Wednesday, May 15, 2019

सुन्या तिच्याही दाही दिशा


कवी परिचय : 



अनुराधा कौतिकराव पाटील  (जन्म 1954)

अलीकडच्या काळातील लक्षणीय कवयित्री. ‘दिगांत’, ‘तरीही’, ‘दिवसेंदिवस’ हे काव्यसंग्रह प्रकाशित. ग्रामीण संस्कृतीच्या परंपरेने संस्कारित झालेली तरीही जीवनाबद्दलचा आधुनिक दृष्टिकोन व्यक्त करणारी अशी त्यांची कविता आहे. आपल्याला हवे असलेले जगणे आपल्या वाट्याला न येणे. यामुळे निर्माण होणारं दु:ख हे त्यांच्या कवितेचे सूत्र आहे. वरवर पाहता सुबोध वाटणारे त्यांच्या कवितेचे शब्दरूप अंतिमत: त्यांच्या भाववृत्तीच्या सूक्ष्म तरल स्वरूपाकडे लक्ष वेधणारे असते.


मूल्य : स्त्री समस्या (दाहक वास्तव)
साहित्य प्रकार : सामाजिक कविता (स्त्री समस्याप्रधान)
संदर्भ ग्रंथ :  तरीही

मध्यवर्ती कल्पना : स्त्री जन्माची करुण कहाणी कवयित्रीने या कवितेत प्रत्ययकारी भाषेत सांगितली आहे. न संपणारे काबाडकष्ट व हालअपेष्टा सोसूनही ती आशावादीच आहे. कणीकोंडा पाखडून सत्व उचलण्याची जीवट सवय बाळगून असलेल्या ह्या स्त्रीला दाही दिशा मात्र सुन्या सुन्याच आहे.

कवितेचा सारांश 

कवयित्रीने कवितेत एका खेडेगावचे दृष्य उभे केले आहे. त्यात भर दुपारी स्त्रिया आणि मुलीही डोक्यावरून कडेवरून पाणी आणत आहेत. त्यांना कधीच विश्रांती नसते. एकापाठोपाठ एक असे कष्टच असतात आणि त्यांना वाटते की, संपतील कष्ट! आयुष्यभर जणू न बरी होणारी जखम, त्यावर तेल हळद लावतच असतात काही अपेक्षा नसते. वाट्याला आलेले कष्ट थोड्याच वाटतात. जळणाच्या लाकडांप्रमाणे पण मन मात्र घुसमटत असते. केव्हातरी सहन झाला नाही तर विहिरी, तळी असतातच जीव द्यायला! ना खंत ना बदलण्याची इच्छा! तांबाभर पाण्याच्या भुकेला असतात त्या! कुणीतरी पाठीपोटी विचारणारा असावा हीच आस! त्यामुळेच संसार जाळणारा वणव्यासारखा असला तरी तिचे हात मात्र आकाश कवटाळायला सिध्द असतात.




प्र. १  खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 

१) गाव कशाने वेढले आहे? 
उत्तर : गाव उदास चार दोन झाडांनी वेढले आहे.

२) भर दुपारी रांग कोणाची? कशासाठी रांग लागली आहे?
 उत्तर : भर दुपारी स्त्रियांची, मुलींची रांग पाणी दुः आणण्यासाठी लागली आहे.

३ त्यांना कोणती बोच घेरत नाही? 
उत्तर : आपले आयुष्य अनाठायी गेले याची बोच त्यांना घेरत नाही.

४) चालता चालता त्यांना काय वाटते? 
उत्तर : चालता चालता त्यांना वाटते की या जीवनाचेही पांग फिटतील.

५) दुःख त्या कोठे पुरतात? 
उत्तर : त्या मातीखाली (मनाच्या?) दु:ख पुरून ठेवतात.

प्र. २   रिकाम्या जागी  योग्य शब्द भरा. 

१) माझ्या ---- समोरून सरकत जातात.
२) सगळे ---- घेऊन येतात त्यांच्यासाठी न । संपणाच्या कष्टीचा माळ!
३) वाळू मधल्या झिच्यासारखा पाझरतो ---
४) कणी कोंडा पाखडून ------ उचलण्याची जीवट सवय.
५) पायांना पान बांधून वाट तुडवणारी कोणतीही ------

उत्तरे : १) डोळ्या २) ऋतू ३) जीवनरस ४) सत्व । ५) आई 


प्र. ३ खालील प्रश्नांची उत्तरे तीन-चार   ओळीत लिहा. 

