Sunday, May 19, 2019

सुखाची चव


लेखक परिचय : 


डॉ. अरुणा रामचंद्र ढेरे (जन्म 1957) कविता, कथा, कादंबरी, ललित गद्य, समीक्षा, संशोधन असे विविध प्रकारचे लेखन. ‘उर्वशी’, ‘मैत्रेयी’, ‘महाद्वार’ इ. कादंबèया. ‘मंत्राक्षर’, ‘यक्षरात्र’, ‘निरंजन’ इ. कविता संग्रह. ‘रूपोत्सव’, ‘लावण्य यात्रा’, ‘मनातलं आभाळ’ इ. ललित गद्य संग्रह प्रसिद्ध आहेत.

मूल्य : संयम
साहित्य प्रकार : ललित
संदर्भ ग्रंथ : मनातलं आभाळ
मध्यवर्ती कल्पना : सुट्टीत मुलांना खेळायला आवडते. अनेक गमती जमती करायला मिळतात. त्यामुळे मुलांना सुट्टी आवडते. लेखिकेला बालपणी आवडीच्या अनेक गोष्टी सुट्टीत मिळायच्या त्यासाठी त्या सुट्टीची वाट पाहायच्या, पण अनेक बाबतीत वाट पाहणे सुद्धा आनंदाचे, जिज्ञासेचे, कुतूहलाचे असते. याचे चित्रण या ललित लेखात आले आहे.

 टीपा
 पोस्टमन इन द माऊंटन- डोंगराळ भागातील पोस्टमन (टपाल वाटणारा), एका चिनी चित्रपटाचे नाव.

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. थंडी केव्हा कमी होत जायची?
उत्तर : होळीनंतर थंडी कमी होत जायची.

2. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्याचा काळ कोणता?
उत्तर : परीक्षा तोंडावर आलेली असतानाच मार्च एप्रिलपासून सुट्टीची वाट पाहणं सुरू होई. हाच पुस्तक वाचण्याची वाट पाहण्याचा काळ होता.

3. लेखिकेने कोणता चिनी चित्रपट पाहिला?
उत्तर : लेखिकेने ‘पोस्टमन इन द माऊंटन’ हा चिनी चित्रपट पाहिला.

4. पोस्टमनने कोणाला पत्र वाचून दाखविले?
उत्तर : झोपडीत राहणाèया एका आंधळ्या म्हातारीला पोस्टमनने पत्र वाचून दाखविले.

प्र. 2. खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1. सुट्टीच्या आधीचा काळ भारावलेला का असतो?
उत्तर : थंडी कमी झाल्यामुळे आंब्यावर मोहोर घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. घरापुढच्या गॅलरीत झोपायला परवानगी मिळायची. तेव्हा वाèयाची झुळूक घेत अंथरूणावर पडलेल्या बहीण भावांना गप्पा मारायला मिळायच्या. पहाटेच्या वेळी कोकिळेचं कुहूऽऽ ऐकू येई. त्यामुळे त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. अशा तèहेने सुट्टीच्या आधीचा काळ भारावलेला असायचा.

2. वाट पाहण्यात कोणकोणत्या गोष्टी असतात?
उत्तर : वाट पाहण्यात केवळ सुखच असते असे नाही तर  दु:ख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड अशा कितीतरी गोष्टी त्यात भरलेल्या असतात. पावसाची वाट पाहणाèया शेतकèयाचे डोळे आठवा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाèया संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की ते लक्षात येते.  एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते.

3. पोस्टमन कोरे पत्र का वाचत असे?

उत्तर : झोपडीत राहणारी आंधळी म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत होती. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची. मुलगा तिला कधीच पत्र लिहीत नाही. तिची चौकशी करत नाही. पण तिचं ते वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचून दाखवत असे. म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानाने चाललेले होते.




प्र. 3. पुढील प्रश्नांची प्रत्येकी चार-पाच वाक्यात उत्तरे लिहा.

1. लेखिका सुट्टीची वाट का पाहत असे?
उत्तर : लेखिकेला सुट्टीत अनेक गमती जमती करायला मिळत असे. मोकळ्या अंगणात रात्रीच्यावेळी अंथरूण घालून झोपायला मिळे. अंगणातलं हजारी मोगèयाचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस, आणि खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तक वाचायला मिळत असे. त्यामुळे लेखिका सुट्टीची वाट पाहत असे.

2. वाट पाहत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी शिकतो?
उत्तर : एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते.  वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवर विश्वास घट्ट करायला शिकतो. ध्यास वाढत जातो. थोडी वाट पाहायला लागली, थोडी तडफड भोगायला लागली तरच सुखाची चव वाढते, यशाची गोडी वाढते, प्रेमातली मायेची तृप्ती वाढते आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढते.

प्र. 4. संदर्भासह स्पष्ट करा.

1. ‘‘जे सुचलं, जे लिहावसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं !’’
उत्तर : संदर्भ : वरील वाक्य अरुणा ढेरे लिखित ‘सुखाची चव’ या पाठातील आहे. भाषेची ताकद स्पष्ट करताना लेखिकेने असे म्हटले आहे.
स्पष्टीकरण : लहानपणी लेखिका पुस्तके वाचण्यासाठी सुट्टीची  वाट पाहत असे. कारण नव्या पुस्तकातून नवे जग तिला भेटत होतं. न पाहिलेला देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीसुद्धा ओळखीचे धागेे जुळणारे व कितीतरी थक्क करणाèया गोष्टी त्यामधून भेट असत. त्यामुळे शब्दांची जादू कळत असे.  आपण वाचत असलेल्या गोष्टी, गाणी, इतिहास हे त्या माणसांना कसं सुचलं ती कशी लिहू शकली असा प्रश्न लेखिकेला पडत असे.

प्र. 5. जोड्या जुळवा 

1. कोकिळा 1. म्हातारीला पत्र
2. चिनी सिनेमा 2. करुणेचा स्पर्श
3. पोस्टमन 3. पोस्टमन इन द माऊंटन
4. संताचे अभंग 4. कुहू कुहू
उत्तर :   
1. कोकिळा 1. कुहू कुहू
2. चिनी सिनेमा 2. पोस्टमन इन द माऊंटन
3. पोस्टमन 3. म्हातारीला पत्र
4. संताचे अभंग 4. करुणेचा स्पर्श

1 comment:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024