हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा CLICK ME
कवी परिचय :
कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) - (1912-1999) नाशिक येथे वास्तव्य. अग्निसंप्रदायी, मानवतावादी कवी म्हणून ओळखले जातात. ‘जीवनलहरी’, ‘विशाखा’, ‘किनारा’, ‘मराठी माती’ हे काव्यसंग्रह; तसेच ‘वैष्णवी’, ‘कल्पनेच्या तीरावर’, ‘जान्हवी’ या कादंबèया, ‘फूलवाली’ (लघुकथासंग्रह), ‘आहे आणि नाही’ (लघुनिबंध संग्रह), ‘समीधा’ हा गद्यकाव्य संग्रह, ‘दूरचे दिवे’, ‘दुसरा पेशवा’, ‘कौंतेय’, ‘राजमुकुट’, ‘नटसम्राट’, ‘वीज म्हणाली धरतीला’ ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. भावनाशीलता, ओजस्वी भाषाशैली आणि उत्तुंग कल्पनाविलास ही कुसुमाग्रजांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. ते ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचे (1988) मानकरी आहेत.
पृथ्वी स्वत:च्या आसाभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते हे भौगोलिक सत्य आहे. पण या कवितेत कुसुमाग्रजांच्या कल्पनाविलासाला बहर येतो व पृथ्वीचं सूर्याकडे प्रेमाची याचना करते अशी भव्य व उदात्त प्रेमाची कल्पना ते मांडतात. तसेच चंद्र, धूमकेतू, मंगळ, धु्रव हे तारे ही पृथ्वीवर प्रेम करीत आहेत पण तेजस्वी सूर्यापुढे हे क्षुद्र आहेत म्हणून पृथ्वी सूर्याचे दूरपणही स्वीकारते असा हा तेजस्वी कल्पनाविलास कवितेत दिसतो.
ही कविता त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. ही कविता ‘सुमंदारमाला’ वृत्तामध्ये आहे. ही प्रेमकविता आहे.
मूल्य : चिरंतन प्रेम
साहित्य प्रकार : प्रेमकविता
संदर्भ ग्रंथ : विशाखा
कवितेचा सुबोध मराठीत अर्थ : -
पृथ्वीचे प्रेमगीत ही केवळ कुसुमाग्रजांच्याच नव्हे तर मराठी काव्यभांडारातील एक श्रेष्ठ अशी कविता आहे. या कवितेने वाचकांना लुब्ध करून टाकले आहे. या कवितेचे श्रेष्ठत्व अनेक दृष्टींनी अढळ आहे.सूर्याभोवती पृथ्वी फिरत आहे. युगानुयुगे हा सृष्टीक्रम अखंड चालला आहे व चालू राहणार आहे. या वैज्ञानिक सिद्धांतामध्ये काव्य असे काहीही नाही, पण कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला हीच एक घटना गरुडझेप घ्यावयास लावते. सूर्य हा प्रियकर व पृथ्वी ही प्रेयसी हे त्यांच्या प्रतिभाशक्तीला दिसते, जाणवते आणि या दिव्य प्रेमाचे भव्योदात्त दर्शन या कवितेमधून ते घडवितात.
हे भास्करा, (सूर्या) युगामागून युगे चालली आहेत. तुझ्या प्रीतीची याचना करीत तुझ्याच कक्षेत मी (पृथ्वी) धावते आहे. तू सदैव माझी वंचनाच करीत आहेस. अशी ही प्रीतीची याचना करीत व तुझ्याकडून वंचना स्वीकारीत मी किती काळ धावू ?
नव्हाळीमध्ये (तारुण्यात) असणारे उमाळे, उसासे (दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य) व ती आग आता माझ्या ठिकाणी उरलेली नाही. यौवनाच्या मशाली आता विझून गेल्या आहेत व फक्त काजळी कोपरे तेवढे शिल्लक उरले आहेत.
परंतु अंतरंगामध्ये असणारी तुझ्याबद्दलची प्रेमाची ज्योत सदैव जागी आहे. ती कधीही शांत होणार नाही- विझणार नाही. ती सदैव जागतीच राहील. तुझी ही याचना करीत मी कुठे चालले आहे ? कोठवर जाणार आहे ? मला काहीच ठावूक नाही. फक्त एवढेच माहीत आहे की तू पुढे व (जसा जाशील तशीच) मी मागे येत आहे. येत राहणार आहे.
माझे लक्ष वेधून घेण्यासाठी आकाशात विराजमान झालेले अनेक तारे वैभवाने नटून थटून बसलेले आहेत. माझ्या मस्तकावर दिव्य अशी उल्का - ते फुले उधळीत आहेत. परंतु हे सूर्या तुझ्याच एका मूर्तीवाचून मला अन्य काहीही प्रिय नाही. तुझ्यावाचून सारे विश्वच अंधारल्यासारखे मला वाटते.
