शनिवारवाडा |
या संदर्भातील माहिती युट्यूब वर पाहण्यासाठी ऐकण्यासाठी क्लिक करा CLICK ME
लेखक परिचय :
कृष्णाजी विनायक सोहनी (1784-1894) बखरकार. ‘पेशव्यांची बखर’ हा त्यांचा एकमेव ग्रंथ उपलब्ध. उत्तर पेशवाई पाहिलेल्या आणि समकालीन राजकारणात वावरलेल्या या माहितगार लेखकाने पेशवकुलाची ही जीवनगाथा आत्मीयतेने व समरसतेने लिहिली आहे. ही त्यांची बखर काही प्रमाणात इतिहासाशी सुसंगत आहे. त्या काळातील समाजजीवनाचे रंग या बखरीत दिसून येतात.
मूल्य : विज्ञानदृष्टी
साहित्य प्रकार : बखर वाङ्मय
संदर्भ ग्रंथ : पेशव्यांची बखर
मध्यवर्ती कल्पना : पेशव्यांचा पुण्यातील नवीन वाडा शनिवारवाडा म्हणून ओळखला जातो. या शनिवारवाड्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कात्रजहून पाणी आणल्याची हकीकत या पाठात आली आहे. त्या काळातील वास्तुविद्या, दूरदर्शीपणा आणि दरबारी बोलण्याचा ढंग यांचे दर्शन त्यातून घडते.
टीप -
शनिवारवाडा - छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्या बाजीरावांना पुणे हे गाव इ.स.1726 मध्ये इनाम दिले. शनिवारवाडा हे पेशव्यांचे निवासस्थान. इ.स.1732 ला त्याची वास्तुशांती झाली. शनिवारवाड्यात कात्रजहून पाणी आणले ते बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे (1740-1761) यांनी. शनिवारवाडा हे मराठी राज्यातील एक प्रबळ सत्ता केंद्र होते.
स्वाध्याय
प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. वाड्यात कोणती सोय नव्हती?उत्तर : शनिवारवाड्यात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सोय नव्हती.
2. पुण्यासभोवती कारकून कशासाठी पाठविले?
उत्तर : शनिवारवाड्यातील पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी; पुण्यासभोवती कारकूनांना पाणी पाहण्यासाठी पाठविले.
3. कातरजेपासून कोठपर्यंत नळ आणला?
उत्तर : कातरजेपासून पुण्यात काळे वावरापर्यंत नळ आणला.
4. नळ कसा बांधून आणला?
उत्तर : संगीन चिरेबंद असा नळ बांधून आणला.
5. खजिना कोठे करून ठेविला होता?
उत्तर : गणेश दरवाज्याजवळ बुरुजामध्ये खजिना करून ठेवला होता.
6. गवंड्यास काय इनाम दिले?
उत्तर : गवंड्यास गाव इनाम देण्यात आले.
प्र. 2. खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. वाड्यात पाणी आणण्यासाठी श्रीमंत नानासाहेबांनी मनात कोणती मसलत योजली?उत्तर : शनिवारवाडा मोठा मजबूत असला तरी यामध्ये आत पिण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची सोय नाही म्हणून श्रीमंत नानासाहेबांच्या मनात असा विचार आला की नवे पाणी आत नळ बांधून आणावे. त्यासाठी चार चार कोस, पाच पाच कोस सभोवती कारकून पाणी पाहण्यासाठी पाठविले.
2. पाणी पाहावयास गेलेल्या कारकुनांनी श्रीमंताना काय सांगितले?
उत्तर : शनिवारवाड्यातील पाण्याची सोय करण्यासाठी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी पुण्याच्या सभोवती चार चार कोस, पाच पाच कोस सभोवती कारकून पाणी पाहण्यासाठी पाठविले. ते सर्वजण पाणी पाहून माघारी परतले. परंतु कात्रज गावाकडे गेलेल्या कारकुनांनी श्रीमंताना विनंती केली की, कात्रजच्या तळ्यात मुबलक पाणी आहे. ते पाणी उन्हाळ्यातदेखील आटणार नाही असे आम्हाला कल्पनेने वाटते. परंतु ते सरकारना पसंत पडेल तेव्हा खरे.
3. श्रीमंत नानासाहेबांनी कातरज तळ्यातील पाण्याचा अंदाज कसा घेतला?
उत्तर : कारकुनांच्या विनंतीवरून कात्रजकडे श्रीमंत नानासाहेब स्वत: गेले. ते उन्हाळ्याचे दिवस होते. त्या दिवसात त्या पाण्याला दहा पाच मोटा अखंड अहोरात्र आठ दिवसापर्यंत चालवून पाहिल्या परंतु तसूभरही पाणी कमी झाले नाही. तेव्हा त्यांनी येथूनच पाणी घेऊन जाण्याचा बेत केला. अशातèहेने श्रीमंतांनी तळ्यातील पाण्याचा अंदाज घेतला.
