Sunday, May 19, 2019

आलोकाबाईस पत्र


लेखक परिचय : 


संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव ढेबुजी झिंगरानी जानोरकर. अमरावती जिल्ह्यातील शेणगाव हे त्यांचे जन्मगाव. वडिलांचे निधन लवकर झाल्याने घरची जबाबदारी ढेबुजीवर पडली. त्यांचे बालपण अतिशय गरिबीत गेला. ते शेती करू लागले. त्याचवेळी शिक्षणापेक्षा त्यांचे मन भक्तीकडे ओढ घेऊ लागले. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती केली. समाजातील दैन्यावस्था, अंधश्रद्धा, रूढी यात बुडालेल्या समाजाचा उद्धार करावा हे त्यांनी निश्चित केले. वृद्धाश्रम, दवाखाने, शिक्षण संस्था व विधवाश्रमही सुरू केले. ग्राम स्वच्छतेवर त्यांचा भर होता. म्हणून ते कायम झाडू हाती बाळगत. त्यांनी अन्नछत्रे घातली. भंडारे (प्रसाद) आयोजित केले. पण स्वत:साठी भाकरी भिक्षा मागूनच खाल्ली. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले आहे.
पत्राची भाषा गाडगेबाबांची असली तरी गाडगेबाबा हे निरक्षर असल्याने गुरुदास ढेमरे यांनी हे पत्र लिहिले आहे.  हे पत्र 29 फेब्रुवारी 1940 रोजी पाठविले आहे.

मूल्य : स्वार्थत्याग
साहित्य प्रकार : पत्र
संदर्भ ग्रंथ : श्री संत गाडगे महाराज - डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर (श्री स्वामी महाराज दीपावली विशेषांक 1987)
मध्यवर्ती कल्पना : गोरक्षणाच्या इमारतीत राहणारी गाडगे महाराजांची कन्या आलोकाबाई व जावई पाहुणेबोवा (फकीरराव) यांच्या मनात स्वार्थ निर्माण झाला. हे समजल्यावर मुलीची कान उघाडणी करण्यासाठी गाडगेबाबानी हे पत्र लिहिले आहे.

स्वाध्याय

प्र. 1. खाली दिलेल्या चार पर्यायातून योग्य उत्तर निवडून लिहा.

1. आलोकाबाई या गाडगे महाराजांच्या कोण होत्या?
अ) बहीण ब) पत्नी क) मुलगी ड) आई

2. तुला ........... याचे भूत लागले असे गाडगेबाबा म्हणतात.
अ) पैशाचे ब) खाण्याचे क) पाण्याचे ड) कपड्यांचे

3. गोरक्षणाचे व्यवस्थापक कोण होते?
अ) पाहुणेबोवा ब) गाडगेबाबा क) दादा ड) वासुदेव

4. कबीराच्या मुलाचे नाव .............. होते. 
अ) रहीम ब) कमाल क) जमाल ड) कलाल

उत्तरे : 1. क) मुलगी   2. अ) पैशाचे   3. क) दादा   4. ब) कमाल

प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

1. आलोकाबाईंच्या मुलाचे नाव काय?
उत्तर : आलोकाबाईंच्या मुलाचे नाव वासुदेव होते.

2. गाडगेबाबांनी दादांना काय सांगण्यास सांगितले आहे?
उत्तर : पाहुणेबोवाचे दोन रुपये बंद करा. त्याला धर्मशाळेत कामाला ठेवू नका, काही देवू नका. असे गाडगेबाबांनी दादांना सांगण्यास सांगितले आहे.

3. साधूच्या घरातील माणसे कशी असतात?
उत्तर : साधूच्या घरातील माणसे उदार असतात.

4. कबीरांनी संतांना कसे जेवू घातले?
उत्तर : कबीराने बाईला वाण्याच्या घरी गहाण ठेवले व संताना जेवू घातले.

3. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. तू मेल्याशिवाय ............... निघणार नाही.

2. दादांचे नाव .................. होते.

3. कर साहिबकी .................. और भुकेकू कुछ दे.

4. गाडगेबाबांजवळ बारा आणे त्याग असेल तर आलोकाबाईकडे ................ त्याग असावयास पाहिजेत.

