी सृष्टीत घडत असलेल्या गोष्टींचे ती त्याच्यासमोर वर्णन करीत आहे. ती म्हणते हे मुकुंदा हे बघ बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली आहे. आकाशातील शुक्रतारा सुद्धा आता पहाट झाली म्हणून मंदावला आहे बघ. येथे पहाटवारा सुद्धा चोरपावलानी आला आहे. त्यामुळे उषेच्या गालावरी लाली पसरली आहे. म्हणजे पहाट झाली असून सूर्योदय झाला आहे अन् अजून तू उठला नाहीस असे यशोदा म्हणत आहे. तू झोपेत जो स्वप्नांचा पसारा मांडला आहेस किंवा जी स्वप्ने पहात आहेस ती आवरून घे कारण पहाट झाली आहे. तू दिसत नसल्यामुळे सारे गोकूळ बेचैन झाले आहे. आणि हे बेचैन झालेले गोकूळ तुझा पुकारा करीत आहे. तुझे गीत गातच ही सारी पाखरे उडाली आहेत. यमुनानदीचा (कालिंदी) किनाराही तुला हाक मारीत आहे पहा. बागेतल्या कळ्यांनीही तुला इशारा केला आहे. सारे जण तुला बोलावित आहेत त्यामुळे तू लवकर ऊठ असे यशोदा त्याला म्हणते. हे मुकुंदा तू दिसत नसल्यामुळे इतरांप्रमाणेच ती राधाही बेचैन झाली आहे. आणि तुला शोधण्यासाठी पुन्हा निघाली आहे. पहाटेच्या वेळी निसर्गात घडणाèया या गोष्टींचा आनंद घेण्यास कृष्ण मुकत आहे त्यामुळे त्याला उठविण्याच्यावेळी सृष्टीत काय काय घडत आहे त्याचे वर्णन यशोदा करीत आहे. कृष्णाने झोपेतून उठावे व सृष्टीतील नजराणा पहावा हाही तिचा हेतू आहे.
It's really good
ReplyDelete