Wednesday, May 15, 2019

सत्कार

                                   
कवी परिचय : 




मंगेश केशव पाडगावकर
(जन्म 1929 मृत्यू - 30 डिसेंबर 2015)  हे नवकवींच्या दुसèया पिढीतील मान्यवर कवी आणि लघुनिबंधकार. त्यांनी ‘जिप्सी’, ‘उत्सव’, ‘विदूषक’, ‘सलाम’, ‘भटकेपक्षी’ इ. कवितासंग्रह लिहिले आहेत. त्यांच्या कवितांमधून निसर्गसौंदर्य, प्रेमभावनेची सूक्ष्म रूपे, उपरोध, समाजभाष्ये चित्रदर्शी प्रतिमा, संवेदनशीलता उत्कटपणे व्यक्त होतात. त्यांच्या ‘सलाम’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2010च्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तसेच 2013 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार दिला आहे.
ही कविता ‘जिप्सी’ या काव्यसंग्रहातून निवडली असून कवितेचा प्रकार (मुक्तछंद) निसर्गकविता आहे.

मूल्य : लढा, संघर्ष
साहित्य प्रकार :  मुक्तछंद (निसर्ग कविता)
संदर्भ ग्रंथ : जिप्सी



रसग्रहण :-

कवी आणि त्याची कविता : ‘सत्कार’ ही मंगेश पाडगावकरांची कविता, त्यांच्या अनेक सुंदर निसर्ग कवितांपैकी एक. आपल्या निखळ निसर्ग परंपरेत ती बालकवींच्या फुलराणी या कवितेची आठवण करून देते. पाडगावकरांना वाटणारी निसर्गाची ओढ, निसर्गातील सृजनाचे कौतुक, निसर्गातील रंगा-गंधाचे आकर्षण यातूनही त्यांची सुंदर कविता जन्माला आली आहे.

‘सत्कार’ कवितेचा विषय आणि तिचा आशय - अंकुरत असलेले एक पहिले हिरवे तृणपाते हा कवितेचा विषय आहे. या नव्या कवीच्या संवेदनशील प्रतिभेला केवढी सुरेख याचना दिली आहे.
जणू त्या हिरव्या तृणपात्याच्या रूपाने धरणीची सृजनेच्छा मूर्तरूप घेत आहे. एक नवे जीवन उसळून उठून उभे राहिले आहे. आणि म्हणून त्याच्या सत्कारासाठी जणू सारा निसर्ग आतूर झाला आहे. परंतु या पहिल्या हिरव्या तृणपात्याचा जन्म काही असा सहजपणे झालेला नाही.
‘उरी जेव्हा ज्वालारस झेलून
धरतीने तप केले दारुण
सुकता सुकता नद्या म्हणाल्या हाच विश्वसंहार’
 सर्वांना तो विश्वाचा संहार शेवटचा विनाश वाटला. परंतु त्याचवेळी काळ्या धरणीच्या पोटात, या इवल्या बीजाच्या ओठी थरथरत ‘श्रद्धेची ललकार’ स्फुरत होती ! मग ....
‘कवच भूमीचे आणि अचानक
भेदुनी आले हिरवे कौतुक
नचिकेताचे स्वप्नच अथवा अवचित हो साकार’
पौराणिक कथेतील नचिकेताचा यथायोग्य दाखला कवीने येथे दिला आहे. नचिकेत हा उद्दालकाचा मुलगा. उद्दालकाने विश्वजित यज्ञ केला व आपले सर्वस्व ऋत्विजांना देऊन टाकले. ‘सर्वस्व’ या  शब्दावर जोर देऊन बापाने आपल्या मुलाचेही दान केले पाहिजे असा आग्रह नचिकेताने धरला. बापाने त्याला रागारागाने यमाला देऊन टाकले. परंतु यमाला त्याची थोरवी कळाल्यावर यमदंडाने त्यास प्रसन्न होऊन तीन वर दिले. नचिकेत मृत्यूनंतरच्या यमधर्माकडून पुन्हा जिवंत होऊन परतला. म्हणजे मृत्यूवरही त्याने विजय मिळविला. तृणपात्याचा नवा जन्म म्हणजे त्या पूर्व संहारावर मातच होय. म्हणून कवीला नचिकेताचे हे मृत्युंजय स्वप्नच अवचित् तृणपात्याच्या रूपाने साकार झाले आहे, असे वाटते.

