Thursday, May 16, 2019

नेनंता गुराखी

कवी परिचय 




 इंद्रजीत नारायणराव भालेराव  (जन्म ५ फेब्रुवारी १९६२)   मराठीतील सुप्रसिद्ध कवी.  सध्या परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयांत मराठी विभाग म्हणून कार्यरत. २० हुन अधिक पुस्तके प्रकाशित.
दूर राहिला गाव,जात गाणं गात, टाहो,  पीकपाणी, उगवले नारायण    हे त्यांचे कविता संग्रह.  आम्ही काबाडाचे धनी, कुळंबिणीची कहाणी,  या त्यांच्या दीर्घ कविता. यागाई घरा आल्या (ललित)   रानमळ्याची वाट,  गावाकडं चल माझ्या दोस् हे बालकविता संग्रह. ग्रामीण दुःखाची नेमकी नाळ  त्यांच्या कवितेत सापडली आहे. निसर्गाशी त्यांच्या कवितेचे एक छान नाते  आहे. लोकवाड्मयाचा  उपजत रेखीवपणा  मायबोलीचा  थेट जिव्हाळा  माणसाच्या जगण्यातल्या वेदनेची खोल जाणीव या कवितेला आहे. तुकाराम आणि कबीराचा वारसा घेऊन आलेली हि कविता आहे.
प्रस्तुत कविता आम्ही काबाडाचे धनी या त्यांच्या दीर्घ कवितेतून घेतलेला एक भाग आहे. अवघ्या महाराष्ट्रातील  तमाम शेतकरी वर्गाचे दुःख यातून व्यक्त झाले आहे. लहानपणी चिखलाची गाई गुरे बनवून खेळणाऱ्या  कवीचे बालपण बघता  बघता  संपले आणि  बैलांमागे रानात जनावरांना चरण्यास न्यावे लागले आणि तो नेनंता  झाला त्याचे चित्रण कवी करतॊ.
कवी : इंद्रजीत भालेराव
काव्य प्रकार : ग्रामीण कविता
संदर्भ : आम्ही काबाडाचे धनी
मूल्य : श्रम प्रतिष्ठा


https://www.youtube.com/watch?v=nRmHdu4L6Q0&feature=youtu.be















No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024