Sunday, May 19, 2019

संत वाणी ऐसे केले या गोपाळे


लेखक परिचय : 
शेख महमद : वारकरी पंथातील हे एक कवी होत. संत एकनाथांचे समकालीन. नगर जिल्ह्यातील रुईबाहिरे हे यांचे मूळ गाव. जन्माने इस्लामधर्मीय परंतु वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाले आणि काव्य रचना करू लागले. ‘योगसंग्राम’ हा त्याचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे.

मूल्य : भक्ती
साहित्य प्रकार : प्राचीन काव्य.
संदर्भ ग्रंथ : योगसंग्राम
मध्यवर्ती कल्पना : वरवर दिसणाèया भेदापेक्षा अंत:करणात असणारी ज्ञाननिष्ठा, निर्मळ भक्तीभावना होय असे सांगणारा हा अभंग आहे.

शब्दार्थ आणि टीपा 
सोवळे-शुद्ध, पवित्र; ओवळे-अशुद्ध, अपवित्र; वरूचा-वरून; जीवन-पाणी; अविंध-मुसलमान; केतकी-केवडा 

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. गोपाळाने काय केले?
उत्तर : गोपाळाने ओवळे सोवळे पाहिले नाही.

2. केतकीच्या झाडात काय जन्मते?
उत्तर : केतकीच्या झाडात केवडा जन्मतो.

प्र. 2.  खालील प्रश्नाचे उत्तर तीन-चार वाक्यात लिहा.

1. आपण अविंध असूनही पांडुरंगाची भक्ती करतो हे दाखविण्यासाठी शेख महमंदानी कोणती उदाहरणे दिली आहेत?
उत्तर : आपण अविंध असूनही पांडुरंगाची भक्ती करतो हे दाखविण्यासाठी शेख महमंदानी अनेक उदाहरणे दिली आहेत. केतकीच्या झाडाला अनेक काटे असतात परंतु त्या झाडाच्या आत केवड्याचा जन्म होतो. फणसाला बाहेरून अनेक काटे असतात परंतु आत रसाळ असे गरे असतात. नारळ वरून कठीण असतो परंतु त्याच्या आत गोड पाणी असते. तसेच शेख महंमद हा वरून जातीने अविंध (मुसलमान) आहे. परंतु त्याच्या हृदयात मात्र सदैव गोविंद वास करून आहे.

कवितेचा सारांश : 

शेख महंमद हे जन्माने इस्लामधर्मीय होते परंतु वारकरी संप्रदायाने प्रभावित होऊन ते काव्य रचना करू लागले होते. या अभंगातून त्यांनी वरून दिसणाèया भेदापेक्षा अंत:करणातील निर्मळ भक्तीभावना महत्वाची आहे हे सांगितले. भक्ती करण्यासाठी ओवळे सोवळे पाळले पाहिजेत असे काही नाही. कारण या गोपाळाने (विठ्ठलाने) ओवळे सोवळे पाहिले नाही. तर भक्ताच्या मनातील भक्तीची निष्ठा पाहिली आहे. जसे वरून पाहिला गेले तर केतकीच्या झाडाला अनेक काटे असतात. परंतु  त्या झाडाच्या आतच केवड्याचा जन्म होतो. फणसालाही बाहेरून अनेक काटे असतात परंतु त्याच्या आत रसाळ असे गरे असतात. जे आपले पोट तृप्त करतात. कवीने यालाच अमृताचे साठे असे म्हटले आहे.  तसाच नारळ वरून कठीण असतो परंतु त्याच्या आत गोड पाणी असते. आपली तृष्णा भागविणारे ते जीवन असते त्याचप्रमाणे हा  शेख महंमद हा वरून जातीने अविंध (मुसलमान) आहे. परंतु त्याच्या हृदयात मात्र सदैव हा  गोविंद वास करून आहे. तो त्याचीच भक्ती करीत असतो. त्यामुळे भक्त कोणत्या जाती धर्माचा आहे हे महत्त्वाचे नाही तर त्याच्या अंत:करणातील भक्ती महत्त्वाची आहे. तीच भगवंताच्या दृष्टीने महत्त्वाची असते असे कवीला सांगायचेआहे.

No comments:

Post a Comment