ते हिरवे तृणपाते म्हणजे जणू ‘सृजनाचा विजयध्वज आहे.’ ‘ हा जीवन साक्षात्काराच’ आहे. असे कवी त्याचे कौतुक करतो. त्याच्या सत्कारार्थ...
‘म्हटले स्वागतगीत खगांनी
केला मुजरा लावून ढगांनी
लाल मातीचा गुलाल उधळीत पवन करी संचार’
शेवटी मातीतून अत्तर घमघमवीत पावसाने त्यावर अभिषेक केला. व हा सत्कार सोहळा आटोपला.
कवितेचे अभिव्यक्तीतील सौंदर्य :- मनातला आशय हा अभिव्यक्त करीत असताना तो तितक्याच सामर्थ्याने, उत्कटपणे अभिव्यक्त व्हावयाचा असेल तर अभिव्यक्तीच्या माध्यमावर म्हणजे शब्दावर त्याचे पुरेसे प्रभुत्व असणे आवश्यक आहे.
कवीने आपल्या ह्या सामर्थ्याची, शब्द सामर्थ्याची, भाषा प्रभुत्वाची प्रचीती जागोजाग आणून दिली आहे. जुन्या वृत्तबद्ध पद्धतीची रचना असून यमक-अनुप्रास उत्तम साधले असूनही शब्दांची ओढाताण किंवा क्लिष्टता मात्र मुळीच जाणवत नाही. कवितेत नादमाधुर्य व एक लय नकळत साधली गेली आहे. ही कविता नुसतीच वाचली जात नाही तर वाचणाèयाच्या मनात नकळत नादात ठेक्यात गायली जाते.
खगांनी स्वागत गीत म्हणणे, ढगांनी लवून मुजरा करणे ही कल्पना मूळ सत्काराच्या कल्पनेशी सुसंगत व परिपोषक आहे.
‘लाल मातीचा गुलाल उधळत पवन करी संचार’
या ओळीतील ‘ल’ चा अनुप्रास आणि  शेवटच्या कडव्यातील
‘कोसळली सर दक्षिण उत्तर
घमघमले मातीतून अत्तर’
या ओळीत तर भावगीताच्या धु्रवपदाचा गोडवा आहे.

कवितेतील गुणदोष विवेचन : कवितेत दोष जवळजवळ नाहीत. सत्कार सोहळ्याचे वर्णन अतूट आहे, असे एक म्हणू. पण तसे म्हणता येईल का ? केवळ निसर्गाने त्या पात्याचा केलेल्या सत्कार संदर्भात टिपणे द्यावयाची आहेत असे नाही.  त्या निमित्ताने तृणपात्याची प्रतिमा कवीस अधिक आशयघन करावयाची आहे. आणि ते कार्य कवीने उत्तम साधले आहे. तृणपाते हे केवळ तृणपाते नाही. तो तृणपात्याचा विजयध्वज आहे. तो मृत्युंजय अशा श्रद्धेचा अंकुर आहे. तो नव्या जीवनाचा साक्षात्कार आहे. ती अंकरून आलेली श्रद्धेची ललकार आहे. लोलकातून प्रकाश परावर्तीत होऊन विविध रंगी किरण ‘शलाका’ बाहेर पडावी त्याप्रमाणे तशी तृणपात्याची ही प्रतिमा अनेकविध  महत्त्वपूर्ण अर्थ लेवून सार्थ ठरली आहे.
विनोदाने बोलायचे झाले तर, कवितेत एक दोष काढता येईल. तो असा की, कवितेच्या खाली टिपणी आहे. कविता दि. 29/06/1952 रोजी लिहिण्याची आणि लेखन स्थळ वर्धा-काकावाडी असल्या अरसिक, बेचव नामग्रामी असली रसपूर्ण सुंदर कविता लिहिली जावी हे थोडे विसंगत नाही का ?
अशी, सदर कविता जवळ जवळ दोषरहित अशीच आहे. पाडगावकरांच्या निसर्ग कवितेच्या सर्व सामर्थ्याची ती प्रचिती आणून देते.

समारोप :- मराठीत निसर्गकवितेचा पाया बालकवींनी घातला त्यानंतर तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण किंबहुना बालकवींच्यापेक्षा अधिक प्रगतम, अधिक संपन्न, अधिक व्यापक स्वरूपाच्या निसर्गकविता सदानंद रेगे आणि मंगेश पाडगावकर यांनी लिहिल्या आहेत. ‘अक्षरवेल’ या सदानंद रेगे यांच्या काव्यसंग्रहातील कविता कल्पनांचे नाविन्य आणि चमत्कृती विस्मयाने भारावून टाकते. परंतु त्याहून पाडगावकरांची निसर्गकविता अधिक श्रेष्ठ आणि सरस वाटते. त्यातलीच सत्कार ही एक कविता.
          __________________________________________________________________________

१. खालील प्रश्नांची उत्तरे  लिहा.

1) सत्कार कोणाचा होत आहे? 
उ. : सत्कार पहिल्या हिरव्या गवताच्या पात्याचा होत आहे.

2) स्वागतगीत कोणी म्हटले? 
उ. : स्वागतगीत पक्षांनी म्हटले.

3) मुजरा कुणी केला? 
उ. : मुजरा ढगांनी केला.

4)  अत्तर म्हणजे काय असावे? 
उ. : पहिला पाऊस पडल्यावर मातीचा जो सुवास येतो त्याला कवीने अत्तर संबोधले आहे.

५) ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून निवडली आहे? 
उत्तर : ही कविता सलाम या काव्यसंग्रहातून निवडली आहे.

