Sunday, May 19, 2019

हा हिंद देश माझा


हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी इथे क्लिक करा CLICK ME

                                    


कवी परिचय : 
आनंद कृष्णाजी टेकाडे  
(1818-1864) हे मूळचे नागपूरचे राहणारे. ते एक राष्ट्रीय बाण्याचे कवी म्हणून ओळखले जातात. ‘आनंदगीत’ या नावाने त्यांचे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. खड्यासुरात आणि मनोहर चालीवर त्यांनी आपल्या कविता गाऊन दाखविल्यामुळे त्या चटकन अधिक लोकप्रिय झाल्या. ‘हा हिंद देश माझा’ हे त्यांचे देशगीत आबाल वृद्धास  परिचित आहे.

मूल्य : देशप्रेम
साहित्य प्रकार : देशभक्ती गीत
संदर्भ ग्रंथ : आनंद गीत
शब्दार्थ आणि टीपा 
शुक-संपूर्ण वैराग्य असलेला वेदकालीन ऋषी, व्यासपुत्र.
वामदेव-एक वेदकालीन त्यागी ऋषी, त्यांना वामदेव गौतम असेही म्हणतात.

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. हिंद देशाने कोणाला राजा मानले आहे?
उत्तर : सत्याला हिंद देशाने राजा मानले आहे.

2. राजयोगी कोणास म्हटले आहे?
उत्तर : जनक राजाला राजयोगी म्हटले आहे.

3. विश्वाला मोह कोण घालतो?
उत्तर : मुकुंदाची मुरली विश्वाला मोह घालते.

4. देशाचे काळीज होऊन कोण राहिले आहे?  
उत्तर : गंगा नदी, हिमालय पर्वत देशाचे काळीज होऊन राहिले आहेत.

5. कोणत्या वीरयोद्ध्यांनी शौर्य गाजविले आहे?
उत्तर : पृथ्वीराज, शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीरांनी शौर्य गाजविले आहे.

प्र. 2.  खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1. भारत देशाला भूषविणारी स्त्री रत्ने व वीर पुरुष कोण कोण आहेत?
उत्तर : भारत देशाला भूषविणारी स्त्री रत्ने दमयंती, जानकी (सीता), गिरिजा (पार्वती) व वीर पुरुष म्हणजे जनकराजा, शुक (व्यासपुत्र), वामदेव (गौतम), पृथ्वीराज, शिवाजी महाराज, देशासाठी हौतात्म्य पत्करलेले स्वातंत्र्यवीर होत.

2. हिंद देश कशाकशामुळे पावन व सुंदर बनला आहे?
उत्तर : हिंद देश सत्यप्रियता, न्यायीवृत्ती, शीलास भूषविणाèया स्त्रिया, विश्वास मोह घालणाèया कृष्णाची मुरली, गंगा नदी, हिमालय पर्वत, देशाला भूषविणारी स्त्री रत्ने व वीर पुरुषांमुळे  पावन व सुंदर बनला आहे.

प्र. 3. सात-आठ वाक्यात विवरण करा.

1. या कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहा.
उत्तर : राष्ट्रीय बाण्याचे कवी आनंद टेकाडे यांनी भारत देशाच्या गौरवप्रीत्यर्थ हे गीत लिहिले आहे. आपल्या देशाची थोरवी त्यांनी या कवितेतून व्यक्त केली आहे. आपला देश कसा थोर आहे हे विविध उदाहरणाद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्राचीन काळापासूनचा आढावा घेत आपल्या देशाची थोरवी त्यांनी गायिली आहे. आपला हिंद देश म्हणजे हा आनंदाचा ठेवा आहे सत्याला राजा मानणारा, न्यायीवृत्ती ठेवणारा असा हा देश आहे. येथे जनकराजा, शुक, वामदेव सारखे योगी पुरुष होऊन गेले आहेत. दमयंती, जानकी सारख्या शीलास भूषविणाèया स्त्रिया होऊन गेल्या आहेत. मुकुंदाच्या मुरलीने येथील लोकांस मोहिनी घातली आहे. गंगासारखी नदी, हिमालयासारखा पर्वत या देशाचे काळीज बनून राहिला आहे. पृथ्वीराज, छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे शूर राजे येथे होऊन गेले आहेत. अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी लढा दिला आहे. असा हा माझा हिंद देश आहे याचे वर्णन कवितेतून करण्यात आले आहे.

प्र. 4. पहिल्या जोडीतील संबंध ओळखून तिसèया पदाशी जुळणारा शब्द लिहा.
1. सत्यास : ठाव : : वृत्तीस : ...............
2. जनक : राजयोगी : : शुक : ...............
3. पूजोनी : जीवे : : वंदोनी : ...............
4. रमवी : निकुंजा : : होऊनी राहि : ...............
5. रणात : मौजा : : जयनाद : ...............
उत्तर : 1 . सत्यास : ठाव : : वृत्तीस : ठेवि न्यायी
           2. जनक : राजयोगी : : शुक : योग
           3. पूजोनी : जीवे : : वंदोनी : प्रेमभाव
          4. रमवी : निकुंजा : : होऊनी राहि : कलिजा
         5. रणात : मौजा : : जयनाद : गर्जा

कवितेचा सारांश : 