4. शनिवारवाडा बांधलेल्या गवंड्यांनी कोणती कल्पकता दाखविली होती?
उत्तर : कात्रजहून संगीन चिरेबंद नळाद्वारे पाणी आणावयाचे ठरल्यानंतर ते आत वाड्यात कसे आणायचे असा प्रश्न निर्माण झाला कारण वाड्याभोवती दगडी चिरेबंदी तट होता. त्यामुळे गवंड्याला बोलावून विचारले असता त्यांने सांगितले की एवढा मोठा वाडा बांधतात म्हणजे बाहेरून पाणी आणतीलच असा निश्चय करून अगोदरच गणेश दरवाज्याजवळ बुरुजामध्ये खजिना (पाणी साठविण्यासाठी हौद) करून ठेवला असल्याचे सांगितले. अशा तèहेने वाडा बांधणाèया गवंड्यानी कल्पकता दाखविली होती.
प्र. 3. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी चार-पाच वाक्यात लिहा.
1. शनिवारवाड्यात पाणी आणण्यासाठी श्रीमंत नानासाहेबांनी कोणते प्रयत्न केले?उत्तर : शनिवारवाडा भक्कम झाला असला तरी त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय नव्हती ती करण्यासाठी श्रीमंतांनी पुण्यासभोवती कारकूनांना पाणी पाहण्यासाठी पाठविले. त्यांनी कात्रजच्या तळ्यातून पाणी पुरवठा होईल असे सांगितल्यावर श्रीमंतांनी स्वत: कात्रजला जाऊन त्या तळ्यातील पाण्याचा अंदाज घेतला. त्या उन्हाळ्याच्या दिवसात त्या पाण्याला दहा पाच मोटा अखंड अहोरात्र आठ दिवसापर्यंत चालवून पाहिल्या परंतु तसूभरही पाणी कमी झाले नाही. तेव्हा त्यांनी येथूनच पाणी घेऊन जाण्याचा बेत केला. त्यासाठी कात्रजपासून पुण्यात काळे वावरापर्यंत संगीन चिरेबंद नळ बांधून आणला.
2. नळ कसा बांधून आणला?
उत्तर : कात्रज तळ्यातील पाणी नळ बांधून पुण्यास न्यावे असा निर्णय झाल्यानंतर गवंडी, पाथरवट बोलावून नळाच्या कामासाठी जुंपण्यात आले. कात्रजपासून पुण्यात काळे वावरात नळ येईपर्यंत संगीन चिरेबंद नळ बांधून आणला. तो असा बांधला होता की त्या बळातून कात्रजपासून काळेवावर पर्यंत घोड्यावर बसून स्वार व्हावा. असा संगीन चिरेबंद नळ बांधून आणला.
3. शनिवारवाडा बांधलेल्या गवंड्यावर श्रीमंत प्रसन्न का झाले?
उत्तर : शनिवारवाडा बांधलेल्या गवंड्यांनी श्रीमंत एवढा मोठा वाडा बांधताहेत म्हणजे ते बाहेरून नवे पाणी वाड्यात आणतील असा विचार करून त्यांनी बांधकामाच्या वेळीच गणेश दरवाज्याजवळील बुरुजामध्ये बाहेरून आणलेले पाणी साठविण्यासाठी हौद तयार करून ठेवला होता. आणि ज्यावेळी खरोखरच बाहेरून पाणी आणल्यानंतर ते आत कसे घ्यायचे याची गवंड्यांकडे चौकशी केल्यावर त्यांनी अगोदरच सोय करून ठेवल्याचे सांगितले त्यामुळे श्रीमंत गवंड्यांवर प्रसन्न झाले व त्यांनी गाव इनाम दिला.
प्र. 4. खालील प्रश्नांची प्रत्येकी सात-आठ वाक्यात उत्तरे लिहा.
1. कात्रजच्या तळ्यातील पाणी शनिवारवाड्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन करा.उत्तर : शनिवारवाड्यातील पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी कात्रजच्या तळ्याची निवड होण्यापूर्वी श्रीमंतांनी स्वत: त्या तळ्यातील पाण्याचा अंदाज घेतला. त्या उन्हाळ्याच्या दिवसात त्या पाण्याला दहा पाच मोटा अखंड अहोरात्र आठ दिवसापर्यंत चालवून पाहिल्या परंतु तसूभरही पाणी कमी झाले नाही. तेव्हा त्यांनी येथूनच पाणी घेऊन जाण्याचा बेत केला.हे पाणी नळ बांधून पुण्यास न्यावे असे ठरविल्यानंतर गवंडी, पाथरवट बोलावून नळाच्या कामासाठी जुंपण्यात आले. कात्रजपासून पुण्यात काळे वावरात नळ येईपर्यंत संगीन चिरेबंद नळ बांधून आणला. तो असा बांधला होता की त्या बळातून कात्रजपासून काळेवावर पर्यंत घोड्यावर बसून स्वार व्हावा. तो नळ पुढे लहान करण्यात आला. तेथून गणेश बुरुजातील खजिन्यात ते पाणी सोडून वाड्यात पाणी खेळविण्यात आले.
