Sunday, May 19, 2019

गोपाळकाला


कवी परिचय :
 प्रल्हाद शिवाजी बडवे  (1632-1730) एक साक्षात्कारी संत. पांडुरंगाच्या मंदिराच्या सभामंडपात पूर्वभागी त्यांची समाधी आहे. पांडुरंगाचे मुख्य पुजारी. त्यांनी पांडुरंगाच्या पूजेचे रोजचे उपचार वैदिक पद्धतीने सुरू केले. भक्तिवेदांतपर रचना खूप केली आहे. ‘अमृतानुभव’ ज्ञानेश्वरांच्या गं्रथाचे संस्कृत समश्लोकी रूपांतर केले आहे. त्यांचे मुख्य कर्तृत्व म्हणजे अफझलखानच्या स्वारीच्यावेळी पांडुरंगाच्या मूर्तीचे त्यांनी केलेले संरक्षण होय. आज त्यांची अकरावी पिढी असून आजही त्यांच्या घरी आळंदीला जाणाèया पालख्या त्यांना आमंत्रण देऊन आरती करून मगच पुढे जातात. त्यांनी एक काकड आरती लिहिली आहे.
मूल्य : भक्ती समानता
साहित्य प्रकार : पंडिती काव्य (ओवी)
संदर्भ ग्रंथ : वाचू आनंदे
शब्दार्थ आणि टीपा
गोपाळकाला-प्रत्येक गोपाळाची शिदोरी एकत्र करून वाटून घेणे; विश्वंभर-श्रीकृष्ण; भोज्य-जेवण, पदार्थ; परवडी-प्रकार; गोपहारी-गोपाळांची रांग; आथीपाथी-आतिथ्य; मिथ्या-खोटे, लटके; यदुपती-श्रीकृष्ण; उच्छिष्ट-उष्टे, कवळ-घास; गुरळी-चूळ; सूरश्रेणी-देवदेवता; घन-ढग; पाषाण-दगड, खडक, कातळ; वृक्ष-झाड; रुचती-आवडणे.

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. शिदोèया आणा असे कृष्ण कोणाला म्हणाला?
उत्तर : शिदोèया आणा असे कृष्ण सवंगड्यांना म्हणाला.

2. सवंगड्यांनी कशाच्या कावडी आणल्या?
उत्तर : सवंगड्यांनी दही दुधाच्या कावडी आणल्या होत्या.

3. गोपाळकाला कोठे मांडला होता?
उत्तर : गोपाळकाला विस्तीर्ण शिळेवर (खडकावर) मांडला होता.

4. गोकुळवासी स्त्रियांसाठी कोणता शब्द वापरलेला आहे?
उत्तर : गोकुळवासी स्त्रियांसाठी व्रजनारी हा शब्द वापरलेला आहे.

5. गोप-गोपींचा अतिथी कोण होता?
उत्तर : यदुपती (श्रीकृष्ण) हा गोप गोपींचा अतिथी होता.

6. गोपाळकाला म्हणजे काय?
उत्तर : प्रत्येक गोपाळाची शिदोरी एकत्र करून वाटून घेणे याला गोपाळकाला म्हणतात.

7. आकाशातून हा सोहळा कोण पहात होते?
उत्तर : आकाशातून देवदेवता हा सोहळा पहात होते.

प्र. 2.  प्रत्येक प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1. ते एकमेकांना कशा प्रकारे वाकुल्या दाखवितात?
उत्तर : गोपाळकाला करण्यासाठी एकत्र आलेले गोप एकमेकांना गुदगुल्या करून वाकुल्या दाखवित होते. लटके लटकेच गाई चुकल्या आहेत, दूर गेल्या आहेत लवकर उठा म्हणून आवई उठवित होते.

2. गोकुळाला धन्य का म्हटले आहे?
उत्तर : गोपाळकालाच्या निमित्ताने सारे गोप गोपिका एकत्र येऊन बसले होते. त्यांच्यामध्ये यदुपती बसला होता. या  श्रीकृष्णाचे आदरातिथ्य करून त्याच्या आवडीच्या गोष्टी त्याला अर्पण करीत होते. आपापसात  वाकुल्या दाखवत होते. शिदोरी चोरून खात होते. दाच विचकाऊन दाखवित होते. हे सारे आनंदी जीवन पाहून गोकुळाला धन्य म्हटले आहे.

3. हा सोहळा पाहण्यासाठी जमलेल्या देवांचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर : गोप गोपिकांच्या साथीत असलेल्या यदुपतीने मांडलेला गोपाळकाला पाहण्यासाठी आकाशात विमानात बसून देवदेवता आल्या आहेत. तेथून ते गोकूळातील हा काला आपल्या नजरेत सामावून घेत आहेत. तेथून ते त्यांच्यावर दिव्य सुमनांचा वर्षाव करीत आहेत. असे आनंदी जीवन जगणाèया गोकुळवासीयांना ते धन्यवाद देत आहेत. येथील वृक्ष, पाषाण, इथल्या स्थानालाही ते धन्य धन्य म्हणून गौरवित आहेत.


प्र. 3. खालील प्रश्नांची प्रत्येकी सात-आठ वाक्यात उत्तरे लिहा.

