हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा CLICK ME
कवी परिचय :
दया पवार (1935-1996)
यांचे पूर्ण नाव दगडू मारुती पवार. दलित साहित्याच्या नव्या प्रवाहातील कवी ते आत्मकथा लेखक. यांनी आपल्या लेखनातून दलितांच्या आशा, आकांक्षा व वेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांची ‘चावडी’ हा स्फुट लेखांचा संग्रह, ‘कोंडवाडा’ कविता संग्रह. ‘बलुतं’ हे आत्मकथन इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘बलुतं’ या आत्मकथनासाठी महाराष्ट्र शासनाचा व फाय फौंडेशनचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. भारत सरकारनेही
त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब बहाल केला आहे.
दया पवार यांची ग्रंथसंपदा
मूल्य : श्रमिकांची व्यथा
साहित्य प्रकार : दलित कविता
संदर्भ ग्रंथ : कोंडवाडा
मध्यवर्ती कल्पना : कष्ट करूनही उपाशी राहणाèया सामान्य कष्टकèयांच्या भावना या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत.
सारांश : -
धरण या कवितेत कवी दया पवार यांनी कष्ट करूनही उपाशी राहणाया सामान्य कष्टकयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. धरण बांधताना स्त्रिया मोलमजुरी करतात. पण, त्यांना दारिद्र्यात रहावे लागते. धरण बांधल्यावर शेतीवाडी पिकेल, ऊस पिकेल, साखर कारखाने होतील, पण, ती दरिद्रीच रहाते. त्या कष्टाचे वर्णन कवितेत आहे. ही कष्टकरी माणसे स्वत: कष्ट करतात व श्रीमंतांचे मळे फुलवितात व आपण मात्र दारिद्यात जीवन जगतात.
धरण बांधण्याचे काम सुरू असते. एक गरीब कष्टकरी स्त्री त्या ठिकाणी कामाला जात असते. धरण हे एक दिवसात बांधून पूर्ण होत नाही. त्याला अनेक वर्षे लागतात. म्हणून धरण-धरण हा शब्द कवीने कल्पकतेने वापरला आहे. त्या धरणाच्या कामात तिला मोबदलाही कमी मिळतो म्हणून ती स्त्री म्हणते हे धरण मी बांधते. पण, जणू मी माझे मरणच कुटत आहे
ही कष्टकरी स्त्री सुर्योदयापुर्वी उठून धान्य दळण्याच्या प्रयत्न करते. पण घरी धान्यच नसल्याने ती निराश होते. पहाट झाली पण जात्यात घालायला धान्यच नाही जणू पीठ आटले आहे. त्यामुळे उरलेला कोंडाच मी जात्यात दळत आहे. शेवटी कणीफोंडा वापरून स्वयंपाक करते. कामासाठी निघून जाते. पण दुपार झाल्यावर तिला जीव घराच्या ओढीने घोटाळायला लागतो. कारण आपलं तान्हं लेकरू वेताच्या टोपलीखाली झोपवून ती बाहेर पडलेली असते. कामाच्या ठिकाणी उन्हाच्या झळा सोसवत नाहीत. तरीही हातोडीचे घाव घालून मोठे मोठे दगड ती फोडत असते. तिला वेदना होत होत्या. रडू येत होते. पायात चप्पल नाहीत पायाला चटके बसू नयेत म्हणून ती झाडाची ओली पाने बांधून घेते. अशा या कष्टकरी महिलेच्या त्यागातून धरण बांधून तयार होते. सर्वत्र पाणी पुरवठा होतो. श्रीमंतांचे ऊसाचे, धान्याचे मळे फुलतात. पण धरण बांधण्यासाठी हाडाची काडं केली तिला मात्र घोटभर पाण्यासाठी वणवण भटकाव लागतं ही शोकांतिका आहे. धरणाच्या कामामुळे सर्वत्र भरभराट होते. लोक श्रीमंतहोतात. पण ज्या स्त्रीच्या कष्टातून, घामातून हे धरण बांधले गेले त्यांच्या घरी मात्र अठराविश्वे दारिद्यच राहते. कष्टकरी समाजाचे प्रातिनिधीक स्वरुपातून वर्णन या कवितेत आले आहे. तुमच्या घरात वेल मांडवाला चढणार, भरभराट होणार, पण ते होण्यासाठी मी घाम गाळला आहे. तेव्हा हे सारे होण्यासाठी मी कारणीभूत असून माझ्या अंगणात पाचोळ्याशिवाय काही नाही. खरच त्यांच्या कष्टाला केव्हा फळ मिळणार?
1. एका वाक्यात उत्तरे द्या.
1) साखर कशामध्ये भरलेली आहे?उ. : ऊसाच्या कांडामध्ये साखर भरलेली आहे.
2) वेल कोठे चढते?
उ. : वेल मांडवावर चढते.
3) ती कष्टकरी स्त्री आपल्या पायाला काय बांधते?
उ. ती. आपल्या पायाला झाडाची ओली पाने बांधते.
४) या कवितेतील स्त्री काय बांधत आहे?
उत्तर : या कवितेतील स्त्री धरण बांधत आहे.
५) ती स्त्री रान का धुंडाळते आहे?
उत्तर : घोटभर पाण्यासाठी ती रान धुंडाळत आहे.
६) वेल कोठे चढते?
उत्तर : वेल मांडवाला चढते आहे.
७) साखर कशात भरली आहे?