उत्तरे : 1. ते भूत  2. अच्युतराव देशमुख   3. बंदगी   4. एक रुपया


प्र. 4. जोड्या जुळवा 

अ.
1. दादा 1. आलोकाबाईंचा पती
2. वासुदेव 2. कबीरपुत्र
3. आलोकाबाई 3. आश्रमाचे व्यवस्थापक
4. पाहुणेबोवा 4. आलोकाबाईंचा मुलगा
5. कमाल 5. गाडगेबाबांची मुलगी
उत्तर : अ.
1. दादा 1. आश्रमाचे व्यवस्थापक
2. वासुदेव 2. आलोकाबाईंचा मुलगा
3. आलोकाबाई 3. गाडगेबाबांची मुलगी
4. पाहुणेबोवा 4. आलोकाबाईंचा पती
5. कमाल 5. कबीरपुत्र

प्र. 5.  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन-तीन वाक्यात लिहा.

1. पाहुणेबोवांना पोलिसाच्या ताब्यात देण्याची शक्यता का होती?
उत्तर : पाहुणेबोवा कोणालाही न विचारता धर्मशाळेमधील खोलीतील सामान काढून खोलीत घुसले होते. त्यामुळे पाहुणेबोवांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची शक्यता होती.

2. गोरक्षणाच्या लोकांचे प्रेम संपादन करण्यासाठी आलोकाबाईनी कसे वागण्याचा सल्ला गाडगेबाबांनी दिला?
उत्तर : गोरक्षणाच्या लोकांचे प्रेम संपादन करण्यासाठी आलोकाबाईना तेथे न राहण्याचा सल्ला गाडगेबाबांनी दिला.

प्र. 6. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी चार-पाच वाक्यात लिहा.

1. साधुच्या घरातील माणसे उदार असतात हे सांगण्यासाठी गाडगेबाबांनी कोणती उदाहरणे दिली आहेत?
उत्तर : साधुच्या घरातील माणसे उदार असतात हे सांगण्यासाठी गाडगेबाबांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. संत तुकाराम महाराज उदार होते तसेच त्यांची मुलेही उदार होती. संत कबीर उदार होता. तसेच त्यांचा मुलगा कमाल व त्यांची बायकोही उदार होती. संत कबीराने तर संताना जेवू घालण्यासाठी आपल्या बायकोला वाण्याच्या घरी गहाण ठेवले होते.  कबीराने तर आपल्या मुलाला साहेबाची चाकरी कर परंतु भूक लागलेल्याला काहीतरी खायला दे असा धर्म सांगितला होता.

2. ‘आलोकाबाईस पत्र’ या पाठावरून गाडगेबाबांचा स्वभाव कसा होता हे स्पष्ट करा.



उत्तर : गाडगेबाबा हे निरपेक्षवृत्तीने काम करणारे संत होते. स्वत: स्थापन केलेल्या धर्मशाळेतील वस्तूसुद्धा स्वत:ला घेता येऊ नये असे ट्रस्ट त्यांनी बनवून ठेवले होते. लालची होऊन काही मिळविण्यापेक्षा आपण इतके काम केले पाहिजे की लोकांनी आम्हाला ते आपणहून देवू केले पाहिजे असे त्यांना वाटे.  आपण उदार होऊन महारोगी, आंधळ्या-पांगळ्या, भुकेल्यांना खायला दिले पाहिजे. त्यांना जुनापुराणा कपडा देवू न त्यांना दोन आणे देवू केले पाहिजे अशी त्यांची वृत्ती होती.  आपल्यापेक्षा आपल्या मुलांनी अधिक उदार झाले पाहिजे, त्यागी असले पाहिजे असे त्यांना वाटे.  इतर गोष्टींचा लोभ धरू नये. पैशाचे भूत लावून घेऊ नये. गाडगेबाबांचे (म्हणजे स्वत:चे) नाव सांगून आपल्या मुलीने कोणाकडे मदत मागू नये व देणाèयांनीही ती देवू नये असे त्यांना वाटे. म्हणजेच भौतिक गोष्टींचा त्याग त्यांनी केला होता असे आपणास दिसते. आपल्या कुटुंबीयांच्या वैयक्तिक सुखापेक्षा समाजातील दीनदुबळ्या लोकांची त्यांनी अधिक काळजी वाहिली. 



या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा .... 


No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024