६) कोणत्या साली मंगेश पडगावकरांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला? 
उत्तर : २०१३ साली मंगेश पाडगावकर यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

७) श्रद्धेची ललकार कोणाला स्फुरली? 
उत्तर : श्रद्धेची लवकार छोट्या गवताच्या पात्याला स्फुरली. 

८) कोणाचे स्वप्न साकार झाले? 
उत्तर : नचिकेताचे स्वप्न साकार झाले आहे.

९) गुलाल कोणी उधळला? 
उत्तर : वा-याने आठ दिशांतून गुलाल उधळला.

१०) मातीने कोणावर मात केली. 
उत्तर : मातीने मृत्यूवर मात केली. 


2. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा.


1) धरतीने कसे व कोणते तप केले? 
उ. : विश्वामध्ये जेव्हा नवनिर्मितीची पक्रिया सुरू झाली. त्यावेळी सृष्टीमध्ये पचंड उलथापालथ झाली. पाऊस पडला नव्हता. नद्या सुकल्या. भूगर्भातून ज्वालारस वाहू लागला. पण धरतीने तो ज्वालारस झेलून घेतला, कठीण तप केले व तृणपात्याच्या रुपातून नव्या जीवसृष्टीला जन्म दिला. नवनिर्मितीसाठी धरतीने कठोर तप केले होते.

2) कवीने जीवनसाक्षात्कार कशाला म्हटले आहे? 
उ. : ज्यावेळी पृथ्वीवर पहिले तृणपाते जन्माला आले. त्यावेळी मातीने मृत्यूवर मात केली असे कवीला वाटते. हा छोटासा अंकूर म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा आहे. हा नवनिर्मितीचा विजयध्वज आहे आणि तोच खरा जीवनाचा साक्षात्कार आहे असे कवी म्हणतो.

३) कवीने जीवन साक्षात्कार कशाला म्हटले आहे? 
उत्तर : अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इवलेसे गवताचे पान उगवले. त्याने मृत्यूवर विजय मिळवला म्हणून त्याला जीवनसाक्षात्कार म्हटले  आहे.   

* संदर्भासहित स्पष्टीकरण करा. 

1)  लाल मातीचा गुलाल उधळीत पवन करी संचार 
संदर्भ : वरील काव्यपंक्ती ‘‘सत्कार या कवितेतील असून या कवितेचे कवी ‘‘मंगेश पाडगावकर आहेत.
स्पष्टीकरण : पृथ्वीवर पहिले वहिले तृणपाते जेव्हा अंकुरते तेव्हा सर्वजण त्याच्या तयारीसाठी सज्ज होतात. पक्षी स्वागतगीत गातात. ढग मुजरा करतात व वारा लाल मातीरुपी गुलाल उधडत संचार करतो. हे वर्णन करताना याचा उल्लेख केला आहे.

२) अष्ट दिशातून अभिष्टचिंतन घुमला जयजयकार । 
संदर्भ - ही ओळ मंगेश पाडगावकरांच्या सत्कार या कवितेतील असून कवितेचा प्रकार मुक्तछंद आहे कवितेचे मूल्य लढा, संघर्ष आहे.  या कवितेत सगळीकडे दुष्काळ पडला होता. नद्या सुकून गेल्या होत्या. लाव्हारस वाहत होता. विश्वाचा संहार होईल, असे वाटत होते. अचानक कोठून तरी गवताचे पाते उगवून आलेले दिसले. आश्चर्य! ही तर मृत्यूवर मात होती. म्हणून त्या तृणपात्यांचा सत्कार करताना तेव्हा अष्टदिशा त्याच्या चांगल्यासाठी जयजयकार करतात.  


2) खालील प्रश्नांची उत्तरे सात-आठ वाक्यात लिहा. 

1)  हिरव्या तृणपात्यांचा सत्कार का व कसा करण्यात आला? 
उत्तर : मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी काव्यसंग्रहातून ही निसर्गकविता निवडली आहे. प्रतिकूल परिस्थिती असताना म्हणजे कुठेही पाण्याचा अंश नसताना नद्या सुकून गेलेल्या असताना एक गवताचे पात उगवते. जणू ते सांगतय की, अशी परिस्थिती राहणार नाही. त्याला आशेचा किरण आहे. त्याने नचिकेताप्रमाणे यमावर विजय मिळवला होता. मग त्याचा सत्कार नको करायला, तर सत्कारासाठी पक्षांनी स्वागतगीत म्हटले, ढगांनी त्यांना मुजरा केला, आठ दिशांचा सुगंध घेऊन गुलाल घेऊन वारा येतो, गुलाल उधळतो आणि काय आश्चर्य दक्षिणोत्तर सरीसरी पाऊस कोसळला. धरणी तृप्त झाली व मृदगंध पसरला. जयजयकार अष्टदिशांनी केला. सोहळा ख-या अर्थाने साजरा झाला.




1 comment:

  1. Great job done. I wanted this poem and got it in detail.Hats off to you all.Keep it up!

    ReplyDelete

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024