लेखक परिचय :
संत कान्होपात्रा : महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तापैकी कान्होपात्रा या एक होत. त्यांचा कालावधी पंधराव्या शतकाचा आहे. त्यांचा जन्म पंढरपूर जवळील मंगळवेढा या गावी शामा नावाच्या कलावंतीणीच्या पोटी झाला. शामाला वाटे आपल्या मुलीनेही आपल्या प्रमाणेच व्यवसाय करावा. पण कान्होपात्रेस ते आवडत नव्हते. तिने विठ्ठल दर्शनाचा ध्यास घेतला होता. एकूण 23 अभंग लिहिले असून त्यामध्ये विठ्ठल भक्तीची ओढ दिसून येते.
मूल्य : भक्ती
साहित्य प्रकार : प्राचीन काव्य.
संदर्भ ग्रंथ : सकळ संत गाथा
मध्यवर्ती कल्पना : विठ्ठल भक्तीची ओढ दिसून येते.
शब्दार्थ आणि टीपा
वैकुंठ-विष्णूचे निवासस्थान; राया-राजा; सखया-मित्रा; अगा-अरे; वसुदेवनंदन-श्रीकृष्ण (इथे पांडुरंग); कांता-पत्नी; राखी-वाचव,रक्षण कर.
टीप :
कलावंतीण-गाणे गाऊन लोकांचे मनोरंजन करणारी स्त्री.
स्वाध्याय
प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. वैकुंठीचा राया कोण आहे?उत्तर : वैकुंठीचा राया विठ्ठल आहे.
2. पुंडलिकास वर देणारा कोण आहे?
उत्तर : पुंडलिकास वर देणारा विठ्ठल आहे.
3. रखुमाईचा कांत कोण आहे ?
उत्तर : रखुमाईचा कांत विठ्ठल आहे.
प्र. 2. खालील प्रश्नाचे उत्तर पाच-सहा वाक्यात लिहा.
1. वरील कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.उत्तर : कान्होपात्रेचा जन्म शामा नावाच्या कलावंतीणीच्या पोटी झाला. शामाला वाटे आपल्या मुलीनेही आपल्या प्रमाणेच व्यवसाय करावा. पण कान्होपात्रेस ते आवडत नव्हते. तिने विठ्ठल दर्शनाचा ध्यास घेतला होता. ती विठ्ठलाचा धावा करताना म्हणते अरे वैकुंठीच्या राजा, अरे विठ्ठल माझ्या मित्रा, अरे नारायणा, अरे वसुदेवनंदना (श्रीकृष्ण), अरे पुंडलिक वरदा (पुंडलिकास वर दिलेला) अरे विष्णू तू गोविंदा, अरे रखुमाईच्या पती तूच आता या कान्होपात्राचे रक्षण कर. असे म्हणून ती विठ्ठलाचा धावा करीत आहे. विठ्ठल भक्तीची ओढ दिसून येते. तसेच संकटाच्यावेळी संकटमोचक म्हणून हा विठ्ठलच मदत करू शकतो असे तिला वाटते
No comments:
Post a Comment