‘हा हिंद देश माझा’ या देशभक्तीपर गीताची रचना राष्ट्रीय कवी आनंदराव टेकाडेनी केलीआहे. विद्यार्थ्यांच्यात देशप्रेम निर्माण व्हावे या हेतूने ही कविता पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे. कवी म्हणतो हा हिंद देश (हिंदुस्थान) म्हणजे आनंदाचा ठेवा आहे. आपल्या या हिंद देशाची थोरवी गाताना कवी म्हणतो की माझ्या हिंद  देशात सत्यास भाव आहे, तर न्यायीवृत्तीला प्राधान्य आहे. सत्याला राजा मानणारा असा हा हिंद देश आहे. मिथिला नगरीचा अधिपती व राजयोगी असलेला जनकराजा, व्यास ऋषींचा मुलगा शुक व त्यागी ऋषी वामदेव (गौतम) या थोर भारतपुत्रांची कीर्ती आमचा हिंद देश सर्वत्र जगात पसरवित आहे. दमयंती जानकी (सीता) सारख्या शीलवान स्त्रिया या देशात होऊन गेल्या आहेत. नटेश गिरिजाही  (शंकर पार्वती) या देशात नटली आहेत. इथल्या मुकुंदाच्या (श्रीकृष्ण) मुरलीचा  मोह साèया विश्वास पडला आहे. लता, वेलींना रमविणारा (रंजविणे) असा हा माझा हिंद देश आहे. गंगासारखी पवित्र नदी, हिमालयासारखा पर्वत येथे कायमस्वरूपी वास्तव्यास  आहे. ते या देशाचे काळीज होऊन  राहिले आहेत. पृथ्वीराज, शिवाजी महाराजांसारखे सिंहासारखे शूर राजे, तसेच अनेक पराक्रमी स्वातंत्र्यवीर येथे होऊन गेले आहेत. आपल्या देशासाठी त्यांनी रणांगणे गाजविली आहेत असा हा माझा हिंद देश आहे. जीवाभावाने त्याची पूजा करून तसेच प्रेमभावे वंदन करून जयनाद करीत गर्जत आहे की असा हा हिंद देश माझा आहे.

अवांतर प्रश्न

1. राष्ट्रीय बाण्याचे कवी म्हणून कोण ओळखले जातात?
अ) सुरेश भट ब) कुसुमाग्रज क) ग.दि.माडगूळकर ड) आनंद कृष्णाजी टेकाडे
2. आ.कृ. टेकाडे यांचे कवितासंग्रह कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत?
अ) आनंदगीत ब) चैत्रबन क) मनाचे श्लोक ड) शाहिरी
3. आनंद कंद असे कोणाला म्हटले आहे?
अ) निकुंजा ब) हिमालय क) हिंद देश ड) स्वातंत्र्यवीर
4. हिंद देश आपली वृत्ती कशी ठेवतो?
अ) अन्यायी ब) न्यायी क) समाधानी ड) कंजूष
5. हा हिंद देश ..... ठाव देई.
अ) न्यायास ब) वृत्तीस क) सत्यास ड) अन्यायास
6. हिंद देशाने कोणाला राजा मानले आहे?
अ) असत्यास ब) सत्यास क) न्यायास ड) अन्यायास
7. वामदेव गौतम असे कोणाला म्हणतात?
अ) शुक ब) जनक क) नटेश ड) वामदेव
8. शीलास कोण भूषविते?
अ) जानकी ब) कालिंदी क) गिरिजा ड) गंगा
9. विश्वास कोण मोह घालीत आहे?
अ) मुकुंदाची मुरली ब) विष्णुचा शंख क) मेनकेचे सौंदर्य ड) गंगेचे पाणी
10. देशाचे काळीज कोण होऊन राहिले आहे?
अ) नर्मदा-निलगिरी ब) कावेरी-सह्याद्री क) गंगा-हिमालय ड) यापैकी नाही

उत्तरे: 1.ड)आनंद कृष्णाजी टेकाडे 2. अ) आनंदगीत 3.क) हिंद देश 4. ब) न्यायी 5. क) सत्यास 6. ब) सत्यास 7. ड) वामदेव 8. अ) जानकी 9.अ) मुकुंदाची मुरली 10. क) गंगा-हिमालय

** कविता पाठांतरासाठी आहे.

हा हिंद देश माझा

आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा
सत्यास ठाव देई
वृत्तीस ठेवि न्यायी
सत्यासि मानि राजा हा हिंद देश माझा
जनकादि राजयोगी
शुक वामदेव योगी
घुमविती कीर्तिवाजा हा हिंद देश माझा
दमयंति जानकी ती
शीलास भूषवीती
नटली नटेश गिरिजा हा हिंद देश माझा
विश्वास मोह घाली
ऐशी मुकुंद मुरली
रमवी जिथे निकुंजा हा हिंद देश माझा
गंगा हिमाचलाची
वसती जिथे सदाची
होऊनि राही कलिजा हा हिंद देश माझा
पृथुराज सिंह शिवजी
स्वातंत्र्यवीर गाजी
करिती रणात मौज हा हिंद देश माझा
पूजोनि त्यास जीवे
वंदोनि प्रेमभावे
जयनाद हाचि गर्जा हा हिंद देश माझा
आनंद कृष्णाजी टेकाडे

1 comment:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024