1. श्रीकृष्ण व सवंगड्यांच्या भोजनाचे वर्णन करा.
उत्तर : श्रीकृष्ण व सवंगडी सारेजण एकत्र भोजनासाठी एकत्र आले आहेत. आज विश्वंभर कृष्ण आपणास खूप भूक लागली आहे शिदोèया लवकर आणा म्हणून आपल्या सवंगड्यांना सांगत आहे. सवंगड्यांनीही आज वेगवेगळे पदार्थ आपल्या शिदोरीमधून आणले आहेत. ते पदार्थ ते तातडीने घेऊन येतात. काहीजणांनी कृष्णाला आवडणाèया दही दुधाच्या कावड्याही आणल्या आहेत. एक विस्तीर्ण शिळा पाहून सारे जण गोपाळाभोवती बसले आहेत. एकीकडे सारे गोप तर दुसरीकडे गोपिकांची रांग आहे. त्यांच्यामध्ये सावळा कृष्ण शोभून दिसत आहे. ते सवंगडी श्रीकृष्णाच्या आवडीचे पदार्थ त्याला अर्पण करीत आहेत. काहीजण चोरून शिदोरी खात आहेत. साèयांनी लोणी खाल्ले आहे. त्यामुळे लोण्यांनी त्यांची तोंडे माखली आहेत. ताकाच्या चूळा  ते एकमेकावर मारीत आहेत..

2. श्रीकृष्णाचे आदरातिथ्य गोपगोपिकांनी कसे केले ?
उत्तर : एका विस्तीर्ण खडकावर शिदोरी सोडून सारे गोप गोपिका कृष्णाच्या भोवती बसले आहेत. एका बाजूला गोपाळांची रांग आहे तर दुसèया बाजूला व्रजनारी बसल्या आहेत. तेथे त्यांनी गोपाळकाला (प्रत्येक गोपाळाची शिदोरी एकत्र करून वाटून घेणे ) मांडला आहे. हे सवंगडी हे यदुपती आम्ही तुझे आतिथ्य करू असे कृष्णाला सांगून त्याला जे जे आवडते ते त्यांनी देवू केले आहे. कृष्णाला अतिशय प्रिय असलेल्या दही दुधाच्या कावड्याही त्या सवंगड्यांनी  आणल्या आहेत. लोणीही त्यांनी आणले आहे. ते खाल्ल्यामुळे साèयांची मुखे माखून गेली आहेत.

प्र. 4. जोड्या जुळवा 

       ब
1. श्रीकृष्ण         अ) Ÿधन्य ते स्थान
2. गोप ब) विमानातून सोहळा पाहतात
3. सूर क) दही दुधाच्या कावडी आणतात
4. गोकूळ ड) शिदोèया आणण्याची आज्ञा देतो
उत्तर :     ब
1. श्रीकृष्ण          अ) Ÿशिदोèया आणण्याची आज्ञा देतो
2. गोप ब) दही दुधाच्या कावडी आणतात 
3. सूर क) विमानातून सोहळा पाहतात
4. गोकूळ ड) धन्य ते स्थान

प्र. 5. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. एकमेकांना ...................... दाखवितात.

2. जे जे ज्या रुचीतीŸ। ते ते ................ कृष्णमुखी

3. दात ..................... दाखवितात.

उत्तरे : 1. वाकुल्या  2. अर्पिती  3. विचकोनी


कवितेचा सारांश :

 विश्वंभर म्हणजे श्रीकृष्णाने साèयांना आज्ञा केली लवकर आपल्या शिदोèया घेऊन या. आज खूप उशीर झाला आहे त्यामुळे भूकसुद्धा खूप लागली आहे. जेवणाचे वेगवेगळे पदार्थही त्याचे सवंगडी तातडीने घेऊन येतात. आणि कृष्णाला अतिशय प्रिय असलेल्या दही दुधाच्या कावडी त्यांनी आणल्या आहेत. एक मोठासा खडक पाहून त्याच्यावरती सारे गोपाळ एकत्र येऊन बसले. त्यांच्या मध्यभागी बसलेला घनसावळा श्रीकृष्ण उठून दिसत होता. त्या साèयांनी गोपाळकाला (प्रत्येक गोपाळाची शिदोरी एकत्र करून वाटून घेणे) मांडला. सारेजण खडकावर  शिदोèया सोडून बसले. एकीकडे गोपाळांची रांग होती तर दुसरीकडे गोकुळातील स्त्रिया (व्रजनारी) म्हणजेच गोपी बसल्या होत्या. त्यांच्या समोर हरी सगळ्यांसोबत बसला होता. काही सवंगडी त्याला म्हणत होते यदुपती (श्रीकृष्ण) आम्ही तुझे आतिथ्य करू, पाहुणचार करू. असे म्हणून त्यांनी आपल्या शिदोèयामधून जे जे पदार्थ आणले होते व जे कृष्णाला आवडत होते ते त्याला अर्पण करीत होते. काही सवंगडी एकमेकांना गुदगुल्या करीत होते. काहीजण वाकुल्या दाखवित होते. मध्येच कोणीतरी गाई चुकल्या आहेत. दूर गेल्या आहेत लवकर उठा म्हणून खोटे खोटे आवई उठवित होते. काहीजण एकमेकाची नजर चुकवून चोरून शिदोरी खात होते. एक तर ती घेऊन पळत होता व दाच विचकावून दाखवित होता.  कौतुकाने लोणी खाल्ल्यामुळे त्या एकमेकांची मुखे लोण्यांनी माखून गेली होती. ताकाच्या चूळा ते एकमेकावर मारीत होते. आकाशात विमानात बसून सारे देवदेवता आपल्या नजरेने हा गोपाळकाला पाहात होते.त्यांच्यावर दिव्य सुमनांची पुष्पवृष्टी करीत होते. आणि ज्याठिकाणी असे जीवन नांदले जात आहे ते गोकूळजन धन्य आहेत. तेथील वृक्ष, पाषाण धन्य आहेत म्हणून धन्यवाद देत होते. 

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024