१) सगळे ऋतू त्यांच्यासाठी काय आणतात? 
उत्तर : खेड्यापाड्यातील स्त्रियांचे जीवन मु संघर्षमय असते. सगळ्याच ऋतूत प्रत्येक प दिवशी त्यांच्या वाट्याला कष्टच असतात., झ संसार चालविण्यासाठी पाणी आणण्यापासून अ मोलमजुरी करून पुन्हा संध्याकाळसाठी न रांधण्यातच जीवन असते. एकूण कष्ट आणि पा कष्टच तिच्यासाठी असतात.

२) जीवनाच्या असह्य ठणका थांबविण्यासाठी काय आणतात? 
उत्तर : जीवनाचा दु:खाचा ठणका जेंव्हा असहनीय होतो, तेव्हा तेल,हळद लावून तो ठणका थांबवण्यासाठी संयमाची तेल, हळद लावतात. उद्या तरी चांगले दिवस येतील या आशेवर मनाला दिलासा देतात त्यालाच कवयित्री तेल, हळद असे म्हणतात.

३) तिच्या संसाराला वणवा का म्हटले आहे? 
उत्तर : अरण्यात जेव्हा आपोआप आग लागते.त्याला वणवा म्हणतात. इथे तिच्या प्रपंचातही दु:खच आहे. साधी पाण्याची समस्या दूर होत नाही. दुरून दुरून पाणी आणावे लागते. खायला एक आहे तर दुसरे नाही कपडेही पुरेसे नाहीत. प्रपंचात खाणारी तोंडे जास्त. दुखण्याखुपण्याला औषधासाठी पैसा नाही. नवरा बरा असेल तर ठीक दरूज असेल तर संपलेच यामधून सुख शोधायचे कस? म्हणून हा वणवा असे म्हटले आहे.

प्र. ४ खालील प्रश्नांची उत्तरे पाच-सहा वाक्यात लिहा. 

१) स्त्रियांच्या कष्टांना कष्टांची माळ का म्हटले आहे? 
उत्तर : अनुराधा पाटील आपल्या कवितेत स्त्री जीवनाचे दु:ख मांडत आहेत. खेड्यापाड्यात स्त्रिया सुखी नाहीत. साधी पाण्यासारखी गरजही भाजत नाही. मग गोड-धोड, कापडालत्ता, दूरच्या गोष्टी, चंद्रमौळी संसारात दोन वेळचे जेवणही कष्टाने मिळते. सकाळी उठल्यापासून एकामागोमाग एक कामे करायची दुपारी कामाला जायचे लहान मुलांचे करायचे पुन्हा जेवण बनवायचे ह्यात सुख कुठे शोधायचे दु:खाची माळच आहे. त्यासाठी सतत कष्ट करताना एकामागून एक अशी माळच आहे सुखच नाही असे वाटते.

२) कोणता विसावा त्यांना कशासाठी हवा आहे? 
उत्तर : अनुराधा पाटील सुन्या तिच्याही दाही दिशा या कवितेत स्त्रीच्या अपार कष्टाचे व दुर्दम्य इच्छाशक्तीचे वर्णन करतात. आधी पाणी आणायचे कणी कोंडा पाखडून रांधायचे मुलाबाळांना नव-याला देऊन मग स्वत: जेवतात पतीच्या बरोबरीने कष्ट करतात. नाहीच सहन झाला तर एखादी विहिर, तळे जवळ करतात. आणि दु:खही पुरून ठेवतात पुन्हा पुन्हा उगाळत नाहीत. आणि स्वत:ला समजावतात तांब्याभर पाणी देणारे कुणी तर असाव, पाठीशी पोटाशी त्यांच्यासाठी बळ आहे तोवर कष्ट करूयात.

 3) स्त्रिया स्वत:ला कसे समजावतात? 
उत्तर : सुन्या तिच्याही दाहीदिशा या अनुराधा पाटील यांच्या कवितेत स्त्री जीवनाचे न संपणारे दु:ख व कष्ट याचे वर्णन केले आहे. जीवनाकडे त्या नेहमी आशावादी दृष्टीकोनातून पाहतात. स्वत:चे दु:ख, वेदना मनातच पुरुन ठेवतात. आज कष्ट केले तर उद्या आपल्याला आपली मुले आधार देतील असा त्यांना विश्वास वाटत असतो. म्हणून प्रसंगी पायाला पाने बांधून त्या कष्ट करतात. पाणीसुद्धा त्यांनाच लांबून आणावे लागते. पण भविष्याच्या दुर्दम्य आशेवर त्या जगत असतात.




No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024