तूच आकाशात उधळून दिलेले तेजाचे दिव्य कण वेचून प्रकाशमान होणारा तो चंद्र मला मोहविण्यासाठी दारुण तपाचार स्वीकारून बसला आहे.
तेजाचा पिसारा उभारून माझ्या दारात माझी प्रतीक्षा करीत पहाटेच्या वेळी हा प्रेमळ शुक्र उभा असतो. माझ्या प्रेमाची याचना करीत तो लाजून लाल होत मंगळही उभा आहे.
या पृथ्वीचे आपल्याला प्रेम लाभत नाही हे पाहून निराश झालेला ध्रुव तर संन्यासच घेऊन उत्तर दिशेला ऋषीच्या कुळात जाऊन बसला आहे. तर पिसाटासारखे केस पिंजारून तो धूमकेतू कधीमधी प्रेमाची आर्जवे करीत असतो.
परंतु तुझे असणारे ते भव्य तेज पाहिल्यानंतर व त्याच्या पूजेचे वेड लागल्यानंतर या क्षुद्र काजव्याप्रमाणे वाटणाèयांच्या प्रेमाचा स्वीकार कसा करू ? या दुर्बलांचा तो क्षुद्र शृंगार मला मुळीच मनास येत नाही. त्यापेक्षा तुझी दूरताही मला बरी वाटते.
तुझ्या प्रेमाच्या आठवणींचा निखारा अंतरंगात नेहमीचाच जागता आहे. तो कधी कधी तुझ्या आठवणीने उफाळून वर येतो (ज्वालामुखीचा उद्रेक होतो.) तर कधी तुझ्या आठवणींनी अंग शहारून जाते. (भूकंप होतो) आणि अंत:करण विदीर्ण होऊन जाते.
असे वाटते की तुझ्या त्या रौद्र रूपात तुझ्याच गळ्यात गळा घालून मिळून जावे. एकरूप व्हावे. तुझ्या त्या लाल ओठातील आग प्यावी आणि तुझ्या मिठीने प्रीतीच्या कळा तीव्रतेने पुन्हा अनुभवाव्यात.
हे मित्रा (सखा-सूर्य) मला तुझी अमर्याद असणारी थोरवी माहीत आहे. आणि मला हेही ज्ञात आहे की मी तुझ्यापुढे एखाद्या धूलिकणाप्रमाणे क्षुद्र आहे. सामान्य आहे. परंतु तुझ्या पायांचा स्पर्श होण्यासाठी मी धूलिकण आहे, याचाच मला आनंद वाटतो. समाधान वाटते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
खालील पश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या.
1) पृथ्वीच्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या.उ. पृथ्वीच्या अंतरी प्रेमाची ज्योत जागी आहे.
2) दिमाखात नटून थटून कोण जात आहे?
उ. दिमाखात नटून थटून आकाशातील तारे जात आहेत.
3) धुमकेतू कशापकारे आर्जवे करतो?
उ. वेड्यासारखे केस पिंजारून धुमकेतू आर्जव (विनवणी) करतो.
4. कुसुमाग्रजांना 1988 साली कोणता पुरस्कार मिळाला?
उ : कुसुमाग्रजांना 1988 साली ‘‘ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
5) सुधांशु म्हणजे कोण?
उ : सुधांशु म्हणजे चंद्र होय.
९) पृथ्वीचे प्रेमगीत कविता कोणत्या कवितासंग्रहातून निवडली आहे?
उत्तर : पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता 'विशाखा मी या संग्रहातून निवडली आहे.
१०) जनस्थान पुरस्कार कोणत्या गावातून दिला जातो?
उत्तर : जनस्थान (कुसुमाग्रज प्रतिष्ठान) पुरस्कार नाशिकमधून दिला जातो.
११) जान्हवी या पुस्तकाचा प्रकार कोणता?
उत्तर : जान्हवी ही वि. वा. शिरवाडकरांची कादंबरी आहे.
१२) हे प्रेमगीत कोणी म्हटले असावे?
उत्तर : हे प्रेमगीत पृथ्वीने सूर्याला उद्देशून म्हटले आहे.
१३) पहाटे दारात कोण उभा असतो?
उत्तर : पहाटे दारात प्रेमळ शुक्र उभा असतो.
१४) ध्रुव कोठे तपश्चर्या करीत आहे?
उत्तर : ध्रुव ऋषींच्याबरोबर उत्तरेकडे तपश्चर्या करत आहे.