उत्तर : साखर उसाच्या पेरापेरात भरली आहे.
८) दया पवारांच्या आत्मकथनाचे नाव काय ?
उत्तर : बलुतं
९) कवितेतील स्त्रीने लेकरू कुठे ठेवले आहे?
उत्तर : स्त्रीने लेकरू पाटीखाली ठेवले आहे.
१०) कवितेतील स्त्री काय कांडत आहे?
उत्तर : कवितेतील स्त्री आपले मरण कांडत आहे.
११) उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून तिने काय केले आहे?
उत्तर : उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून तिने पायाला झाडाचा पाला बांधला आहे.
१२) पाचोळा कोठे पडत आहे?
उत्तर : पाचोळा तिच्या अंगणात पडत आहे.
१३) मांडवावर चढलेल्या वेलीला कोणते आळे आहे?
उत्तर : मांडवावर चढलेल्या वेलीला त्या स्त्रीच्या घामाचे आळे आहे.
2. खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1) पीठ जात्यात आटलं याचा अर्थ काय?उ. : पीठ होण्यासाठी धान्यच कमी आहे. तेव्हा ती थोडा कोंडा घालून जातं फिरवते सामान्य कष्टकयांच्या भावना या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत. दुसयाच्या विकासासाठी ही सर्व माणसे राबतात, पण त्यांच्या घरी खायला अन्नाचा कण नसतो. या कवितेतील कष्टकरी स्त्री जेव्हा दळण दळण्याची तयारी करते पण धान्य नसल्यामुळे पुरेसं पीठ तिला मिळत नाही. म्हणूत पीठ जात्यात आटलं असे म्हटले आहे.
2) कामावर जाण्यापुर्वी ती पहाटेला कोणती कामे करते?
उ. : धरणाच्या बांधकामासाठी तिला नेहमीच घरातून लवकर जावे लागे. त्यासाठी ती सकाळी लवकर उठत असे असेल ते धान्य घेऊन ते दळत असे. कणीकोंडा शोधून स्वयंपाक करत असे. त्यानंतर आपल्या तान्ह्या बाळाला टोपलीखाली झोपवून कामावर जात असे.
३) जीव मागे घोटाळला असे ती स्त्री का म्हणते?
उत्तर : धरण कवितेतील कष्टकरी स्त्री सकाळी उठून कामावर जाते. दुपारपर्यंत काम करते. दुपारी तिला आपल्या तान्ह्या बाळाची आठवण येते. त्याला वेताच्या पाटीखाली तिने झाकून ठेवलेले असते. त्याच्यातच जणू तिचा जीव असतो म्हणून जीव मागे घोटाळला असे म्हणते.
3. संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1) दिसं कासवाला आला, जीव मागे घोटाळला
उ. : वरील काव्यपंक्ती ‘‘धरण या कवितेतील असून ‘‘दया पवार यांनी ही कविता लिहिली आहे.
स्पष्टीकरण : कष्टकरी स्त्री धरण बांधण्याच्या कामासाठी जाते. उन्हातान्हात काम करते. ज्यावेळी दुपारची वेळ होते, त्यावेळी तिला घरची ओढ लागते. कारण कामाला येताना आपल तान्हं बाळ ती घरी सोडून आलेली असते. म्हणून ती हे वाक्य म्हणते.
२) पेरापेरात साखर तुमचं पिकलं शिवार,
उत्तर : वरील ओळ धरण या दया पवार यांच्या कवितेतील असून या कवितेत धरणाच्या कामावर कष्ट करणाच्या स्त्रिची व्यथा वर्णन केली आहे. ती म्हणजे धरणाच्या पाण्याने तुम्ही ऊस पिकवाल. ज्याच्यामध्ये भरपूर साखर असेल पण आम्हाला घोटभर पाण्यासाठी फिरावे लागत आहे.
३) वेल मांडवाला चढे, माझ्या घामाचे ग आळे
उत्तर : वरील ओळ धरण या दया पवार यांच्या कवितेतील असून कोंडवाडा संग्रहातून निवडली आहे. धरणावर कष्ट करणाच्या स्त्रीची व्यथा या कवितेत मांडली आहे. धरणामुळे शेतक-यांचे मळे पिकणार त्यांच्या घरी वैभव येणार. पण, त्याच्यासाठी मी वर्षानुवर्षे घाम गाळला आहे. पण मला गरीबीशिवाय काहीच नाही मिळाले.
4. खालील प्रश्नाचे 8-10 वाक्यात उत्तरे लिहा.
1) या कवितेतील स्त्रीच्या गरीब परिस्थितीचे वर्णन करा.उ. : या कवितेतील स्त्रीच्या घरी अठराविश्व दारिद्य असते. त्यासाठी तिला घरदार सोहून दिवसरात्र कष्ट करावे लागतात. स्वत:चे तान्हे मूल असुनसुध्दा ती घरी थांबत नाही. तिच्या घरी पीठ करायला धान्य नाही. कणीकोंडा घालून ती स्वयंपाक करते. तिला असंख्य वेदना सहन कराव्या लागतात. तरीही ती राबते दुसयाचे शिवार तिच्या घामातून फुलते. पण घोटभर पाण्यासाठी तिला वणवण करावी लागते. एवढे कष्ट करूनही तिला काहीच मिळत नाही.
------------------------------------------- ----------------------------------------------------
No comments:
Post a Comment