2. शनिवारवाड्यात कायमस्वरूपी पाणी मिळविण्याकरिता कात्रजच्या तळ्याची निवड श्रीमंतानी का केली ?
उत्तर : शनिवारवाड्याची निर्मिती मजबूत झालेली असली तरी आत चांगले पिण्यायोग्य पाणी नव्हते त्यासाठी श्रीमंतांनी पुण्यासभोवती कारकूनांना पाणी पाहण्यासाठी पाठविले. त्यांनी कात्रजच्या तळ्यातून पाणी पुरवठा होईल असे सांगितल्यावर श्रीमंत स्वत: कात्रजला गेले. वाड्याला कायमस्वरूपी पाणी मिळावे त्यात उन्हाळ्यात खंड पडू नये यासाठी त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसातच कात्रजच्या तळ्यातील पाण्याचा अंदाज घेतला. त्या दिवसात त्या पाण्याला दहा पाच मोटा अखंड अहोरात्र आठ दिवसापर्यंत चालवून पाहिल्या परंतु तळ्यातील पाणी तसूभरही कमी झाले नाही. तेव्हा येथून पाणी घेऊन गेल्यास उन्हाळ्यातही पाण्याची कमतरता जाणवणार नाही असे जाणवल्यामुळे श्रीमंतानी कात्रजच्या तळ्याची निवड केली.
प्र. 5. संदर्भासह स्पष्ट करा.
1. ‘‘मग सरकारचे मर्जीस येईल ते खरे’’उत्तर : संदर्भ : सदर विधान ‘पेशव्यांची बखर’मधील ‘शनिवारवाड्यात कात्रजचे पाणी’ या पाठातील आहे. याचे लेखक कृष्णाजी विनायक सोहनी आहेत. हे वाक्य कारकूनांनी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना म्हटले आहे.
स्पष्टीकरण : शनिवारवाड्यासाठी पाण्याची सोय करण्यासाठी कात्रजकडे गेलेले कारकून जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी श्रीमंत नानासाहेबांना विनंती केली की, ‘‘कात्रजच्या तळ्यात पाणी मुबलक आहे ते पाणी उन्हाळ्यादेखील आटणार नाही असे आम्हाला कल्पनेने वाटते परंतु सरकारना (नानासाहेबांना) ते पसंत पडल्यावरच ते खरे.’’
2. ‘‘एवढा वाडा बांधतात ते पाणी बाहेरून नवे आणतील’’
उत्तर : संदर्भ : सदर विधान ‘पेशव्यांची बखर’मधील ‘शनिवारवाड्यात कात्रजचे पाणी’ या पाठातील आहे. याचे लेखक कृष्णाजी विनायक सोहनी आहेत. शनिवारवाडा बांधणाèया गवंड्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना म्हटले आहे.
स्पष्टीकरण : श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी पुण्यात मोठा शनिवारवाडा बांधला होता. त्यासाठी कायमची पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी कात्रजहून पाणी आणले परंतु वाड्याची संगीन तट चिरेबंदी असताना पाणी आत कसे आणायचे या संदर्भात वाड्याचे बांधकाम केलेल्या गवंड्यास बोलावून श्रीमंतांनी विचारले असता त्यांने सांगितले हा विचार पूर्वीच आम्ही करून ठेवला आहे. एवढा मोठा वाडा ते बांधतात म्हणजे ते नवे पाणी ते बाहेरून आणतील. याची सोय करून ठेवली आहे.
प्र. 6. खाली दिलेल्या उत्तरातून योग्य उत्तर निवडून लिहा.
1. वाडा कसा होता?अ) मजबूत ब) उंच क) रंगीत ड) संगीन
2. वाड्यात कोणती सोय नव्हती?
अ) दिवा-बत्तीची ब) बैठकीची क) भोजनगृहाची ड) पिण्याच्या पाण्याची
3. कातरजेच्या तळ्यात पाणी कसे होते?
अ) दुधासारखे ब) मुबलक क) स्फटिकासम ड) निळे निळे
4. आठ दिवसापर्यंत किती मोटा चालवून पाहिल्या?
अ) एक-दोन ब) सहा-सात क) दहा-पाच ड) चार-तीन
5. नळ केवढा मोठा होता?