१५) पृथ्वीचे प्रेमगीत कविता कोणत्या वृत्तात आहे?
उत्तर : ही कविता सुमंदारमाला वृत्तात आहे.
१६) धूमकेतूला काय म्हटले आहे?
उत्तर : धूमकेतूला पिसाट प्रेमवीर म्हटले आहे.
१७) पृथ्वीला कसले भूषण आहे?
उत्तर : पृथ्वीला धुळीचे भूषण वाटते.
खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.
1) पृथ्वीने सूर्याकडे कोणती याचना केली आहे?उ. युगामागून युगे निघून गेली. पण हे सूर्या तू माझी नेहमीच फसवणूक करतोस. तुझे पेम मिळविण्यासाठी आता मी अजून किती काळ तुझ्या कक्षेत फिरत राहू? तू लवकरात लवकर माझ्या पेमाचा स्वीकार कर. अशी पेमाची याचना पृथ्वीने केली आहे.
2) पृथ्वीला कशाचे भूषण वाटते? का?
उ. : पृथ्वीला धुलीकणाचे भूषण वाटते. कारण सूर्याची श्रेष्ठता खूप मोठी आहे याची जाणीव पृथ्वीला आहे. म्हणून सूर्यापुढे आपण धुलीकण आहोत असे ती म्हणते. या धुलीकणाने सूर्याचे पाय श्रृंगारीत करण्यासाठी धुळीचे कणही पृथ्वीला भूषणावह वाटतात.
खालील पश्नाचे उत्तर पाच, सहा वाक्यात लिहा.
1) पृथ्वी सूर्याची याचना कशी करत आहे? तिची सध्याची अवस्था कशी आहे?2) पृथ्वी सूर्याकडे पेमाची याचना करताना म्हणते, ‘‘युगामागून अनेक युगे निघून गेली तरी तू माझी फसवणूक करतोस. तुझे पेम मिळविण्यासाठी मी किती काळ तुझ्या मागे धावू? सूर्याकडे पेमाची याचना करून करून पृथ्वीच्या तारुण्यातला बहर कमी झाला आहे. तिच्या अंगात पूर्वीसारखा उत्साह उरला नाही. तारुण्याची मशाल नष्ट होवून फक्त तिच्या मनात निराशेची काजळी पसरली आहे. अशी पृथ्वीची सध्यीा अवस्था आहे.
२) विश्व केव्हा अंधारले असे पृथ्वीला वाटते?
उत्तर : कुसुमाग्रजांनी पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेत पृथ्वी सूर्याभोवती फिरते; कारण तिचे सूर्यावर प्रेम आहे, अशी रम्य कल्पना मांडली आहे. तिच्यावर चंद्र, मंगळ, शुक्र, शनी, धूमकेतू यांचेही प्रेम आहे. पण युगानुयुगे ती सूर्यावर प्रेम करत आली आहे. आज जरी ती प्रौढ झाली असली तरी अंत:करणात प्रेम तसेच आहे, असे तिला वाटते. अर्थात त्यांचे प्रेम सफल होणारे नाही, त्यामुळे नसेल आपण दोघे दोन ठिकाणी राहणेच भूषणावह आहे, असे ती म्हणते. सूर्य नसेल तर पृथ्वीवर अंधारच राहणार. पण पृथ्वी म्हणते की सूर्य देवा तुम्ही नसता तेव्हा मला हे विश्वात अंध:कारमय आहे असे वाटते आणि ते खरेही आहे.
संदर्भासहीत स्पष्टीकरण करा.
1) ‘‘पिसारा पभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा पेमळ.उ. संदर्भ : वरील काव्यपंक्ती ‘‘पृथ्वीचे पेमगीत य कवितेतील असून, या कवितेचे कवी ‘‘कुसुमाग्रज हे आहेत.
स्पष्टीकरण : पृथ्वीला आकर्षिक करण्यासाठी जसे तारे, चंद्र, धुमकेतू वेगवेगळे पयत्न करतात तसाच पयत्न पहाटेच्यावेळी शुक्रतारा करतो असा कल्पनाविलास करताना हे वाक्य लिहिले आहे.
२) परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा मला वाटते विश्व अंधारले.
उत्तर : वरील ओळ पृथ्वीचे प्रेमगीत या कुसुमाग्रजांच्या कवितेतील असून, विशाखा काव्यसंग्रहातून ही कविता निवडली आहे. मूल्य चिरंतन प्रेम आहे. पृथ्वीचे सूर्यावर प्रेम आहे. युगानुयुगे ती प्रेम करते आहे आणि सूर्यदेव असेल तर जग अंध:कारमय आहे असे तिला वाटते
No comments:
Post a Comment