अ) दहा फूट ब) माणूस जाईल असा क) घोड्यावर बसून स्वार यावा असा ड) तोफगोळा जाईल असा
उत्तरे : 1. अ) मजबूत 2. ड) पिण्याच्या पाण्याची 3. ब) मुबलक 4. क) दहा-पाच 5. क) घोड्यावर बसून स्वार यावा असा.
या संदर्भातील माहिती युट्यूब वर पाहण्यासाठी क्लिक करा CLICK ME
अ. खालील उतारा प्रमाण मराठीत लिहा.
ते दिवस उष्ण काळाचे. त्या काळी त्या पाण्याला दहा-पाच मोटा अखंड अहोरात्र आठ दिवसपर्यंत चालवून पाहिल्या, परंतु तसूभर कमी झाले नाही. त्या समयी श्रीमंतांची मर्जी प्रसन्न होऊन बेत झाला की, येथील पाणी नळ बांधून पाण्यास पुण्यास न्यावे.उत्तर : ते दिवस उन्हाळ्याचे होते. त्या दिवसामध्ये त्या पाण्याला पाच दहा मोटा अखंड अहोरात्रपणे आठ दिवसापर्यंत चालवून पाण्याचा उपसा केला परंतु त्यातील तसूभरही पाणी कमी झाले नाही. त्यावेळी श्रीमंतांनी खुष होऊन असा निर्णय घेतला की येथील पाणी भुयारी चिरेबंदी मार्गाद्वारे पुण्यास न्यावे.
प्रमाण मराठीत धड्याचा सारांश : वाडा मोठा मजबूत, बाहेरून तट दगडी चिरेबंदी होते. असे असतानाही वाड्यात पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. अशावेळी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या मनात असा विचार आला की, नवीन पाणी आत नळ (पाणी आणावयाचा भुयारी चिरेबंदी मार्ग) बांधून आणावे. त्यासाठी पुण्याच्या सभोवती चार चार, पाच पाच कोसावर पाणी पाहण्यासाठी कारकूनांना पाठविले. ते सर्वजण पाणी पाहून माघारी परतले. कात्रज गावाकडे गेलेल्या कारकुनांनी श्रीमंत नानासाहेब यांना विनंती केली की कात्रजच्या तळ्यात मुबलक पाणी आहे. ते पाणी उन्हाळ्यात देखील आटावयाचे नाही असे आम्हाला वाटते. परंतु आपल्याला पसंत पडल्यानंतरच त्यावर निर्णय होईल. त्यांची विनंती ऐकून स्वत: नानासाहेब पेशवे पाणी पहावयास निघाले. तेथे जाऊन सरकारानी (नानासाहेब) पाणी पाहिले. ते दिवस उन्हाळ्याचे होते. त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या पाण्याला पाच दहा मोटा अखंड अहोरात्रपणे आठ दिवसापर्यंत चालवून पाण्याचा उपसा केला परंतु त्यातील तसूभरही पाणी कमी झाले नाही. त्यावेळी श्रीमंतांना ते ठिकाण पसंत पडून त्यांनी असा निर्णय घेतला की येथील पाणी भुयारी चिरेबंदी मार्गाद्वारे पुण्यास न्यावे. यासाठी गवंडी, पाथरवट बोलावून नळाच्या बांधकामास प्रारंभ केला. कात्रजपासून पुण्यात काळे वावरात नळ येईपर्यंत संगीन चिरेबंद नळ बांधून आणला. तो पाण्याचा भुयारी चिरेबंदी मार्ग (नळ) असा बांधला होता की कात्रजपासून काळेवावरापर्यंत त्यातून घोड्यावर बसून स्वार यावा. पुढे तो लहान केला होता. परंतु वाड्यात पाणी कसे आणावयाचे असा प्रश्न निर्माण झाला. कारण वाड्याभोवती दगडी चिरेबंदी तट होता. त्यामुळे त्या वाड्याचे बांधकाम केलेल्या गवंड्यास बोलावून आणून त्याला विचारले की, पाणी वाड्यात आणावयाची आहे त्याची सोय (व्यवस्था) कशी करावी? तेव्हा गवंड्याने सरकारना (नानासाहेब पेशवे) सांगितले की याचा विचार आम्ही वाडा बांधताण्यापूर्वीच करून ठेवला आहे. एवढा मोठा वाडा बांधताहेत ते नक्कीच नवीन पाणी बाहेरून घेऊन येतील असा विचार करून आम्ही गणेश दरवाजाजवळ बुरुजामध्ये पाणी साठविण्यासाठीचा हौद (खजिना) तयार करून ठेवला आहे. हे ऐकताच श्रीमंत सरकार खूष झाले. तो हौद (खजिना) पाहून त्यांनी गवंड्यास गाव बक्षीस म्हणून दिले. मग पाणी आणून त्या हौदात सोडून संपूर्ण वाड्यामध्ये पाण्याची सोय केली.
No comments:
Post a Comment